पाचवा दिवस: सिर्खा ते गालागढ. १८ किमी. उंची ९५०० फूट
आज अठरा किलोमीटरच जायचे असले तरी आजचा प्रवास खडतर आहे. त्यामुळे पहाटे चार वाजताच उठलो. आज आम्हाला बेड-टी मिळाला होता. चहा घेतला आणि भराभरा सर्व आवरले. आज नाश्ता सोबत बांधून मिळणार होता, त्यामुळे बोर्नव्हिटा पिऊन नाश्त्याचे पार्सल घेऊन वाटचालीला सिद्ध झालो. सिर्खाला मुक्कामाचे तंबू हे डोंगरमाथ्यावर होते. त्यामुळे थोडे पुढे जाताच खडांज्यांचा (ओबडधोबड दगडी पायर्या) उतार सुरू झाला. रात्री पाऊस पडून गेला होता त्यामुळे चिकचिक झाली होती. जपून हळूहळू उतरावं लागलं. उतरलो कसेबसे. समोर ठाकली होती कठीण रुंगलिग टॉपची खडी चढाई...
थोडे थांबून चालू लागलो. घनदाट जंगल आहे. उन्हाची तिरीपही लागत नाही. सर्वत्र वेळूची - ज्यापासून बासरी बनवतात त्या बांबूची बने होती. त्या बनामधून वारा वेणूनाद घुमवत होता. मोठमोठ्या वृक्षांवरून तशीच मोठ्या आकाराची माणसाएवढी काळ्या तोंडाची पांढर्या रंगाची केसाळ माकडे धुडगूस घालत होती. मी जरा त्यांची मजा बघत उभी राहिले. हे थोडे पुढे गेले होते. मला थांबलेले पाहून म्हणाले, "ती काही त्र्यंबकेश्वरची माकडे नाहीत, येतील अंगावर." मी घाबरले आणि पुढे धावले. दगडाला अडखळले. बूट असूनही पायाची करंगळी मुडपली. आला एकदाचा रुंगलिंग टॉप. सारे पोहोचले होते. आज आम्ही मागे राहिलो होतो. आधी बूट काढून पाहिले. उजव्या पायाच्या करंगळीचे फर्स्ट मेटाकार्पल बोन डिसलोकेट झाले होते. स्ट्रॅपिंग करायला हवे होते. इकडेतिकडे शोधले. लाकडाची मला हवी तशी ढलपी मिळाली. मग स्टिकिंग-प्लास्टरने छानशी स्प्लिंट बनवली आणि करंगळीला स्ट्रॅपिंग केले. सर्वजण माझ्याकडे कुतुहलाने बघत होते. सुनील म्हणाला, "कमाल आहे वहिनी! न घाबरता स्वतःच उपाय केलात!" हे म्हणाले, "अरे ती हेच सारे करत असते तिच्या हॉस्पिटल मध्ये." असो. सर्वानी नाश्ता केला. सुनील पित्रे म्हणाले, "हा टॉप उतरला की थोड्या अंतरावर दोन रस्ते फुटतील. उजव्या बाजूचा रस्ता शॉर्टकट आहे. आपण त्या रस्त्याने जाऊ म्हणजे लवकर पोहोचू." निघालो.
माझा पाय दुखत होता त्यामुळे मला चालायला वेळ लागत होता. सुनील पित्रे माझ्याबरोबर चालत होते. बाकी मंडळी पुढे गेली. त्यांच्याबरोबर पांडेजी गेले होते. रुंगलिंग टॉप उतरला. यथावकाश ते दोन रस्ते आले. बरोबरचे लोक दिसत नव्हते, पण आधी ठरले होते म्हणून मी आणि सुनील पित्रे त्या शॉर्टकटने निघालो. दाट जंगलातून रस्ता जात होता. चिखलही होता. खाजकुयली वारेमाप वाढलेली होती. जपून पावले टाकत होतो. तोच दिसले की दोघांच्याही बुटांवर जळवा चढल्या आहेत. मी घाबरले. सुनील माझ्या पायावरच्या जळवा काढायला लागले. मग मीही धीर करुन त्यांच्या बुटावरील जळवा काढू लागले. या गडबडीत दोघांच्याही हाताला बिच्छू (खाजकुयली) लागली. झाले! 'आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला' अशी आमची अवस्था झाली. जळवा काढू की आग होत असलेल्या हाताला चोळू! सुनीलने जवळच उगवलेल्या पालक नावाच्या वनस्पतीची पाने तोडली आणि त्याचा रस हाताला लावायला दिला. स्वतःच्याही हाताला लावला. क्षणात आग होणे थांबले. खरोखरच देवाची करणी अगाध आहे. बिच्छू आहे तर लगेचच जवळ त्यावर उतारा पालकही त्याच्याच शेजारी तयार ठेवला. दोन्ही संकटांतून त्याच्याच कृपेने बाहेर पडलो आणि पुढे निघालो. थोड्याच वेळात काली नदीवरचा एक झुलता पूल आला. बरोबरचे लोक कसे दिसत नाहीत असा विचार करत पूल ओलांडून पुढे गेलो.
आता नवीनच संकट समोर उभे ठाकले. पुढे रस्ताच नव्हता. डोंगर ढासळला होता. सुनील म्हणाले, "वहिनी हिमालयात रस्ता नसतो. तो आपल्याला तयार करुन घ्यावा लागतो." मी म्हटले, "हरकत नाही. तुम्ही दाखवा तसा मी तयार करते." मग उजव्या हाताने डोंगराचा आधार घेत डाव्या हाताने ढासळलेल्या मातीत वाट तयार करत हळूहळू पुढे जाऊ लागलो. सुनील म्हणाले, "वहिनी हिमालयात डोंगर चढताना कधीही पकडायचे नाही. तर फक्त आपल्या हाताचा पंजा डोंगराच्या भिंतीला दाबून ठेवायचा. कारण हिमालय हा ठिसूळमातीचा पर्वत आहे. आपण एखादा दगड किंवा झुडूप पकडायला जाऊ आणि तो दगड किंवा झुडूप निसटून येईल आणि आपणच पडू." रस्ता तयार करत-करत कसेबसे तो डोंगर चढून वर आलो. वरती सुंदर हिरवळीचा गालिचा पसरलेली प्रशस्त वायवाट विविधरंगी फुलांचे दागिने अंगाखांद्यावर लेवून आमची वाट बघत होती. पाठीवरची पिशवी काढून एका दगडावर बसलो. आमचे सहयात्री कुठेच दिसत नव्हते. पाणी प्यायलो. काय करावे असा विचार करत होतो, इतक्यात हे येताना दिसले. मी भान हरपून त्यांच्याकडे धावले! पाठोपाठ मीना, रोहिणी, सुनील शिंदे आणि पांडेजी आले. माझा जीव भांड्यात पडला. सर्वजण बसलो. ते सगळे दुसर्या रस्त्याने आले होते. तो मुळीच अवघड नव्हता. वाटेत त्यांनी गुटखा नावाची गावठी बटाट्याची स्वादिष्ट भाजी आणि पाव खाल्ला होता. आम्ही त्यांना लांबून डोंगर चढताना दिसत होतो. त्यामुळे ते निर्धास्त होते. सुनील पित्रे म्हणाले, "खरे सांगा वहिनी! तुम्ही घाबरला होता की नाही?" मी म्हटले, "घाबरले होते, पण माझ्या जिवासाठी नाही. कारण मी खाली पडले असते तर तुम्ही कसेही करुन मला वर काढले असतेच. पण तुम्ही जर पडला असतात तर मी काय केले असते? त्या जंगलात फक्त आपणा दोघांशिवाय चिटपाखरुही दिसत नव्हते. म्हणून मी घाबरले होते." असो.
घनदाट जंगल, माकडे, बिच्छू-पालक, ढासळलेला डोंगर अशा भयानकतेबरोबरच मनोहारी सुवासिक फुले, खळखळणारे झरे, बासरीचा नाद घुमवणारा वारा अशी शिणवटा घालवणारी मनोरंजकता असलेला हा पहाटे साडेपाचला सुरु झालेला अठरा किमी आणि साडेनऊ हजार फूट उंचीचा चित्तथरारक प्रवास संध्याकाळी साडेपाचला बारा तासांनी गालागढच्या मुक्कामी सुफळ संपूर्ण झाला..!
क्रमशः
प्रतिक्रिया
2 Sep 2014 - 8:14 pm | एस

-------------------------------
मध्ये राहिलेल्या भागांचे मुद्रितशोधन नंतर वेळ मिळेल तसे पूर्ण करीन.
2 Sep 2014 - 9:27 pm | प्यारे१
__/\__
सामाजिक कार्याची आवड लहानपणापासूनच का?
2 Sep 2014 - 11:25 pm | एस
समाजकार्य करणारे मूर्ख असतात असे माझे प्रामाणिक मत लहानपणापासूनच आहे. जन्मात कधीही समाजकार्य करायचं नाही असंही स्वतःला बजावून बरेचदा झालंय. याचा अर्थ मी स्वतः मूर्ख नाही असा नाही. कित्येकदा ठामपणे नाही म्हणायचे असे ठरवूनसुद्धा शेवटी पूर्णपणे गुंततो आम्ही लोक.
ह्या मुद्रितशोधनाबद्दल - तसे मी कबूल केले होते म्हणून. वचनपूर्ती. बाकी काही नाही.
2 Sep 2014 - 11:36 pm | प्यारे१
>>> समाजकार्य करणारे मूर्ख असतात असे माझे प्रामाणिक मत लहानपणापासूनच आहे.
आमच्या तिस्तातै सेटलवाड(का काय ते), बर्याच एन जी ओ चालवणार्या ताया, बाप्ये सगळे मूर्ख?
बाकी हात मिलाओ म्हणण्याइतपत मत पटलं.
3 Sep 2014 - 7:12 pm | खुशि
धन्यवाद.
आपल्या नावाच्या स्व वर जी चन्द्रकोर लिहिली आहेत ती कशी लिहितात शिकवा ना प्लीज मला तसे शब्द लिहिता येत नाहीत आभारी आहे मदत केल्या बद्दल.
3 Sep 2014 - 7:30 pm | एस
तुमच्या कीबोर्डवरील Shift + E ही कळ त्यासाठी वापरा. म्हणजे तुम्हांला अॅप्पल असे लिहायचे असेल तर खालीलप्रमाणे टंकून पहा: Eppal.
स्वॅप्स असे लिहिण्यासाठी swEps असे टंका. बघा प्रयत्न करून. (E कॅपिटल टंका टंकताना म्हणजे काम होईल.)
3 Sep 2014 - 9:26 pm | प्यारे१
स्वेप्स, स्वँम्प, स्वाईप्स, सॅप्स, स्वैप्स. जमेना की वो ;)
3 Sep 2014 - 10:23 pm | एस
http://misalpav.com/comment/605981#comment-605981
जमतंय, जमतंय. कीबोर्ड प्रोग्रॅम्ड ऑटोवर ठेऊन टंकन रीडिंग घेऊन पहा. नक्की जमेल!
3 Sep 2014 - 11:04 pm | दशानन
मुद्रितशोधन ??
हा प्रकार नाही समजला, तुम्ही मदत करत आहात हे प्रतिसादातून जाणवले, समजले. पण तुम्ही हे का करत आहात हे नाही समजले. त्यापेक्षा त्यांना अवघड शब्द कसे लिहावे हे समजवून देणे हा सोपा मार्ग नाही का? आता एका लेखावर प्रतिसाद दिला त्यात देखील मी एका गोष्टीचा उल्लेख केला होता "दोन-दोन वर्ष एका संकेतस्थळावर तुम्ही लिहित आहात, प्रतिसाद देत आहात तर तुम्हाला हे टंकन एवढे अवघड का जावे?" याचा विचार तुम्ही देखील करावा व आपला वेळ सत्कारणी लावावा. तुम्ही लिहून देत आहात म्हणून त्या आपल्याच पद्धतीने लिहित राहतील नेहमीच.
गैरसमज नको, जे जाणवले ते लिहिले.
3 Sep 2014 - 11:14 pm | एस
http://misalpav.com/comment/608556#comment-608556 इथे मी त्यांना त्याबद्दल थोडेसे सांगितले आहे आणि त्यांच्या आत्ताच्या सातव्या भागात चांगली प्रगतीही दिसली आहे. मुद्रितशोधनाबरोबर थोडेसे शुद्धलेखनही नीट करता येते. शब्द टंकणे आता त्यांना सोप्पे जातेय. हळूहळू व्याकरण आणि भाषेवरील हिंदीचा प्रभाव कमी करणे हेही त्यांना जमू लागेल.
त्यांनी स्वतः त्यादृष्टीने काहीच प्रयत्न केले नसते आणि हा माणूस करतोय तर करू देत मुद्रितशोधन असं म्हटलं असतं तर मीही ह्यातून अंग काढून घेतलं असतंच. मला त्यांची मदतीची हाक प्रामाणिक वाटली म्हणून आणि थोडा माझा शुद्धलेखनाचा आग्रह यातून हे होतंय.
अर्थात स्पूनफीडींग काही उपयोगाचे नाही हेही अगदी मान्य. आपलाही दृष्टिकोन योग्य असू शकेल.
3 Sep 2014 - 11:28 pm | दशानन
तुमचा मुद्दा मान्य, पण मराठी टाइपिन्ग हे काय रॉकेट सायन्स नाही आहे, मी शुद्ध लिहाच याचा आग्रह धरु शकत नाही कारण मी स्वतः शुद्ध लिहू शकत नाही, कारण जास्तवेळा मी मोबाईलद्वारे ऑनलाईन असतो. पण हा मार्ग चूकीचा आहे असे जाणवले म्हणून स्पष्ट लिहले. राग नसावाच, उलट तुम्ही व त्यांनी देखील माझ्या प्रतिसादाकडे सकारात्मक दृष्टीने पहावे (तुम्ही पाहिले आहेच) ही अपेक्षा.
4 Sep 2014 - 12:41 pm | एस
तुमचे म्हणणे बरोबर आहे.
4 Sep 2014 - 1:53 pm | खुशि
नमस्कार दशाननजी.
मी प्रयत्न करत आहे पण नाही जमत अजुन आधि गमभन डाउन लोड केले होते पण आता त्यानी काहितरी वेगळी पद्धत केली आहे त्यामुळे मला मराठी टाइप करणे जमत नव्हते आता मी प्रमुखचे सोपे मराठी डाउन लोड केले आहे बाराखडी लिहुन घेतली आहे प्रयत्न करते आहे.मुळात म्हणजे माझा कॉम्प्युटरचा कसलाही कोर्स झालेला नाही.मी शाळेत असताना इंग्लिश,हिन्दी टायपिंग शिकले होते त्याला आता ४०पेक्षा जास्त वर्ष झाली.मी मराठी शाळेत शिकले माझे इंग्रजी फक्त माझ्या मेडिकल ज्ञाना पुरतेच मर्यादित आहे त्यामुळे इथे ज्या सुचना इंग्रजीत देतात त्या माझ्या डोक्यावरुन जातात.त्यातच मी आता म्हातारीही झाले आहे आणि म्हातारपण म्हणजे दुसरे लहानपण त्यामुळे मला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगावी मला मदत करणार्या माझ्या मित्राना. त्याना माझ्यासाठी मेहनत पडते या मुळे आपणास वाईट वाटते हे मी समजू शकते.क्षमा करा मला.
24 Sep 2014 - 10:49 pm | दशानन
मी स्वत: दहावी नापास आहे, आणि तुमच्या वयाच्या आसपास पोचलो देखील आहे. एकच प्रणाली वापरा टाईप करण्यासाठी सर्वकाही सोपं जाईल. हा सर्व सवयीचा भाग असतो, एकदा टाईप करणे अंगवळणी पडले तर तुम्हालाच अजून खूप काही सोपं जाईल.
*वय वर्ष ४०+ म्हणजे म्हातारपण असे तुम्ही समजत असाल तर कृपया हे लिहिणे इत्यादी सोडा व आधी आपले गैरसमज दूर करू घ्या, हा सल्ला ;)
3 Sep 2014 - 12:11 am | कवितानागेश
वाचतेय. :)
3 Sep 2014 - 10:00 am | कविता१९७८
मस्तं वाटतंय वाचायला, तुम्ही नर्मदा परीक्रमा केली आहे, मलाही खुप इच्छा आहे परीक्रमेची , पाहुयात मैयाची आज्ञा होते की नाही.
3 Sep 2014 - 7:17 pm | खुशि
आपली कर्तव्ये पार पडली की मैय्या स्वतः तसा योग आणेल विश्वास ठेवा,तो पर्यंत रोज फक्त म्हणत जा मैय्या!मला परिक्रमा करायची आहे योग्यवेळी तू ती करवुन घे.
3 Sep 2014 - 7:03 pm | पैसा
बर्याच ठिकाणांची नावे कधी कानावरून गेलेली पण नाहीत. वेगळाच अनुभव आहे खरा!
@स्वॅप्स, सपादकांचे काम कमी केल्याबद्दल खूप धन्यवाद! मी नेहमी म्हणते की हे लेख जरा नीटनेटके करून टाकावेत, पण दुसरं काहीतरी काम आलं की ते राहूनच जातं!
3 Sep 2014 - 7:06 pm | एस
माझे प्रतिसाद काम झालं की उडवत जा ना! :-)
3 Sep 2014 - 7:24 pm | खुशि
नको मला सारे प्रतिसाद पुन्हा पुन्हा वाचायला फारआवडते.
3 Sep 2014 - 7:22 pm | खुशि
माझे अडाणीचे वेडेवाकुडे लिखाण आपण कौतुकाने,आपुलकिने वाचता हे माझ्यासाठी खुप आहे.तुमच्या आपुलकीने तुम्ही सारे तुम्हाला न बघताही माझे खुप लाडके झाले आहात.
4 Sep 2014 - 7:45 pm | कंजूस
लेख पाठवा स्वॉप्स(swaps)कडे. शुध्दी झाल्यावर चोपडा इथे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.