त्या गेंड्याची दोन पावले - (विडंबन)

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
13 Oct 2014 - 11:08 am

'
(चाल - या डोळयांची दोन पाखरे ..)

त्या गेंड्याची दोन पावले,
फिरतील तुमच्या भवती -
पाठलाग ती सदैव करतील,
फक्त मताच्यासाठी .....

वर्तन तुमचे, हात असे हो
त्या गेंड्याचा थारा
सहवासातून हवाच त्याला,
नित्यच तुमचा नारा
तुमचा परिचय त्यास हो आंदण,
बिलकुल मताचसाठी ..

भाव देतही असतील काही,
पैसा अडक्यातुनी
एका मताचसाठी तुमचे
धरतील कर दोन्ही
आहेत डोळे, क्षणैक प्रीती,
ते तर खुर्चीवरती ..
.

अद्भुतरसविडंबन

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

13 Oct 2014 - 11:15 am | खटपट्या

आवडली !!

स्वामी संकेतानंद's picture

13 Oct 2014 - 12:40 pm | स्वामी संकेतानंद

आवडेश!

प्रकाश१११'s picture

14 Oct 2014 - 5:06 am | प्रकाश१११

छान

पैसा's picture

14 Oct 2014 - 11:51 pm | पैसा

=))

मुक्त विहारि's picture

15 Oct 2014 - 12:03 am | मुक्त विहारि

मस्त

अत्रुप्त आत्मा's picture

15 Oct 2014 - 12:16 am | अत्रुप्त आत्मा

लै झ्याक!

विदेश's picture

15 Oct 2014 - 12:20 pm | विदेश

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार !

हरकाम्या's picture

16 Oct 2014 - 11:00 pm | हरकाम्या

प्रतिक्रिया देण्यासाठी " योग्य " शब्द सापडले नाहीत.

विदेश's picture

17 Oct 2014 - 1:44 pm | विदेश

दोन पायांचा गेंडा ..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Oct 2014 - 4:37 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आवडेश. बाकी चार पायाचे गेंडे साधे सज्जन असतात म्हणे. =))