(व्याकरणामध्ये चुका झाल्या असतील तर समजून घ्यावे)
नसतील शब्द जिवंत जर का
अबोल राहतील नातीगोती
शब्दावाचून मुके अर्थ हे
रडत बसतील हळव्या पोटी
नसेल रुसवा नसेल फुगवा
नसतील ओळी सुंदर ओठी
शब्दावाचून ओठांच्या ह्या
होणार नाहीत गाठी भेटी
देवही तिकडे मलुन होतील
भजनावाचून वीझतील वाती
पुस्तक डोळे मीटुनी म्हणेल
माझी नाही राहीली ख्याती
बाळाला ही झोपवताना
अंगाईविना सरतील रात्री
कविवर्याच्या कल्पकतेला
शब्दावाचून लेगेल कात्री