आश्रमात बाबा ध्यानमग्न बसलेले होते, अचानक त्यांनी डोळे उघडले, क्षणाचा ही बिलंब न करता मी प्रश्न विचारला, स्वामीजी मनात एक शंका आहे. स्वामी त्रिकाळदर्शी: काय शंका आहे बच्चा? मी: स्वामीजी पुरोगामी कोण असतो, त्याची लक्षणे काय? स्वामी त्रिकाळदर्शींच्या चेहऱ्या एक हास्याची लहर पसरली, ते म्हणाले बच्चा, समोर वडाचे झाड बघ, झाडाच्या डाव्या अंगाला एक वाळकी फांदी दिसते आहे न. मी म्हणालो होय, स्वामीजी. स्वामी त्रिकाळदर्शी: त्या फांदीला पुरोगामी फांदी असे म्हणतात. मी त्या वाळक्या फांदी कडे बघितले,मला काहीच कळले नाही. मी पुन्हा प्रश्न केला, स्वामीजी मी अज्ञ बालक आहे, आपल्या गूढ वाक्याच्या अर्थ स्पष्ट करावा. स्वामी त्रिकाळदर्शी म्हणाले, बच्चा, ती वडाची वाळकी फांदी स्वत:ला वडाच्या झाडाचा अंग मानीत नाही. ती वडाच्या झाडाचा तीव्र द्वेष करते. म्हणून तिने फांदीवर लागणार्या पानांना झटकून दिले. मी मध्येच टोकले, का स्वामीजी? स्वामी त्रिकाळदर्शी म्हणाले, हिरवी पानें झाडासाठी प्राणवायू तैयार करतात, प्राणवायू झाडाला न मिळावी हाच तिचा हेतू. ही गोष्ट वेगळी कि झाडापासून मिळणारे सर्व पोषक तत्व ही फांदी शोसते. मी म्हणालो, बाबा हे तर विचित्र आहे. मनात एक प्रश्न आला, म्हणून विचारतो, ही फांदी सर्व झाडांचा द्वेष करते का? स्वामीजींच्या चेहऱ्यावर पुन्हा मंद मुस्कान पसरली, ते म्हणाले, बच्चा, ही फांदी फक्त ती ज्या वडाच्या झाडावर आहे, तिचा द्वेष करते, पण शेजारच्या घराच्या कुंपणावर लागलेल्या बाभळीच्या झाडाची ती सदैव प्रशंसा करते. पुरोगामी आहे म्हणून, मागच्या जन्मी काही पाप केले असेल म्हणून वडाची फांदी झाले असे तिला नाही वाटत. पण आपण एखाद्या दुर्घटनेमुळे वडाची फांदी झालो असे तिला वाटते. मी पुन्हा स्वामीजींना पुन्हा प्रश्न विचारला, स्वामीजी, झाडावर एखादे संकट आले, पुरात झाड बुडाले वैगरेह? स्वामीजी म्हणाले, अशा वेळी झाडाची मुळे मातीला घट्ट पकडून झाडाला पडण्यापासून वाचविण्याचे प्रयत्न करतात, झाडाचे इतर अंग ही उदा. फांद्या ही मुळांना भरपूर प्राणवायू पोहचवून त्यांची ताकद वाढवितात. पण पुरोगामी फांदी असे काहीच करत नाही, ती केवळ विचार करते, पूर का आला, हे झाड का वाचले, पडले का नाही इत्यादी. एखादा NGO सेमिनार साठी पेपर तैयार करतो तसेच. पण स्वामीजी, जरं, वडाचे झाड पडले तर, झाडा बरोबर फांदीचे अस्तित्व ही नष्ट होईल, हे तिला कळत कसें नाही. स्वामीजी पुन्हा जोरात हसले व म्हणाले, बच्चा तिला जर हे कळले असते तर ती पुरोगामी कशी झाली असती? क्षणभर आ! वासून मी स्वामीजींना बघत राहिलो, स्वामीजींना पुढचा प्रश्न विचारणार, पण स्वामीजी डोळे मिटून पुन्हा ध्यानमग्न झाले होते.
प्रतिक्रिया
4 Sep 2014 - 5:47 pm | बाळ सप्रे
फारच गंडलेली उपमा !!
आणि पहिल्यांदाच मी पयला!!
4 Sep 2014 - 6:51 pm | आनन्दा
ह्म्म.. तुम्हाला त्या लेखांमधली बाभळीची फांदी आवडलेली दिसतेय :)
ह घ्या हे वे सा न ल.
4 Sep 2014 - 8:04 pm | विवेकपटाईत
मस्त मजा आली.
4 Sep 2014 - 5:49 pm | सूड
रुपक आवडलं, पण तितकंसं पटलं नाही.
वाटतोय का प्रतिसाद पुरोगामी? ;)
4 Sep 2014 - 6:46 pm | पोटे
लबाडपुराण
4 Sep 2014 - 6:46 pm | प्रसाद१९७१
बच्चा, ही फांदी फक्त ती ज्या वडाच्या झाडावर आहे, तिचा द्वेष करते, पण शेजारच्या घराच्या कुंपणावर लागलेल्या बाभळीच्या झाडाची ती सदैव प्रशंसा करते.
ही गोष्ट वेगळी कि झाडापासून मिळणारे सर्व पोषक तत्व ही फांदी शोसते>>>>>>>>
अगदी परफेक्ट उपमा. जमुन आले आहे
4 Sep 2014 - 7:04 pm | धन्या
तुमचा हा लेख वाचून "थॉट्स ऑफ अदर पर्सन आर ऑलवेज इनवॅलिड" असं काहीसं वाटतंय.
पार हुकलेलं रुपक. आपण शहाणं व्हायचं नाही. दुसरा शहाणा होऊन चार भल्याच्या गोष्टी सांगत असेल तर त्यालाच वेडयात काढायचं असा प्रकार आहे हा.
4 Sep 2014 - 7:32 pm | तिमा
ये सब क्या हो रहा है?
अगर ऐसाच हय तर चेकाळस्वामी का उपयोग क्या ?
4 Sep 2014 - 7:34 pm | विनोद१८
6 Sep 2014 - 10:01 am | विवेकपटाईत
प्रतीसादाबाबात, धन्यवाद, फार कमी वाचकांना अर्थ कळला आहे.