लोहगडला आतापर्यंत कितीवेळा गेलोय याची गणतीच नाही. दरवर्षी पावसाळ्यात किमान दोन भटकंती तर येथे हमखास असतातच. घाटमाथ्याजवळ हा सातवाहनकालीन किल्ला असल्याने येथे निसर्गाने अगदी भरभरून दिलेय. यंदा पाऊस तसा उशिराच चालू झाला, येथेही उशिरानेच पण सध्या मात्र तो अगदी धुव्वाधार कोसळतोय. मागच्याच आठवड्यात येथे पुन्हा एकदा जाउन आलो.
लोहगडाचे वर्णन तसे बर्याच वेळा मिपावर येऊन गेल्याने फक्त पाऊस आणि हिरवाई अनुभवा.
१. तुडुंब भरलेली भातखाचरे आणि पेरणीच्या तयारीत असलेले वाफे.
२. पवनेच्या पार्श्वभूमीवरील तुंग किल्ला
३. धुक्यात हरवलेला लोहगड
४. पवनेच्या पाणलोट क्षेत्रात कोसळणारा पाऊस
५. पायथ्याचा परिसर
६. बुलंद तटबुरुज
७. गणेश दरवाजा
८. धुकटात हरवलेला गड
९. धुकटात हरवलेला गड
१०. धुकं धुकं
११. गडाचा पायरीमार्ग
१२. गडमाथ्यावर
गडमाथ्यावर हल्लीच उत्खनन झालेलं आहे. दोन महिन्यापूर्वीच प्रशांत आणि चौराकाकांबरोबर गेलो होतो तेव्हा इथे फक्त मातीचे ढिगारे होते. पण त्या ढिगार्यांच्या उत्खननातून वाड्यांची जोती, भिंती, खापरी कौले अगदी शौचकूपही नव्याने बाहेर आलेले दिसतात. चर खोदण्याचे काम अगदी सुनियोजितपणे चालू आहे.
१३. नुकत्याच झालेल्या उतखननासाठी खोदलेले चर
१४. खापरी कौलांचे अवशेष
१५. खापरी कौले
१६. वाड्यांची जोती आदी अवशेष
१७. हे सर्व आधी ढिगार्यांखाली गाडलं गेलें होतं
१८. गडावरील सातवाहन गुहा. ह्यांचा वापर कोठारं म्हणून होत असावा.
१९. हिरवाई
२०. प्रचंड पाऊस आणि ढगांच्या आवरणामुळे विंचुकाट्यामुळे जेमतेम २/३ वेळाच अर्धवट दर्शन दिलं.
२१. विंचुकाटा
२२. विंचुकाटा
विंचुकाटा पाहिल्यावर तेथून निघालो. पाऊस कोसळतच होता, आताही कोसळतोय.
प्रतिक्रिया
29 Jul 2014 - 9:30 am | ज्ञानोबाचे पैजार
कोणत्या वारी गेला होतात? गर्दी कमी दिसतेय म्हणुन विचारतोय.
उत्खननानंतरचा गड बघायला जायला पाहिजे एकदा.
फोटो नेहमी प्रमाणेच मस्त आहेत.
29 Jul 2014 - 9:33 am | प्रचेतस
रविवारीच गेलो होतो.
गर्दी तुफान होतीच पण ती पायर्या आणि मंदिरापाशी. आम्ही अनवट वाटांनी भटकत राहिलो.
29 Jul 2014 - 11:25 am | यसवायजी
अर्र्र.. गेल्या रविवारी तर मी पण लोहगडावरच होतो की. एकत्रच गेलो असतो.
तुमचेच जुने धागे वाचून गेलो होतो. आमचीही मस्त झाली 'चिंब भटकंती'. विंचुकाट्याचे फोटो टाक्तो इथेच.
29 Jul 2014 - 5:39 pm | प्रचेतस
अरे सहीच.
थोडक्यात चुकामूक झाली म्हणायची.
29 Jul 2014 - 9:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर फोटो. च्यायला तुमच्या भटकन्तिचा हेवा वाटतो. सालं एकदा या लोहगडाला नक्की यावं लागतं ! हं आता ते कधी येणं होईल माहिती नाही, पण वल्ली शेठ स्थळ मनात बुकमार्क करुन ठेवले आहे.
-दिलीप बिरुटे
29 Jul 2014 - 9:53 am | चौकटराजा
प्रा डा , तुम्ही पुण्यास येकांदा रैवार प़कडून याच. जाव आपुन . वल्ली बी येल. .
29 Jul 2014 - 10:37 am | धन्या
आनी आमी पन येव.
29 Jul 2014 - 1:55 pm | सूड
मना पन येयाचा हाय !! ;)
29 Jul 2014 - 2:23 pm | धन्या
येयाचा = यायाचा :)
29 Jul 2014 - 5:40 pm | प्रचेतस
चला चला.
आम्ही तयार आहोतच.
29 Jul 2014 - 5:42 pm | धन्या
आधी सरांना पुण्यात येऊदे तर. :)
29 Jul 2014 - 11:53 am | रुमानी
मस्त! सर्व फोटो आवडले...!
सर खरंच एकदा ठरवा वल्लीला विचारुन आपन जावुत....! :)
29 Jul 2014 - 9:44 am | खटपट्या
मस्त सहल, छान माहिती आणि फोटो, गेलं पाहिजे एकदा
29 Jul 2014 - 9:58 am | किसन शिंदे
अर्रे व्वा!! उत्खनन सुरू केलं वाटतं. नाही नाही म्हणता माझंही पाच-सहा वेळा लोहगडला जाणं झालंय या गेल्या दोने-तीन वर्षात. उत्खननाचे फोटो अजून घ्यायला पाहीजे होते असं वाटतंय.
29 Jul 2014 - 5:41 pm | प्रचेतस
पाऊस चुकवून कसेबसे मोजके फोटो काढता आले.
परत उत्खननाचे फोटो काढायला जाईनच.
29 Jul 2014 - 10:07 am | यशोधरा
मस्त! फोटो आवडले. विंचूकाट्याचा फोटो मस्तच आलाय.
29 Jul 2014 - 10:24 am | अजया
सुंदर फोटो,जावंसं वाटायला लागलंय.
29 Jul 2014 - 10:39 am | धन्या
झक्कास हो वल्लेश.
आम्हाला टांग देउन गेल्याबद्दल निषेध.
29 Jul 2014 - 10:39 am | स्पा
मस्तच फटू
29 Jul 2014 - 10:39 am | संजय क्षीरसागर
वल्लीभाई, लगे रहो.
29 Jul 2014 - 12:42 pm | कंजूस
छान .त्या भुलेश्वरचं काय झालं ?
मीही गेलो आहे दोनतीनदा लोहगडावर.त्या गुहेत राहिलो होतो .इंद्रायणी गाडीने जाऊन प्रथम लेणी ,विसापूर नंतर लोहगडावर मुकाम .सकाळी परत .(हल्ली राहण्यास मनाई आहे .)
फोटो आवडले .
29 Jul 2014 - 5:42 pm | प्रचेतस
भुलेश्वर रद्द झालं ओ. :(
ती लोमश गुहा प्रचंड मोठी आहे आतून.
29 Jul 2014 - 12:52 pm | बॅटमॅन
एक नंबर!!!! उत्खनन सुरू आहे ते कोण करतंय? डेक्कन कॉलेज की ए एस आय?
29 Jul 2014 - 5:43 pm | प्रचेतस
ते कोण करतंय काही कल्पना नाही. पण माझ्यामते दुर्गयात्रींची एखादी स्वयंसेवी संघटना असावी. डेक्कन कॉलेज की ए एस आय नक्कीच नाही.
29 Jul 2014 - 5:45 pm | धन्या
स्वयंसेवी संस्थांना अशी गडावर उत्खननाची परवानगी मिळते?
29 Jul 2014 - 5:58 pm | प्रचेतस
माहित नाही पण जोपर्यंत गडावर हानिकारक काम करत नाहीत तोपर्यंत एसेआय काही हरकत घेत नाहीतसे वाटते.
कित्येक गडांवर टाकी साफ करणे करणे, गाळ काढणे, आतले अवशेष बाहेर काढणे ही कामे याच स्वयंसेवी संस्था करीत असतात.
30 Jul 2014 - 2:11 pm | बॅटमॅन
ओह अच्छा. स्वयंसेवी संस्था असणे कठीणच वाटतेय. नुकत्याच एका परिसंवादात गेलो असताना उत्खननासंबंधीची नियमावली पाहण्यात आली. अतिशय जाचक वाटतील असे नियम आहेत. त्यामुळं म्हणतोय.
29 Jul 2014 - 1:07 pm | स्वाती दिनेश
चिंब भटकंती पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या.. कित्त्येक वर्षात लोहगडाला गेले नाहीये..
स्वाती
29 Jul 2014 - 6:50 pm | सखी
चिंब भटकंती पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या.. कित्त्येक वर्षात लोहगडाला गेले नाहीये..हे आणि असेच म्हणते.
29 Jul 2014 - 1:33 pm | सुहास झेले
वल्लीशेठ, नेहमीप्रमाणे फोटो मस्तच.... किल्ल्याचा फार हेवा वाटतो ह्या. अतिशय रेखीव बांधकाम आणि आजही बऱ्यापैकी सुस्थितीत... :)
पण हल्ली प्रचंड अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे :( गेल्यावेळी गेलो तेव्हा बांधकाम पण सुरु होते गडावर कबरीचे... आणि लोहगड वाडीतसुद्धा रस्ते बांधत होते. लोहगड वाडीतले आणि मी माझ्या मित्रांसोबत तक्रारदेखील केली होती पण काही उत्तर नाही मिळाले. मुसलमानांची जत्रा असते शुक्रवारी आणि रमजान/बकरी ईद सारख्या दिवशी :(
29 Jul 2014 - 5:45 pm | प्रचेतस
किल्ल्याचे आज जे बांधकाम दिसतंय त्यातले बहुतांश नाना फडवणीसांच्या कारकिर्दित झाले असल्याने ते आजही सुस्थितीत आहे.
लोहगडावरची मुसलमानांची वाढती संख्या पाहून हा दुसरा विशाळगड होतोय की काय अशी भीती वाटून राहिलीय.
29 Jul 2014 - 5:54 pm | चौकटराजा
किल्ल्याचे आज जे बांधकाम दिसतंय त्यातले बहुतांश नाना फडवणीसांच्या कारकिर्दित झाले असल्याने ते आजही सुस्थितीत आहे.
म्हण्जे दादा, बाबा यांचे पेक्षा टिकाउ बांधकाम देवेंद्र फडणवीस नक्कीच करतील असे म्हणायचं आहे का वल्लीब्वॉ ?
29 Jul 2014 - 6:00 pm | प्रचेतस
नाय ब्वॉ.
आमच्या सातकर्णींचे काम अधिक टिकावू आहे. ;) ह्याला तर जेमतेम २५० वर्षेच झालीयेत. ;)
29 Jul 2014 - 6:24 pm | किसन शिंदे
ओ चौराकाका, वल्ल्याच्या प्रतिसादावरून त्याला तुमचा प्रतिसाद बाऊन्सर गेल्याचं दिसून येतंय.
तसंही देवेंद्र फडणवीस काल परवा म्हणाल्याचं ऎकलं, त्यांना म्हणे बांधकाम करण्याच्या कुठल्याही शर्यतीत राहण्याची इच्छा नाहीये.
29 Jul 2014 - 7:22 pm | चौकटराजा
तुमचा प्रतिसाद बाऊन्सर गेल्याचं
असं शक्य आहे, वल्ली तसा निरागस आहे. आत्मू ना विचारा हवं तर !
29 Jul 2014 - 7:36 pm | प्रचेतस
बाउन्सर नाय हो.
असं म्हणायचं नाय ब्वॉ असं म्हटलं होतं.
29 Jul 2014 - 7:24 pm | यशोधरा
अचानक हे कबरींचे पेव का आणि कुठून फुटते?
29 Jul 2014 - 7:37 pm | प्रचेतस
एक छोटीशी कबर होती मूळात. तिथे आता बांधकामं वाढत जाऊन मोठं स्थळच उभं राहिलंय.
29 Jul 2014 - 7:55 pm | सूड
असंच होत असतं, आधी चारेक वीटांचं बांधकाम, मग थोडं मोठं, मग थोडं आणखी. एकीकडे म्हणायचं मूर्तीपूजा आम्ही मानत नाही, मग अगदी हुबेहूब मूर्ती घडवत नसलात तरी प्रतिमा म्हणून कसली तरी उपासना करताच आहात ना? उपासना करा त्याला ना नाही, पण हे ओसरी दिल्यावर हातपाय पसरायची कामं का?
29 Jul 2014 - 8:19 pm | धन्या
परमेश्वर निर्गुण आहे असं मानत असले तरी माथा टेकवायला सगुण रुपच लागतं. :)
30 Jul 2014 - 2:13 pm | बॅटमॅन
कठोर पावले उचलणे गरजेचे आहे नैतर अजून बरेच गडही अतिक्रमणग्रस्त होतील.
30 Jul 2014 - 2:29 pm | सूड
उचलणार कोण ब्याट्या, लग्गेच भावना वैगरे दुखावतात!! ;)
30 Jul 2014 - 2:32 pm | बॅटमॅन
होय, म्हणून जर-तरची भाषा केली. जे होणे नै ते तर आहेच म्हणा...
29 Jul 2014 - 4:18 pm | प्यारे१
मस्त रे वल्ली.
मागच्या पावसाळ्याच्या आठवणी जाग्या झाल्या.
29 Jul 2014 - 7:24 pm | अत्रुप्त आत्मा
विंचुकाटा भारीच!
संपूर्ण गड फिरायला लागणार्या वेळेचा अंदाज घेता..पायात लोह जमा होइलसे वाटते. ;)
29 Jul 2014 - 7:38 pm | प्रचेतस
नाय ओ.
लोहगड तसा लहानसा किल्ला आहे. शेजारचा विसापूर मात्र प्रचंड आहे.
29 Jul 2014 - 10:35 pm | सुहास झेले
विसापूर माझा आवडता किल्ला... जाऊया रे सगळे एकत्र. दोन्ही किल्ले एकदम करू. पहिल्यांदा गेलो तेव्हा वाट चुकलेलो, पण आता नाय चुकणार ;-)
29 Jul 2014 - 10:42 pm | किसन शिंदे
तुला 'आता' जमेल यायला? ;-)
29 Jul 2014 - 10:44 pm | सुहास झेले
तुला जमतंय की लेका... तूच आमचा आदर्श ;-)
29 Jul 2014 - 11:22 pm | सूड
जायच्या आधी सांगा रे!!
29 Jul 2014 - 11:43 pm | अत्रुप्त आत्मा
अजून वेळ आहे.
29 Jul 2014 - 7:43 pm | धन्या
फोटो पाहून अंगावर काटा आला काय?
या विंचूकाटयाच्या देठाशी बसून गेल्या वर्षी आम्ही आमच्या एका मित्राबरोबर सुख-दु:खाच्या गोष्टी केल्या होत्या ते आठवले.
29 Jul 2014 - 8:51 pm | किसन शिंदे
बुवा तासभर पुरेसा होतो संपुर्ण गड फिरायला, पण एकदा का विंचूकाट्याच्या टोकाशी फर्राट गार वारं अंगावर घेत बसलं की तासाचे दोन तास कधी होतील ते कळणारही नाही. :-)
29 Jul 2014 - 11:08 pm | वेल्लाभट
सुस्स्स्स्स्साटच फोटो !
30 Jul 2014 - 9:03 am | इनिगोय
उत्खननाचे फटू काढायला परत कधी जाणार आहेस? तेव्हा हाक मार हो..
फटू बघून डोळे निवले. लोहगड म्हणजे...!
30 Jul 2014 - 10:06 am | कोट्या धीश
अनवट वाटांनी भटकंती केली म्हणून अभिनंदन
नाही तर लोहगड म्हणजे लोकांमध्ये हरवलेला गड
फोटू लय भारी
परत जाल त्या वेळेस साद घाला , मिपा चा १ छोटी पण धमाल सहल कम सामुहिक भटकंती करू
30 Jul 2014 - 10:24 am | दिपक.कुवेत
बघुनच मन ओलचंब झालयं. फोटु सॉल्लीडच आलेत. परत कधी जाणार आहात ते सांगा शेठ....
30 Jul 2014 - 1:01 pm | राजेंद्र मेहेंदळे
मस्त भटकंती...फोटो बघुन हिरवेगार वाटतेय
30 Jul 2014 - 5:19 pm | सुहास पाटील
लय भारि पन गुहेत गेला नहित गुहेचे फोतो नहित
30 Jul 2014 - 5:32 pm | प्रचेतस
हल्ली तिथं जावेसे वाटत नाही हो.
30 Jul 2014 - 5:48 pm | चौकटराजा
एक तरूण मुलगा एका गड प्रेमीला म्हणतो " मला कसे जायचे ते सांगा. म्हणजे वाट विंचू काटा वगैरे "
तो ( वल्लीसारखा ) उत्साही गड प्रेमी सगळे सिरीयस्ली सांगतो.
"बरंय धन्स आता मी लव्ह गडावर जायला मोकळा !" तो तरूण .