✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

स्वामी त्रिकाळदर्शी उवाच: पुरोगामीस्य किम् लक्षणं?

व
विवेकपटाईत यांनी
गुरुवार, 09/04/2014 - 17:26  ·  लेख
लेख
आश्रमात बाबा ध्यानमग्न बसलेले होते, अचानक त्यांनी डोळे उघडले, क्षणाचा ही बिलंब न करता मी प्रश्न विचारला, स्वामीजी मनात एक शंका आहे. स्वामी त्रिकाळदर्शी: काय शंका आहे बच्चा? मी: स्वामीजी पुरोगामी कोण असतो, त्याची लक्षणे काय? स्वामी त्रिकाळदर्शींच्या चेहऱ्या एक हास्याची लहर पसरली, ते म्हणाले बच्चा, समोर वडाचे झाड बघ, झाडाच्या डाव्या अंगाला एक वाळकी फांदी दिसते आहे न. मी म्हणालो होय, स्वामीजी. स्वामी त्रिकाळदर्शी: त्या फांदीला पुरोगामी फांदी असे म्हणतात. मी त्या वाळक्या फांदी कडे बघितले,मला काहीच कळले नाही. मी पुन्हा प्रश्न केला, स्वामीजी मी अज्ञ बालक आहे, आपल्या गूढ वाक्याच्या अर्थ स्पष्ट करावा. स्वामी त्रिकाळदर्शी म्हणाले, बच्चा, ती वडाची वाळकी फांदी स्वत:ला वडाच्या झाडाचा अंग मानीत नाही. ती वडाच्या झाडाचा तीव्र द्वेष करते. म्हणून तिने फांदीवर लागणार्या पानांना झटकून दिले. मी मध्येच टोकले, का स्वामीजी? स्वामी त्रिकाळदर्शी म्हणाले, हिरवी पानें झाडासाठी प्राणवायू तैयार करतात, प्राणवायू झाडाला न मिळावी हाच तिचा हेतू. ही गोष्ट वेगळी कि झाडापासून मिळणारे सर्व पोषक तत्व ही फांदी शोसते. मी म्हणालो, बाबा हे तर विचित्र आहे. मनात एक प्रश्न आला, म्हणून विचारतो, ही फांदी सर्व झाडांचा द्वेष करते का? स्वामीजींच्या चेहऱ्यावर पुन्हा मंद मुस्कान पसरली, ते म्हणाले, बच्चा, ही फांदी फक्त ती ज्या वडाच्या झाडावर आहे, तिचा द्वेष करते, पण शेजारच्या घराच्या कुंपणावर लागलेल्या बाभळीच्या झाडाची ती सदैव प्रशंसा करते. पुरोगामी आहे म्हणून, मागच्या जन्मी काही पाप केले असेल म्हणून वडाची फांदी झाले असे तिला नाही वाटत. पण आपण एखाद्या दुर्घटनेमुळे वडाची फांदी झालो असे तिला वाटते. मी पुन्हा स्वामीजींना पुन्हा प्रश्न विचारला, स्वामीजी, झाडावर एखादे संकट आले, पुरात झाड बुडाले वैगरेह? स्वामीजी म्हणाले, अशा वेळी झाडाची मुळे मातीला घट्ट पकडून झाडाला पडण्यापासून वाचविण्याचे प्रयत्न करतात, झाडाचे इतर अंग ही उदा. फांद्या ही मुळांना भरपूर प्राणवायू पोहचवून त्यांची ताकद वाढवितात. पण पुरोगामी फांदी असे काहीच करत नाही, ती केवळ विचार करते, पूर का आला, हे झाड का वाचले, पडले का नाही इत्यादी. एखादा NGO सेमिनार साठी पेपर तैयार करतो तसेच. पण स्वामीजी, जरं, वडाचे झाड पडले तर, झाडा बरोबर फांदीचे अस्तित्व ही नष्ट होईल, हे तिला कळत कसें नाही. स्वामीजी पुन्हा जोरात हसले व म्हणाले, बच्चा तिला जर हे कळले असते तर ती पुरोगामी कशी झाली असती? क्षणभर आ! वासून मी स्वामीजींना बघत राहिलो, स्वामीजींना पुढचा प्रश्न विचारणार, पण स्वामीजी डोळे मिटून पुन्हा ध्यानमग्न झाले होते.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3791 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

फारच गंडलेली उपमा !!

बाळ सप्रे
गुरुवार, 09/04/2014 - 17:47 नवीन
फारच गंडलेली उपमा !! आणि पहिल्यांदाच मी पयला!!
  • Log in or register to post comments

ह्म्म.. तुम्हाला त्या

आनन्दा
गुरुवार, 09/04/2014 - 18:51 नवीन
ह्म्म.. तुम्हाला त्या लेखांमधली बाभळीची फांदी आवडलेली दिसतेय :) ह घ्या हे वे सा न ल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

मस्त मजा आली.

विवेकपटाईत
गुरुवार, 09/04/2014 - 20:04 नवीन
मस्त मजा आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

रुपक आवडलं, पण तितकंसं पटलं

सूड
गुरुवार, 09/04/2014 - 17:49 नवीन
रुपक आवडलं, पण तितकंसं पटलं नाही. वाटतोय का प्रतिसाद पुरोगामी? ;)
  • Log in or register to post comments

..

पोटे
गुरुवार, 09/04/2014 - 18:46 नवीन
लबाडपुराण
  • Log in or register to post comments

अगदी परफेक्ट उपमा. जमुन आले आहे

प्रसाद१९७१
गुरुवार, 09/04/2014 - 18:46 नवीन
बच्चा, ही फांदी फक्त ती ज्या वडाच्या झाडावर आहे, तिचा द्वेष करते, पण शेजारच्या घराच्या कुंपणावर लागलेल्या बाभळीच्या झाडाची ती सदैव प्रशंसा करते. ही गोष्ट वेगळी कि झाडापासून मिळणारे सर्व पोषक तत्व ही फांदी शोसते>>>>>>>> अगदी परफेक्ट उपमा. जमुन आले आहे
  • Log in or register to post comments

तुमचा हा लेख वाचून "थॉट्स ऑफ

धन्या
गुरुवार, 09/04/2014 - 19:04 नवीन
तुमचा हा लेख वाचून "थॉट्स ऑफ अदर पर्सन आर ऑलवेज इनवॅलिड" असं काहीसं वाटतंय. पार हुकलेलं रुपक. आपण शहाणं व्हायचं नाही. दुसरा शहाणा होऊन चार भल्याच्या गोष्टी सांगत असेल तर त्यालाच वेडयात काढायचं असा प्रकार आहे हा.
  • Log in or register to post comments

ये सब

तिमा
गुरुवार, 09/04/2014 - 19:32 नवीन
ये सब क्या हो रहा है? अगर ऐसाच हय तर चेकाळस्वामी का उपयोग क्या ?
  • Log in or register to post comments

....समझनेवाले........!!!

विनोद१८
गुरुवार, 09/04/2014 - 19:34 नवीन
समझनेवाले समझ गये है... ना समझे वो अनाडी है.........!!!!
  • Log in or register to post comments

प्रतीसादाबाबात, धन्यवाद, फार

विवेकपटाईत
Sat, 09/06/2014 - 10:01 नवीन
प्रतीसादाबाबात, धन्यवाद, फार कमी वाचकांना अर्थ कळला आहे.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा