भारतिय राजकरणाला पडलेलं सुंदर स्वप्न !!!

बिपिन६८'s picture
बिपिन६८ in राजकारण
2 Apr 2014 - 1:32 pm

२०१४ लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत , प्रत्तेक पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडतोय , एकूणच सगळे वातावरण ढवळून निघतेय .प्रत्तेक पक्षाचे स्टार प्रचारक सभा गाजवत आहेत ….

आणि अशा वेळेस माझ्या सारख्या सामान्य नागरिकाला गेल्या २ दशकातील काही नेत्यांची आठवण येतेय … हे नेते एकतर काळाच्या पडद्या आड गेलेत किंवा प्रकृती अस्वस्था मुळे सक्रिय राजकारणातून निवृत्त झालेत… हा छोटासा प्रयत्न त्या पैकी काही नेत्यांना आठविण्याचा !

"न भितो मरानादास्मी केवलम दुषितो यश:" मी मरणाला भीत नाही जर कशाला घाबरत असेल तर ते फक्त बदनामीला, असा रामायणातला श्लोक आपल्या पहिल्या १३ दिवसाच्या सरकारच्या पतनाच्या वेळेस उधृत करणारे !

" अध्यक्ष महोदाय लोकतंत्र संख्या का खेल है", असे सांगत बेरजेच्या राजकारणा पासून स्वतः ला दूर ठेवणारे!

" हिंदू तन मन , हिंदू जीवन , रग रग हिंदू मेरा परिचय " हि कविता वयाच्या १७ व्या वर्षी करणारे

५० वर्षाहून जास्त काळ सक्रीय राजकारणांत असून चारित्र्यावर कुठलाही शिंतोडा उडू न देणारे, अटल बिहारी वाजपेयी.

२५ डिसेंबर १९२४ सगळी कडे येशु ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद सोहळा चालू होता, आणि त्याच वेळेस ग्वाल्हेर संस्थानात कृष्णा देवी आणि कृष्ण बिहारी वाजपेयी यांच्या पोटी अटल बिहारींचा जन्म झाला.उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील बटेश्वर हे भगवान शंकराचे देवस्थान त्यांचे मूळ गाव

अटलजींचे आजोबा श्यामलाल हे प्रकांड पंडित, वाराणसीला गुरुकुलात राहून शिक्षण घेतले, त्यांना अनेक संस्कृत ग्रंथ मुखोद्गत होते, लग्न मुंजी करिता पौरोहित्य करणे तसेच भागवत पठन करणे हेच उधारनिर्वाहाचे साधन.

आजोबां प्रमाणे अटलजींचे वडील पण पंडित होते , हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी भाष्यांवर त्यांचे प्रभुत्व, व्यवसायाने शिक्षक आणि वृत्तीने कवी, त्यांनी अनेक कवी संमेलने गाजवली. नोकरीमुळे हे कुटुंब ग्वाल्हेर ला स्थाईक झाले .

अशी प्रचंड विद्वत्ता आणि साहित्य प्रेम असलेल्या कुटुंबात जन्म झालेले अटलजी " शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी" या न्यायाने पुढील आयुष्यात स्वतः पण घराण्याची परंपरा पुढे चालविताना एक पाउल पुढेच गेले .

अटलजी राजकारणात नसते तर नक्कीच एक चांगले शिक्षक झाले असते.

ग्वाल्हेर च्या विक्टोरिया कॉलेज मधून (आताचे लक्ष्मि बाई कॉलेज ) हिंदी ,संस्कृत आणि इंग्रजी विषय घेवून शिक्षण पूर्ण केले, त्या नंतर MA पोलिटिकल सायन्स DAV कॉलेज कानपूर हून पूर्ण केले. वडिलांची इच्छा स्वतः वकील होण्याची होती, त्या मुळे त्यांनी अटलजी ना वकिलीचे शिक्षण घेण्याची गळ घातली आणि वडिलांच्या इच्छेला मान देवून त्यांनीही वकिलीचे शिक्षण सुरु केले , विशेष म्हणजे त्याच वेळेस वडिलांनी पण बरोबरीनी त्यांच्याच वर्गात वकिली करिता प्रवेश घेतला आणि "वडील आणि मुलाचे " एका वर्गात शिक्षण सुरु झाले.

१९४२ ला जेंव्हा गांधीजीं नि चले जाव ची हाक दिली , त्यात असंख्य तरुण ओढले गेले, पैकी एक अटलजी , तिथून पुढे कॉलेज ला विद्यार्थी चळवळीत त्यांना संघटना या शब्दाचा अर्थ उमगला आणि नकळत पूर्ण वेळ रस घेवून काम करू लागले,

पुढे त्यांनी स्वतः ला संघ कार्यात झोकून दिल्या मुळे वकिलीचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले हा भाग निराळा पण वडिलांनी ते पूर्ण केले हे विशेष

कॉलेज जीवनात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघा च्या संपर्कात आले होते, डॉ हेडगेवारांच्या विचाराने भारावले होते, डॉ ची तळमळ कळत होती आणि आपण काहीतरी करावे अशी मनात भावना निर्माण झाली होती पण नक्की काय करावे हे कळत नव्हते , त्या वेळे पर्यंत ते ग्वाल्हेर ला नित्य शाखे वर जात होते, संघाची व्याप्ती वाढविण्या करिता डॉ हेडगेवार पण संघ प्रचारक म्हणून सुशिक्षित पदवीधर मुलांच्या शोधात होते आणि योग योगाने अकोल्याच्या श्री नारायण तरटे म्हणून एका व्यक्ती मुळे एके दिवशी अटलजी संघ प्रचारक झाले , श्री तरटे संघाचे निष्ठावान कार्यकर्ते आणि त्यांनी अटलजी मधील गुण हेरून त्यांना प्रचारक बनवून नकळत त्यांच्या पुढील यशस्वी राजकीय वाटचालीचा पाया रचला , त्या मुळेच तरटे ना ते राजकीय गुरु मानतात म्हणूनच गुरु शिष्याचे नाते अजूनही कायम आहे, श्री तरटे आयुष्याची संध्याकाळ नागपूर ला संघ कार्यालयात घालवतात.

१९४८ ला गांधी हत्ये नंतर संघावर बंदी आली, संघाचे जवळ पास ६०,००० स्वयंसेवक तुरुंगात होते त्या वेळेस भूमिगत राहून संघाचे काम करत होते,

संघा वरील बंदी उठविण्या करिता गुरुजी दिल्ली मध्ये प्रयत्न करीत होते पण त्याला यश येत नव्हते , पण शेवटी जुलै १९४९ मध्ये संघावरची बंदी उठवली गेली आणि दीनदयाळ उपाध्याय , नानाजी देशमुख आणि इतर स्वयंसेवक तुरुंगातून बाहेर आले .

दीनदयाळ हे अटलजी चे दुसरे राजकीय गुरु , सक्रिय राजकारणाचे धडे त्यांना दीनदयाळजिं कडून मिळाले तसे तर अटलजी त्यांचे मानसपुत्र.

तिथून पुढे या जोडीने जनमानसात संघा बद्दल झालेले शंकाचे मळभ दूर करिण्या करिता जीवाचे रान केले आणि त्यात त्यांना यश आले .

अटलजी च्या आयुष्यातील पुढचा अध्याय राजकारणाचा.

श्याम प्रसाद मुखर्जी नेहरू मंत्री मंडळात उद्योग मंत्री होते, १९५० च्या " नेहरू लियाकत अली " करारातील काही मुद्यावर त्यांचे नेहरूंशी वाद झाले आणि तडक मंत्री मंडळातून बाहेर पडले, आणि सर्व समावेशक राष्ट्रीय पक्ष काढण्याचे ठरविले, सक्रिय पाठींब्या साठी जेंव्हा ते गोळवलकर गुरुजीना भेटले तेंव्हा त्यांनी संघाचे काही कार्यकर्ते दीनदयाळजी ,नानाजी , अटलजी , इतर प्रचारक आणि स्वयंसेवकांना नव्या पक्षाच्या कार्या करिता दिले. …. आणिरे २१ ऑक्टोबर १९५१ ला " भारतीय जनसंघाची स्थापना झाली "

१९५३ ला अटलजी लोकसभेची पहिली निवडणूक लखनौ मधून लढले आणि अपेक्षे प्रमाणे हरले " अपयश हि यशाची पहिली पायरी

जून १९५३ ला श्याम प्रसाद मुखर्जी यांचा गूढ मृत्यू झाला , अटलजी अक्षरशः कोसळून पडले, हळव्या मनाच्या अटलजी वर याचा खोल आघात झाला तो नुसता पक्ष अध्यक्षाचा मृत्यू नव्हता तर श्यामप्रसादजी त्यांच्या करिता Guide , Philospoher असे सर्व काही होते.

या सर्व पार्श्वभूमीवर ते जनसंघाचे सरचिटणीस झाले.

अशातच १९५७ च्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या , तो पर्यंत अटलजी हे व्यक्तिमत्व जनमानसात नावारूपाला आले होते, देशव्यापी दौरे सुरु झाले होते , सभा गाजवते होते , लोक अटलजींचे विचार ऐकण्या करिता गर्दी करू लागले होते, म्हणून पक्षाने त्यांना लोकसभा निवडणूक एक, दोन, नव्हे तर तीन ठिकाणाहून लढविण्याचा आदेश दिला. आणि अटलजी तीन ठिकाणाहून निवडणूक लढले - बलरामपुर , लखनौ आणि मथुरा.

बलरामपुर मधून निवडून आले आणि थेट लोकसभेत प्रवेश झाला …ते साल होते १९५७

वत्कृत्व कले मुळे लोकसभेत त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधले.

१९६२ ला परत पराभवाचा सामना करावा लागल्या मुळे , पक्षाने त्यांना राज्यसभेत पाठविले

१९६७ परत बलरामपुर मधून प्रचंड मताधिक्याने निवडून आले

१९६८ साली दिन दयाळ जीचा गूढ मृत्यू झाला …. अटलजी तर त्यांचे मानसपुत्र…. "आज मी अनाथ झालो " असे उद्गार त्यांना श्रद्धांजली वाहताना काढले

१९७१ ला भारत पाकिस्तान युद्धात भारताने पाकिस्तान ला धूळ चारत स्वंतंत्र बांगलादेश ची निर्मिती झाली, इंदिरा गांधीनी घेतलेल्या खंबीर भूमिकेचे कौतुक करिताना त्यांना दुर्गेची उपमा दिली , राजकीय विरोधकाचे जाहीर कौतुक करिण्या करिता नुसते मन मोठे असून चालत नाही तर तसे संस्कार असावे लागतात , त्यांनी आयुष्यात कधीही विरोधा करिता विरोध केला नाही .

अटलजींच्या वात्कृत्वा मुळे लोकसभेत त्यांची छाप पडू लागली , अभ्यास पूर्ण आणि आवेश पूर्ण भाषण , भाषेवर विलक्षण प्रभुत्व , अन्याया विरुद्ध पेटून उठणे , या मुळे फक्त लोकसभेत च नाही तर जाहीर सभेत त्यांची भाषणे ऐकण्या करिता लोक गर्दी करू लागले .

१९७५ च्या आणीबाणीत इतर विरोधी पक्ष नेत्या प्रमाणे अटलजी ना तुरुंगवास घडला , बंगलोर च्या तुरुंगात काही दिवस होते , स्वयपाकाची मूलतः आवड असल्या मुळे तिथे त्यांचा बराचसा वेळ भटारखान्यात जायचा, नंतर प्रकृती अस्वस्था मुळे त्यांना प्रथम बंगलोर च्या इस्पितळात आणि नंतर दिल्ली ला एम्स मध्ये दाखल केले, काही दिवसा नंतर त्यांना घरातच नजर कैदेत ठेवण्यात आले।

१९७७ ला इंदिरा विरोधी लाटेत जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले आणि त्यात परराष्ट्र मंत्री झाले , विदेश नीती हा कायम आवडीचा विषय , त्या मुळे तो कार्यकाळ गाजविला. UNO मध्ये केलेले हिंदी भाषण गाजले.

वेगवेगळ्या पक्षांची बांधलेली मोट , त्यात महत्वाकांकाशी नेते, मोरारजींचा आडमुठेपणा ,चरण सिंघाना झालेली घाई याचे पर्यवसान सरकार कोसळण्यात झाले.

जयप्रकाश नारायणना दिलेला शब्द पाळू शकलो नाही , राजघाटावर घेतलेली शपथ पूर्ण करू शकलो नाही या वेदनेतून त्यांनी कविता लिहिली -

क्षमा करो बापू तुम हमको

वचन भंग के हम अपराधी

राजघाट का किया अपावन

मंजिल भुले यात्रा आधी !

अतिशय हळवे आणि कोमल मन , पण व पु म्हणतात तसे "कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असते , कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे , म्हणूनच पाण्याच्या प्रवाहाने खडक झिजतात”.

याचा अनुभव पुढे जाऊन १९९९ ला कारगिल युद्ध किंवा अणु चाचण्या च्या वेळेस आलाच .

जनता सरकारच्या अयशस्वी प्रयत्ना नंतर १९८० ला भारीतय जनता पक्षाची स्थापना झाली आणि त्याचे ते अध्यक्ष झाले , तिथून पुढची काही वर्षे पक्ष वाढविण्यात गेली, १९८४ च्या इंदिरा हत्त्ये नंतरच्या लाटेत पक्षाची धूळधाण उडाली , अटलजी पण निवडणूक हरले . "दिल्ली बहोत दूर थी "

नंतर रथ यात्रा , राम जन्म भूमी , शहाबानो प्रकरण या मुळे पक्ष कायम प्रकाशझोतात होता , त्यात अटलजी इतकाच वाटा अडवानीचा होता यात वाद नाही .

हि ९० च्या दशकातील गोष्ट ,बहुतेक बाळासाहेब भारदे म्हणाले होते -

कॉंग्रेस खुर्ची वाल्यांचा

भाजप पूजा अर्चा वाल्यांचे

समाजवादी चर्चा वाल्यांचे

कम्युनिस्ट मोर्चा वाल्यांचे

त्याच सुमारास अटलजी आणि अडवाणींनी पक्षाचा चेहेरा बदलण्याचे जाणीव पूर्वक प्रयत्न केले त्याचे पर्यवसान, समता , ममता , जयललिता इतर पक्षांना घेवून सत्ता मिळविण्यात झाले.

सर्व समावेशक सरकार बनविताना काही मुद्दे बाजूला ठेवावे लागले , जसे कि समान नागरी कायदा, ३७० कलम , राम मंदिर …. पण त्या वेळेस मुद्दे बाजूला ठेवण्या शिवाय पर्याय नव्हता. विरोधक म्हणून किती दिवस राहणार?

मग १३ दिवस , १३ महिने आणि ५ वर्षे असा ३ वेळेसचा पंतप्रधानाचा कार्यकाल वेगवेगळया गोष्टीनी गाजला.

अणु चाचण्या ,आग्रा सुमिट , लाहोर सुमिट , लाहोर बस प्रवास , कारगिल युद्ध विजय , सुवर्ण चतुष्कोन योजना, कंधार विमान अपहरण, संसदे वरचा हल्ला…. अशा बर्याच चांगल्या वाईट गोष्टीं चा कार्यकाल.

इथे त्यांच्या पंतप्रधान कार्यकालाची चिकित्सा हा हेतू नाही. एक राजकारणी म्हणून अटलजी चे भारतीय राजकारणातील योगदान, आठविण्याचा हा प्रयत्न.

सत्तेत नसलेल्या आणि सत्तेत असलेल्या वाजपेयींच्या देहबोलीत काहीच फरक पडला नव्हता...तेच मंद स्मित चेह-यावर कायम होतं

दुटांगी धोतर, झब्बा , डोळ्यावर जाड काड्यांचा चष्मा, मागे वळविलेले पांढरे केस , बोलताना मधेच घेतला जाणारा जीवेघेणा pause…. आणि एकदा बोलू लागले कि जिभेवर साक्षात सरस्वती !! हे आम्ही कधीच विसरू शकत नाही .

राजकारणी असून पाहताच पायावर डोके ठेवावे असे व्यक्तिमत्व…. पण आपल्या नशिबात तो योग दिसत नाही.

आता त्यांच्या हयातीत "भारत रत्न " मिळावा हि दुसरी इच्छा तरी पूर्ण करो आणि त्यांना उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !

बिपीन कुलकर्णी

प्रतिक्रिया

बाबा पाटील's picture

2 Apr 2014 - 2:29 pm | बाबा पाटील

भाजप व जनसंघाचे हजार गुन्हे माफ...!असा ऋषीतुल्य कवीमनाचा पंतप्रधान परत होणे नाही.

मदनबाण's picture

2 Apr 2014 - 2:39 pm | मदनबाण

सुरेख लेखन ! :)
हल्लीच्या राजकारणात निष्ठेने चाटुगिरी आणि लाळघोटे करण्यांचे प्रस्थ आहे.आत्मसन्मान,नैतिकेतेने राजिनामा देण्याचा काळ केव्हाच गेला.

प्यारे१'s picture

2 Apr 2014 - 2:40 pm | प्यारे१

छान आढावा घेतलाय.
काही मुद्द्यांबद्दल मतभेद असू शकतात पण ते व्यक्त करण्याचं हे ठिकाण नाही हयाची जाणीव ठेवायला हरकत नसावी.

बिपिन६८'s picture

2 Apr 2014 - 4:06 pm | बिपिन६८

मांडलेल्या काही मुद्यांवर तात्विक मतभेद असणे काही गैर नाही. इथे फक्त त्या व्यक्तिमत्वाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
धन्यवाद

बिपीन

प्यारे१'s picture

2 Apr 2014 - 4:11 pm | प्यारे१

माझं सांगणं प्रतिसादकर्त्यांसाठी अधिक होतं.

असो. बदलीन.

पोटे's picture

2 Apr 2014 - 2:47 pm | पोटे

:)

नानासाहेब नेफळे's picture

2 Apr 2014 - 2:48 pm | नानासाहेब नेफळे

अटलजी एक चांगले व्यक्तीमत्व आहे, तेजस्वी हिंदुत्ववाद कसा असावा याचे बोलके उदाहरण. दुर्देवाने आजचे हिंदुत्व प्रखर झाले आहे, तेजस्वी नाही.
अटलजींना निरामय दिर्घायुष्य लाभो.

बिपिन६८'s picture

2 Apr 2014 - 4:18 pm | बिपिन६८

धन्यवाद

Dhananjay Borgaonkar's picture

2 Apr 2014 - 2:48 pm | Dhananjay Borgaonkar

उत्त्म लेख..
आता त्यांच्या हयातीत "भारत रत्न " मिळावा हि दुसरी इच्छा तरी पूर्ण करो आणि त्यांना उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !

यासाठी १०००० वेळा सहमत.

बिपिन६८'s picture

2 Apr 2014 - 4:12 pm | बिपिन६८

धन्यवाद

अटलजीबद्दल कधी काही वाचनात आलेल नव्हत अन तस मुद्दाम वाचायचा असा प्रयत्ऩदेखील केला नव्हता
तुमचा लेख वाचुन चांगल्या व्यक्तीमत्वची ओळख झाली मला :)

मराठी मध्ये मला पण फार कमी पुस्तके दिसली या व्यक्तिमत्वावर लिहिलेली, पण मध्यंतरी एक चांगले पुस्तक वाचनात आले …आत्ता नाव आठवत नाही
धन्यवाद

बिपीन

अनिरुद्ध प's picture

3 Apr 2014 - 12:19 pm | अनिरुद्ध प

+१ सहमत

पुण्यात्मा's picture

2 Apr 2014 - 3:57 pm | पुण्यात्मा

खर तर आद्वनिच्या नावावर एकमत न झाल्याने अटलजअना पं.प्र होण्याचि सन्धि मिळालि. पण त्यामुळे ह्या देशाला त्यान्चि ओळख झालि. असा वक्ता परत होणे नाहि.

बिपिन६८'s picture

2 Apr 2014 - 4:13 pm | बिपिन६८

१००% सह्मत

दुश्यन्त's picture

2 Apr 2014 - 4:23 pm | दुश्यन्त

२००४ ला जनतेने अजून एक संधी द्यायला हवी होती. तेव्हा अनेक सर्व्हेमध्ये पंतप्रधान म्हणून लोकांची त्यांनाच सर्वाधिक पसंती होती मात्र पक्षाला आणि एनडीएला काही गोष्टी भोवल्या.

बिपिन६८'s picture

2 Apr 2014 - 4:54 pm | बिपिन६८

२००४ ला, का असे घडले ? ते खरेच देव जाणे

वाजपेयींसारखा नेता भाजपाला आजतागायत मिळु शकलेला नाही हे त्या पक्षाचं दुर्दैवं :(

लेख आवडला. तपशीलात मतभेद असतील - आहेत, पण ते इथे काढायची इच्छा नाही.

ते भारतरत्नच्या योग्यतेचे आहेत याबद्दल त्यांच्या विरोधकांच्याही मनात किंतु नसेल!

बिपिन६८'s picture

2 Apr 2014 - 4:58 pm | बिपिन६८

लिखाणातील प्रत्तेक गोष्ट वाचकाला मान्य असावीच असे नाही… प्रत्तेक गोष्टीला दोन बाजू असतातच
फक्त हा त्या व्यक्तीमत्वाचा वेध घेण्याचा छोटासा प्रयत्न

धन्यवाद

बिपीन

बिपिन६८'s picture

2 Apr 2014 - 4:58 pm | बिपिन६८

लिखाणातील प्रत्तेक गोष्ट वाचकाला मान्य असावीच असे नाही… प्रत्तेक गोष्टीला दोन बाजू असतातच
फक्त हा त्या व्यक्तीमत्वाचा वेध घेण्याचा छोटासा प्रयत्न

धन्यवाद

बिपीन

चौकटराजा's picture

2 Apr 2014 - 5:51 pm | चौकटराजा

या व्यक्तीला एका पंगतीत माझ्या आईने वाढले आहे ! ( मुक्काम तळेगाव दाभाडे ) .

बिपिन६८'s picture

2 Apr 2014 - 6:03 pm | बिपिन६८

वा....

वाजपेयींच्या आयुष्याबद्दल काही वाचावं ही इच्छा पूर्ण केल्याबद्दल बहुत धन्यवाद!!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Apr 2014 - 6:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

पक्षापक्षांच्या भिंती ओलांडून सर्वांना आदरणीय वाटणारे व्यक्तिमत्व ! परत असा नेता भारतिय राजकारणात होईल का?

वाटाड्या...'s picture

2 Apr 2014 - 7:13 pm | वाटाड्या...

अप्रतीम ओळख करुन दिलीत...

- वाट्या

अत्रुप्त आत्मा's picture

2 Apr 2014 - 8:21 pm | अत्रुप्त आत्मा

+१

धन्यवाद... मा. अटलजींबद्दल एवढी सखोल माहिती दिल्याबद्दल.

धन्यवाद... मा. अटलजींबद्दल एवढी सखोल माहिती दिल्याबद्दल.

मी-सौरभ's picture

2 Apr 2014 - 8:39 pm | मी-सौरभ

आवडेश

आत्मशून्य's picture

2 Apr 2014 - 8:52 pm | आत्मशून्य

बाकी आज भारताला पुतिनसारख्या कणखर व्यक्तीमत्वाची प्रचंड गरज आहे. (नेहमीच होती) केव्हां येणार तो सुदीन....

विकास's picture

2 Apr 2014 - 9:19 pm | विकास

किंचीत अधिक...

१९७५ च्या आणीबाणीत इतर विरोधी पक्ष नेत्या प्रमाणे अटलजी ना तुरुंगवास घडला , ... काही दिवसा नंतर त्यांना घरातच नजर कैदेत ठेवण्यात आले।

आणिबाणीच्या काळात ते नक्की कधी ते माहीत नाही पण न्यूयॉर्क-बॉस्टनमधे पण होते. किंबहूना, त्यांना, सुब्रम्हण्यम स्वामींना (जे देखील अमेरीकेत होते) मदत करणार्‍यांना आणि आणिबाणीस विरोध करणार्‍या अनिभांना नंतर भारतीय वकीलातीतून त्यांचा पासपोर्ट सस्पेंड केला आहे (थोडक्यात you are not welcome back in India) असे सांगण्यात आले होते...

१९८४ च्या इंदिरा हत्त्ये नंतरच्या लाटेत पक्षाची धूळधाण उडाली ,
त्यावेळेस, "सारे देश मे एक भिकारी, अटल बिहारी अटल बिहारी" असे विजयोन्मादातील काँग्रेस समर्थक घोषणा देत होते. त्यामुळे विशेष करून, नंतर जेंव्हा ते पंतप्रधान झाले तेंव्हा आनंद झाला होता. पंतप्रधान म्हणून त्यांची प्रत्येक गोष्ट पटली असेल असे नाही. पण जर तशी (प्रत्येक निर्णय/गोष्ट) पटावी असे ते वागले असते तर त्यांच्या हातून काहीच घडले नसते असे वाटते...

सत्तेत नसलेल्या आणि सत्तेत असलेल्या वाजपेयींच्या देहबोलीत काहीच फरक पडला नव्हता...तेच मंद स्मित चेह-यावर कायम होतं

खरे आहे. सगळ्यांशी मैत्री असल्याने आणि त्यांच्या बोलण्यावर विश्वास असल्यानेच राव सरकारने त्यांना भारतसरकारचा प्रतिनिधी म्हणून काश्मीरवरून जेंव्हा पाकीस्तानने जिनेव्हात तमाशा केला तेंव्हा पाठवले होते. एनडीए हरल्यावर ते आणि अडवाणी राष्ट्रपतींकडे गेले होते आणि लवकरात लवकर नवीन सरकार स्थापून आम्हाला मुक्त करा असे म्हणल्याचे माध्यमांमधे वाचल्याचे आठवते.

गंमत म्हणजे मला वाटते त्यांनी वयाच्या पन्नाशीला खालील काव्य लिहीले, पण त्यांचे राजकीय कर्तुत्व हे त्यानंतरच अधिक दिसले असे वाटते...

जीवन की ढलने लगी सांझ
उमर घट गई
डगर कट गई
जीवन की ढलने लगी सांझ।

बदले हैं अर्थ
शब्द हुए व्यर्थ
शान्ति बिना खुशियाँ हैं बांझ।

सपनों में मीत
बिखरा संगीत
ठिठक रहे पांव और झिझक रही झांझ।
जीवन की ढलने लगी सांझ।

श्रीरंग_जोशी's picture

2 Apr 2014 - 9:44 pm | श्रीरंग_जोशी

वाजपेयींबद्दल एवढे थोडक्यात लिहिणे नक्कीच आव्हानात्मक झाले असणार.

बाकी तपशिलातली एक चूक जरा खटकली. ५ वर्षे ऐवजी साडेचार वर्षेच कार्यकाळ होता.

अवांतर - स्वतःहून ६ महिने अगोदर निवडणुका घेण्याची चूक भाजप व मित्रपक्षांना महाराष्ट्रात १९९९ मध्ये व केंद्रात २००४ मध्ये चांगलीच भोवली असे मला वाटते.

या व्यक्तिला आयुष्यात एकदातरी भेटावं ही लहानपणापासुन ची इच्छा आहे...
त्यांना उत्तम आरोग्य मिळावं ही प्रार्थना देवाकडे न चुकता करत असते..

सखी's picture

3 Apr 2014 - 12:09 am | सखी

चांगला आढावा घेतला आहे. शीर्षक वाचुन (खरं तर पहिले दोन शब्द वाचुन) घाबरतच धागा उघडला, पण उघडल्यावर चीज झालं :)

पैसा's picture

3 Apr 2014 - 9:13 am | पैसा

चांगल्या माणसाची चांगली ओळख आवडली. आता जर ते सक्रीय असते (म्हणजे त्या वयाचे असते) तर भाजपाला जिंकण्यासाठी फार काही करावं लागलं नसतं!!

daredevils99's picture

3 Apr 2014 - 9:26 am | daredevils99

आता जर ते सक्रीय असते (म्हणजे त्या वयाचे असते) तर भाजपाला जिंकण्यासाठी फार काही करावं लागलं नसतं!!

खरच की काय? २००४ साली काय झालतं मग?

लेख आणि प्रतिक्रियांचा टोन चांगला आहे तो तसाच ठेवा. कैच्याकै अफाट लिहून तो टोन घालवू नका.

पैसा's picture

3 Apr 2014 - 9:34 am | पैसा

२००४ आणि २०१४ या परिस्थितीत फार फरक आहे. मी वाजपेयींबद्दल लिहिलं आहे. सौम्य आणि सर्वांना आवडणारं व्यक्तिमत्व याबद्दल लिहून आलंच आहे. तुम्ही माझ्याबद्दल लिहिण्यापेक्षा वाजपेयींबद्दल लिहिलंत तर बरं होईल!

विजुभाऊ's picture

3 Apr 2014 - 9:36 am | विजुभाऊ

उत्तम लेख. काही बाबतींत मतभेद असतील. मात्र अटलजी ह एक उत्तम व्यक्तीमत्व होते.
त्यांच्याबातीत एकच गोष्ट चुकीची घडली असे वाटते ती म्हणजे " राईट मॅन इन अ राँग कम्पनी"

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

3 Apr 2014 - 12:33 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

म्हणजे काय रे विजु? ते कॉन्ग्रेसमध्ये पाहिजे होते असे सुचवतो आहेस की काय? की जनता दलात? .
अटलजी एक उत्तम वक्ते पण्..भाजपा राजकिय पक्ष म्हणून वाढला तो अड्वाणीं,जोशीं,बख्त व संघामुळे.सुंदर कविता करून मध्यम वर्गावर छाप पाडणे हे एक्.उन्हातान्हात देशभर भटकून पक्ष विस्तार करणे हे दुसरे.

अनुप ढेरे's picture

3 Apr 2014 - 1:26 pm | अनुप ढेरे

म्हणजे काय रे विजु?

=))

भारतिय राजकरणाला पडलेलं सुंदर स्वप्न नसले तरी... एक उत्तम व्यक्तिमत्व.

आता त्यांच्या हयातीत "भारत रत्न " मिळावा हि दुसरी इच्छा तरी पूर्ण करो आणि त्यांना उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !

एमेन.

श्रीगुरुजी's picture

3 Apr 2014 - 3:06 pm | श्रीगुरुजी

सुंदर लेख!

अटलजींचे बावनकशी नेतृत्व झळाळून ऊठले ते १९९९ च्या कारगिल युद्धामध्ये. सैन्याला व विमानदलाला सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये जाऊन हल्ले करायची परवानगी न देता भारतातूनच हल्ले करून पाकिस्तानी घुसखोरांना पिटाळून लावण्यामध्ये अटलजींची प्रचंड दूरदृष्टी होती. युद्धबंदी करून बोलणी करावी यासाठी अमेरिकेचा वाढता दबाव, सीमा ओलांडून पाकिस्तानवर हल्ला करावा असा जनतेचा दबाव व काँग्रेससह विरोधी पक्षांचा असहकार इ. गोष्टींचे आव्हान स्वीकारून भारताने युद्ध जिंकले ते केवळ त्यांच्याच दूरदृष्टीमुळे. अमेरिकी उपग्रहांना सुगावा लागून न देता १९९८ ची अणुचाचणी (जी नरसिंहरावांना अगदी आयत्यावेळी थांबवावी लागली होती) करणे हा त्यांच्या निर्धारशक्तीचा विजय होता.

दुर्दैवाने त्यांना फार उशीरा पंतप्रधानपदाची संधी मिळाली. त्यांना प्रकृती उत्तम असताना अजून ८-१० वर्षे मिळायला हवी होती. पण मिळालेल्या कमी कालावधीच्या संधीचा त्यांनी सदुपयोग केला. विशेषत: १० वर्षे संधी मिळूनसुद्धा बुजगावण्यासारखे निष्क्रीय बसून सहकार्‍यांना मनसोक्त भ्रष्टाचार करून देणारे व पाकिस्तान, चीन, अतिरेकी इ. आक्रमकांसमोर आपल्या दुर्बलतेचे वारंवार केविलवाणे प्रदर्शन करणारे विद्यमान पंतप्रधान पाहिले की अटलजींबद्दल जास्तच वाईट वाटते.

स्पार्टाकस's picture

3 Apr 2014 - 6:59 pm | स्पार्टाकस

देशाला आजवर दोनच कणखर पंतप्रधान मिळाले. आणीबाणीलादूनही निर्वीवाद धाडसी असलेल्या इंदिरा गांधी आणि दुसरे म्हणजे अटलबिहारी. राजकारणात असूनही ज्यांच्यापुढे आदराने वाकावेसे वाटते अश्या हाताच्या बोटांवर मोजण्यापैकी एक व्यक्तीमत्व म्हणजे वाजपेयींचे.

काश्मीरप्रकरणी नको ती घाण करणारे नेहरू, आणीबाणी लादणा-या इंदिरा गांधी आणि बोफोर्सनध्ये यथेच्छ पैसे खाणारा राजीव गांधी यांना भारतरत्न, पण अटलबिहारी वाजपेयींना मात्रं अद्यापही नाही.. हा वाजपेयींचा आणि त्या पुरस्काराचाही अपमानच.

पिशी अबोली's picture

5 Apr 2014 - 1:30 pm | पिशी अबोली

आणीबाणीलादूनही निर्वीवाद धाडसी असलेल्या इंदिरा गांधी आणि दुसरे म्हणजे अटलबिहारी.

+१
पंतप्रधान म्हटलं की का कोण जाणे, हेच दोन लोक डोळ्यांसमोर येतात.

श्रीगुरुजी's picture

3 Apr 2014 - 8:27 pm | श्रीगुरुजी

>>> काश्मीरप्रकरणी नको ती घाण करणारे नेहरू, आणीबाणी लादणा-या इंदिरा गांधी आणि बोफोर्सनध्ये यथेच्छ पैसे खाणारा राजीव गांधी यांना भारतरत्न, पण अटलबिहारी वाजपेयींना मात्रं अद्यापही नाही.. हा वाजपेयींचा आणि त्या पुरस्काराचाही अपमानच.

+ १

नेहरूंनी निव्वळ काश्मिर प्रश्नाचाच नाही, तर ज्या ज्या प्रश्नात हात घातल्या, त्या सर्व प्रश्नांचा विचका करून टाकला. काश्मिर, चीन, धर्माच्या आधारावर भेदभाव करणारी राज्यघटना लिहिणे, हिंदी भाषा राष्ट्रभाषा म्हणून लादणे, भाषिक आधारावर राज्ये बनविताना काम अपूर्ण ठेवून बेळगाव, चंदिगड, तेलंगण, विदर्भ इ. प्रश्न जिवंत ठेवणे . . . अशा अनेक प्रश्नांचा विचका त्यांच्या काळात झाला.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

3 Apr 2014 - 9:05 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

'वर जाताना' हे प्रश्न अजिबात सोडवायचे नाहीत असे सांगून गेले काय रे पंडितजी सर्वांना?
( एके काळची नेहरूंची फॅन) माई

श्रीगुरुजी's picture

4 Apr 2014 - 2:53 pm | श्रीगुरुजी

१ आठवड्यांपूर्वीच जन्म झालेला आहे. श्री. रा. रा. आदरणीय ग्रेटथिंकर उपाख्य टॉपगिअर्ड फिलॉसॉफर उपाख्य नानासाहेब नेफळे यांचा स्त्रीपार्टी जन्माला आलेला दिसतोय.

चौकटराजा's picture

4 Apr 2014 - 9:25 am | चौकटराजा

त्यावेळी दूरदशेन ची मक्तेदारी इतकी होती की राज्यकत्याखेरीज दुसर्याना काहीही महत्व दूरदर्शनवर येता नये याची पुरेपूर खबरदारी घेतली जाई. तळेगाव दाभाडे येतील एका सभेत वाजपेयी म्हणाले. "सारखे इंदिराजीना दाखवतात दूरदर्शनवर मला
एकदा तरी दाखवा ना ....तसा मी दिसायला बरा आहे.... त्यांच्या इतका नसलो तरी ..... "

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Apr 2014 - 11:37 am | माईसाहेब कुरसूंदीकर

लग्न केले नसले तरी मी ब्रम्हचारी नाही असे सांगणारे अटलजीच बरे का!
माई-

श्रीगुरुजी's picture

4 Apr 2014 - 2:55 pm | श्रीगुरुजी

माईसाहेब,

तुम्हाला हे कसं कळलं हो नानासाहेब?