बटाटेवडे आणि चिंच-खजूर आंबटगोड चटणी (फक्त फोटो...)

एस's picture
एस in पाककृती
31 Aug 2014 - 10:22 pm

थांबा, थांबा, थांबा. ही काही पाककृती नाही. एकच फोटो टाकणार आहे. पाककृतीबिती टाकायला मी काही बल्लवाचार्य नाही. बटाटेवड्यांची पाककृती Mrunalini यांनी आधीच मिपावर देऊन ठेवली आहे. उत्सुकांनी ती आवर्जून वाचा. इथे फक्त एक फोटो पहायला मिळेल. तोही अजिबात धड नाहीये. तेवढा धीर धरवला नाही आणि सर्व वडे + चटणी गट्टम केले गेले. ;-)

Batatewade&Chutney

हो, चिंच-खजुराच्या चटणीबद्दल चार ओळी निश्चितच खरडू शकेन.

साहित्य - चिंच, खजूर, गूळ, पाणी.
प्रमाण - सगळंच अदमासे. (मला काय प्रमाणबिमाण विचारताय...!)
कृती - हे सगळं एका जाड बुडाच्या स्टीलच्या पातेल्यात पंधरा-वीस मिनिटे उकळून घ्या. नंतर दाबून-पिळून-गाळून-बिळून घ्या. चटणी तयार...

उद्या पाणीपुरीचा बेत आहे...

बटाटेवड्यांसोबतच अर्ध्या बटाट्याचे बटाटाभजी आणि वांग्याच्या चारदोन चकत्यांची वांगीभजीपण गेलाबाजार करून पाहिली. वांग्यांच्या चकत्यांवर थोडेथोडे तिखटमीठ भुरभुरले आणि बेसनात घोळवून तळून घेतली. झाली गाड्याबरोबर नळ्याचीपण यात्रा!

पाककृती विभागात का? तर मी एवढं राबराब राबून (कुटुंबाचे एक्स्पर्ट अ‍ॅडवाइस-कम-टोमणे वैग्रे ऐकून घेत घेत हम भी कुछ कम नहीं असे म्हणत हे सगळं बनवलंय तर मग टाकूयात मिपावर. शेवटी काय आहे की मिपा आहे घरचं, होऊ द्या खर्च!

एन्जॉय माडी... चिअर्स!!! :-)

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

31 Aug 2014 - 10:26 pm | सुहास झेले

फोटो पाहून जळफळाट झालेला आहे.... ;-)

मुक्त विहारि's picture

31 Aug 2014 - 10:44 pm | मुक्त विहारि

खजूराची चटणी?

आयला, तुम्ही पुणेकर दिसता...तेच ते दही-मिसळ खाणारे...

गरमा-गरम बटाटे-वड्यां बरोबर फक्त लसणाचीच चटणी हवी आणि तोंडी लावायला तळलेल्या हिरव्या लवंगी मिरच्या.

मृत्युन्जय's picture

1 Sep 2014 - 12:20 pm | मृत्युन्जय

दही मिसळ? मिसळीबरोबर दही खातो आम्ही. पण मिसळीत दही घालुन खाण्याचा करंटेपणा करत नाही. नाही म्हणायला पुण्यात एका ठिकाणची दही भेळ भारी फेमस आहे म्हणे. मी त्याच्याही वाट्ञाला आजवर गेलेलो नाही. पण दही भेळ हा प्रकार तुमच्या ममईतही मिळतो बरे,

बादवे ठाणे मुंबैच्या बाहेर येते हे मान्य पण आम्ही ठाणे = मुंबई समजतो. आणि तिथेतरी वडा चिंचगुळाच्या चटणी बरोबर मिळतो. ठाण्यात ५ वर्षे राहिलो असल्याने तिथले सगळे वडापाव खाल्ले आहेत. अर्थात राजमाता आणि दुर्गा मध्ये चटण्या लै म्हणजे लै च भारी असतात पण कुंजविहार आणि इतर अनेक ठिकाणी गोड चटणी मिळते मात्र जवळजवळ प्रत्येक ठिकाणी तिखट चटणीदेखील मिळते. पुण्यात ती चटणी मिळत नाही पण पुण्यात मिरच्या असतातच. असो पुणे - ठाणे नको. दोन्ही आम्हाला प्रिय आणि दोन्हीकडच्या सुखद आठवणी आणि अनुभव आहेत. पुण्यात तर राहतोच असल्याने अजुन काही बोलत नाही.

दिपक.कुवेत's picture

1 Sep 2014 - 1:07 pm | दिपक.कुवेत

एवढि गोड / घट्ट चटणी देत नाहित. अर्थात गाडिवाल्यांना परवडतपण नाहि म्हणा. पण चिंचगुळाच्या पातळ पाण्यामधे तिखट आणि बारीक चीरलेला कच्चा कांदा घालुन "चटणी' म्हणुन ती पावाला फासतात. निदान मला तरी अशी चटणी आवडते. घरी वडे केले कि मीहि अशी चटणि करतो. अर्थात गाडिवर वडापाव सोबत वड्यांच्या भुग्यात तिखट्/खोबरं घालुन बनवलेली चटणीहि असते. ती हि आवडते. आवड-निवद व्यक्तिसापेक्ष वेगवेगळी असु शकते पण अट्ट्ल खवैय्या सगळे पदार्थ निदान एकदा तरी चाखुन बघतोच.

प्रभाकर पेठकर's picture

1 Sep 2014 - 1:13 pm | प्रभाकर पेठकर

गाडिवाल्यांना परवडतपण नाही.

गैरसमज आहे दिपकराव. आणि उत्तम चवीसाठी दोन पैसे जास्त आकारले तर गिर्‍हाईके तक्रार करीत नाहीत. पण दोन पैसे जास्त न आकारताही दाट चटणी देता येते.

दिपक.कुवेत's picture

1 Sep 2014 - 1:23 pm | दिपक.कुवेत

पण अजुन पर्यंत तरी काय दाट चटणी कुठल्याच गाडिवर पाहण्यात आली नाहि ब्वॉ. पण ईथे मात्र मिळते...बर्गरच्या पावात घालुन :)

प्रभाकर पेठकर's picture

1 Sep 2014 - 2:08 pm | प्रभाकर पेठकर

चिंचेच्या चटणीत आम्ही खजूरही वापरतो. खजूर जरा महाग पडतो. पण ती चटणी चवीला जास्त उजवी असते.

चिंच गुळाची चटणी पातळ ठेवण्यामागील कारण म्हणजे पातळ चटणी ही दाट चटणीपेक्षा, पावावर, पसरवायला (स्प्रेडेबल) सोपी असते. विशेषतः गर्दीच्या वेळी.

आम्ही इथे चिंच-गुळ-खजूर अशी चटणी बनवितो. ती सुद्धा दाट नसते, जरा पातळच असते. त्या मागील कारण म्हणजे भेळेत ओलावा राहण्यासाठी, नीट समतोल मिसळण्यासाठी सोपी जाते. समोशाबरोबर खायला दाट चटणी चांगली लागते. पण पुन्हा दोन वेगवेगळ्या चटण्या करा आणि अडीच बाय ४ फुट टेबलावर अजून एक भांडे वाढवा हे त्रासाचे होते. त्यामुळे आहे तीच पातळ चटणी सर्व (भेळपुरी, दहिबटाटा पुरी, शेवबटाटा पुरी, पाणीपुरी, रगडा पॅटीस, दहीवडा, समोसा) पदार्थांमध्ये वापरली जाते.
नेहमी आर्थिक गणित पाहिले जात नाही. ते सोडविणे सोपे असते. पण आपल्या कारागिराच्या सवयी (जसे चटणीवर हात आखडता असणे किंवा ढिला असणे), पदार्थातील इतर जिन्नसांचा मुळ चवीवरील प्रभाव नियंत्रण करणे, पदार्थ बनविण्यसाठी लागणारा वेळ वगैरे वगैरे इतर बाबींचा विचार करून ही कांही चटण्या जास्त प्रवाही बनविणे आवश्यक असते. हिरव्या मिरचीची चटणी, जी व्हेज. सँडविचला लावतात. ती जर दाट आणि जास्त तिखट असेल तर चवीवर नियंत्रण करण्यासाठी काकडी, टोमॅटो, बटाटा, बटर आदी जिन्नस जास्त वापरावे लागतील. त्यांचे पावाशी असणारे प्रमाण (रेशो) बिघडतो आणि चवीत फरक पडतो. पातळ आणि कमी तिखट चटणी पसरवायला सोपी आणि तिखट पणा नियंत्रणात राहून बाकी जिन्नसांच्या पातळ चकत्या वापरता येवून खाताने ते सँडविच हाताळणे गिर्‍हाईकालाही सोपे जाते आणि जास्त तिखट लागत नाही.

दिपक.कुवेत's picture

1 Sep 2014 - 6:24 pm | दिपक.कुवेत

सर्व चाट आयटम्स साठि चिंच-गुळ-खजूर अशीच चटणी बनवितो.

मनिष's picture

1 Sep 2014 - 1:24 pm | मनिष

अगदी, अगदी!! काही झाले की झोडपले पुण्याला. :(

पुण्यात ती चटणी मिळत नाही पण पुण्यात मिरच्या असतातच. असो पुणे - ठाणे नको. दोन्ही आम्हाला प्रिय आणि दोन्हीकडच्या सुखद आठवणी आणि अनुभव आहेत.

+१११११११११११११

असे काही नाही हो....पुणेकर वागतात तस तसे, तर कौतूक करणे भाग आहे ना?

आता

"पुणेरी दही-मिसळ"

आणि

"कोल्हापूरी मिसळ"

ह्यात तुलना केली तर आम्हाला कोल्हापूरीच मिसळ आवडते....

सस्नेह's picture

1 Sep 2014 - 3:43 pm | सस्नेह

मिसळच काय, बटाटावडा (कोल्हापुरी नाव कटवडा) खावा तो कोल्हापुरातच. कराड-सातार्यापासून उत्तरेकडे जावे तसे वड्याचे आकारमान हवा गेलेल्या टायरसारखे अन चवही साधारण तशीच होत जाते, असा अनुभव आहे.

पैसा's picture

1 Sep 2014 - 3:59 pm | पैसा

झाली सुरुवात! उत्तरेला फक्त पुणे आणि पुणेच!!

एस's picture

1 Sep 2014 - 4:50 pm | एस

तुम्हांला काही काम नाही का? पुण्याबद्दल कोणी काडी लावली की फुंकर घालून व्यवस्थित कशी पेटेल याची काळजी घ्यायला लगेच पुढे असता! ;-)

बादवे, टायरची आणि तेही हवा गेलेल्या टायरची चव पुणेकरांना काही माहिती नाही बुवा. हो आता ज्यांना जोशी वडेवाल्यांचे वडे म्हणजेच पुणेरी वडे असं आणि एवढंच माहिती असतं त्यांच्याबाबत आपण काही करू शकत नाही म्हणा.

पैसा's picture

1 Sep 2014 - 4:54 pm | पैसा

:D

हर काडी काडी पे लिखा है जलानेवाले का नाम! :D

बरं वडे र्‍हाऊ द्या, ते एक श्रीखंड पात्तळ केलेलं पेय (त्याला म्हणतात मात्र पियुष, म्हणजे अमृत) मिळतं का अजून पुण्यात?

>>ते एक श्रीखंड पात्तळ केलेलं पेय (त्याला म्हणतात मात्र पियुष, म्हणजे अमृत) मिळतं का अजून पुण्यात?

काय हे, आता पियुष कसं बनवतात त्याची रेसिपी टाकायलाच हवी !!

एस's picture

1 Sep 2014 - 5:56 pm | एस

पी-यू-ष. हं, आता दहावेळा लिहून काढा बरं "पीयूष"...

सूड's picture

1 Sep 2014 - 5:57 pm | सूड

हे एक बरं केलंत !! ;)

दिपक.कुवेत's picture

1 Sep 2014 - 6:26 pm | दिपक.कुवेत

स्नेहातै ने पार हवाच काढुन टाकली कि हो.....

काळा पहाड's picture

27 Oct 2014 - 8:01 pm | काळा पहाड

खरं बोलतायत हो त्या. कोल्हापूरचा वडा खाणारा माणूस जेव्हा पुण्यात वडा नावाचा विनोदी पदार्थ खातात, तेव्हा पुणेकरांची कीव करावी की हसावं हे समजत नाही हे ही खरं.

बॅटमॅन's picture

1 Sep 2014 - 6:40 pm | बॅटमॅन

पीयूष म्ह. श्रीखंडाची भांडी दुधाने धुतल्यावर तयार होणारे पेय.

शिद's picture

1 Sep 2014 - 6:53 pm | शिद

=)) बेक्कार.

किसन शिंदे's picture

1 Sep 2014 - 9:31 pm | किसन शिंदे

पीयूष म्ह. श्रीखंडाची भांडी दुधाने धुतल्यावर तयार होणारे पेय.

=))

नाय रे ब्याट्या. ये एकदा आमच्या ठाण्यात, तुला आमच्या गोखलेतलं(गोखले उपहार गृह ;) ) पीयूष पाजतो.

सस्नेह's picture

1 Sep 2014 - 10:27 pm | सस्नेह

पाकृ सोप्या कशा कराव्या हे उणे..सॉरी, पुणेकरांकडून शिकावे !

विजुभाऊ's picture

1 Sep 2014 - 7:25 pm | विजुभाऊ

हो आता ज्यांना जोशी वडेवाल्यांचे वडे म्हणजेच पुणेरी वडे असं आणि एवढंच माहिती असतं त्यांच्याबाबत आपण काही करू शकत नाही म्हणा.

त्याम्च्याबद्दल बोलूच नका. वड्याचा आकार गोल( चेंडूप्रमाणे) असण्या ऐवजी चक्क चपटा असतो तेथे. बहुतेक वड्याला सुद्धा इस्त्री करत असावेत

मृत्युन्जय's picture

1 Sep 2014 - 7:11 pm | मृत्युन्जय

बटाटावडा (कोल्हापुरी नाव कटवडा)

माफ करा पण बटाटावडा म्हणजे कटवडा नाही आणि कोल्हापूरातही बटाटावडा म्हटल्यावर कटवडा देत नाहित. कटवडा कोल्हापूरात चांगलाच मिळत असेल पण पुण्यातही तो बर्‍याच ठिकाणी उत्तम मिळतो. इच्छुकांनी प्रथम कर्वे नगरातल्या शिवदीप कडे प्रयाण करावे.

सस्नेह's picture

1 Sep 2014 - 10:05 pm | सस्नेह

मिसळपाव अन मिसळ यात जो फरक आहे, तोच कटवडा अन बटाटावडा यात आहे.
कृपया अभ्यास वाढवावा. वाटल्यास 'अभ्यास' करण्यासाठी एकदा कोल्हापुरात यावे. अ

कटवडा म्हणजे बटाटावडा? पातळ भाजीतला वरचा कट ज्यास पुण्यात 'सँपल' म्हणतात तो बटाटेवड्यावर घालून दिला तर तो कटवडा असं मला वाटायचं.

मृत्युन्जय's picture

2 Sep 2014 - 3:48 pm | मृत्युन्जय

कटवडा आणि बटाटावडा एकच? आयला कोल्हापुरात आजकाल काय वाट्टेल ते घडायला लागले आहे. आमच्यावेळेस असे नव्हते. तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी ३ वर्षे कोल्हापुरात राह्यलेलो आहे (अर्थात तेव्हा लहान होतो (अजुनही आहे :D) )

आमच्या पुण्यात (आणि इतर जगभरात) बटाटावडा साधारण असा असतो:
batatawada

आणि कट असा:

kat

कटवडा असा:
katwada

*तिन्ही चित्रे अपर्णातैंच्या धाग्यावरुन साभार (विनापरवानगी घेतल्याबद्दल माफी)

बटाटावडा कटात मिसळल्यावर त्याचा कटवडा होतो, पण आम्ही (आणि इतर सामान्य मनुष्ये) बटाटावडा कटाशिवायही (बर्‍याचवेळा कटाशिवायच) खातो (पण कटवडा आम्हाला फार प्रिय).

आमच्याकडे केळ, दूध आणि शिकरण सुद्धा वेगवेगळ मानतात. तेच दूध, त्याच दूधात टाकल्यावर शिकरण बनते. पण म्हणुन केळ्याला शिकरण म्हणण्याचा करंटेपणा आम्ही करत नाही. शिवाय आमच्यासाठी शिरखुर्मा वेगळा आणि नुसत्याच शेवया वेगळ्या. ईडली वेगळी आणि सांबार वेगळा. अजुन बरेच आहे. पण तुर्तास इथेच थांबतो. अजुन ज्ञान मिळवायचे असल्यास पुण्याला यावे. इथे एक आख्खी खाद्य संस्कृती आहे. तुम्हाला जरुर दर्शन घडवेन (खर्च तुमचा (माझ्या खाण्यापिण्यासकट) :) )

प्यारे१'s picture

2 Sep 2014 - 4:04 pm | प्यारे१

मृत्युंजया,

एकदम पोटावर (शेपटीवर च्या चालीवर) पाय दिल्यासारखा उसळला आहेस?
पुणेंकर शोभतोंस बरें! =))

ती आपातै एक भारी, स्नेहातै भारीत भारी आणि तू जगात भारी. :D :P

कवितानागेश's picture

1 Sep 2014 - 7:30 pm | कवितानागेश

आयला!! हवा गेलेल्या टायरची चव कशी असते?? :P

एस's picture

1 Sep 2014 - 7:33 pm | एस

स्नेहातैंना माहिती असावी. हवा भरलेल्या आणि हवा गेलेल्या टायरांची चव वेगवेगळी लागते का असा उपप्रश्न. आणि का लागते असा पुरवणी उपप्रश्न.

सस्नेह's picture

1 Sep 2014 - 10:08 pm | सस्नेह

चाखली आहे चव एकदा पुण्यात या हवा-लेस टायरची पुण्यात. पुण्यात येऊन वडा खाण्याचे पाप केले तेव्हा.
बाकी, पुणेकरांना ती चव तोंडात बसल्याने त्यात निराळे काय ते जाणवत नाही, हे साहजिक आहे ! अ

मुक्त विहारि's picture

1 Sep 2014 - 9:07 pm | मुक्त विहारि

आलू बोंडे सोडून....

आता नागपूरला गेलो की परत एकदा आलू-बोंडे खायला लागणार.

आमचा पिंडच मुळी सावजी मटण आणि आलू-बोंड्यावर पोसला गेलाय.

मृत्युन्जय's picture

1 Sep 2014 - 7:08 pm | मृत्युन्जय

मिसळ आम्हाला तरी बेडेकरांची आवडते तशीच मामलेदारांची आवडते तशीच दिवे आगरच्या आवळसकरांची आवडते तशीच काट्टाकिर्र्र ची आवडते तशीच बावड्याची आवडते तशीच नेवाळ्यांची आवडते. पण कृपा करुन फडतर्‍यांच्या आणि रामनाथाच्या मिसळीबद्दल चांगले बोलायला लावु नका.

>>गरमा-गरम बटाटे-वड्यां बरोबर फक्त लसणाचीच चटणी हवी आणि तोंडी लावायला तळलेल्या हिरव्या लवंगी मिरच्या.

हो आता ज्याची त्याची आवड!! नुसता झणझणीत जाळ हीच जर 'चवीची' व्याख्या असेल तर तुम्हाला तसं वाटणं साहजिक आहे. :D

मुक्त विहारि's picture

1 Sep 2014 - 2:41 pm | मुक्त विहारि

वडे म्हटले की जाळ हा हवाच त्याशिवाय लाळ कशी गळणार?

अर्थात,

कोंबडीचे, चिकन झाले की थोडा-फार फरक पडणारच...

आम्हाला त्या बटर-चिकन पेक्षा, तांबड्या रश्यातली कोंबडीच प्रिय...

तसेच

वडे म्हटले की सणसणीत चटणी ही हवीच....

असो,

कधी येताय वडे खायला?

कदाचित नंतर तुम्ही पण चिंचेच्या चटणीला विसरून जाल..

>>कदाचित नंतर तुम्ही पण चिंचेच्या चटणीला विसरून जाल..

नको, आमचं पुणं त्यातली चिंचेची चटणीच बरी. ;)

मुक्त विहारि's picture

1 Sep 2014 - 8:55 pm | मुक्त विहारि

ओके...

कट्ट्याच्या वेळी निवांत बोलू....

पुणेरी चिंचेची चटणी चांगली की डोंबोलीतली थोरल्या ठाकूरांकडची चटणी चांगली, ह्या विषयावर एकदा चर्चा करायचा बेत करू या....

बादवे,

आपला तो हुकलेला मिसळपावचा बेत पण परत एकदा आखू या....

एस's picture

1 Sep 2014 - 2:52 pm | एस

अजून शंका आहे का मध्यवर्तीकर?

गरमा-गरम बटाटे-वड्यां बरोबर फक्त लसणाचीच चटणी हवी आणि तोंडी लावायला तळलेल्या हिरव्या लवंगी मिरच्या.

आम्ही हे पण खातो आणि ते पण खातो. पुण्याची खाद्यसंस्कृती काय काढताय तुम्ही? :-)

मुक्त विहारि's picture

1 Sep 2014 - 10:11 pm | मुक्त विहारि

हम्म्म्म्म्म्म्म्म....

पुण्यातल्या पोह्यांपेक्षा उत्तम पोहे इंदौरला मिळतात.

पुण्यातल्याच न्हवे तर सगळ्या जगातली उत्तम मिसळ माझा डोंबोलीतला मित्र बनवतो.

पुण्यातल्या पियुष पेक्षा उत्तम पियुष ठाण्यात मिळते.

पुण्यातल्या मसाला डोश्यापेक्षा उत्तम डोसा इथे यानबूत मिळतो.

आणि पुणेरी बासुंदी पेक्षा उत्तम बासूंदी आमच्या डोंबोलीतल्या अनंत हलवाई कडे मिळते.

आणि जमल्यास बिर्याणी खायला या एकदा आमच्या डोंबोलीत.

आमच्या इथल्या (डोंबोलीतल्या) आस्वाद हॉटेलात फार उत्तम बिर्याणी मिळते आणि ती पण अपमान न करता, हसतमूख चेहर्‍याने..... संध्याकाळी ७ ते रात्री ८...घरगुती पद्धतीने असल्याने बिर्याणीचा पुलाव किंवा मसालेभात होत नाही...

शिवाय पुणेरी मसाला पानापेक्षा, नागपूरातल्या आनंद पान भंडारला भेट द्या किंवा संभाजी नगरात पान खावून बघा.

असो,

सध्या इतकी उदाहरणे बस्स झाली.

बाकी पुण्यातल्या लोकांना स्वतःचे उणेपण समजत नाही, ह्यात नवल ते काय?

पुण्याशिवाय इतर पण शहरे आहेत आणि ती पण आपापला आब राखून आहेत....

असो,

एकूण काय तर पुण्यातल्या लोकांना दुर्वांकूर आणि पेशवाई प्रिय.

नागपूरला आर्यभुवन मध्ये, किंवा वलसाडला स्टेशन जवळ किंवा अहमदाबादला (हॉटेलचे नांव विसरलो) पुण्यातल्या पेक्षा उत्तम जेवण मिळते.

अर्थात,

त्यासाठी मध्यवर्ती भागात यावे लागते.शिक्षण म्हणू नका की नौकरी म्हणू नका.पुणे फार पुर्वीच परीघाबाहेर गेले आहे.सध्यातरी पुण्यात सगळेच उणे आहे.हवेशीर आणि गार-गार हवा पण आजकाल पुणे सोडून इतरस्त्र गेली आहे, असे ऐकिवात आहे.

जावू दे....

अजूनही तुम्हाला वाटत असेल की पुणे उत्तम तर आमची संमती आहे.

आम्हाला पुण्यापेक्षा, पुणेकर आणि त्यातूनही मिपाकर जास्त प्रिय आहेत.

अनंत हलवाई डोंबोलीतसुद्धा आहे? मला वाटत होतं फक्त कल्याणला आहे.

बदलापूरात पण आहे, पण शिंचे एक चटणीची पिशवी जास्त मागितली तर महापाप केल्यासारखी रिअ‍ॅक्शन देतात.

पुणेकर मायग्रेट झाले की काय बदलापुरात? हा बदल पुराच दिस्तोय ;)

मुक्त विहारि's picture

1 Sep 2014 - 10:24 pm | मुक्त विहारि

आमच्या डोंबोलीत आहेत... मानपाडा रोडवर.. गोदरेज शोरूमच्या पुढे...जैन मंदिराच्या जवळ...

बादवे,

सध्या आमच्या पुरते, मध्यवर्ती ठिकाण म्हणजे मिपाकर...

त्यामुळे डोंबोलीला "मध्यवर्ती" हे बिरूद लावलेले नाही, हे लक्षांत आले असेलच..

मृत्युन्जय's picture

2 Sep 2014 - 3:55 pm | मृत्युन्जय

पुण्यातल्या पोह्यांपेक्षा उत्तम पोहे इंदौरला मिळतात.

पुण्यातल्याच न्हवे तर सगळ्या जगातली उत्तम मिसळ माझा डोंबोलीतला मित्र बनवतो.

पुण्यातल्या पियुष पेक्षा उत्तम पियुष ठाण्यात मिळते.

पुण्यातल्या मसाला डोश्यापेक्षा उत्तम डोसा इथे यानबूत मिळतो.

आणि पुणेरी बासुंदी पेक्षा उत्तम बासूंदी आमच्या डोंबोलीतल्या अनंत हलवाई कडे मिळते.

आणि जमल्यास बिर्याणी खायला या एकदा आमच्या डोंबोलीत.

आमच्या इथल्या (डोंबोलीतल्या) आस्वाद हॉटेलात फार उत्तम बिर्याणी मिळते आणि ती पण अपमान न करता, हसतमूख चेहर्‍याने..... संध्याकाळी ७ ते रात्री ८...घरगुती पद्धतीने असल्याने बिर्याणीचा पुलाव किंवा मसालेभात होत नाही...

शिवाय पुणेरी मसाला पानापेक्षा, नागपूरातल्या आनंद पान भंडारला भेट द्या किंवा संभाजी नगरात पान खावून बघा.

मान्य आहे. जगातले सगळे चविष्ट पदार्थ सर्वोत्तम पुण्यात कसे मिळत्तील. पण वरील सर्व पदार्थ पुण्यात उत्कृष्ट मिळतात. हेच पुण्याचे वैशिष्ट्य, नाही म्हणजे कुठे पान चांगले मिळते, कुठे वडा, कुठे बासुंदी. आमच्याकडे सग्गळे चांगले मिळते, सर्वोत्तम असेलच असा दावा नाही.

बादवे जगातली सर्वात चविष्ट मिसळ माझा आत्तेभाऊ बनवतो. ;) . तुमचा मित्र नाही.

मुक्त विहारि's picture

2 Sep 2014 - 10:20 pm | मुक्त विहारि

"आमच्याकडे सग्गळे चांगले मिळते, सर्वोत्तम असेलच असा दावा नाही."

तेच तर आहे ना...

म्हणजे सर्वोत्तम वस्तू दुसर्‍या गावांत आणि नांव मात्र पुण्याचे....

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Oct 2014 - 12:15 am | निनाद मुक्काम प...

पुण्यापेक्ष्या चांगले पियुष आमचा डोंबिवली वली मधील फडके रोडवरील कुलकर्णी कडे मिळते .

तिमा's picture

7 Sep 2014 - 5:06 pm | तिमा

अशा खाण्यामुळेच मग 'दोंद'वलीकर तयार होतात.

मुक्त विहारि's picture

9 Sep 2014 - 12:34 am | मुक्त विहारि

होणारच हो!!!!

वड्यांबरोबर चिंचेची चटणी खाण्यापेक्षा, वड्यांबरोबर लसणाची चटणी खाणारे 'दोंद'वलीकर परवडले...

टवाळ कार्टा's picture

9 Sep 2014 - 2:36 pm | टवाळ कार्टा

आणि जमल्यास बिर्याणी खायला या एकदा आमच्या डोंबोलीत.

आमच्या इथल्या (डोंबोलीतल्या) आस्वाद हॉटेलात फार उत्तम बिर्याणी मिळते आणि ती पण अपमान न करता, हसतमूख चेहर्‍याने..... संध्याकाळी ७ ते रात्री ८...घरगुती पद्धतीने असल्याने बिर्याणीचा पुलाव किंवा मसालेभात होत नाही...

बिर्यानी...इने च्चार्र्मिनारा के पिच्चु के गली में इस्माईलभाई की बीर्यानी खाने को देव रे...फिर तुम किदर्कुभी जाव..और दुसरी बीर्यानी नक्को

मुक्त विहारि's picture

9 Sep 2014 - 9:51 pm | मुक्त विहारि

उस टाईम कट्टा करणेका हय...

तुम चिंता मत करणा... शिवास रीगल के साथ हमारे डोंबोली की बिर्याणी खाणेका.

अब इतनाच बोलो, मटण बिर्याणेका आरडर दू या प्रॉन्स बिर्याणी या फिर चिकण?

वैसे उसकी व्हेज भी सुंदर होती हय.

तुम बोलणेका हम बिर्याणी और बाटली (बिबा) लेके आता हय. तुम बीच में वो दात दूखने का बिबा नहीं डालनेका...

प्रभाकर पेठकर's picture

10 Sep 2014 - 1:42 am | प्रभाकर पेठकर

अब क्या रुलाएगा क्या????

मुक्त विहारि's picture

11 Sep 2014 - 9:04 pm | मुक्त विहारि

आपण परत एकदा कट्टा करू.

ठाणे झाले की मग पुणे, नाहीतर एरंडवणे आहेच...

मुळात बिर्यानी ही कोलांबीची असूच कशी शकते. माझ्या शुल्लक माहितीप्रमाणे ती फक्त कोंबडी किवा मटनाचीच असते.
बाकी डोंबवलीत काहीही घडू शकत हे दक्षिण मुंबई मधे राहणारे समजू शकतात. :D

यशोधरा's picture

17 Sep 2014 - 11:45 pm | यशोधरा

का हो मुविकाका, इतकं सगळं पुण्यापेक्षा इतर शहरांत उत्तम आहे तर तुम्हे काही मंडळी सतत पुण्याबद्दलच का बोलता? आपापल्या शहरांचा थोदा फार अभ्यास करा ना त्यापेक्षा :P की तिथे काही नाहीच अभ्यास करण्याजोगं? :D

सूड's picture

18 Sep 2014 - 12:27 am | सूड

असू दे, आपलं पुणं त्यानिमित्ताने का होईना चर्चेत राहतंय!! ;)

यशोधरा's picture

18 Sep 2014 - 1:20 am | यशोधरा

किंवा इतर शहरांबद्दल बोलण्यासारखं फारसं काही नसावं बहुतेक.

हाच तो टिपीकल पुणेकर प्रतिसाद....

आणि

पुण्यापेक्षा आमचे यानबू उत्तम आहे.

निदान इथे तरी वड्यांबरोबर चिंचेची चटणी देत नाहीत.

आणि सांभार पण देत नाहीत.

अर्थात जिथे जेमतेम घोटभर चहाला, "अम्रुत-तुल्य" म्हटल्या जाते, त्या शहराबद्दल काय बोलणार?

बाद्वे

उद्या पुण्यात मेदूवडे आणि चिंचेची चटणी किंवा गेला बाजार, इडली आणि चिंचेची चटणी, असा पण बेत असू शकतो.

कवितानागेश's picture

31 Aug 2014 - 10:44 pm | कवितानागेश

कोथिंबीर धुतली होती का खाण्याआधी? ;)

एस's picture

1 Sep 2014 - 2:54 pm | एस

कोथिंबिर खास मुठेच्या पाण्याने धुतात आमच्याकडे विशेषतः पाहुण्यांना निमंत्रण दिले असल्यास. कधी येताय बरं मग आमच्याकडे?

कवितानागेश's picture

1 Sep 2014 - 3:49 pm | कवितानागेश

येते येते. मला मुठेचं पाणी पचतं... मिठीचंही पचतं. :)

एस's picture

1 Sep 2014 - 4:46 pm | एस

याच एकदा, तुमच्यासाठी खास म्हणून स्वहस्ते कोथिंबिर वड्या करतो. ;-)

दिपक.कुवेत's picture

1 Sep 2014 - 6:22 pm | दिपक.कुवेत

"धुतलेल्या" कोंथींबीर ते आपलं कोथींबीरीच्या वड्या....

पूर्वी ठाण्याच्या कुंजविहार मध्ये चिंचेच्या चटणीसोबत वडा मिळायचा त्याची आठवण झाली.
आता मिळतो का माहित नाही.

मुक्त विहारि's picture

31 Aug 2014 - 11:40 pm | मुक्त विहारि

तुम्ही पण त्या कुंजविहार्चे फॅन का?

ह्या जन्मात तरी परत त्या कुंज-विहार मध्ये जाणार नाही.एकदाच चून गेलो होतो.

मेल्याने वड्या बरोबर चिंचेची चटणी दिली आणि भर म्हणून मारवाडी मिरच्या.

च्यामारी आमच्या सारख्या गावरान माणसांचे हे खाणेच न्ह्वे.

गेला उडत...

आम्ही अद्याप झमझमीत वडे आणि चटकदार चटणी पचवू शकतो.

खटपट्या's picture

1 Sep 2014 - 7:23 am | खटपट्या

अगदीच वाईटही नाही आहे. लहानपणापासून खातोय.
कधीतरी काहीतरी वेगळे म्हणून ठीक आहे.
बाकी आवड आपली आपली. :)

मुक्त विहारि's picture

1 Sep 2014 - 2:45 pm | मुक्त विहारि

ते ही खरेच म्हणा...

मुक्त विहारि's picture

31 Aug 2014 - 11:43 pm | मुक्त विहारि

चूकून वाचावे...

" बादवे, ह्या स्वसंपादनाचा गैर फायदा कुणी घेतला?"

किसन शिंदे's picture

31 Aug 2014 - 11:44 pm | किसन शिंदे

बटाटेवडा राहू द्या, पण चिंचेची चटणी पाहून तोंडात लाळ जमा झाली आहे. वडा + ही चटणी, समोसा + ही चटणी ही आमची अत्यंत आवडती समीकरणे.

मुक्त विहारि's picture

31 Aug 2014 - 11:59 pm | मुक्त विहारि

तुम्ही एकदा थोरल्या ठाकूरांचा डब्बल वडा-पाव खायला हवा होता...

अर्थात त्या साठी तुम्हाला डोंबोलीला यावे लागले असते.

मस्त हिरव्या मिरच्यांची चटणी आणि कांदा-लिंबू मारून वडा-पाव द्यायचा.

असो....

आम्ही पुण्यवान की, आम्हाला थोरल्या ठाकुरांचे वडे मनसोक्त खाता आले...

किसन शिंदे's picture

1 Sep 2014 - 12:04 am | किसन शिंदे

२००४ पुर्वी तुमचे थोरले ठाकुर बंद झाले नसतील तिथला वडापाव खाल्ल्याची शक्यता शंभर टक्के आहे, फक्त आता आठवत नाही. बादवे कुठे होता हा वडापाव?

मुक्त विहारि's picture

1 Sep 2014 - 12:36 am | मुक्त विहारि

प्रश्र्नांतच उत्तर आहे...

सध्या डोंबोलीला जशी मून-मून मिसळ फेमस आहे, तसे ह्या वडा-पावचे नांव होते.

सुरुवातीला केळकर रोड, मानपाडा रोडला जिथे मिळायचा तिथे मिळायचा.

नंतर नगरपालिकेच्या जवळ सुरु झाला.

सध्या आदित्य मंगलकार्यालयाच्या समोर मिळतो, पण तो आमच्या साठी नसतो.

शिंचे आजकाल चिंचेची चटणी टाकतात आणि मक्याचे पोहे देतो.

आणि परत त्या मारवाडी मिरच्या.

ठाकूर बुवा मस्त एक-दोन लवंगी मिरच्या टाकायचा.

जावू दे, लग्न झाल्या पासून आम्हाला पण घरी रहायचे असल्याने चिंचेची चटणी आवडली, असे दाखवायला लागते.(अशावेळी बियर उपयोगी पडते.त्या कडवड पण मधूर चवी बरोबर, ती चटणी चालून जाते.) पण तो जुलुमाचा राम-राम.

आता पुढच्या वेळी आलो की, झमझमीत वडे आणि लसणाच्या चटणी सोबतच कट्टा करू या.

तुम भी क्या याद करोगे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Sep 2014 - 8:52 pm | निनाद मुक्काम प...

डोंबिवली मध्ये ब्राह्मण सभा जेथे मुविच्या भाषणाला बक्षिस मिळाले होते त्या बाजूला त्रिमूर्ती ह्यांचा वडापावात झणझणीत हिरव्या मिरचीची चटणी असते.
नुसत्या आठवणीने तोंड भरून आले.

मुक्त विहारि's picture

14 Sep 2014 - 10:34 pm | मुक्त विहारि

आज-काल तिथे पण ह्या गुज्जू मंडळींच्या नादाने खजूर-चिंचेची चटणी असते.

जावुदे,

फडके रोड जिथे प्रधान डॉ.च्या बंगल्याच्या रोडला मिळतो, तिथले कुळकर्णी जरा बरे वडे विकतो.पण तो त्याच बरोबर इतरही बरेच पदार्थ विकत असल्याने, त्याच्या कडे पण चिंचेची चटणी आणि वडे खाणारे आहेतच.

हा हंत हंत...

ते थोरले ठाकूर गेले आणि डोंबोलीतल्या वडा-पावाची मज्जाच गेली.निदान ठाकुरांनी तरी चिंचेची चटणी आणि वडे हे काँबिनेशन ठेवायला नको होते.

मी ती चिंचेची चटणी पुरण-पोळी बरोबर खाइन कदाचित श्रीखंडा बरोबर पण खाईन.पण बटाटेवडे आणि चिंचेची चटणी एकत्र अजिबात खाणार नाही.

लसणाची चटणी आणि बटाटे वडे हेच खरे.

ते मद्राशी तर बटाटे वडे आणि सांभार पण खातात.

आणि लोकं पण त्या वडा-सांभारा बरोबर पाव खातात.त्या मद्राशांचे एक ठीक आहे, पण आपलीच, रांगडी मराठी पुरुष मंडळी, चिंचेची चटणी खातांना बघून कसेसेच होते.

वाघाने गवत खाल्ले तरी चालेल, पण मराठी पुरुषांनी चिंचेची चटणी वड्यांच्या बरोबर खाणे, हे महाराष्ट्र धर्माला शोभत नाही.

एकूणच, आमचा राग चिंचेच्या चटणीवर आहे, हे सुज्ञ माणसांच्या लक्षांत आलेच असेल.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Oct 2014 - 12:26 am | निनाद मुक्काम प...

येथे उशिरा लक्ष गेले
त्रिमूर्ती च्या बाजूला सुभाष डेअरी आहे तेथे पूर्वी मातोश्रींचा वाडा होता ,
खानदानी डोंबिवलीकर असल्याचा सार्थ अभिमान बाळगून सांगतो , त्रीमृती मध्ये वडापाव खायला जाणार असे सांगताच माझ्या डोंबिवलीकर मामे बहिणींनी लगेच ओरिजनल वडा पाव बनवणार्याने चवीशी इमान राखता यावे म्हणून सर्वेश जवळ नवीन दुकान थाटले असल्याचे कळले आहे , पावसळ्यात गाड्यांचा गोंधळ असायचा तेव्हा आईची ७ पर्यंत वाट पहायची नाहीतर त्रिमूर्ती मध्ये जाऊन घरगुती जेवण आणावे. असा रिवाज होता , त्रिमूर्ती आमची दुसरी आई होत्या , गुज्जू लोकांसाठी चवीसाठी प्रतारणा पाहून वाईट वाटले.

दिपक.कुवेत's picture

1 Sep 2014 - 11:51 am | दिपक.कुवेत

एवढा टेम्टींग फोटो टाकून जळवल्याबद्दल. मित्रा पाकृ रेडिमेड असली तरी फोटो तरी स्टेप बाय स्टेप टाकत जा...उदा. बाहेरुन वडे आणल्यास त्यांचा पुडितच ठेवुन काढलेला फोटो, प्लेट स्वच्छ पुसतानाचा, कोथींबीर धुतानाचा :D मग वडे प्लेट मधे ठेवुन चटणीची वाटि मधे ठेवतानाचा आणि मग शेवटि अर्धवट खाल्ल्याचा....बघ विचार कर.

एस's picture

1 Sep 2014 - 2:48 pm | एस

राजहंसाचे चालणे| भूतळी जहाले शहाणे|
येर काय कोणे| चालावेचि ना||

वडे खावे तर टोकावडेचेच .

पैसा's picture

1 Sep 2014 - 2:07 pm | पैसा

"कुटुंबाला" तरी दिले का नाही? वडे खायची घाई फोटोवरून जाणवते आहे. वड्यांच्या फार जवळून काढलेला फोटो आहे अशी एक शंका आली. का चटणी आपण केल्यामुळे तिचा फोटो फोकस करून द्यायचा असं ठरवलं होतं?

असो. कुटुंबाला सांगा, वडे छान दिसताहेत. :-/

एस's picture

1 Sep 2014 - 2:50 pm | एस

वड्यांपासून चटणीपर्यंत सगळं काही आम्हीच केलंय. तरीपण 'कुटुंबा'पर्यंत तुमची दाद पोहोचवण्यात येईल.

कोसळत्या पावसात सर्वाँच्या तोंडाला पाणी सुटेल, काहींचे डोळे पाणावतील, असा विषय काढल्याबद्दल धन्यवाद.
एक शंका.
नाशिक जळगाव वर्धा नागपूरची वेगळी शाखा आहे का मिपाची? तिथून काही पोच येत नाहीत. आमच्याकडे असं असतं वगैरे.

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Sep 2014 - 6:05 pm | llपुण्याचे पेशवेll

फोटोग्राफी उत्तम. पण वडे थोडे करपल्यासारखे का वाटत आहेत? थोडा मूड गेला त्यामुळे. :(

एस's picture

1 Sep 2014 - 6:09 pm | एस

पण वडे थोडे करपल्यासारखे का वाटत आहेत?

मी केलेत हो! ;-) सांभाळून घ्या थोडं! :-P
बादवे, मस्त टेस्टी झाले होते!

प्यारे१'s picture

1 Sep 2014 - 6:14 pm | प्यारे१

>>> मस्त टेस्टी

उंदराला साक्ष उंदीरच? मांजर तरी आणायची ;)

सूड's picture

1 Sep 2014 - 6:24 pm | सूड

>> मांजर तरी आणायची

नको, मग बोके जातात खरडवह्यांत खरडी टाकायला. =))))

मग बोके जातात खरडवह्यांत खरडी टाकायला.

ठ्ठो :rofl:

किसन शिंदे's picture

1 Sep 2014 - 9:34 pm | किसन शिंदे

रे मेल्या वाटच बघत असतोस.

सूड's picture

1 Sep 2014 - 9:37 pm | सूड

खिक्क !! ;)

एस's picture

1 Sep 2014 - 10:50 pm | एस

माझ्या पहिल्यावहिल्या पाककृतीचं पुणे Vs इतर सर्व असं यशस्वी रूपांतर आणि शतकोत्तर कामगिरीकडे ढकलणे या अजोड कामगिरीबद्दल मुवि आणि स्नेहांकिता या दोन्ही आयडींचे हाभिनंदण.

घाईगडबडीत केलेल्या पाककृतीच्या त्याच दर्जाच्या धाग्यावर पहिल्याच दिवशी प्रतिक्रियांचा पाऊस. अरेरे!

बाकी छायाचित्रणासारख्या विषयावर जीव तोडून लिहिलेल्या धाग्यांवर कुत्रेही फिरकत नाही हेही मिपाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. :-) धन्य! चलो बायबाय! :-)

प्रचेतस's picture

1 Sep 2014 - 10:54 pm | प्रचेतस

आम्ही इथे पण आलो हं... :)