असूनी दोस्त करितो दुष्मनी

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
5 Aug 2008 - 10:04 pm

(अनुवादीत. कवी--समीर)

केला आहे दुष्टपणा दुष्टानी
केले तरी कुठे कमी दोस्तानी
येतो काळ आसाही जीवनी
असूनी दोस्त करितो दुष्मनी

लागे दोस्तीला कुणाची नजर
बदल होता तुला नसे ती खबर
नाही राहिल्या आणा अन शपथा
साथ साथ मरण्याचा एकही इरादा
दौलतीला राहती सर्वस्व मानूनी
येतो काळ आसाही जीवनी
असूनी दोस्त करितो दुष्मनी

प्रीतिचा लवलेश नसे तुझ्या नयनी
मित्र होऊनी अर्थ मैत्रीचा घे समजूनी
दौलत कसली कसली दोस्ती
नाती गोती सर्वच नावा पुरती
पश्चातापे जे होईल ते अनुभवूनी
सच्चाईचा मार्ग ही अंगिकारूनी
असूनी दोस्त करितो दुष्मनी

श्रीकृष्ण सामंत

कविता

प्रतिक्रिया

रेवती's picture

5 Aug 2008 - 11:58 pm | रेवती

येते. आपण गैर्समज करुन घेतो, कधीतरी गैरसमजास करणीभूत ठरतो, तर कधि समोरच्या माणसाच्या गरजा बदलतात. आपणही वेळेनूसार बदलतोचकी त्यावेळी ही कविता आपले मित्र म्हणत असतील. आपण वयाने व अनुभवाने ज्येष्ठ आहात, चूकत असल्यास सांगावे.

रेवती

श्रीकृष्ण सामंत's picture

6 Aug 2008 - 1:08 am | श्रीकृष्ण सामंत

रेवतीजी,
आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे.वरिल कवितेत एक दोस्त दुसर्‍या दोस्ताला उद्देशून म्हणतो.पण हा त्या दोस्ताचा त्याच्या पुरता अनुभव असेल.आणि माझा मित्रही मला तसं म्हणूही शकेल.प्रत्येक वादाला दोन बाजू असतात.आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com