"कवडसा"

मनीषा's picture
मनीषा in जे न देखे रवी...
30 Jul 2008 - 12:56 am

खिडकीतूनी उतरे अलगद असा
देई उजेडाचा वसा
अंधारलेल्या खोलीला
प्रकाशाचा एक कवडसा |

गोल, शुभ्र, उजळसा
धरती वरती चंद्र जसा
अंधाराला छेदुनी आला
प्रकाशाचा एक कवडसा |

सप्तरंग सामावे कसा
भूमिवरी ना दिसे ठसा
तेजाचा तो मोहक तुकडा
प्रकाशाचा एक कवडसा |

अंधार निराशेचा असा
दाटे फार मनी कसा
उजळीत येई नवीन आशा
प्रकाशाचा एक कवडसा |

कविता

प्रतिक्रिया

धनंजय's picture

30 Jul 2008 - 2:03 am | धनंजय

आणि कल्पनाचित्रे आवडली.