AN ODE TO मिसळपाव ! द्वितीय पुष्प

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
1 Oct 2014 - 4:20 pm

मिपा बोधिवृक्षकारांनो…वृक्षाची जोपासना करणार्यांनो …. सर्व स्वयंभू देवस्थानांनो ….खालसा आणि स्वायत्त संस्थानांनो …. अखंड धुनी पेट्व्यानो…त्यात अविरत तेल ओतणाऱ्यानो …. सतत खल करणार्यांनो …. अविश्रांत गूळ काढणार्यांनो… तळ्यात- मळ्यात खेळणाऱ्यानो… विरोधासाठी विरोध करणाऱ्यानो…

खरडफळा भरणाऱ्यानो…कळफलक बडवणार्यांनो…दुर्गभ्रमंती करणार्यांनो… खाद्यचौकशी करणार्यांनो … अनुभवसमृद्ध काकांनो आणि सर्वगुणसंपन्न ताईन्नो…. फक्त किल्ली फिरवणार्यांनो…. सतत खिल्ली उडवणार्यांनो…. "विदा"रक परिस्थिती आणणार्यांनो… सुधारक विचार मांडणार्यांनो…
उत्साही धागाकर्त्यानो….त्यांचे पतंग बधण्याआधी कापणार्यानो…एकटेच पतंग उडवणाऱ्यानो….वातावरण तंग करणाऱ्यानो…

वैचारिक दंगल उसळवणार्यांनो… दंगलीत फक्त दगडफेक करणार्यांनो….दंगल शांत करणार्यांनो …विषयावर पाणी टाकणाऱ्यानो….उद्याच्या फुलपाखरांनो …. आजच्या सुरवंटानो…फटाका लावून पळणाऱ्यानो…. फटाक्यामुळे भाजणाऱ्यानो…. शाब्दिक गोळीबार करणार्यांनो….भावनिक संततधार सोडणार्यांनो….

देशोदेशीच्या समुद्रातल्या माशानो … आपल्याच विहिरीतल्या मंडूकांनो…. मतांच्या पिंका टाकणाऱ्यानो… येता जाता लिंका टाकणाऱ्यानो… मूक आयडीच्या रोपटानो… कंठ फुटलेल्या पोपटानो….पोटाची भूक भागवणार्यांनो… बौद्धिक भूक जागवणार्यांनो…

रसग्रहण करणाऱ्या भून्ग्यांनो … डोक्याला आलेल्या मुन्ग्यांनो …. बुंदी आणि जिल्बी पाडणाऱ्या हलवायांनो …जिल्बीची मागणी करणाऱ्या गिर्हैकांनो ….लिहिण्यासाठी धडपडणार्यनो…. चमकण्यासाठी लिहिणार्यांनो… मिपा बंद असल्यास सैरभैर होणार्यांनो …. अगदीच नाईलाज म्हणून मग काम करणार्यांनो ….

शेवटच्या बाकावरच्या टवाळानो… पहिल्या बाकावरच्या स्कोलरानो …. सगळीकडे पैलेच पोच्णार्यांनो … सतत इतरांना टोचणार्यानो…. नवागतांची रेवडी उडव्णार्यांनो … गप्पांची चावडी उघड्नार्यांनो …. सगळं माहित असूनही न बोलणार्यानो… काहीच माहित नसूनही कोकल्णर्यानो…

प्रत्येक घडामोडीची माहिती ठेवणार्यानो…. काहीही नवीन अनुभवताना इतर मिपाकरांची आवर्जून आठवण काढणाऱ्या मित्रांनो ….जालीय समाजकंटकांनो… स्वयंघोषित नैतिक पोलीसानो …सदाशिवपेठी अर्कांनो … तरुण आणि तुर्कांनो … अन्यायाला वाचा फोडणाऱ्यानो… नुसतेच वचावचा बोलणार्यानो….

गूढ प्रकांडपंडितानो… मदत याचना पीडितानो…. फणसासारख्या माणसानो…. विचित्र पदार्थ आणि जीन्नसांनो …. शरीराने कुठेही असणार्यानो पण मनाने मिपाला वाहून घेतलेल्यांनो …. त्रिवार सलाम …

हे दुसरे पुष्प तुम्हाला अर्पण !!

अद्भुतरसकविता

प्रतिक्रिया

जमलाय तुम्हाला दुसरा भाग.

आणी

मी पयला की काय.

माम्लेदारचा पन्खा's picture

2 Oct 2014 - 11:49 pm | माम्लेदारचा पन्खा

प्रथम पुरुषाचे एकवचनी प्रमाणपत्र !

'विदा'रक ज्याम आवडलं !! ;)

सौंदाळा's picture

1 Oct 2014 - 5:27 pm | सौंदाळा

+१

आदूबाळ's picture

1 Oct 2014 - 5:30 pm | आदूबाळ

विदा-रत जास्त योग्य आहे...

माम्लेदारचा पन्खा's picture

1 Oct 2014 - 11:57 pm | माम्लेदारचा पन्खा

इसकटून सांगा की....

म्हणजे विदा देण्या-घेण्या-तपासण्या-चिवडण्यामध्ये रत असणारे.

विवेकपटाईत's picture

1 Oct 2014 - 5:30 pm | विवेकपटाईत

पहिल्या बाका वर बसून जास्त टवाळकी करता येते आणि ती कुणाला कळंत ही नाही.

खटपट्या's picture

2 Oct 2014 - 2:06 am | खटपट्या

Skype Emoticons

मारवा's picture

2 Oct 2014 - 10:02 am | मारवा

GREAT !

आयुर्हित's picture

2 Oct 2014 - 12:40 pm | आयुर्हित

सत्याकडे न पाहण्याचा वसा घेतलेल्या सुमारांनो,

उजाडुच नये म्हणुन झाकुन ठेवलेल्या कोंबड्यांनो,

कायम अंधार रहावा म्हणुन प्रयत्नशील उच्चपदवी धारकांनो,

आमच्या वेळेला असे नव्हते म्हणून सतत बोटे मोडणाऱ्यांनो,

अभिजात ज्ञानाकडे विदेशांत मान्य नाही म्हणून पाठ फिरवणाऱ्यांनो,

सर्व आजार फक्त आमचीच पॅथि बरे करु शकते असे म्हणणाऱ्या चिकित्सातज्ञांनो,

शिकवलं गेले नाही म्हणून जनमानसात असलेल्या ज्ञानाची खिल्ली उडवणाऱ्यांनो,

सतत नाहि रे! म्हणून पुढे जाणाऱ्याचे पाय ओढणाऱ्यांनो,

तोंडात लाळ येवून मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झालेल्यांनो,

गुन्हे लपवण्यासाठी मंत्रालयाला लाक्षागृह बनवणाऱ्यांनो,

पाणी नाही म्हणून काय धरणात मुतू? विचाराणाऱ्यांनो,

गायीसाठीचा चारा न पचवता आल्यानं तुरुंगात जाणाऱ्यांनो,

केवळ सत्तेसाठी नँनो प्रकल्प राज्याबाहेर घालवणाऱ्यांनो,

देशाच्या प्रगतीच्या सतत आडवे जावून बेरोजगार झालेल्या विदेशी मांजरिंनो,

सतत केवळ एका जातीला लक्ष्य करून गाडगीळ अहवाल गुंडाळणाऱ्यांनो,

आत्महत्या रोखता आल्या नाहीत म्हणून अजून २६ लवासा करायला निघालेल्यांनो,

काळीआई बिल्डरांच्या घशात घालणाऱ्या कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ठरलेल्या शेतकऱ्यांनो,

देशासाठी काय महत्त्वाचे आहे हे सांगून जगाला दिशा दाखविणाऱ्यांनो,

"वसुधैव कुटुंबकम" हिच खरी संस्कृती आहे हे पटवून देणाऱ्यांनो,

विनोद१८'s picture

3 Oct 2014 - 12:06 am | विनोद१८

..आम्हा मिपाकर्सवर, तुम्हा दोघांना साष्टांग नमस्कार घालायची वेळ आणणार्‍यांनो.....!!

आणखी काय लिहू ???? एकदम जबरदस्त रंगलय.

पैसा's picture

3 Oct 2014 - 11:10 am | पैसा

मस्त लिहिलंय!

मुक्त विहारि's picture

3 Oct 2014 - 12:36 pm | मुक्त विहारि

आवडला.

शिद's picture

4 Oct 2014 - 11:57 pm | शिद

+१, +१००, +१००० असं लिहीण्यार्‍यांनो,
असेच म्हणतो असं बोलण्यार्‍यांनो...

-वरील दोन्ही कॅटेगरीत असलेला.

अन्या दातार's picture

5 Oct 2014 - 10:55 pm | अन्या दातार

दुरडी कितीची आहे?