ओळखा पाहूं!

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
30 Jul 2008 - 10:37 pm

सेल किंवा मोबाईल फोनचा अलिकडे इतका वापर होत आहे की आपल्याला हवं असलेल माणूस केव्हांही आणि कुठेही आपल्या संपर्कात आणू शकतो.
त्यामुळे कुठलीही व्यक्ति दूर जरी असली तरी ती ह्या फोनमुळे जवळच असते.
"माझा होशील का" ह्या गाण्यातल्या दोन ओळी चटकन मनात आल्या.
"दूर तू परी, जवळी तुझ्या मी नाम गुंफीते, तुझीया नामी"आणि त्यानंतर
"दूर तू परी, जवळी तुझ्या मी" हे जणू ह्या फोनचं दुसरं नांव आहे असे मनात आलं.

ओळखा पाहूं!

घणघणलो की मजं
मग जवळी घेशी
अन म्हणशी तिला
माझ्या कानाशी
"दूर तू परी
जवळी तुझ्या मी"

वदते ती मग
तुझीया कानी
"नांव गुंफीते
तुझीया नामी"

करूं किती मी
तुमची मध्यस्थी
आणुनी तुम्हा
एकमेकां जवळी

पुसतां तुम्ही मला
असे मी कोण?
नाही का? म्हणता
तुम्हीच मला "सेलफोन"

श्रीकृष्ण सामंत

कविता

प्रतिक्रिया

प्राजु's picture

31 Jul 2008 - 12:01 am | प्राजु

मस्त आहे एकदम..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/