मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चिंब भटकंती: लोहगड

प्रचेतस · · भटकंती
लोहगडला आतापर्यंत कितीवेळा गेलोय याची गणतीच नाही. दरवर्षी पावसाळ्यात किमान दोन भटकंती तर येथे हमखास असतातच. घाटमाथ्याजवळ हा सातवाहनकालीन किल्ला असल्याने येथे निसर्गाने अगदी भरभरून दिलेय. यंदा पाऊस तसा उशिराच चालू झाला, येथेही उशिरानेच पण सध्या मात्र तो अगदी धुव्वाधार कोसळतोय. मागच्याच आठवड्यात येथे पुन्हा एकदा जाउन आलो. लोहगडाचे वर्णन तसे बर्‍याच वेळा मिपावर येऊन गेल्याने फक्त पाऊस आणि हिरवाई अनुभवा. १. तुडुंब भरलेली भातखाचरे आणि पेरणीच्या तयारीत असलेले वाफे. a २. पवनेच्या पार्श्वभूमीवरील तुंग किल्ला a ३. धुक्यात हरवलेला लोहगड a ४. पवनेच्या पाणलोट क्षेत्रात कोसळणारा पाऊस a ५. पायथ्याचा परिसर a ६. बुलंद तटबुरुज a ७. गणेश दरवाजा a ८. धुकटात हरवलेला गड a ९. धुकटात हरवलेला गड a १०. धुकं धुकं a ११. गडाचा पायरीमार्ग a १२. गडमाथ्यावर a गडमाथ्यावर हल्लीच उत्खनन झालेलं आहे. दोन महिन्यापूर्वीच प्रशांत आणि चौराकाकांबरोबर गेलो होतो तेव्हा इथे फक्त मातीचे ढिगारे होते. पण त्या ढिगार्‍यांच्या उत्खननातून वाड्यांची जोती, भिंती, खापरी कौले अगदी शौचकूपही नव्याने बाहेर आलेले दिसतात. चर खोदण्याचे काम अगदी सुनियोजितपणे चालू आहे. १३. नुकत्याच झालेल्या उतखननासाठी खोदलेले चर a १४. खापरी कौलांचे अवशेष a १५. खापरी कौले a १६. वाड्यांची जोती आदी अवशेष a १७. हे सर्व आधी ढिगार्‍यांखाली गाडलं गेलें होतं a १८. गडावरील सातवाहन गुहा. ह्यांचा वापर कोठारं म्हणून होत असावा. a १९. हिरवाई a २०. प्रचंड पाऊस आणि ढगांच्या आवरणामुळे विंचुकाट्यामुळे जेमतेम २/३ वेळाच अर्धवट दर्शन दिलं. a २१. विंचुकाटा a २२. विंचुकाटा a विंचुकाटा पाहिल्यावर तेथून निघालो. पाऊस कोसळतच होता, आताही कोसळतोय.

वाचने 16335 वाचनखूण प्रतिक्रिया 61

कोणत्या वारी गेला होतात? गर्दी कमी दिसतेय म्हणुन विचारतोय. उत्खननानंतरचा गड बघायला जायला पाहिजे एकदा. फोटो नेहमी प्रमाणेच मस्त आहेत.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्रचेतस Tue, 07/29/2014 - 09:33
रविवारीच गेलो होतो. गर्दी तुफान होतीच पण ती पायर्‍या आणि मंदिरापाशी. आम्ही अनवट वाटांनी भटकत राहिलो.

In reply to by प्रचेतस

यसवायजी Tue, 07/29/2014 - 11:25
अर्र्र.. गेल्या रविवारी तर मी पण लोहगडावरच होतो की. एकत्रच गेलो असतो. तुमचेच जुने धागे वाचून गेलो होतो. आमचीही मस्त झाली 'चिंब भटकंती'. विंचुकाट्याचे फोटो टाक्तो इथेच.

सुंदर फोटो. च्यायला तुमच्या भटकन्तिचा हेवा वाटतो. सालं एकदा या लोहगडाला नक्की यावं लागतं ! हं आता ते कधी येणं होईल माहिती नाही, पण वल्ली शेठ स्थळ मनात बुकमार्क करुन ठेवले आहे. -दिलीप बिरुटे

किसन शिंदे Tue, 07/29/2014 - 09:58
अर्रे व्वा!! उत्खनन सुरू केलं वाटतं. नाही नाही म्हणता माझंही पाच-सहा वेळा लोहगडला जाणं झालंय या गेल्या दोने-तीन वर्षात. उत्खननाचे फोटो अजून घ्यायला पाहीजे होते असं वाटतंय.

कंजूस Tue, 07/29/2014 - 12:42
छान .त्या भुलेश्वरचं काय झालं ? मीही गेलो आहे दोनतीनदा लोहगडावर.त्या गुहेत राहिलो होतो .इंद्रायणी गाडीने जाऊन प्रथम लेणी ,विसापूर नंतर लोहगडावर मुकाम .सकाळी परत .(हल्ली राहण्यास मनाई आहे .) फोटो आवडले .

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस Tue, 07/29/2014 - 17:43
ते कोण करतंय काही कल्पना नाही. पण माझ्यामते दुर्गयात्रींची एखादी स्वयंसेवी संघटना असावी. डेक्कन कॉलेज की ए एस आय नक्कीच नाही.

In reply to by धन्या

प्रचेतस Tue, 07/29/2014 - 17:58
माहित नाही पण जोपर्यंत गडावर हानिकारक काम करत नाहीत तोपर्यंत एसेआय काही हरकत घेत नाहीतसे वाटते. कित्येक गडांवर टाकी साफ करणे करणे, गाळ काढणे, आतले अवशेष बाहेर काढणे ही कामे याच स्वयंसेवी संस्था करीत असतात.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Wed, 07/30/2014 - 14:11
ओह अच्छा. स्वयंसेवी संस्था असणे कठीणच वाटतेय. नुकत्याच एका परिसंवादात गेलो असताना उत्खननासंबंधीची नियमावली पाहण्यात आली. अतिशय जाचक वाटतील असे नियम आहेत. त्यामुळं म्हणतोय.

स्वाती दिनेश Tue, 07/29/2014 - 13:07
चिंब भटकंती पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या.. कित्त्येक वर्षात लोहगडाला गेले नाहीये.. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

सखी Tue, 07/29/2014 - 18:50
चिंब भटकंती पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या.. कित्त्येक वर्षात लोहगडाला गेले नाहीये..हे आणि असेच म्हणते.

सुहास झेले Tue, 07/29/2014 - 13:33
वल्लीशेठ, नेहमीप्रमाणे फोटो मस्तच.... किल्ल्याचा फार हेवा वाटतो ह्या. अतिशय रेखीव बांधकाम आणि आजही बऱ्यापैकी सुस्थितीत... :) पण हल्ली प्रचंड अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे :( गेल्यावेळी गेलो तेव्हा बांधकाम पण सुरु होते गडावर कबरीचे... आणि लोहगड वाडीतसुद्धा रस्ते बांधत होते. लोहगड वाडीतले आणि मी माझ्या मित्रांसोबत तक्रारदेखील केली होती पण काही उत्तर नाही मिळाले. मुसलमानांची जत्रा असते शुक्रवारी आणि रमजान/बकरी ईद सारख्या दिवशी :(

In reply to by सुहास झेले

प्रचेतस Tue, 07/29/2014 - 17:45
किल्ल्याचे आज जे बांधकाम दिसतंय त्यातले बहुतांश नाना फडवणीसांच्या कारकिर्दित झाले असल्याने ते आजही सुस्थितीत आहे. लोहगडावरची मुसलमानांची वाढती संख्या पाहून हा दुसरा विशाळगड होतोय की काय अशी भीती वाटून राहिलीय.

In reply to by प्रचेतस

चौकटराजा Tue, 07/29/2014 - 17:54
किल्ल्याचे आज जे बांधकाम दिसतंय त्यातले बहुतांश नाना फडवणीसांच्या कारकिर्दित झाले असल्याने ते आजही सुस्थितीत आहे. म्हण्जे दादा, बाबा यांचे पेक्षा टिकाउ बांधकाम देवेंद्र फडणवीस नक्कीच करतील असे म्हणायचं आहे का वल्लीब्वॉ ?

In reply to by चौकटराजा

प्रचेतस Tue, 07/29/2014 - 18:00
नाय ब्वॉ. आमच्या सातकर्णींचे काम अधिक टिकावू आहे. ;) ह्याला तर जेमतेम २५० वर्षेच झालीयेत. ;)

In reply to by चौकटराजा

किसन शिंदे Tue, 07/29/2014 - 18:24
ओ चौराकाका, वल्ल्याच्या प्रतिसादावरून त्याला तुमचा प्रतिसाद बाऊन्सर गेल्याचं दिसून येतंय. तसंही देवेंद्र फडणवीस काल परवा म्हणाल्याचं ऎकलं, त्यांना म्हणे बांधकाम करण्याच्या कुठल्याही शर्यतीत राहण्याची इच्छा नाहीये.

In reply to by प्रचेतस

सूड Tue, 07/29/2014 - 19:55
असंच होत असतं, आधी चारेक वीटांचं बांधकाम, मग थोडं मोठं, मग थोडं आणखी. एकीकडे म्हणायचं मूर्तीपूजा आम्ही मानत नाही, मग अगदी हुबेहूब मूर्ती घडवत नसलात तरी प्रतिमा म्हणून कसली तरी उपासना करताच आहात ना? उपासना करा त्याला ना नाही, पण हे ओसरी दिल्यावर हातपाय पसरायची कामं का?

In reply to by प्रचेतस

सुहास झेले Tue, 07/29/2014 - 22:35
विसापूर माझा आवडता किल्ला... जाऊया रे सगळे एकत्र. दोन्ही किल्ले एकदम करू. पहिल्यांदा गेलो तेव्हा वाट चुकलेलो, पण आता नाय चुकणार ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

धन्या Tue, 07/29/2014 - 19:43
विंचुकाटा भारीच!
फोटो पाहून अंगावर काटा आला काय? या विंचूकाटयाच्या देठाशी बसून गेल्या वर्षी आम्ही आमच्या एका मित्राबरोबर सुख-दु:खाच्या गोष्टी केल्या होत्या ते आठवले.

In reply to by अत्रुप्त आत्मा

किसन शिंदे Tue, 07/29/2014 - 20:51
बुवा तासभर पुरेसा होतो संपुर्ण गड फिरायला, पण एकदा का विंचूकाट्याच्या टोकाशी फर्राट गार वारं अंगावर घेत बसलं की तासाचे दोन तास कधी होतील ते कळणारही नाही. :-)

कोट्या धीश Wed, 07/30/2014 - 10:06
अनवट वाटांनी भटकंती केली म्हणून अभिनंदन नाही तर लोहगड म्हणजे लोकांमध्ये हरवलेला गड फोटू लय भारी परत जाल त्या वेळेस साद घाला , मिपा चा १ छोटी पण धमाल सहल कम सामुहिक भटकंती करू

चौकटराजा Wed, 07/30/2014 - 17:48
एक तरूण मुलगा एका गड प्रेमीला म्हणतो " मला कसे जायचे ते सांगा. म्हणजे वाट विंचू काटा वगैरे " तो ( वल्लीसारखा ) उत्साही गड प्रेमी सगळे सिरीयस्ली सांगतो. "बरंय धन्स आता मी लव्ह गडावर जायला मोकळा !" तो तरूण .