इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग

Prajakta२१'s picture
Prajakta२१ in जनातलं, मनातलं
13 Apr 2014 - 11:21 pm

साधे पासबुक भरून घेण्यासाठी जिथे पूर्वी तासनतास रांगेत उभे राहावे लागायचे तिथे आता आपण आपली महिन्याची बिले/रिचार्ज पण घरबसल्या इंटरनेट/मोबाईल बँकिंग द्वारे भरू शकतो

ह्यात पण काही संभाव्य धोके/त्रुटी आहेत

अकौंट hack होणे
मोबाईल बँकिंग मध्ये connectivity नसल्याने फंड ट्रान्स्फर मध्येच अडकणे ( डेबिट तर पडते पण क्रेडीट होत नाही आणि ही ट्रान्स्फर पूर्ण होण्यास ७-१० दिवस जातात )

NEFT /RTGS चालू नसेल तर मग बँकेत जाण्याशिवाय काहीच पर्याय नाही

आपल्याला ह्या बाबतीत कसे अनुभव आले आहेत?(चांगले/ वाईट दोन्ही)

आपल्याला कुठल्या प्रकारचे बँकिंग सोयीस्कर वाटते ते पण सांगा
(जुन्या लोकांना बँकेत गेल्याशिवाय चैनच पडत नाही त्यामुळे त्यांचा ह्या गोष्टींकडे कमी कल आहे असे जाणवते)

तसेच ह्या बाबतीत कुठल्या प्रकारच्या बँका आघाडीवर आहेत?

तंत्रमदत

प्रतिक्रिया

शशिकांत ओक's picture

14 Apr 2014 - 12:12 am | शशिकांत ओक

जुन्या लोकांना बँकेत गेल्याशिवाय चैनच पडत ना.

अशा लोकांसाठी लिहून काही फरक पडत नाही. त्यांनी प्रतिसादाचा पुढील भाग नाही वाचला तरी चालेल.

कुठल्या प्रकारच्या बँका आघाडीवर

बाकीच्यांचे मला माहित नाही. पण आयसी आय सी आय व एक्सेस बँकेचा अनुभव चांगला आहे. एसबी आय व कॅनरा ही ठीक आहेत.
जर काही महत्वाच्या खबरदारी घेतल्या तर संभाव्य धोके व तृटी मला तरी व्यक्तीशः जाणवल्या नाहीत.

स्पंदना's picture

14 Apr 2014 - 4:42 am | स्पंदना

ते सगळ सोड!
ते पहिला KYC काय प्रकरण आहे सांगा.
देवा जीव गेला माझा त्या प्रकरणाने. माझ्याच पैशाला पारखे व्हायाची वेळा आली होती. पण मग सिस्टमपुढे माणुसकीची हाक काम करुन गेली.

आत्मशून्य's picture

14 Apr 2014 - 4:53 am | आत्मशून्य

फार काही नाही एक दोन फॉर्म व पुराव्याची कागदपत्रे भरावी लागतील. लोच्या खरा तिथे झाला होता जेंव्हा याला आधार कार्डच सक्तिचे केले गेले होते. आय गेस ही झंझट बहुदा आपल्या न वापरातील सॅलरी अकांउंट बाबत मागे लागली असावी.

एक वेगळे अकाउंट उघडून त्यात एक रक्कम ठेवायची .या अकाउंटला मोबाईल बैंकिंग सुविधा वापरली तर मला वाटते काही घोटाळा झाल्यास तेवढीच मर्यादित रक्कम जाईल .

१)स्टेट बैंकेत गावी पैसे पाठवणाऱ्यांच्या मोठ्या रांगा लागतात .त्यांनी ही सोय वापरली तर खूपच गर्दी कमी होईल .
२)पेन्शनर्स (राज्य) वारंवार पासबुक भरायला येतात पेन्शन आली का पाहायला .त्यांनी मोबाईलवर बैलन्स पाहिला तरी खूप झाले .अथवा एसेमेस मिळवावा .
३)आयसिआय अॅक्सिस आणि एचडीएफसी मध्ये असेपण नवीन तयार पिढी आहे .
४)चलन वगैरे भरून पैसे भरल्याचा शिक्का लागतो अशी कामेच फक्त बैंकेत जाऊन केली पाहिजेत .

माहितगार's picture

14 Apr 2014 - 10:53 am | माहितगार

एक वेगळे अकाउंट उघडून त्यात एक रक्कम ठेवायची .या अकाउंटला मोबाईल बैंकिंग सुविधा वापरली तर मला वाटते काही घोटाळा झाल्यास तेवढीच मर्यादित रक्कम जाईल .

असे करणे अधिक सुरक्षीत असेल असे वाटते.

श्रीरंग_जोशी's picture

14 Apr 2014 - 5:49 am | श्रीरंग_जोशी

मी गेल्या ८-९ वर्षापासून मी इंटरनेट बँकिंग वापरतोय (आयसीआयसीआय व सिटी बँक यांचे). आजवरचा अनुभव उत्तम आहे.

एकदा (२००७ साली) एसबीआय क्रेडिट कार्डाचे बिल मी व्हिसा मनी ट्रान्स्फर सुविधेद्वारे माझ्या आयसीआयसीआय खात्यातून भरले व ते दोन्ही बँकांकडे तक्रारी केल्यावरच प्रत्यक्षात भरले गेले. हा एकमेव वाईट अनुभव होता.

बाकी रोख रकमेऐवजी इंटरनेट बँकिंग वगैरेचा वापर का करावा यावर माझे विचार मी येथे मांडले होते.

मोबाईल बँकिंगचा वापर करण्याचा योग मात्र अजुन आला नाही.

खटपट्या's picture

14 Apr 2014 - 6:44 am | खटपट्या

माझा नेट बँकिंग चा अनुभव अत्यंत चांगला आहे.

प्रमोद देर्देकर's picture

14 Apr 2014 - 9:54 am | प्रमोद देर्देकर

मी इलेक्ट्रीक बील फक्त मोबाइलने भरतो, बाकी विमानाचे, ट्रेनचे, एस.टी.चे बूकींग, अगदी नेहरु तारांगणाचे , बुकींग सुद्धा इंटरनेटने केलेली आहेत. काही अडचण नाही, झाली व्यवस्थीत झाले.
खास करुन विरोपी पत्ता हा https ने सुरु झाला की नाही ते पहावे, आणि वन टाईम पासवर्डने सगळ्या गोष्टी सोप्या होतात.

होय OTP (वन टाइम पासवर्ड ) ने सुरक्षाविषयक बाबी safe केल्या आहेत
पण कधी कधी त्याने युजरफ्रेंडली नेस वर परिणाम होतो लोक गोंधळून जातात
ह्या बाबतीत अजून हि जास्त ट्रेनिंग ची गरज आहे लोकांना
माझा पण नेट बँकिंगचा अनुभव चांगला आहे

मोबाइल बँकिंग चे अनुभव कोणालाच नाहीयेत का?

मंदार कात्रे's picture

14 Apr 2014 - 10:52 am | मंदार कात्रे

रेल्वे ची आय आर सी टी सी या साईट द्वारा बुकिंग करताना नेट बँकिंग असो वा डेबिट कार्ड असो ,नेहमी घोटाळा होतोच . बॅन्क कोणतीही असो, ३५-४० टक्के फेल्युअर रेट आहे

आदूबाळ's picture

14 Apr 2014 - 11:26 am | आदूबाळ

ती आयआरसीटीसी या महान यंत्रणेची कमाल आहे.

लॉरी टांगटूंगकर's picture

14 Apr 2014 - 11:39 am | लॉरी टांगटूंगकर

ख्या ख्या!!!
आमच्या कंपनीतल्या लोकांचा मुख्य प्रॉब्लेम आयआरसीटीसीची साईट स्लो असणे हा आहे.

प्रसाद१९७१'s picture

14 Apr 2014 - 11:29 am | प्रसाद१९७१

कशाला पाहीजे तुम्हाला मोबाईल बँकींग? इतकी कधी तातडी असते?

आदिजोशी's picture

14 Apr 2014 - 2:59 pm | आदिजोशी

बँकेत जायचा यायचा वेळ आणि खर्च वाचवण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. हवे तेव्हा, अगदी रात्री १२ वाजताही व्यवहार करता येतात.

अलबेला सजन's picture

14 Apr 2014 - 4:08 pm | अलबेला सजन

इंटरनेट बँकिंग अतिशय उपयोगी व वेळ वाचवणारे आहे. सर्वांनी याचा जास्तीत जास्त वापर करायला हवा.
वेळेची मर्यादा न बाळगता आपण घरबसल्या अनेक कामे करू शकतो.
ऑफिसमध्ये बसून मी लाईट बिल, मोबाईल बिल, टीवी रिचार्ज, हे सर्व करतो. मात्र यामध्ये इंटरनेट बँकिंग हे अधिक भरवशाचे वाटते मोबाईल बँकिंग पेक्षा. कारण संगणकावर antivirus असतो. आणि आता तर प्रत्येक व्यवहारासाठी मोबाईल वर पासवर्ड येत असल्यामुळे सुरक्षित वाटते. मोबाईल वर मात्र हे सर्व करने धोक्याचे वाटते.
माझा इंटरनेट बँकिंग चा अनुभव अतिशय चांगला आहे. फक्त एकदाच LIC चे पेमेन्ट दोन वेळा खात्यातून कापले गेले होते ते सुद्धा LIC ला मेल पाठवल्यानंतर ८-१० दिवसांत परत जमा झाले होते.

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 Apr 2014 - 8:18 pm | राजेंद्र मेहेंदळे

>>>> कारण संगणकावर antivirus असतो.>>> त्याचा काय उपयोग इथे?

जेव्हा तुम्ही घरच्या संगणकावरुन तुमचे नेट बँकींग व्यवहार करत असता म्हणजे लॉग इन असता तेव्हा तुमचे अकाऊंट हॅक होउ शकते. किंवा आत्ताच माहीत झालेला http://heartbleed.com/ तुमचे https वरुन होणारी माहीतीची देवाण घेवाण सुद्धा हॅक करु शकतो.

यावर इलाज म्हणजे ऑफिसमधुन किवा जिथे फायरवॉलने सुरक्षित केलेले नेटवर्क असेल तिथुनच नेट बँकींग करा.

आत्मशून्य's picture

16 Apr 2014 - 8:28 pm | आत्मशून्य

हार्ट्ब्लिड मेसेंजींग प्रोटोकॉल हॅक/डमी करु शकतो. नेट बँकींगमधे ट्रॅण्जॅक्शन्साठी हे प्रोटोकॉल वापरले जात नाहीत. फायरवॉल घरातही बसवता येतेच. आंटी वायरस + फायरवाल दोन्ही (अपडेट व चालु स्थितीत) हवे तरच ते मशीन सिक्योर आहे असे म्हणता येइल.

याही पेक्षा महत्वाचे म्हणजे विंडोज क्रिटीकल अपडेट्स. (पैचेस). विंडोज जर ओरिजिनल असेल तर हे अपडेट्स मस्ट, असेच म्हणेन. बऱ्याचदा antivirus पेक्षा हे अपडेट्स परिणामकारक असतात.

आय.सी.आय.सी.आय मधे जे जे इंटरनेट बँकिंगने करता येते, ते सर्व मोबाईल बँकिंगने सुद्धा करता येते फंड ट्रान्सफर, बील पेमेंट, तिकीट बुकींग, अगदी एफ.डी. उघडणे सुद्धा. आणि मोबाईल मुळे अगदी तुमच्या सोयीनुसार केव्हाही, कुठेही. (पहा आय.सी.आय.सी.आय बँकिंग) फक्त ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचे नाव नव्याने टाकता येत नाही. त्याकरिता इंटरनेट बँकिंग मध्ये जाऊन ते पेयी म्हणून सेव करावे लागते मग हवे तेव्हा त्याला पैसे पाठवता येतात. ही एक फार चांगली सुरक्षा सुविधा आहे, यामुळे कोणि तुमचे अ‍ॅप हॅक केले तरी त्याला हव्या त्या अकाउंटला पैशे पाठवता येणार नाहीत. (कोणि तरी भेटूदे, भेटू दे कि जर मोबाईल आणि इंटरनेट दोन्ही हॅक केले तर विचारणारा :) )
आणि एवढ्या मोठ्या बँका अशी सुविधा देतात म्हणजे त्यांनी बरीच खबरदारी घेतलेली असते. तरी पण फसवणूक होण्याचा संभव असतोच. जेवढा धोका इंटरनेट बँकिंगने मधे आहे तेवढाच मोबाईल मधेही आहे.

भावा पीटर लै महान शक्ती असत्या किनी ती लै महान जबाबदारी बरोबर पण येत्या काय *LOL*
--------------------------------------------------
मला जात नाही माहित, मला वेद नाही माहित

घाबरवण्याचा हेतू नाही पण हल्लीच्या धपल्यात सावध राहाणे चांगले .एक वाचलेला किस्सा .एका घरफोडीत चोर मिळालेल्या मोबाईल वरून बैंकेकडून "पिन नंबर आठवत नाही द्या "सांगून मिळवतो .हे शक्य आहे का ?जाणकारांनी सांगावे .

आत्मशून्य's picture

16 Apr 2014 - 7:56 pm | आत्मशून्य

पण अशक्यही नाही. तुमची गोपनीय माहिती ठाउक असेल जसे संपुर्ण नाव, कायमचा पत्ता, आइचे नाव अकाउंट नंबर व बारीकशी नशीबाची साथ... पुरेशी होती नवीन पिन मिळवायला पण आता पिन मिळवणे यासाठी बहुदा प्रत्यक्ष बँकेतच जावे लागते.

श्रीगुरुजी's picture

16 Apr 2014 - 8:49 pm | श्रीगुरुजी

नेटवर्कच्या कमीअधिक वेगामुळे मोबाईल बँकिंग पूर्णपणे टाळतो.

इंटरनेट बँकिंग सढळ हाताने वापरतो. आयसीआयसीआय व एचडीएफसी बँकेचे नेट बँकिंग सुरक्षित व विश्वासार्ह आहे. फोन बिल, वीज बिल, मोबाईल रिचार्ज, व्यक्तिगत खात्यात पैसे ट्रान्सफर करणे, पर्यटनस्थळी असलेल्या हॉटेलचे चार्जेस इ. गोष्टींकरता इंटरनेट बँकिंग गेले अनेक वर्षे वापरत आहे.

मुंबई - देशातील विस्ताराने द्वितीय क्रमांकावर असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाईटवर इतर खातेदाराची प्राथमिक माहिती उपलब्ध असल्यास त्या आधारे त्या खात्याचा तपशील (स्टेटमेंट) खातेदाराखेरीज त्रयस्थ व्यक्तीही काढू शकत असल्याची बाब आयुष घोष या तरुणाने लक्षात आणून दिली आहे. एकीकडे बँकेने आपल्या ऑनलाईन सुरक्षेबाबत खात्री व्यक्त केली असली तरीही हा तांत्रिक दोष दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे नेट बँकींग सुविधेत लॉग इन केल्याखेरीज स्टेटमेंट मिळणे सध्यातरी थांबविण्यात आले आहे.

या संदर्भात खुलासा करताना बँकेच्या प्रवक्त्याने सांगितले की; आमच्या तंत्रज्ञांच्या पथकाने बँकेची संपूर्ण वेबसाईट काळजीपूर्वक तपासली असून ग्राहकांच्या खात्यावरील माहिती आणि व्यवहारांचा तपशील सुरक्षित आणि गोपनीय रहाण्यासाठी सर्व प्रभावी यंत्रणा कार्यरत आहेत. मात्र नेट बँकींगमध्ये लॉग इन न करता काही ग्राहकांच्या व्यवहाराचा तपशील इतरांना मिळत असल्याचा प्रकार घडत असेल; तर त्याबाबत त्वरित तपासणी करून त्रुटी तातडीने सूर करण्यात येईल; अशी ग्वाही त्यांनी दिली.

घोष यांना आपले स्वत:चे बँक खाते ऑनलाईन वापरत असताना या धक्कादायक गोष्टीचा शोध लागला. या प्रकाराबाबत त्यांनी बँकेला इ मेलद्वारे माहितीही दिली आहे. बँकेचे खातेदार सहजपणे शेअर करीत असलेल्या माहितीच्या आधारे त्यांचे नाव; पत्ता यासह त्यांच्या खात्यावरील जमा आणि खर्चाच्या व्यवहारांचा तपशील त्रयस्थ व्यक्तीला उपलब्ध होऊ शकतो. त्यासाठी हॅकींग अथवा कोडींगचे तंत्र अवगत असण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे हा प्रकार अधिक गंभीर आहे; असे मत घोष यांनी नोंदविले.

हे प्रकार जागतिक पातळीवरील बॅकींगच्या ऑनलाईन सेवांमध्ये अनेक वेळा दिसून आले असून यामुळे बँक अथवा ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता नाही; असे सायबर सुरक्षा क्षेत्रातील सल्लागार डॉम्निक के यांनी स्पष्ट केले. मात्र आपले खाते सुरक्षित ठेवण्यासाठी ग्राहकांनी आपला पासवर्ड सुरक्षित आणि सहज लक्षात येणार नाही; असा ठेवणे; तो वेळोवेळी बदलणे; आपल्या व्यवहारांना बहुस्तरीय सुरक्षा प्रदान करणे; आपले नाव, पत्ता यासारखी बँकेकडे नोंदविलेली प्राथमिक माहितीदेखील सार्वजनिक न करता सुरक्षित ठेवणे; या बाबी अमलात आणणे आवश्यक आहे; याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
साभार: आयसीआयसीआय बँक खाती असुरक्षित काटेकोर सुरक्षा प्रदान करीत असल्याचा बँकेचा दावा

आपले नाव, पत्ता यासारखी बँकेकडे नोंदविलेली प्राथमिक माहितीदेखील सार्वजनिक न करता सुरक्षित ठेवणे कसे शक्य आहे हे कोणी हुशार/तज्ञ सांगू शकेल का?

आत्मशून्य's picture

23 Apr 2014 - 5:05 pm | आत्मशून्य

आपले नाव, पत्ता यासारखी बँकेकडे नोंदविलेली प्राथमिक माहितीदेखील सार्वजनिक न करता सुरक्षित ठेवणे शक्यच नाही आणी आपल्या फोन बँकींगच्या (अर्थातच गोपनीय) संभाषणाचे (रेकॉर्डींग) जतन केले जात नसावे, जेणे करुन पुन्हा फोन केल्यास आवाजाची पडताळणी शक्य होइल. थोडक्यात महत्वाच्या गोष्टीचा अपवाद सोडला तर आपल्या अकाउंटचा रिड-ओन्ली अ‍ॅक्सेस बहुदा कोणालाही आहे हेच गृहीत धरुन चालावे लागेल.

माझा फोन बँकीगचा प्रथम अनुभव घेतल्यावर हे प्रश्न मनात उभे राहीले होते मी माझा अकाउंट नंबर व पिअनही फोनवरुन टाइप केली होती म्हणून कॉल झाल्या झाल्या मी रिडायल बटन दाबुन बघीतले ऑटो लॉगीन होत आहे काय. पण हा प्रकार सुरक्षीत आहे. असे घडले नाही.

तसेच फोनही कॉल चालु असताना डायल/प्रेस केलेले नंबर लक्षात ठेवत नाही म्हणजेच इतर कोणाकडे फोन गेला अथवा सार्वजनीक फोन सेवेचा वापर केला तरी रिडायल मधुनही ही माहिती उघड होत नाही.

मुंबईः Apr 25, 2014, 01.07AM IST
ऑनलाइन आर्थिक व्यवहारांत होणारे फ्रॉड्स रोखण्यासाठी दोन स्तरीय सुरक्षा म्हणजेच 'टू स्टेप ऑथेन्टिफिकेशन' लागू करण्याची सूचना रिझर्व्ह बँकेने केली आहे. तसेच, इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या विविध व्यवहारांमधील धोक्यांची माहितीही बँकांनी वेळोवेळी ग्राहकांना दिली पाहिजे, असेही मध्यवर्ती बँकेचे स्पष्ट केले आहे.

'इनेब्लिंग पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर इन पेमेंट सिस्टिम अॅप्लिकेशन' या रिझर्व्ह बँकेच्या अहवालात ऑनलाइन आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित कसे करता येतील, याचा आढावा घेण्यात आला आहे. ऑनलाइन बँकिंगच्या व्यवहारांबाबत ग्राहकांना अधिक सजग करण्यावर रिझर्व्ह बँकेने भर दिला आहे.

ग्राहकांना पासवर्ड वापरून इंटरनेट बँकिंगची सुविदा सुरू करावी लागते. तसेच, आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी दोन स्तरीय ऑथेन्टिफिकेशन द्यावे लागते. ही दोन स्तरीय प्रक्रिया सर्व बँकांनी सक्तीची करावी, अशी सूचना करण्यात आली आहे.

शिवाय, 'पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर'वर आधारित इलेक्ट्रॉनिक पेमेंट करण्याची सु‌विधाही ग्राहकांना उपलब्ध असते. या यंत्रणेअंतर्गत आरटीजीएस, एनईएफटी, सीबीएलओ, फोरेक्स क्लीअरिंग, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज क्लीअरिंग आणि चेक ट्रन्केशन सिस्टिम अशा विविध रितीने ऑनलाइन पेमेंट करता येते. या व्यवहारांसाठीही आता दोन स्तरीय 'सुरक्षा' लागू करावी लागणार आहे. म्हणजेच ऑथेन्टिफिकेशन आणि ट्रान्झॅक्शन अशा दोन्ही बाबींसाठी दोन वेगवेगळे पासवर्ड म्हणजेच हेरिफिकेशन्स असावेच लागतील, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

साभार: ऑनलाइन व्यवहारांसाठी दोन स्तरीय सुरक्षेची सूचना