उपवासाचा पौष्टिक चिवडा

मीराताई's picture
मीराताई in पाककृती
28 Sep 2014 - 7:15 pm

उपवासाचा पौष्टिक चिवडा
1
साहित्यः
नायलॉन साबूदाणा
डिंक
शेंगदाणे
सुक्या खोबर्‍याचे काप
काजू-बेदाणे
बटाट्याचा खिस (वाळवलेला)
(वरील सर्व एक-एक वाटी)
तळण्यासाठी तूप किंवा रिफाईन्ड तेल
जिरे, मीठ, साखर, तिखट (चवीप्रमाणे)
2
कृती:
तेल/ तूप कढईत गरम करावे. आधी साबूदाणा तळून घ्यावा. पाठोपाठ एक एक करुन डिन्क, शेंगदाणे, खोबरे, बटाट्याचा खिस, काजू, बेदाणे, जिरे तळून घ्यावेत. सर्व पदार्थ एकत्र करावेत. त्यावर मीठ, पिठीसाखर, तिखट भुरभुरून एकत्र करावे.
3
हा चिवडा उपासाला चालतोच, शिवाय बाळंतिणींना पारंपारिक पद्धतीच्या डिंकाच्या लाडूंऐवजी, पौष्टिक पदार्थ म्हणून उपयोगी होउ शकतो.

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

28 Sep 2014 - 7:36 pm | दिपक.कुवेत

फोटो दिसत नाहियेत.

ते फक्त भारतियांना दिसतात हो!

कवितानागेश's picture

28 Sep 2014 - 7:45 pm | कवितानागेश

मला दिसतायत की.

रेवती's picture

28 Sep 2014 - 7:50 pm | रेवती

फोटूबाबतीत गणेशा झालाय. साबूदाणा चिवड्यात डिंक घालण्याची नवीन पद्धत आवडली.

कवितानागेश's picture

28 Sep 2014 - 8:17 pm | कवितानागेश

हुश्श... :)

हां, आता फोटू दिसतायत. सगळी तयारी नक्षीच्या बाऊल्समध्ये मांडलीये ते जास्त आवडलं.

अजया's picture

28 Sep 2014 - 9:39 pm | अजया

छान पाकृृ!

माम्लेदारचा पन्खा's picture

28 Sep 2014 - 10:44 pm | माम्लेदारचा पन्खा

साबुदाण्याची उगमकथा नुकतीच वाचली आहे.... त्यामुळे उपवासातच काय एरवी पण साबुदाणा कटाप !!

कवितानागेश's picture

28 Sep 2014 - 11:16 pm | कवितानागेश

साबुदाण्याशिवाय, नुसत्या डिंकाचा आणि बटाट्याचा चिवडा करता येइल की.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Sep 2014 - 11:32 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११
साबुदाणा???????? :-/ नक्को! :-/

साबुदाणं रबरसदृशं श्वेतवर्णम् च्यूईंगम्॥ :D

जुइ's picture

28 Sep 2014 - 11:44 pm | जुइ

करुन बघण्यात येईल :)

मुक्त विहारि's picture

29 Sep 2014 - 12:17 am | मुक्त विहारि

पौष्टिक पाकक्रुतीत अजून एका पदार्थाची भर पडली..

पण साबूदाणे न घालता, डिंकाचा वापर केला तर उत्तम...

उमा @ मिपा's picture

29 Sep 2014 - 10:14 am | उमा @ मिपा

चविष्ट होईल हा चिवडा. सोपी पाकृ. करेन नक्की. त्या नक्षीदार वाट्या किती सुंदर दिसताहेत.

इशा१२३'s picture

29 Sep 2014 - 2:25 pm | इशा१२३

सोपा आहे चिवडा...लेकीला आवडेल.

madhu's picture

29 Sep 2014 - 4:18 pm | madhu

चान

स्मिता चौगुले's picture

30 Sep 2014 - 12:22 pm | स्मिता चौगुले

लहानपणी आमच्या सोलापुरात हा चिवडा स्वीट मार्ट, किराणा दुकानात मिळायचा.(आताही मिळत असेल)प्रामुख्याने याची चव गोड होती आणि त्यात मिरचीचे तुकडे तळून टाकलेले असत.कित्येकदा हा चिवडा खाण्यासाठी उपवास केल्याचे आठ्वते. नंतर हा चिवडा घरी बनवण्याचे फ्याड निघाले आणि महिन्याच्या किराणा यादीत तो नायलॉन साबू दिसू लागला.

निवेदिता-ताई's picture

30 Sep 2014 - 7:39 pm | निवेदिता-ताई

छान

अनन्न्या's picture

3 Oct 2014 - 5:11 pm | अनन्न्या

आता यासाठी उपास करायला हवा.

मदनबाण's picture

3 Oct 2014 - 8:57 pm | मदनबाण

मस्त !

अवांतर :- च्यामारी... मी सांगतो तुम्हाला हल्ली काय काय वाचायला नाय मिळत ? हे साबुदाणा हा शाकाहारी पदार्थ नाही अशी वर्ता व्हॉट्सअ‍ॅप जगतात अधुन मधुन फिरत असते ! खरचं साबुदाणा बनवण्याची पद्धत इतकी घाणेरडी आहे ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Junction Lo... ;) Aagadu {Waiting for Original 1080P}