प्रिय मित्र,
सप्रेम नमस्कार.
पालकनीती परिवाराचे खेळघर वंचित मुलांच्या सर्जनशील शिक्षणासाठी काम करत आहे.सलगअठरा वर्षं, अनेक आव्हानांशी सामना करत खेळघराचं काम उभं राहिलं, पुढं गेलं. या वाटचालीत आपल्यासारख्या मित्र परिवाराचा फार मोठा वाटा आहे.
आज कोथरूडमधल्या लक्ष्मीनगरयेथील १५० मुलां-मुलींबरोबर खेळघराचं अर्थपूर्ण शिक्षणाचं काम जोमदारपणे चालू आहे. वस्तीतील शंभराहून अधिक मुलं-मुली आत्मविश्वासानं आपल्या पायावर उभी आहेत. प्रसन्न संवेदनशीलतेनं आयुष्य जगत आहेत.
मात्र हे काम लहानशा गटाचं आणि एकाच झोपडवस्तीतील मुला- मुलींबरोबर केलं जाणारं छोटेखानी काम राहिलेलं नाही. वंचित मुलांचे प्रश्न, मानसिकता,त्यांना नेमकं काय आणि कसं शिकवायला हवंअशा मुद्यांचा खेळघरानं शास्त्रशुद्ध अभ्यास केला.या अभ्यासावर आधारित वंचित मुलांसमवेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षणाची रचना तयार केली आहे. गेली सात वर्षं अशी प्रशिक्षणं घेतली गेली. या प्रशिक्षणांच्या माध्यमातून महाराष्ट्रात नऊ ठिकाणी नवी खेळघरे सुरूझाली आहेत. या कामाचा आणि अभ्यासाचा एक दस्तावेजही खेळघरानं तयार केला आहे. ‘आनंदानं शिकण्याच्या दिशेनं... ’ ही खेळघराची हस्तपुस्तिका आता छपाईच्या टप्प्यावर आहे.२०१२ मध्ये शिक्षण हक्क कायद्यानं मान्य केलेलं ज्ञानरचनावादावर आधारित, आनंददायी शिक्षण, हीच पालकनीतीच्या खेळघराची सुरुवातीपासून दिशा आहे. त्यामुळे अनेक शाळांकडून,संस्थाकडून खेळघराकडे या प्रशिक्षणाची मागणी होत आहे.
दुसऱ्या बाजूला खेळघरासमोर आज अत्यंत गंभीर असा आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे. गेली आठ वर्षं खेळघराला सर रतन टाटा ट्रस्ट, मुंबई यांनी आर्थिक मदत केली होती, पणत्यांच्या बदललेल्या धोरणांनुसार यापुढे ही मदत मिळेलच खात्री देता येत नाही. वेगवेगळ्या संस्था,कॉर्पोरेटस आणि न्यासांकडे आर्थिक मदतीसाठीचे अर्ज सदर केलेले आहेतपण अजून तरी अशी भरीव आर्थिक मदत मिळालेली नाही. त्यामुळे खेळघरासमोरीलआर्थिक प्रश्न अधिकच बिकट होतो आहे. निधीअभावी खेळघराचं काम कमी करण्याची वेळ येऊ नये असं आम्हाला मनोमन वाटतं. अशा वेळी ज्यांना हे काम महत्वाचं, मोलाचं वाटतं अशा आपल्यासारख्या मित्रांचाचआधार महत्वाचा आहे.
यापुढील काळासाठी निधी पुरवणारया मोठ्या संस्थांवर संपूर्णपणे अवलंबून न राहता,खेळघर चालवण्यासाठी ज्यावर विसंबून राहता येईल असा काही एक निधी मित्र-मैत्रिणींच्या मदतीने उभा राहावा असं वाटतं आहे.आपल्यासारख्या काही मित्रांनी जर दरवर्षी खेळघरातल्या एका किंवा काही मुलांमागे येणाऱ्या खर्चाची जबाबदारी घेतली तर या आर्थिक आव्हानांना सामोरं जाण्याचं बळ आम्हाला मिळेल.
एकेका मुलामागे वर्षभरासाठी खेळघरालायेणारा खर्च सर्वसाधारणपणे असा आहे -
१ ली ते ४ थी - ६०००/-, ५ वी ते ७ वी - ८०००/-, ८ वी ते १० वी- ११०००/- शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी१० वी नंतरच्या शिक्षणासाठीया मुलांना खेळघराकडून २००००/- पर्यंत मदत दिली जाते.खेळघरात आठवड्याचे पाच दिवस तीन तासांसाठी खेळघराचे कार्यकर्ते मुलांसमवेत काम करतात. २० ते २५ मुलांबरोबर एक शिक्षिका काम करते. या खेरीज विषय तज्ञांची मदत असतेच. भाषा, गणित आणि जीवनकौशल्ये यासारख्या विषयांवर काम होते. आरोग्य, स्वओळख, संवादकौशल्ये, भावनांचे समायोजन अशा विषयावरील काम मुलांचे व्यक्तिमत्व समृद्ध करते. सर्वधर्मसमभाव, लिंगभेद, हिंसेला विरोध, सहिष्णुता अशा सामाजिक विषयांवरील चर्चांमधून मुलांच्या जाणिवांचा विकास होतो.याखेरीज सहली, सिनेमा, नाटके,प्रदर्शने,पाहुणे, सण–समारंभ, उत्सव अशा अनेकविध उपक्रमांची आखणी केली जाते.कुमारवयीन मुलांबरोबर काम करणं अधिक कौशल्याचं आणि ताणाचं असते.त्यामुळे त्यासाठी अधिक तयारीच्या कार्यकर्त्यांची गरज असते, त्यामुळे खर्चही वाढतो.
आपण स्वतः दरवर्षी काही मुलांची खेळघरातील शिक्षणाची आर्थिक जबाबदारी घेऊ शकता.शिवाय आपल्या मित्र, सहकारी, नातेवाईकांनाही खेळघराची ओळख करून देऊ शकता. अधिक लोकांपर्यंत खेळघर पोचलं तरच हे आव्हान पेलता येणार आहे.
या योजनेच्या दिशेनं पहिलं पाऊल म्हणून, नव्या–जुन्या मित्रांना खेळघराची प्रत्यक्ष झलक अनुभवायला मिळावी यासाठीएक कार्यक्रम आखला आहे.दि. २३/०८/२०१४ रोजी खेळघरात, सायंकाळी ४-९ या वेळात शैक्षणिक साधनांचे प्रदर्शन पहाणं, खेळघराच्या फिल्म्स पाहणं, मुलांशी गप्पा असा विविधांगी कार्यक्रम आखला आहे. या कार्यक्रमात आपण आपल्या मित्र –परिवारासह जरूर सहभागी व्हावत अशी विनंती आहे.
आम्ही आपली वाट पाहू.
दिनांक - २३-८-२०१४, वेळ - ४ ते ९
स्थळ - खेळघर, शुभदा जोशी,
गुरुप्रसाद अपार्टमेंट,२३, आनंदनिकेतन सोसायटी,कर्वेनगर,पुणे-४११०५२.
फोन नंबर - ०२०- २५४५७३२८, ९८२२८७८०९६, ९७६३७०४९३०, ९८२२०९४०९५.
धन्यवाद.
आपले,
पालकनीती खेळघराचे कार्यकर्ते.
P.S. -हि सर्व माहिती माझ्या पर्यंत e -mail द्वारे आली आहे. पण इथे प्रकाशित करून अजून काही लोकांपर्यंत हि माहिती पोहचेल आणि हे काम करणाऱ्या एका चांगल्या संस्थेला आपल्या मुळे काही मदत होईल हीच अपेक्षा आणि इच्छा…
प्रतिक्रिया
20 Aug 2014 - 12:56 pm | एस
जमेल तशी मदत नक्कीच केली जाईल.
30 Aug 2014 - 10:01 pm | काळा पहाड
ही ई मेल ईंग्लिश मध्ये आहे का? मला एका फोरम वर टाकायची आहे जो ईंग्लिश आहे.
5 Sep 2014 - 3:59 pm | काव्यान्जलि
Dear friends,
Khelghar of Palakneeti Pariwar has been working for unprivileged children’s meaningful education from last 18 years.
Well wishers like you have been always big support in our journey. Khelghar is facing financial crisis presently and we know that you are with us in this situation also.
We are organising an event on 23 th August 2014 where people can experience khelghar activities, watch khelghar‘s films and educational material exhibition and chitchat with children.
Do come with your friend and families we are egar to meet u all.
Thanks,
Yours,
Palakneeti Pariwar Team
Date – 23.8.2014 , Time – 4to 9pm
Venue – Shubhada Joshi
Guruprasad Appartment, 23 Anand Niketan society, Karvenagar, Pune 411052.
Phone numbers - 020- 25457328 , 982278096, 9763704930