(अनुवादीत. कवी--अनामिक)
केशभार असा सोडून
नको बागेत येऊस
फुलांच्या सावल्यांना
नको लज्जीत करूस
प्रेमाचे गुणगान
नको तू ही गाऊस
गीताचे भ्रमराकडून
नको हंसे करून घेऊस
प्रेमाचे भ्रमराला
असे कसले ज्ञान
मी काय सांगू?
कळ्यानांच तू विचार
लफंगा असे हा भूंगा
शिकवील तो मग तुला
त्याचीच नकली कला
अन घेशील नंतर
तूं माझाच पंगा
शोभे न तुला
हे असे बोलणे
पावित्र्य प्रेमाचे
असे विटवीणे
देशी का मज
तू साथ तिथे
हे क्षीतज जिथे
पूरे पूर्ण झुकते
येईन मी ही
तुझ्या संगती
नको वाटेत होऊस
तू कधी वेगळा
प्रेम आपुले पाही
हा जमाना सगळा
श्रीकृष्ण सामंत