या लेखात विद्या कॉमर्स लायब्ररीचा चुकीने उल्लेख महाराष्ट्र लॉ हाऊस असा झाला होता, आदुबाळ यांनी प्रतिसादातून लक्षात आणून दिल्या नंतरर शीर्षक बदलले आहे,
अजून पाच मिनीटे, घडाळ्याचे काटे रात्रीच्या १२ वर जातील पुढच्या २४ तासांना भारतात १ मे म्हणतील, महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन.
आठवणींनी मला जवळपास २० वर्षे मागे नेलं पुण्यातल्या अप्पाबळवंत चौकाकडे जाणार्या रस्त्यावर (मला वाटते केळकर रस्ता) एक एस.एन.डि.टी नावाची मुलींची शाळा आहे त्या शाळेच्या थोडसं डायगोनली आपोझीट एक कायद्याच्या पुस्तकांच वाचनालय होत. नाव आता नेमक आठवत नाही पण बहुधा महाराष्ट्र लॉ हाऊस असाव. (आदुबाळांनी ते नाव विद्या कॉमर्स लायब्ररी असे होते हे लक्षात आणून दिले आहे.) त्या वाचनालयाच्या मालकांचा तेथूनच अजून एक व्यवसाय चालत असे म्हणजे गावोगावच्या मुलांना शासकीय आणि बँकींग इत्यादी स्पर्धा परीक्षांचे फॉर्म पाठवणे. केवळ वाचनालय चालवण किंवा फॉर्म विकायचा म्हणून विकण या पलिकडे जाऊन व्यक्तीगत सेवा देण्याचा त्या वाचनालय काकांचा कटाक्ष असे. आणि म्हणून स्पर्धा परि़क्षांना बसणार्या असंख्य होतकरू तरूणांचा तिथे नेहमी राबता दिसत असे.
मी त्यांच्या वाचनालयाचा सदस्य नव्हतो ना स्पर्धा परिक्षेच्या फॉर्मचा ग्राहक, कुणाचा कुठे आणि का परिचय व्हावा ? पण त्या काकांचा माझा परिचय होण्याचा योग आला आणि तेही ते अतं:करणातन कष्टी असताना. आणि त्यांच्या मनाला कष्ट कसल होत ? पुणे विद्यापिठान लॉ हा विषय मराठीतून शिकवण्याच बंद करण्याचा घेतलेला निर्णय. काकांकडे एक फाईल होती त्यात लॉ विषयाच मराठीतन शिक्षण का चालू राहील पाहीजे या बद्दलचे लेख ते वाचकांची पत्रे मधे आलेली त्यांची पत्र ते त्यांनी विद्यापीठाला या विषयावर केलेल्या पाठपुराव्याच्या प्रती. आयुष्यात कोण कशासाठी लढतो तर कोण कशा साठी, प्रत्येक लढाई यशस्वी होत नाही आणि प्रत्येक लढवय्याच गाणही गायल जात नाही. मीया बीबी राजी तो क्या करेगा वाचनालयका काजी, बहुधा पुणे विद्यापीठाचा तो निर्णय अंतीम असावा , ते काकाही तसे वृद्धत्वाकडे झुकलेले होते.
नंतर त्या वाचनालयाकडे दहा पंधरा वर्षेतरी पुन्हा जाण्याचा प्रसंग आला नाही. काही कारणानी एक कॉपीराईट बद्दलच पुस्तक शोधण्याचा योग आला, काकांच्या वाचनालयाची आठवण आली तशी गाडी तीकडे वळवली. ते वाचनालय आता त्या जागेवर नव्हतं म्हणून आजू बाजूच्या दोनचार दुकानदारांकडे चौकशी केली तर कुणीतरी ते दुकान मागच्या गल्लीत गेल्याच सांगीतल म्हणून शोधत गेलो. दुकान त्याच नावाने चालू होते, दुकानात एक हिंदी भाषिक माणूस होता मला आधी वाटल तो कर्मचारी असावा म्हणून चौकशी केली त्यानी ते वाचनालय/दुकान स्वतः चालवण्यासाठी विकत घेतल्याचे सांगितले.
मी काही अधीक चौकशी केली नाही, ते वृद्ध काका आता असतील नसतील, पण मराठी भाषेसाठी भाषिकांसाठीचा एक निर्व्याज्य व्यवसाय माझ्या लेखी तरी मृत झाला होता. मी खीन्न मनाने हव्या असलेल्या पुस्तकासाठी अप्पाबळवंत चौकाचा रस्ता धरला.
प्रतिक्रिया
2 May 2014 - 4:34 pm | जयनीत
''''आयुष्यात कोण कशा साठी लढतो तर कोण कशा साठी प्रत्येक लढाई यशस्वी होत नाही आणि प्रत्येक लढवय्याच गाणही गायल जात नाही.'''''
मोजक्या शब्दात खुप काही बोललात.
2 May 2014 - 6:25 pm | आदूबाळ
तुम्हाला कन्या शाळेसमोरची "विद्या कॉमर्स लायब्ररी" अभिप्रेत आहे का? त्याच्या मालकांचं नाव "आठवले". काकांचे चिरंजीव आमोद आठवले काही वर्षं चालवत असत. रस्तारुंदीकरणात लायब्ररीची जागा गेली बहुदा.
मी विद्यार्थीदशेत अनेक वर्षं मेंबर होतो. काकांना स्वतःला चांगलीच माहिती होती. एखाद्या विषयावरचं एखादं पुस्तक झेपलं नाही तर काका दुसरं काढून द्यायचे.
काकांच्या कार्याविषयी आदर बाळगूनही मला असं वाटतं की कायद्याचं "शिक्षण" इंग्रजीतच हवं. कायद्यांची ओळख / वाविप्र हे मराठीतून अथवा अन्य भाषांतून असायला हरकत नाही.
2 May 2014 - 9:19 pm | माहितगार
"विद्या कॉमर्स लायब्ररी" नावांबद्दल धन्यवाद मला विश्वास होता कुणी न कुणी बरोबर नावाची आठवण देईल असा विश्वास होता. मला केवळ त्यांची कायद्याच शि़क्षण मराठीतून उपलब्ध असाव हि तळमळच तेवढी लक्षात राहिली आणि मी त्या वाचनालयाच नाव अशा 'महाराष्ट्र लॉ हाऊस' आडपाट पद्धतीने लक्षात ठेवलं :) (मी धाग्याचे नाव बदल करण्याची संपादकांना विनंती करतो आहे.)
होयना त्यांना जे वाटत होत ते वीस वर्षापूर्वी त्यांनी त्यांच मनमोकळ करून मलाही नीटस कळल नव्हत. मी त्या काळात आजच्या एवढा मराठी मराठी करत नसे. तरी पण त्यानंतर जेव्हा केव्हा संयुक्त महाराष्ट्र हे शब्द ऐकले ऐकताना बर्याचदा पोकळ वाटले. म्हणून या लेखाचे लेखन अंशतः तट्स्थ ठेवण्याचा प्रयास केला आहे
2 May 2014 - 11:56 pm | मुक्त विहारि
आवडला.
22 Nov 2014 - 12:16 pm | माहितगार
मुंबई उच्चन्यायालयाने कायद्याची पुस्तके मराठीतून कधी? हा प्रश्न विचारल्याचे वृत्त आहे . पण सरकार आणि जनतेकडे उत्तर नसलेले प्रश्न न्यायालयांनी विचारावेत का ? हाच प्रश्न आहे.