सिनेमाच्या, अल्बम च्या गाण्यांच्या मीटरवर बसवलेली भजनं हा संगीताचा एक विशिष्ट प्रकार म्हणावा लागेल. त्यात फूल न फुलाची पाकळी म्हणून ही माझी एक प्रामाणिक भर. महागाई कमी करण्यासाठी देवाकडे मागितलेलं हे मागणं.
भजन - महागाई
मीटर: तुझी घागर नळाला लाव
नाही वजन नाण्याला
नोट केविलवाणी
आणलं डोळ्यात सगळ्यांच्या
महागाईनं पाणी ॥धृ॥
नाही परवडत, आता दुधाचा घोट
गॅसच्या किमतीचा, बघ झालाय स्फोट
कुणी जेवी हॉटेलात, राही उपाशी कुणी ॥१॥
मेहनतवाल्यांच्या, बघ पोटात खड्डे
वडापाव पोचला, आता दहाच्या पुढे
मुलाबाळांचे हट्ट कसे पुरवावे कुणी ॥ २॥
टीव्ही मोबाईल, अन गाड्या, न घोडे
मोबाईलच्या मागे, झाले सगळेच वेडे
पैशापुढे आता नाही, कुणाचं कुणी ॥ ३॥
कोटी-कोटीचे, उभे राहती महाल
सामान्यांचे हे, बघ झालेत हाल
ग्राहकांच्या टाळूचं खाती बिल्डर लोणी ॥ ४॥
ज्याची लक्ष्मी तो, पुढे शर्यतीत
बुद्धी खाते धूळ, इथे अडगळीत
देवा जाहीर कर इथे तूच आणीबाणी ॥ ५॥
सगळे भासती, इथं झपाटलेले
पैशासाठी हे, सारे हपापलेले
ये रे धावून ताराया, ऐक माझी विनवणी ॥ ६॥
(C) काव्याचे सर्व हक्क बाधित.
प्रतिक्रिया
19 Mar 2014 - 7:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजून येऊ दे.
-दिलीप बिरुटे
20 Mar 2014 - 6:24 pm | वेल्लाभट
:) जरूर...
20 Mar 2014 - 12:12 am | आयुर्हित
आणलं डोळ्यात सगळ्यांच्या
महागाईनं पाणी ॥धृ॥
अगदी खरे आहे!
महागाई तर काही कमी होणार नाही.
आपल्यालाच काही तरी शक्कल लढवायला हवी.
आपली विनवणी देवाने ऐकली आहे.पण देवाची काही इच्छा बाकी आहे
काय आहे ती, हे पाहण्यासाठी वाचा भिऊ नकोस मी आहे तुझ्यापाठी
20 Mar 2014 - 6:26 pm | वेल्लाभट
आभार ! :)