हाणा! मारा!! ठेचा!!!

स्पंदना's picture
स्पंदना in पाककृती
1 May 2014 - 9:12 am

http://www.misalpav.com/node/27742 अन http://www.misalpav.com/node/27744 वाचल्यावर आपले घरात बनणारे साधे सुधे प्रकारच जीभेला कसे गुलाम बनवतात याची सहज कल्पना यावी.
कितीही देशी विदेशी निरनिराळ्या पदार्थांची चव चाखली तरी अनिवार ईच्छा म्हणता येइल ती, अश्या अनवट पदार्थांचीच होते. अन एकदा का जीभेला त्या चवीची आठवण झाली की मग आपलं काही म्हणता काही चालत नाही त्यापुढे! नाही कां?
तशी ही जीभ एक महाभयानक प्रकरण आहे. हिच्यापुढे मोठमोठे वीर महावीर नामोहरम होत असतीलं. अगदी तलवारीचा घाव बरा होइल पण या जीभेचा तडाखा नको! अश्या वेदना ही जीभ देउ शकते. तसच शहाणपण सुद्धा शिकवु शकते. आता हल्ली नेटमुळे जीभेची जागा कळ्फलकाने घेतलीय म्हणायला हरकत नाही पण ते सुद्धा या जीभेचच एक एक्सेटेंशन म्हणु. कस्स्ला घावं घालतात माणसं या कळफलकानं की एखादी सेंसीटीव्ह व्यक्ती पलिकडे अक्षरशःघायाळ होउ शकते! म्हणजे जीभेला हाड नाही म्हणता म्हणता कळफलकाला हाड नाही म्हणायची पाळी येउ शकते.
ते ही असोच. तसा या जीभेचा पराक्रम अगदी रामायण, महाभारतापासुन आपल्याला माहीती आहेच. नवल या गोष्टीच वाटत की इतक्या वर्षांनीपण तिचा महिमा काय कमी झाला नाही. एक याच तर बाईसाहेब आहेत ज्या कधी सांभाळुन घेतात, कधी तडाखे देतात, प्रेम.....हे मात्र डोळ्यातुन सांडत्....स्पर्शातुन कळत...अन जीभेने पोसतं हो! तो एक वेगळाच विषय होइल. ..अन अगदी नामोहरम सुद्धा करतात. पुलंच्या हरी तात्यांसारख शाहिस्तेखानाला ,"हवी तर दुसर्‍या हाताची बोट तोड पण ही शिवी मात्र परत घे " अस म्हणायला लावायची शक्ती फक्त आणि फक्त या जीभेतच असु शकते नाही का?
त झाल काय हिरव्या मिरचीचा ठेचा हे शिर्षक वाचल्यावर माझी जीभ खवळली. अहो ठेचा म्हणता मग तो हिरव्या मिरचीचा कसा? त्याला खरडा म्हणतात. अस काही बाही बोलता बोलता माझी जीभ,"ठेचाऽऽ ठेचाऽऽ " करु लागली. शेवटी सगळ सोडुन बाजार गाठला अन झकास पैकी ओल्या लाल मिरच्या शोधुन काढल्या. आजकाल थाय फुडने आपली ओल्या लाल मिरच्यांची मात्र झकास सोय झाली हो!
काय विचार करुन हे नाव असाव या प्रकाराला? ठेचुन करतात म्हणुन? तशी आपली मराठी जरा रांगडीच नाही म्हंटल तरी. आमचं काय सुद्धा मलमलीत रेशमी नसतं. सगळं असंच. चवीला भन्नाट प्रकार पण बघा नावापायी मार खातात!!!
आता असो. मी पहिला माझीच जीभ...सॉरी...कळफलक आवरते अन झटक्यात पाककृती देउन मोकळी होते.
तर बिगी बिगी उठा अन बाजारात जावा. पाव किलो ओल्या लालं मिरच्या अन एक लिंबु एव्हढच आणा. बाकी सगळा माल मसाला घरचाच.
तर घ्या.

ओल्या लाल मिरच्या -एक दहा बारा नग.
एक लिंबु
हळद -अर्धा चमचा
हिंग- पाव चमचा
मिठ -चमचाभर
मेथी दाणे -पाव चमचा

फोडणी
तेल- चांगल अर्धा वाटी. (किंवा ठेचा ज्या बरणीत भराल त्यात ठेच्याच्या वर आल पाहिजे थोडस)
मोहरी-पाव चमचा
हिंग -चुटकीभर
हळद- चुटकीभर
मेथीदाणे- दहाबारा (हवे असतील तर जास्त घाला)

कृती
सगळ्यात आधी एका छोट्या फोडणीच्या भांड्यात अर्धा वाटी तेल चांगल धुर निघेतोवर गरम करुन घ्या. गॅस अथवा शेगडी बंद करुन तेल जरा निवु द्या. आता त्यात मोहरी घाला. जरा निवु दिलेल्या तेलात मोहरी जळत नाही पण तडतडते मात्र. तर त्या अंदाजाने तेल निवु द्या. मग त्यात हिंग, हळद अन मेथी दाणे घालुन ही फोडणी थंड व्हायला बाजुला ठेवुन दया.
मिरच्यांचे देठ काढुन त्यातल्या बिया सुरीने अथवा कात्रीने काढुन घ्या. हात लागु देउ नका चुकुनही. दिवसभर जरा चेहर्‍याला लागला की जळायला लागते चेहर्‍याची त्वचा!! नाका बिकाला तर हात लागला ना? ती "नाकाला मिरच्या झोंबल्या" ही म्हण साक्षात साकार होते भाऊ! सो बी केअरफुल.
आता या मिरच्या अन वरचा मेथी दाणे सोडुन सगळा मसाला एकत्र करुन जमल तर चर्नरवर नाही तर सरळ मिक्सरवर बारिक करुन घ्या. मेथीदाणे अगदी थेंबभर तेलावर हलके भाजुन घ्या. रंग तांबुस झाला की भाजणे बंद करा. अन हे एव्हढेच मेथी दाणे खलबत्त्यात कुटुन घ्या. मस्त जमतील तेव्हढे बारिक करा. आता ही मेथी पावडर मिक्सरच्या भांड्यातल्या आधीच्या मिश्रणात मिसळुन आणखी एक हलकीच गिरकी मारा.
सगळ व्यवस्थीत मिक्स झाले असेल तर आता हे एका साठवणीच्या बरणीत काढुन घ्या. वरुन लिंबु रस पिळा. अगदी भरपुर. अख्खा लिंबु!! आता यात साखरेचा उल्लेख चालायचा नाही कित्येकांना तरीही हवी असेल तर चिमटभर साखर याची चवं वाढवुनच जाते. अन एक अतिशय महत्वाच म्हणजे हा ठेचा जितका दिसतो ना, तेव्हढा तिखट नाही लागत!! लिंबु रसाने याचा तिखटपणा जरा का चांगलाच कमी होतो. ;)
थंड झालेली फोडणी आता यावर ओता. अन काय? अगदी कश्या कश्या बरोबरही हाणा.

फोडणीतली मेथी एक दोन दिवसात अगदी मस्त भिजते अन आणखीच चव वाढवते या ठेच्याची.
तर अद्वेय आम्ही बाई याला ठेचा म्हणतो. आता तुला काय राग लोभ असेल तो ठेचुन ही सेवा मान्य करु घ्या!

प्रतिक्रिया

एक प्रकारच्या मुळ्या असतात इतकेच ठाऊक आहे. आता ते कंद तुम्ही दाखवल्याप्रमाणे असतात की कसे असतात ते कधी पाहिले नै ओ. फकस्त लोणचंच खाल्लंय. पण नेट्वर सर्च मारला असता मायबोलीवर माईनमुळ्याच्या लोणच्याची पाकृ दिलेली आहे त्यात त्याचा फटू आहे बगा.

http://www.maayboli.com/node/25498?page=1

अन हा प्रकार केनियातही मिळतो असा प्रतिसादांत उल्लेख दिसला. रोचक आहे!

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 May 2014 - 12:35 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

त्या लेखात हे लोणचे गुजराथी मंडळींतही आवडीचे आहे असे लिहीले आहे. त्यामुळे ते युगांडा-केनिया-टांझानियात गेले असल्यास आश्चर्य नाही !

बॅटमॅन's picture

4 May 2014 - 12:47 am | बॅटमॅन

अगदी अगदी!!!

बॅटमॅन's picture

4 May 2014 - 12:32 am | बॅटमॅन

मायबोलीवरच्या धाग्यामुळे त्याचे शास्त्रीय नावही कळाले. विकीवर त्याबद्दल लेखही निघालाच.

http://en.wikipedia.org/wiki/Plectranthus_barbatus

स्पंदना's picture

5 May 2014 - 4:34 am | स्पंदना

जागु's picture

3 May 2014 - 2:09 pm | जागु

मस्त ठेचा.
पहिला टायटल वाचून मला लेख वगैरे असेल अस वाटल.

राही's picture

3 May 2014 - 3:19 pm | राही

बरंच भारी प्रकरण दिसतंय. खाताना देखील एव्हढी हाणामारी काही जमायची नाही पण फोटो आणि लेख ज्वलज्जहाल आहेत एव्हढं खरं.

निनाद's picture

5 May 2014 - 6:25 am | निनाद

झकास लेख आणि कृती.
आवडली आहे.
बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. :)

कोल्हापूरची लवंगी मिरची आणि तिचा ठेचा .... तिखट असणारच. :)

भाते's picture

5 May 2014 - 8:58 pm | भाते

धाग्याचे शिर्षक वाचुन एखाद्या हाणामारीसंबंधी लेख आहे का या विचारात पडलो. धागा चुकुन पाकृ विभागात टाकला गेला आहे का अशी शंका आली.
माझ्या या प्रतिसादाने धाग्याची शंभरी झाली.
जाता जाता, पाकृ आवडली.

अनन्न्या's picture

7 May 2014 - 6:54 pm | अनन्न्या

त्यात खर्डा, ठेचा....घाम फुटलाय वाचूनच!!!!!!!!!!

प्रीत-मोहर's picture

7 May 2014 - 10:27 pm | प्रीत-मोहर

माईनमुळाच लोणच आमच्याकडेही आवडीने खातात. मस्त्त एकदम

जाम जहाल प्रकरण दिसतेय.

कोणाला ठेचा हा प्रकार माहीत नसेल तर फोटो पाहुन ही 'शेजवान चटणी' आहे असेच म्हणेल.

मराठी माणसाला ठेचा माहित नाही अन शेजवान चटणी ठाऊक, असं झालं तर त्याला मराठी म्हणावं का?

पण मी कुठे मराठी माणसाचा उल्लेख केला आहे... मी तर फोटोत दिसण्यार्‍या ठेच्याबद्दल माझं मत नोंदवलं.

आणखी एक शंका, जर चुकूनमाकून एखाद्या मराठी माणसाला ठेचा हा प्रकार माहीतच नसेल तर तुमच्या लॉजीक प्रमाणे ती व्यक्ती मराठी नाहीच का? *unknw*