कोकोनट राईस (थेंगाई सादम)

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
10 Sep 2014 - 9:46 pm

साहित्यः

१ वाटी तांदळाचा शिजवलेला भात (शिळा भात असल्यास तो ही चालेल)
१ वाटी खवलेला ओला नारळ (प्रमाण आवडीप्रमाणे कमी-जास्तं घ्यावे)
१/२ टीस्पून मोहरी
१ टीस्पून उडदाची डाळ
१ टीस्पून चणाडाळ
१ टेस्पून काजू
२-३ लाल सुक्या मिरच्या तोडून
१ हिरवी मिरची बारीक चिरलेली
कढीपत्ता
१/४ टीस्पून हिंग
मीठ चवीनुसार

.

पाकृ:

पातेल्यात २ टेस्पून खोबरेल तेल गरम करावे. तुम्ही रोजच्या वापरातले तेल वापरले तरी चालेल पण खोबरेल तेल वापरल्यामुळे भाताचा स्वाद छान लागतो.
त्यात मोहरी, हिंगाची फोडणी करावी.
त्यात उडदाची डाळ, चणाडाळ व काजू घालून तांबूस रंगावर परतून घ्यावे.
त्यात कढीपत्ता, लाल सुक्या मिरच्या व हिरवी मिरची घालून परतावे.
आता त्यात ओला नारळ व मीठ घालून खोबर्‍याचा रंग न बदलता मंद आचेवर परतावे.
शिजवलेला भात घालून चांगले मिक्स करावे व झाकून मंद आचेवर एक-दोन वाफा काढाव्यात.

.

दिसायला साधा तरीही फ्लेव्हरफूल असा हा कोकोनट राईस तुम्ही पापड, लोणचं, रस्सम किंवा सांबाराबरोबर सर्व्ह करु शकता.

.

नोटः

हा भात खोबर्‍यामुळे पांढराच ठेवावा, कृपया हळद घालू नका.
आवडत असल्यास ह्यात शेंगदाणे ही घालू शकता.
झटपट होतो त्यामुळे मुलांच्या डब्याला ही देता येईल.

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

10 Sep 2014 - 9:51 pm | दिपक.कुवेत

मी पयला. साउथ चे सगळे राईस प्रकार आवडतात. कोकोनट राईस त्यातलाच एक. पाकृ आणि फोटो नेहमीप्रमाणेच नयनरम्य.

सुहास झेले's picture

10 Sep 2014 - 10:24 pm | सुहास झेले

ह्येच बोलतो... :)

अत्रुप्त आत्मा's picture

10 Sep 2014 - 9:52 pm | अत्रुप्त आत्मा

मस्स्स्स्स्स्स्स्स्त.... !

मुक्त विहारि's picture

11 Sep 2014 - 10:07 pm | मुक्त विहारि

+१

सुहास..'s picture

10 Sep 2014 - 9:53 pm | सुहास..

_/\_

आत एकदा आमचा फेवरिट ..तैरसादम पण येवु द्यात प्लीज :)

तुम्ही पण LG चा हिंग वापरता?*

*नेहमीच छान, मस्त, सुरेख किती म्हणायचं!! त्यासाठी थोडी वेगळी कमेंट. ;)

मस्त आणि झटपट प्रकार..आवडला ..

कवितानागेश's picture

10 Sep 2014 - 10:49 pm | कवितानागेश

मस्तच. साउथचे बाकीचे राइसपण येउदेत. :)

प्रभाकर पेठकर's picture

11 Sep 2014 - 2:07 am | प्रभाकर पेठकर

सुंदर आणि चविष्ट. करून पाहणेत येईल.;

किती ते सुंदर पदार्थ,किती ते देखणे फोटो
दोनच डोळे माझे उत्सव जातो वाया ॥

रच्याकने:आज केकची पाकृृ येईल असं वाटलेलं :)

पैसा's picture

11 Sep 2014 - 9:29 am | पैसा

अतिशय आवडता प्रकार. म्हणजे भाताचे सौदिंडियन सगळेच प्रकार मस्त असतात!

उमा @ मिपा's picture

11 Sep 2014 - 9:42 am | उमा @ मिपा

सुरेख

अय्ययो अय्यो... अय्ययो अय्यो... ;)
ये क्या मस्त राईस दिखता जी... सुब्ब सुब्ब ऐसा देखके बहुत तकलिफ होता जी ! ;)
{लुंगी अण्णा} ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बोलक्या पोपटांचे राजकारण

मस्त ग. करुन बघायला पाहिजे. मला गोड नारळी भात अजिबात आवडत नाही. हा बहुतेक आवडेल.

ऋषिकेश's picture

11 Sep 2014 - 10:23 am | ऋषिकेश

मस्तच _/\_
विकांताला करून बघेन. खोबरेल तेल वापरून कधी केला नाहिये

सौंदाळा's picture

11 Sep 2014 - 10:35 am | सौंदाळा

सुंदर
भाताचे कोणताही प्रकार बेहद्द आवडतो.
१५ वर्षे तमिळ कुटुंबाचा शेजार लाभल्याने चिंचेचा भात, कोकोनट राईस, त्यांच्या स्टाईलचा गुळभात, सांबार्,रस्सम भात भरपुर खाल्ला. आईच्या मागे लागुन मी घरी बनवायला लावयचो पण तशी चव यायची नाही. नंतर एकदा त्या तमिळी काकुंनीच आमच्या घरी येऊन बनवला होता तरी तितकी चव आली नाही. त्यांचा सगळा मसाला (तांदुळ,उडीद डाळ वगैरेसुध्दा) साउदींडीयातुन यायचा त्यामुळे फरक पडत असावा.
हा भात बघुन जुने दिवस आठवले.
चिंचेच्या भाताची पाकृपण आहे का ईकडे? असेल तर कृपया लिंक द्यावी.

पिलीयन रायडर's picture

11 Sep 2014 - 12:28 pm | पिलीयन रायडर

काय आता नेहमी नेहमी तेच बोलणार...
सुस्कारे टाकुन उरल्या सुरल्या मि.पा कडे पहाते आता...

अनन्न्या's picture

11 Sep 2014 - 4:15 pm | अनन्न्या

करून पहाते, सुंदर छान, मस्त.....वगैरे वगैरे

दक्षिणायनची आठवण झाली. बंद पडलं तेच्यायला :(

तेंगई सादम खाल्ल्याचे आठवत नसले तरी तेंगई उत्ताप्पा जो तिकडे मिळायचा, त्याला तोड नाही. हा भातही अगदी मौथवॉटरिंग आहे.

चला, रात्री आता इन्स्टंट रसमच्या पाकिटातून रसम बनवणे आले...

स्पा's picture

11 Sep 2014 - 4:21 pm | स्पा

जबराट

आता रस्सम ची पाक्रु हवीच :)

शिद's picture

11 Sep 2014 - 4:24 pm | शिद

मस्त व सोपी पाकृ.

आजच्या रात्रीच्या जेवणाचा मेन्यू फिक्स्ड. :)

बॅटमॅन's picture

11 Sep 2014 - 4:33 pm | बॅटमॅन

नाउ द्याट आय थिंक अबौट इट, राच्च्याला करून पाहीन. बहुधा वीकांतसमयी.

गणितच चुकलं आमचं. ओणम चालू आहे वाटलं केरळी साद्य, भक्षणम येईल. पण चणाडाळ फोडणीत पडली आणि कळलं मदुराईकडे गाडी वळलीय. आता तयिर राइस, चिंच भात, रसम हे सर्व हट्ट पुरवा.

लहानपणची आठवण. आमच्या बिल्डिँगमधल्या तमिळ मुलीच्या लग्नात गेलो होतो डिशमध्ये पुरण आणि मोठा स्टीलचा ग्लासभरून कोका कोला आला बच्चेकंपनी तुटून पडली पण हाय पहिल्या घासात आणि घोटातच जिरली आमची. पुरण आख्या चवळीचं आणि गलासभर बिनदुधाची काळी कॉफी होती. हे कुटुंब कोईमतूरचं होतं. [{मुलीचं लग्न तिच्या मामाशीच झालं होतं ही माहीती सिनिअर लोकांनी पुरवली } मग आमच्यासाठी खरा कोका कोला आला एक्केक बाटली प्रत्येकाला पण पुन्हा हाय !तेवढ्यात सायरन वाजला. बलैक आउट याने शत्रुची विमाने येतात तेव्हा लाईट बंद करायचे. चीनशी युध्द चालू होतं त्यावेळी. जिंकू किंवा मऽऽरूऽऽऽ.अंधार झाला. आम्हाला आपलं कोका कोला गेल्याचं दु:ख.]
थोडं काय जास्तच भरकटलं विमान.

सेविया राइसचंही बघा जरा.

मुक्त विहारि's picture

11 Sep 2014 - 10:07 pm | मुक्त विहारि

झक्कास...

आयुर्हित's picture

11 Sep 2014 - 11:31 pm | आयुर्हित

फोटो इतके सुंदर आले आहेत की तों पा सू!!

खुप सोप्पी व साधी वाटणारी परंतू आरोग्यदायी पा़कॄ!
धन्यवाद.

उमा @ मिपा's picture

17 Sep 2014 - 11:03 am | उमा @ मिपा

सानिका, हा नारळी भात केला, शेंगदाणे घातले होते, मस्त झाला होता. सगळ्यांना आवडला. धन्स!