तसं तर रोज असते तिथे ती
पण आज दिसली मला
डोळ्यांना अंधाराची सवय झाली असताना
अनपेक्षितपणे प्रकाशाचा झोत शिरावा थेट डोळ्यात
असं काहीसं झालं मला
सा-या जगाने टाकलेल्या कच-यात
तिचं जगणं वेचत असते ती रोज
आणि बहुतेक वेळेला
जवळच असलेल्या झाडाच्या सावलीत
तिचं कळकटलेलं पोर खेळत असतं
पण आज जरा लांब ठेवलं होतं तिने त्याला
अरे हो,
काल ते झाड तोडत होते नाही का....
तिने संगितलं असेल का, त्या झाड तोडणा-यांना
तिला ते झाड हवय म्हणून?
पण संगितलं असेल तरी तिचं कोण ऐकणार म्हणा
अगदी एकविसाव्या शतकातली स्त्री झाली म्हणून काय झालं
खरं तर नसेलच सांगितलं तिने कोणाला काही
कारण त्या झाडापेक्षाही
तिथली कचराकुंडी न हालणं जास्त महत्त्वाचं असणार तिला
.
.
.
.
'कुठे राहत असेल ही'
'कशी राहत असेल'
'काय खात असेल'
'आणि काय खावू घालत असेल तिच्या त्या पोराला'
'थंडी-पावसाचं काय करत असेल'
'गळणारं छप्पर असेल की छप्परच नसेल'
एक ना अनेक
मुंग्यांची रांग लागावी तसे प्रश्न घेऊन मी निघालो तिथून
पण ना...
एसी गाडीत बसून तिला बघताना
मला अस्वस्थ व्हायला झालं ते एक बरं झालं
नाहीतर हल्ली हल्ली मला वाटायला लागलं होतं
की माझ्या संवेदना बोथट वगैरे झाल्या आहेत की काय
प्रतिक्रिया
14 Jun 2014 - 10:29 pm | यशोधरा
आणि
!!!
16 Jun 2014 - 5:30 pm | सस्नेह
खासच आहेत या ओळी !
17 Jun 2014 - 10:31 am | आतिवास
कविता आवडली.
14 Jun 2014 - 10:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
एसी गाडीत बसून तिला बघताना
हे खासच !मला अस्वस्थ व्हायला झालं ते एक बरं झालं
नाहीतर हल्ली हल्ली मला वाटायला लागलं होतं
की माझ्या संवेदना बोथट वगैरे झाल्या आहेत की काय
14 Jun 2014 - 10:42 pm | आयुर्हित
भावना पोचल्या. अप्रतिम लिखाण!
16 Jun 2014 - 1:39 am | एस
असेच म्हणतो.
15 Jun 2014 - 10:31 pm | कवितानागेश
.....सुंदर. :)
15 Jun 2014 - 10:47 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
__/\__!!
16 Jun 2014 - 5:34 pm | धन्या
कविता आवडली.
17 Jun 2014 - 12:08 am | पैसा
अगदी! थेट पोचणारं.
17 Jun 2014 - 5:29 am | नगरीनिरंजन
हम्म्म्म!!
17 Jun 2014 - 6:48 am | झंम्प्या
भावना छान मांडल्यात.
गमतीशीर आहे ना आयुष्य,
कोणाच्या मुखी सोन्याचा घास,
तर कोणाच्या उरी दुक्खाचा भार,
17 Jun 2014 - 8:49 am | प्रचेतस
सुरेख रे चाणक्या.
17 Jun 2014 - 8:50 am | इन्दुसुता
यशोधरा यांनी म्हटल्याप्रमाणेच !!!!
17 Jun 2014 - 10:51 am | अनुप ढेरे
छान लिहिलय!
21 Jun 2014 - 10:40 am | निश
चाणक्य सर , फार सुंदर कविता आहे. कविने जगाला सभोतालच्या समाजातील व्यथा दु:ख समाजाला जाणीव करुन द्यायची असते आणि तुमची ही कविता ती जाणिव करुन देते. मनाला वेदना देत पिळवटून टाकते. म्हंजे अजुनही माझ मन बोथट झाल नाही असच म्हणिन मी. कविता नक्कीच सुन्न करुन गेली.