मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोकोनट राईस (थेंगाई सादम)

सानिकास्वप्निल · · पाककृती
साहित्यः १ वाटी तांदळाचा शिजवलेला भात (शिळा भात असल्यास तो ही चालेल) १ वाटी खवलेला ओला नारळ (प्रमाण आवडीप्रमाणे कमी-जास्तं घ्यावे) १/२ टीस्पून मोहरी १ टीस्पून उडदाची डाळ १ टीस्पून चणाडाळ १ टेस्पून काजू २-३ लाल सुक्या मिरच्या तोडून १ हिरवी मिरची बारीक चिरलेली कढीपत्ता १/४ टीस्पून हिंग मीठ चवीनुसार . पाकृ: पातेल्यात २ टेस्पून खोबरेल तेल गरम करावे. तुम्ही रोजच्या वापरातले तेल वापरले तरी चालेल पण खोबरेल तेल वापरल्यामुळे भाताचा स्वाद छान लागतो. त्यात मोहरी, हिंगाची फोडणी करावी. त्यात उडदाची डाळ, चणाडाळ व काजू घालून तांबूस रंगावर परतून घ्यावे. त्यात कढीपत्ता, लाल सुक्या मिरच्या व हिरवी मिरची घालून परतावे. आता त्यात ओला नारळ व मीठ घालून खोबर्‍याचा रंग न बदलता मंद आचेवर परतावे. शिजवलेला भात घालून चांगले मिक्स करावे व झाकून मंद आचेवर एक-दोन वाफा काढाव्यात. . दिसायला साधा तरीही फ्लेव्हरफूल असा हा कोकोनट राईस तुम्ही पापड, लोणचं, रस्सम किंवा सांबाराबरोबर सर्व्ह करु शकता. . नोटः हा भात खोबर्‍यामुळे पांढराच ठेवावा, कृपया हळद घालू नका. आवडत असल्यास ह्यात शेंगदाणे ही घालू शकता. झटपट होतो त्यामुळे मुलांच्या डब्याला ही देता येईल.

वाचन 12326 प्रतिक्रिया 0