प्रेरणा: गोंधळ
साल्या तू बेवडा मारताना
तुझे डोळे फार तांबारुन जातात
सगळ्याचा कसा उगाचंच तमाशा होतो
-----
गोठलेल्या पाण्यासारखी ती चिल्ड बीयर
आणि जळमटं पकडलेल्या
गंजलेल्या खिडकीतून दिसणारा
तो बर्ड व्हॅलीचा तलाव...
अरबी समुद्राचा आभास निर्माण करतो
आणि सगळा लफडा होतो...
सगळ्याचा कसा उगाचंच तमाशा होतो
-----
साल्या तू बेवडा मारताना
बघता बघता बसल्या जागी तरंगू लागतोस
भरभर शिव्या बाहेर येतात
बाजूचे बेवडे तुझ्याकडे पाहायला लागतात
तुझ्या हेलकावे खाणार्या शरीराकडे पाहतात
मग त्यांचाही डोलकर होतो, आणि
सगळाच शिमगा आणि मग
सगळ्याचा कसा उगाचंच तमाशा होतो
-----
साल्या तू बेवडा मारताना
माझा सगळाच नाईलाज असतो
कधी अचानक एखादा काचेचा ग्लास
हातातून सटकन निसटतो
तर कधी टेबलावरच कलंडतो
अशा रिकाम्या झालेल्या अवस्थेत
चुकून बाजूला लक्ष गेले
तर बाजूचे साले बेवडे...
आपल्याकडे पाहून क्षद्मी हसत असतात
तेव्हा तर माझी ब्याटरीच डाऊन होते
मला लवकर बारमधून बाहेर पडायचे असते
पण तू साल्या उठत नाहीस
असा सगळा लोच्या होऊन बसतो...
अन् मग
सगळ्याचा कसा उगाचंच तमाशा होतो
|- विसळलेला द्रवप्रेमी -|
(एक ताजीच रचना, भंगार आहे जे जाणवल्यास मंडळ जबावदार नाही )
प्रतिक्रिया
26 Aug 2014 - 4:48 pm | अन्या दातार
छ्या. कच्च्या ताडीसारखी मजा नाय ;)
26 Aug 2014 - 5:14 pm | प्रचेतस
हे कच्ची ताडी काय प्रकर्ण आहे ओ दातारबुवा?
27 Aug 2014 - 12:16 pm | अन्या दातार
आत्मुस बुवांची अजरामर रचना कस्सा राव थांबू =))
26 Aug 2014 - 4:51 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
बाबो.. आरे धन्या काय रे हे!!
=))
खल्लास!! म्हणून मला मिपा आवडतं...
अवांतरः कवितेचे विडंबन हे दारु आणि बेवड्यांचा उल्लेख झाल्याबिगर होऊच शकत नाही कां? आज एक मिपाकर असल्याची शरम वाटली. ;)
27 Aug 2014 - 2:38 pm | गवि
हो.. होऊ शकतं की. दारु नसेल तर वारा सरणे, अतिसार, एरंडेल इत्यादि चालतात.
किंवा दारुमधे हे सर्व मिसळूनही चालतं.
27 Aug 2014 - 2:42 pm | सूड
=))))
26 Aug 2014 - 4:59 pm | एस
इतका तमाशा होत असेल तर आपलं लिमिटमध्येच ठेवावं ना नेहमी !
26 Aug 2014 - 5:05 pm | पैसा
सगळंच कसं एकदम सोप्पं करून टाकलं न काय!
26 Aug 2014 - 5:28 pm | धन्या
असं सगळंच कसं एकदम सोप्पं करून टाकणारे मिपावर आहेत हे मिपाकरांचं अहोभाग्य. ;)
27 Aug 2014 - 12:41 pm | सस्नेह
27 Aug 2014 - 12:50 pm | धन्या
मिपावर लिहिलेलं सारंच तुम्ही खरं मानता काय? तसं असेल तर जपून र्हावा. नाही तर एक दिवस आम्हाला कळायचं की तुम्हाला "स्व" गवसला आहे. ;)
27 Aug 2014 - 1:03 pm | पैसा
स्वॅप्सला आणि आम्हालाही!
27 Aug 2014 - 3:19 pm | एस
कृपया बाब्बौ हे (का भौ?) असं (कंसांसकट) वाचावं. प्रतिसादाचं विडंबन करताना शीर्षकाचंही करायचं असतं हे घाईघाईत लक्षात आलं नव्हतं.
26 Aug 2014 - 5:14 pm | प्रचेतस
फोन, मुरलीधर आणि एका मद्यपीचा किस्सा आठौला.
26 Aug 2014 - 5:22 pm | सूड
हो, पुराणकाळात चतुर असणारा मुरलीधर सद्यकाळी अंमळ भोळा झालाय म्हणा. त्यात त्याला काही महाभाग भेटले की मग काय कथा !! ;) पुण्यात 'खुन्या' मुरलीधराचं' देऊळही आहे, असं जाता जाता नमूद करतो.
26 Aug 2014 - 5:24 pm | प्रचेतस
कलीयुग हो कलीयुग.
26 Aug 2014 - 5:43 pm | अत्रुप्त आत्मा
=)) काय त्या दिव्य आठौणी! =))
27 Aug 2014 - 12:29 pm | प्यारे१
अरेरे!
वल्ली मुरलीधर कोण रे?
27 Aug 2014 - 12:49 pm | धन्या
>> वल्ली मुरलीधर कोण रे?
मुरलीधर लोकसंगितवाले.
27 Aug 2014 - 2:06 pm | सूड
खुन्या मुरलीधर !!
27 Aug 2014 - 3:13 pm | विवेकपटाईत
आपण त्यातले नाही, काहीच प्रतिक्रिया देत नाही. *diablo* ]:-> }:-> ]:> }:> >:-] >:] (6) :diablo: *DIABLO*
27 Aug 2014 - 4:08 pm | कवितानागेश
हे प्रकार नवीनच आहेत.
dhabdhaba
kaichyaakai
Khuni panja
..........
आजपर्यंत भूछत्री आणि कोडाईकॅनल हे प्रकार माहित होते.