माझाच चंद्र
सतत हरवतो
तुझ्या आभाळी
कोसळणारे
गढूळ धबधबे
कडेकपारी
झडणारा मी
वसंत टपटप
अश्रूंमधला
ओळी कातर
उल्लेख पानभर
व्याकुळ शाई
बंद पापण्या
तवंग मणभर
साचवलेले
हिरव्याकंच
जखमांचे वैभव
मन शेवाळी
बेलाशेठ लिहिते झाले म्हणून उत्सुकतेने वाचली, आवडली. पण बेलाशेठ कधीपासून परत लिहायला लागले म्हणून शोधलं, तर पोकळी आणि दाखला या दोन यावर्षीच लिहिलेल्या कविता सापडल्या, त्या आधिक आवडल्या. वेलकम बॅक, बेलाशेठ, आता चालू ठेवा लिहिणं.
प्रतिक्रिया
14 Oct 2014 - 12:31 am | मुक्त विहारि
हे नक्की काय आहे?
फक्त शेवटचे थोडे फार कळाले...असे वाटत आहे....
"हिरव्याकंच जखमांचे वैभव मन शेवाळी"
14 Oct 2014 - 1:59 am | अत्रुप्त आत्मा
सुं.........................................दर!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
14 Oct 2014 - 2:00 am | बहुगुणी
बेलाशेठ लिहिते झाले म्हणून उत्सुकतेने वाचली, आवडली. पण बेलाशेठ कधीपासून परत लिहायला लागले म्हणून शोधलं, तर पोकळी आणि दाखला या दोन यावर्षीच लिहिलेल्या कविता सापडल्या, त्या आधिक आवडल्या. वेलकम बॅक, बेलाशेठ, आता चालू ठेवा लिहिणं.
14 Oct 2014 - 5:05 am | प्रकाश१११
सुरेख
14 Oct 2014 - 5:38 am | यशोधरा
आवडली!
14 Oct 2014 - 3:12 pm | कवितानागेश
"हिरव्याकंच जखमांचे वैभव मन शेवाळी" :)
14 Oct 2014 - 3:30 pm | सूड
एकच नंबर!!
14 Oct 2014 - 6:57 pm | पैसा
सुरेखच लिहिलंय!
14 Oct 2014 - 10:03 pm | मुक्त विहारि
मला पण समजावून सांगा...
15 Oct 2014 - 9:10 pm | तिमा
बे.ला. लिहायला लागले. कविता आवडली.
कविता समजावून सांगायची नसते. आपापल्या अनुभवांशी ताडून बघायची असते. खुणा जुळल्या की कविता आवडते.