गटारी अमावस्या

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in काथ्याकूट
28 Jul 2008 - 11:03 am
गाभा: 

गटारी अमावस्या -

गेले काही वर्षांपासुन गटारी अमावस्येला एका उत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. ३१ डिसेंबर सारखेच या दिवसा कार्यक्रम आखले जातात.
श्रावण महिन्यात मांसाहार साधारण पणे केला जात नाही. पुढील संपुर्ण श्रावण महिना उपवास घडणार असल्याने श्रावण सुरु होण्यापुर्वीच्या अमावस्येदिवशी भरपेट मांसाहार ( पेयपान ) करुन पुढील महिन्याची उणीव भरुन काढण्याचा प्रयत्न केला जातो. ( मुंबईत बहुतेक श्रावण सुरु होण्यापुर्वीचा शेवटचा रविवार गटारी म्हणुन साजरा केला जातो. )
यामागचे काय शास्त्र आहे ? काय रुढी आहेत ? हे या चर्चेतुन माहित करुन घ्यायला आवडेल. नाहीतर गटारी म्हणजे गटारात लोळण्याइतकी अवस्था होईपर्यंत खाणे आणि पिणे यापलिकडे फारशी माहिती नाही.

नेहमी मांसाहार करणारी मंडळी श्रावण महिन्यात मांसाहाराचे नाव काढत नाहीत. कां बरे असे ? जाणकारांचे काय मत आहे? आरोग्य चांगले रहाण्यासाठी असे सांगीतले आहे का श्रावणात धार्मिक कार्य जास्त असल्याने असा मांसाहार केला जात नाही?
याबाबत कुणी जास्त माहिती देऊ शकेल का?

प्रतिक्रिया

पद्मश्री चित्रे's picture

28 Jul 2008 - 11:18 am | पद्मश्री चित्रे

>>नेहमी मांसाहार करणारी मंडळी श्रावण महिन्यात मांसाहाराचे नाव काढत नाहीत. कां बरे असे ?
माझ्या मते कारणे-
१] सणवार खुप असतात.
२] कोळी लोक समुद्रवर जात नाहित मासेमारीला-त्यमुळे बाजार कमी.( हल्ली हे कारण कमी च. कारण -मोठ्या बोटी जातात मासेमारी ला.उलट श्रावणात बाजार स्वस्त असतो ह्ल्ली)
३] माशांचा प्रजनन काळ असतो हा-म्हणुन.
४] आयुर्वेदाप्रमाणे- या काळात पचायला हलका आहार घेणे योग्य.
पण गटारी करुन श्रावण न करणारेच खुप असतात. :)

विसोबा खेचर's picture

28 Jul 2008 - 11:29 am | विसोबा खेचर

पण गटारी करुन श्रावण न करणारेच खुप असतात.

हा हा हा! आम्हीही त्यातलेच. आम्ही गटारी साजरी करतो, पण श्रावण पाळतच नाही! :)

आपला,
(ग्लेन मोरांजीप्रेमी) तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Jul 2008 - 9:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तात्या,
आपल्याकडेपण ग्लेन मॉर्न्गी मिळते? आधी माहित असतं तर विमानातून मी ओझं वाहिलं नसतं. माझ्याकडे बहुतेक यापेक्षाही जास्त जुनी आहे पण खात्री नाही.

(बहुतेक सर्व महिन्यात श्रावण पाळणारी) अदिती

विसोबा खेचर's picture

28 Jul 2008 - 10:46 pm | विसोबा खेचर

माझ्याकडे बहुतेक यापेक्षाही जास्त जुनी आहे पण खात्री नाही.

ठीक आहे, बघुया आपण! :)

राधा's picture

28 Jul 2008 - 7:21 pm | राधा

आपल्या भारतीय ॠतुचक्रा नुसार श्रावण म्हण्जे पावसाळ्याची सुरुवात्............म्हणजे एक ॠतुबदल.......... या बदलाचा त्रास कमी व्हावा खासकरुन पोत खराब होउ नये म्हणुन हे बंधन आपले पुर्वज पाळत असतील.......... श्रावणात उपवास पण खुप आहेत....... ते यासाठीच असेल. म्हणजे शाकाहारी असो वा मांसाहारी दोघानाही बंधन अस्तात या महिन्यात........... आता कोण किति पाळतो ते आपण बघतोच की.........;)

गटारी वरुन होस्टेलची आठवण झाली.
होस्टेलवर असताना २ सण आम्ही दिवाळी सारखे ५-५ दिवस साजरे करायचो.

१) रंगपंचमी (होळी)
२) गटारी.
(अर्थात श्रावण कधीच पाळायचो नाही.)

आंबोळी

अभिज्ञ's picture

28 Jul 2008 - 7:57 pm | अभिज्ञ

अगदी हेच म्हणतो.
फक्त गटारी तेवढी "व्यवस्थित" पाळायची म्हणजे झाले,
श्रावण हा पाळल्यासारखाच असतो मग. ;)

प्रकाश घाटपांडे's picture

28 Jul 2008 - 9:19 pm | प्रकाश घाटपांडे

गटारात लोळे पर्यंत टाकायची तव्हा कुठं गटारी साजरी व्हतियं. आन त्वांड बी गटार व्हतयं मंग!
:T
प्रकाश घाटपांडे