तू अता ये याच रस्त्याने तुझ्यापाशी ...

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
10 Mar 2014 - 9:58 am

हात भाग्याने न माझा सोडला होता
तूच तेव्हा पाय माझा ओढला होता !

पाळला मी शब्द माझा तो युगानुयुगे ...
तूच जन्माचा शिरस्ता मोडला होता !

मी तुझी अवलोकिली गात्रातली जादु
मी तुझा मग हात हलके चोळला होता !

तू अता ये याच रस्त्त्याने तुझ्यापाशी ...
काल मी मजपासुनी तो जोडला होता !

तू अता शपथेवरी हे सांगते आहे:
परवलीचा शब्द अपुला फोडला होता !

चित्रगुप्ताची लिहू ये चोपडी आता
तू स्वतःचा काल गुन्हा खोडला होता !

भक्त भगवे पळुन गेले चोरवाटेने
मेघश्यामल देव त्यांनी झोडला होता!

डॉ.सुनील अहिरराव

कविता