श्यामची आई..

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
9 Mar 2014 - 10:35 am
गाभा: 

परवा पुस्तके आवरतांना १९७७ साली वाढदिवसाला मिळालेले श्यामची आई हे पुस्तक समोर आले...
ह्या अत्यंत गाजलेल्या पुस्तकाचे पुढे चित्रपट (राष्ट्रपती पदक मिळाले वगैरे) आणि एकूणच मराठी साहित्यात काही विशेष स्थान आहे वगैरे उल्लेख येत असत...

माझी आई काही विशेष होती तिने माझ्यावर अत्यंत उच्च संस्कार केले माझ्यासाठी त्याग केला...वगैरे वगैर....
परंतु अत्यंत सर्वसामान्य घरगुती घटनांना विलक्षण तीव्र भावनांची फोडणी देवून सतत वाचकाच्या (ते हि बाल वाचकांच्या)मनाशी अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक असे माझे पहिल्यापासूनच मत झाले होते.

अत्यंत कारुण्यपूर्ण नैराश्युक्त वातावरण..सतत मानसिक दबाव /खच्चीकरण/ गरीबीचे विनाकारण अतिरेकी उदात्तीकरण

कदाचित तात्कालिक कोकणातील वातावरण तसे असेलही..पण त्याचं वातावरणात वाढून अनेकांनी अतिशय कष्टांनी आपले आयुष्य काही सकारात्मक करून लौकिक यश संपादले आहे/असेल.

कालौघात ह्या पुस्तकाचे विस्मरण होते आहे आणि ते कालबाह्य होते आहे आणि त्याबरोबरच काही दशकांचा एक इमोशनल दहशतवाद/अत्याचार संपतो आहे ...हा एक अतिशय मोठा दिलासा आहे

इत्यलम

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

9 Mar 2014 - 12:22 pm | कवितानागेश

ही बालकथा आहे का?
ठीकेय.
असू दे.

चिगो's picture

9 Mar 2014 - 12:48 pm | चिगो

आपल्या भावनांशी बराच सहमत आहे. लै पिडू पुस्तक.. आमच्या कालिजात एकाने एका पोरीला, जिला तो बहीण मानायचा म्हणे, हे पुस्तक भेट देऊन विनोदाची परमावधी गाठली होती.. ;-) =))

प्रसाद गोडबोले's picture

24 Mar 2014 - 2:21 pm | प्रसाद गोडबोले

आमच्या कालिजात एकाने एका पोरीला, जिला तो बहीण मानायचा म्हणे, हे पुस्तक भेट देऊन विनोदाची परमावधी गाठली होती.

>>>>> =)) महान आयडीया =))

भडकमकर मास्तर's picture

9 Mar 2014 - 3:57 pm | भडकमकर मास्तर

अवांतर :
तौबा
तेरा
जलवा
तौबा
तेरा
प्यार
तेरा
इमोशनल
अत्याचार

प्यारे१'s picture

9 Mar 2014 - 4:03 pm | प्यारे१

असू द्या हो... नया हय वह! =))

नावातकायआहे's picture

9 Mar 2014 - 4:04 pm | नावातकायआहे

श्यामची आई..... :-))

आत्मशून्य's picture

10 Mar 2014 - 2:14 am | आत्मशून्य

कोल्ह्याला द्राक्षांची जी चव असते त्या प्रकारच्या व वित्र्णास पूर्ण बेकायदेशीर असल्याने
त्याकाळी सरवसामान्य पांढरपेशा व्यक्तिला सहजी अनुपलब्ध असलेल्या दृक्श्राव्य फितिला सुधा हेच टोपन नाव होते नाही का ?

नावातकायआहे's picture

10 Mar 2014 - 7:34 am | नावातकायआहे

चोराच्या वाटा...
'त' वरुन ताकभात वगैरे वगैरे... :-))

आत्मशून्य's picture

10 Mar 2014 - 8:07 am | आत्मशून्य

.

नाय हो. त्याला 'भक्त प्रल्हाद' म्हंत्यात (म्हणायचे). आद्याक्षरांवरून.

परंतु भक्त प्रल्हाद, बिस्किट पुडा हे शाळ्करि वयोगटाचे शब्द होते. 21 वय पूर्ण आहे म्हणून मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला वयोगट हा आशा नामोल्लेखाबाब्त विशेष सात्विक असे.

नावातकायआहे's picture

10 Mar 2014 - 12:32 pm | नावातकायआहे

सहमत... :-)

अरारा! या गंमती तुम्हाला २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर उमगल्या? काय हे मागासलेपण!

(ह. घेणे ही विनंती)

बादवे - बिस्किट पुडा हा जब्री शब्द आहे! :))

बॅटमॅन's picture

10 Mar 2014 - 3:29 pm | बॅटमॅन

बिस्किटपुडा हा बाकी अतिशयच मऊ-अ‍ॅज-कुकुंबर शब्द हां. टोट्टल के एल पी डी (खास लम्हें पे धोका) होईल हा शब्द ऐकून =))

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Mar 2014 - 10:59 am | llपुण्याचे पेशवेll

नाही हो तसं म्हणायचं नसेल त्यांना. शाळकरीवयात जिथे फारच जोश असतो तिथे काहीही वाचायाला बघायला चालते. जेव्हा टेस्ट डेव्हलप होते तेव्हा (म्हणजे २१+) सात्विकता विषेश सांभाळली जाते.

स्वप्नांची राणी's picture

9 Mar 2014 - 5:36 pm | स्वप्नांची राणी

ह.मो. मराठेंच 'बालकाण्ड' याच वातावरणातील पण जास्त प्रत्ययदर्शि आहे. खुप लागतं मनाला... :(

स्वप्नांची राणी's picture

9 Mar 2014 - 5:38 pm | स्वप्नांची राणी

बाकि, अत्रन्गी पाउस तुमच्याशी पुर्ण सहमत.

मंदार कात्रे's picture

9 Mar 2014 - 7:05 pm | मंदार कात्रे

पूर्णपणे असहमत

साने गुरुजींच्या अतिप्रचंड सामाजिक कार्याचा विचार करता आपणास त्यांच्याविषयी असे लिहिण्याच काडीमात्र अधिकार नाही

पाश्चात्य संस्कारानी बिघडलेल्या नवीन मराठी(?) पिढीची थेर आहेत ही सगळी ! अत्रंगी पावुस जी पर्सनली घेवू नका , पण असे अकलेचे तारे तोडणार्या नवीन पिढीच्या एक सणसणीत कानाखाली द्यावीशी वाटते .

मागे एका कथित "अति-सुधारक" मराठी संकेत्स्थळावर "व्हू इज फकिंग श्याम ?""व्हू इज साने गुरुजी?" असलि भाषा वापरली होती , माझा अक्षरशः तिळपापड झाला होता , अशा हरामखोर लोकाना लाथानी बुकलून काढले पाहिजे .

आपल्याच पूर्वजांबद्दल / मागच्या पिढीबद्दल इतकी अनास्था? कोकणातल्या त्या काळातल्या माधुकरी मागून शिक्षण घेणार्या मुलांच्या कहाण्या ऐकल्या की दोळे पाणावतात .... खुद्द माझे दोन चुलते आणि इतर काही नातेवाइक अशा प्रकाराने शिकलेले आहेत,,,,,,,,,,,,,,,,

बाळ जातो दूर देशी........... कविता वाचून पहा एकदा ........!

अत्रन्गि पाउस's picture

9 Mar 2014 - 7:32 pm | अत्रन्गि पाउस

मंदारपंत...

आपण असहमत आहात ... ठीक आहे ..पण मला माझे अधिकार आपण सांगायची अजिबात गरज नही...आपण आपले मुद्दे मांडा ...

साने गुरुजींचे सामाजिक कार्य ह्याविषयी एक कणभर लिहिलेले नही..माझे मुद्दे पुन्हा नीट वाचा.

बाकी त्या दुसर्या संकेतस्थळावर कुणी काय म्हटलंय त्याचा राग इथे काढण्याचे प्रयोजन समजले नाही ...

पुन्हा एकदा ... 'श्यामची आई'ह्या पुस्तकावर आपली मते मांडा'..

मंदार कात्रे's picture

10 Mar 2014 - 8:26 am | मंदार कात्रे

आपल्याच पूर्वजांबद्दल / मागच्या पिढीबद्दल इतकी अनास्था? कोकणातल्या त्या काळातल्या माधुकरी मागून शिक्षण घेणार्या मुलांच्या कहाण्या ऐकल्या की दोळे पाणावतात .... खुद्द माझे दोन चुलते आणि इतर काही नातेवाइक अशा प्रकाराने शिकलेले आहेत,,,,,,,,,,,,,,,,

बाळ जातो दूर देशी........... कविता वाचून पहा एकदा ........!

खटपट्या's picture

10 Mar 2014 - 8:45 am | खटपट्या

मनोहर जोशी सुद्धा माधुकरी मागून शिकले

प्रसाद गोडबोले's picture

24 Mar 2014 - 2:24 pm | प्रसाद गोडबोले

पण
ते जातीयवादी पक्षासोबत आहेत म्हणुन त्यांचे कौतुक होणार नाही .

तिमा's picture

9 Mar 2014 - 8:29 pm | तिमा

इतके नका रागावू. तरुण पिढीला व्यक्त होऊ द्या. काळाप्रमाणे विचारही बदलतात.
आपण जुनी खोडे! म्हणून गदिमांचे हे काव्य कवटाळून बसतो.

वाईट तितुके इथे चांगले
भलेपणाचे भाग्य नासले
पतिव्रतेच्या गळ्यांत धोंडा
वेश्येला मणिहार
उद्धवा, अजब तुझे सरकार!

अत्रुप्त आत्मा's picture

9 Mar 2014 - 11:04 pm | अत्रुप्त आत्मा

__/\__

अप्पा जोगळेकर's picture

23 Mar 2014 - 2:32 pm | अप्पा जोगळेकर

तरुण पिढीला व्यक्त होऊ द्या.
मला वाटत तरुण आणि म्हातारं असण्याचा याच्याशी फार संबंध नाही.
स्वातंत्र्यपूर्व काळात कोकणातल्या खेड्यातले वातावरण आणि एका ममताळू, अशिक्षित आणि पारंपारिक संस्कार झालेल्या स्त्रीचे व्यक्तीचित्र आणखीन काय वेगळे असणार ?
विचार करण्याची थोडीशी शक्ती असेल तर अगदी लहान मुलालादेखील हे कळू शकेल. पण किमान विचारीपणाचीच वानवा असेल तर सगळंच मुसळ केरात जाणार.

अत्रन्गि पाउस's picture

23 Mar 2014 - 8:49 pm | अत्रन्गि पाउस

वातावरण ते असेल मान्य
दुसरी अपेक्षा नही हे हि मान्य
माझे म्हणणे हे कि त्या संपूर्ण पुस्तकातले वातावरण त्यातील प्रसंग ह्यात काहीही विशेष वेगळे नही...तत्सम वातावरण, प्रसंग, संस्कार हे घरोघरी होत असत पण बहुतांश प्रसंगांमधून हे 'काहीतरी' विशेष आहे असे मांडले जाते आहे..वर कारुण्य रसाचा अतिरेकी अविष्कार झाल्याने लहान मुले अजूनच हळवी झाली/होतील
ज्यांना हे आवडते आवडो बापडे
ज्यांना ती मुल्ये, संस्कार, धडे बाणवण्यासासाठी 'हे पुस्तक' जरुरी वाटले/वाटते ...वाटो ..
सध्याच्या काळात मुलांना वाढवतांना किती जण हे पुस्तक अनिवार्य मानतात /आवश्यक मानतात/ खरोखर वापरतात ?

सचिन's picture

9 Mar 2014 - 11:41 pm | सचिन

लेखकाशी पूर्ण सहमत. अत्यंत कालबाह्य पुस्तक.
रद्दीवाला तरी घेतो का ? का तो ही म्हणतो की कालबाह्य आहे ?

आयुर्हित's picture

10 Mar 2014 - 12:07 am | आयुर्हित

कोणत्या सुज्ञ माणसाने आपल्या सारख्या बालकाला दिले बरे हे पुस्तक?

मला माझ्या लहानपणी पाण्यात पोहायला जायची खूप भीती वाटत असे, परंतु "श्यामची आई" हे पुस्तक माझ्या आईनेच खुद्द वाचले होते त्यामुळे त्यातील श्यामची कहाणी सांगत आमच्या बाल मनावर जबरदस्तीने चांगले संस्कार केले आहेत, त्यामुळे ह्या पुस्तकाचा मी सदैव ऋणी राहील.

सचिन's picture

10 Mar 2014 - 12:10 am | सचिन

पोहायला शिकायला श्यामची आई शिवाय अनेक चांगले उपाय आहेत.

आयुर्हित's picture

10 Mar 2014 - 12:19 am | आयुर्हित

सचिनशेट........
चांगले उपाय आहेत ना तुमच्या जवळ ठेवा! आपल्या मुलांना त्याचा वापर होईलच की कधीतरी.
मी माझ्या लहानपणची आठवण ती सांगितली हो!

सचिन's picture

10 Mar 2014 - 12:25 am | सचिन

आयुर्हित साहेब,
फारच पर्सनल घेता राव ! मिपा वर असं नाही चालत !!

बन्या बापु's picture

10 Mar 2014 - 6:41 am | बन्या बापु

कालौघात ह्या पुस्तकाचे विस्मरण होते आहे आणि ते कालबाह्य होते आहे आणि त्याबरोबरच काही दशकांचा एक इमोशनल दहशतवाद/अत्याचार संपतो आहे ...हा एक अतिशय मोठा दिलासा आहे

रद्दीवाला तरी घेतो का ? का तो ही म्हणतो की कालबाह्य आहे ?

मग आता नवीन धागे उसवतील.. पुल कालबाह्य .. कुसुमाग्रज कालबाह्य ... अजून पुढे जाऊन
कालांतराने पाडगावकर, जी ए, सगळ्यांना निकालात काढा..

आणि आपल्या येणाऱ्या पिढीला "हैदोस" ( ते देखील मराठी आहे म्हणून कालबाह्य ).. "पेंटहौस स्टोरीज" असली पुस्तके देऊ वाचायला..

रद्दीवाला जास्त भावात घेतो असली पुस्तके.. त्यांची रिसेल value पण मिळेल हा अतिरिक्त फायदा..

अवांतर : आमच्या घरी हे वाचून " लेखक बरेच विद्वान आहेत, त्यांना आवर्जून हे सांगा" असा सल्ला मिळाला.. :-)

अत्रन्गि पाउस's picture

10 Mar 2014 - 10:25 am | अत्रन्गि पाउस

भावी पिढी साठी आपण श्यामची आई आणि हैदोस/पेंटहौस हे दोनच पर्याय आठवू शकता, हे आपल्या घरी सांगितल्यावर (सांगितले असल्यास)आपल्याला काय सल्ला मिळाला ?

आणि कालातीत, अजरामर वगैरे साहित्य जे निर्माण व्हायचे ते होईलच(रामायण/महाभारत झाले होते तसे)...

'पु ल',कुसुमाग्रज, पाडगावकर वगैरे प्रभृतिचे साहित्य निकालात निघेल कि नही हे 'काल' ठरवेल... परंतु समजा उद्या नारायण किंवा रावसाहेब ह्यांच्या तुलनेत 'दोन वस्ताद'/'जनार्दन नारो शिन्ग्नापुरकर' हे किंचित कालसापेक्ष संदर्भहीन झालेतर त्यात रागाव्ण्यासारखे काय आहे ??

परंतु अत्यंत सर्वसामान्य घरगुती घटनांना विलक्षण तीव्र भावनांची फोडणी देवून सतत वाचकाच्या (ते हि बाल वाचकांच्या)मनाशी अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक असे माझे पहिल्यापासूनच मत झाले होते.

तुम्हाला आवडले नसेल, पण तुम्ही त्या पुस्तकाकडे त्रयस्थपणे पाहु शकत नाही/ किंबहुना अश्या टिप्पण्णीवरून तुमचा वाद पेटवण्यचा विचार स्पष्ट दिसतो.

अत्रन्गि पाउस's picture

10 Mar 2014 - 1:50 pm | अत्रन्गि पाउस

पुस्तक वाचतांना त्रयस्थ होऊन वाचावे कि समरसून हा एक व्यक्तिगत आवडीचा भाग आहे..
श्यामच्या आई मध्ये असा कोणता अविस्मरणीय (प्रसंग + निष्कर्ष) वाटतो कि जो त्याच्या भावनिक ताणाची किंमत देऊन वाचलाच पाहिजे ?

बाकी वाद पेटवण्याचा उद्देश ? छे हो ...चर्चा/मंथन हाच उद्देश आहे...

सचिन's picture

11 Mar 2014 - 12:02 am | सचिन

इतिहासाचे अवजड ओझे, डोक्यावर घेउन ना नाचा
करा पदस्थल त्याचे आणिक चढुनी त्यावर भविष्य वाचा ....

त्यामुळे, श्यामची आई कितीही आदरणीय वगैरे असले तरीही कालबाह्य झाले आहे, हे निश्चित !!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Mar 2014 - 8:30 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

दारिद्रय, दैना, मुळु-मुळु रडणं ह्या गोष्टीच फक्त तुम्ही पाहील्या असतील पुस्तकात. त्यांच्यावर झालेले चांगले संस्कार पण पहा ना. वो गरीब हुए तो क्या हुआ संस्कार से तो आमीर है!!
हल्ली पोरांना त्या संस्कारांबरोबरच मानसिक आणि शारीरिक पातळीवर कणखर बनवलं पाहीजे एवढाच काय तो काळानुसार असलेला बदल.

मागे एका कथित "अति-सुधारक" मराठी संकेत्स्थळावर "व्हू इज फकिंग श्याम ?""व्हू इज साने गुरुजी?" असलि भाषा वापरली होती , माझा अक्षरशः तिळपापड झाला होता , अशा हरामखोर लोकाना लाथानी बुकलून काढले पाहिजे .

त्या **च्या आईचे संस्कार कमी पडले असतील :).

योगी९००'s picture

10 Mar 2014 - 9:23 am | योगी९००

अत्रन्गि पाउस यांनी आपले म्हणणे थोडे भडकपणे मांडले आहे...

माझ्या आईने हे पुस्तक माझ्याकडून निदान चारदा वाचून घेतले होते. मलाही लहानपणी हे पुस्तक तितकेसे आवडले नाही पण मी "मनाशी अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक" असे म्हणणार नाही. कदाचित त्यावेळच्या काळानुसार ते पुस्तक बरोबरच होते. आजच्या पिढीला किंवा आज मी जरी हे पुस्तक परत वाचायला बसलो तर कंटाळवाणेच वाटेल पण त्यातले साहीत्यमुल्य किंवा उच्च संस्कार हे घेण्यासारखेच..

कदाचित या पुस्तकाचा effect म्हणूनच की काय... मी माझे आईवडील जो पर्यंत होते तो पर्यंत त्यांना उलटे कधीच बोललो नाही. तसेच कुठल्याही वडीलधार्‍या माणसाशी (ओळखीचा किंवा अनोळखी) most of the time नम्रच असतो आणि शक्यतो उलटे बोलायचे टाळतो. पण हे मी नंतरच्या पिढीत पाहीले नाही. इतर माझ्यापेक्षा बर्‍याच वयाने लहान असलेले फाडफाड बोलताना पाहून संताप होतो.

अत्रन्गि पाउस's picture

10 Mar 2014 - 10:35 am | अत्रन्गि पाउस

मांडतांना त्यातील घटना किंवा आठवणी ह्या त्याकाळातील बहुतेक समाजात अतिशय कॉमन होत्या(किंवा असाव्यात असे वाटते)...
माझा रोख आहे तो त्या घटनांना काहीतरी विशेष म्हणून अधोरेक्खीत करणे आणि त्याच्यावर भारंभार दैन्य कारुण्यरसाची वारंवार पेरणी करणे ह्यावर..
वडीलधार्यांना उलट नं बोलणे हा ह्या पुस्तकाचा effect ?? कदाचित ते पुस्तकाविनही आलेच असते..पहा विचार करून.:)

मला नाही वाटत...

मी हे पुस्तक एकदाच, दहावी नंतर वाचले. तेव्हा ते जाम पकावू वगैरे वाटले होते. पण याचा अर्थ असा नाही, की मी त्याआधी वयाने/मानाने इ. मोठ्या व्यक्तिंशी अतिशय उर्मटपणे वागायचो आणि पुस्तक वाचून मी आमुलाग्र बदललो.

शिवाय, लेखक आणि लेखकाशी सहमत असलेले इतर प्रतिसादकसुद्धा त्यांच्या वडीलधार्‍यांशी, गुरुजनांशी, कामाच्या ठिकाणावरील ज्येष्ठांशी नम्रपणे वागत नसतील, असे नाही.
या पुस्तकातील सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक वर्णने खरी असतीलही. पण विनाकारण ते काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी दु:ख आहे असा जो स्वर लावला आहे(पुस्तकात), तो चुकीचा आहे.
नम्रतेने वागणे, चोरी न करणे अशा संस्कारांसाठी अशा पुस्तकांची काय गरज? गरीबी असेल, तर कष्ट करून, शिक्षण घेऊन मोठे होता येते, हे १९७०-८० नंतरच्या पिढीने स्वतः अनुभवले आहे. गरीबीला गोंजारत तिला अति-करूण भावनेचे आवरण घालायाची (सध्याच्या काळातनाही) आवश्यकता नाही

बॅटमॅन's picture

10 Mar 2014 - 1:11 pm | बॅटमॅन

सहमत.

जणू कै आधी जनावर होतो अन नंतर या पुस्तकामुळे सुधारलो इ.इ. तद्दन वेडेपणा आहे.

अत्रन्गि पाउस's picture

10 Mar 2014 - 1:53 pm | अत्रन्गि पाउस

असेच तर म्हणतोय ...

योगी९००'s picture

10 Mar 2014 - 3:40 pm | योगी९००

कदाचित या पुस्तकाचा effect म्हणूनच की काय
अरे बाबांनो कदाचित असे म्हटले आहे रे... याचा अर्थ असा नाही की मी आधी जनावर होतो आणि या पुस्तकामुळे नंतर माणसाळलो..

पण कोठेतरी शाम मनात बसलाच आहे.

बाकी तुम्हा लोकांवर या पुस्तकाचा काहीच परिणाम नाही झाला हे दिसतेच आहे..

तुषार काळभोर's picture

10 Mar 2014 - 5:41 pm | तुषार काळभोर

मी रोज सकाळी उठल्यावर आई-वडिलांना प्रणाम करीत नाही. रोज झोपायच्या आधी त्यांनी (खरोखर कष्ट घेऊनही)मला वाढवताना घेतलेल्या कष्टाने व्याकूळ वगैरे होत नाही. रोज दुपारच्या जेवणाआधी आई-वडील जेवले असतील का, या विचाराने माझे जेवणावरचे मन उडून जात नाही.
पण माझ्या मनात त्यांच्या विषयी प्रेम आहे, त्यांनी घेतलेल्या कष्टाविषयी आदर आहे. आणि तो टिकवण्यासाठी अथवा वाढवण्यासाठी श्यामची आई अथवा इतर कुठल्याही पुस्तकाची वा कोणत्याही माध्यमाची गरज नाही.
माझ्या आईवडीलांनी मला वाढवण्यासाठी, मला शिक्षण देण्यासाठी, माझ्यावर संस्कार करण्यासाठी कोणत्याही आऊट ऑफ द वर्ल्ड पद्धतीचा अवलंब केला नाही याचा मला अभिमान आहे.
आणि त्यामुळेच मी सामान्य आईवडीलांचा सामान्य मुलगा आहे.

संचित's picture

22 Mar 2014 - 3:02 pm | संचित

+१

मृत्युन्जय's picture

24 Mar 2014 - 12:47 pm | मृत्युन्जय

रोज दुपारच्या जेवणाआधी आई-वडील जेवले असतील का, या विचाराने माझे जेवणावरचे मन उडून जात नाही.

भावना माझ्याही थोड्याफार तुमच्यासारख्याच आहेत. पण श्याम आणि तुम्ही यांच्या सांपत्तिक स्थितीतला फरक लक्षात घेता तुमच्या मनात असा विचार न येणे यात फार काही अनपेक्षित नाही

योगी९००'s picture

27 Mar 2014 - 10:22 am | योगी९००

+१
सहमत.

'श्यामची आई' मला आवडतं - आजही आवडतं; ते माझ्यासाठी कालबाह्य झालेलं नाही.
पण तुम्हाला ते कालबाह्य वाटतं - हे मी समजू शकते.
तुम्हाला सध्या कोणतं पुस्तक अतिशय आवडतंय, कालातीत वाटतंय तेही सांगा* - तेही वाचेन मी. कदाचित त्या पुस्तकाबाबत आपलं मतैक्य होईलही :-)

* उपरोध नाही, तसं वाटल्यास, क्षमस्व.

पिशी अबोली's picture

10 Mar 2014 - 11:22 am | पिशी अबोली

तुम्हाला ते अतिशय टाकाऊ, कालबाह्य वाटत असेल. मला त्यातील सगळ्याच गोष्टी पटल्या होत्या असे नाही. पण काही गोष्टी नकळत श्यामची आईची आठवण करुन देतात. उदा. जेवणात गुंतवळ वगैरे आला तर सगळ्यांना दाखवू नये, किळस येते इ., मला सो कॉल्ड कल्चर्ड लोक जेव्हा अशा गोष्टी करतात तेव्हा हमखास आठवतं. इतका बाळबोधपणा वाचायला आता बोर होतं, पण त्या पुस्तकाने लहानपणीच्या काळात अगदी काहीच म्हणजे काहीच दिलं नाही, असं मलातरी वाटत नाही.

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Mar 2014 - 12:42 pm | llपुण्याचे पेशवेll

हजारटक्के सहमत. त्यामुळे एखादा पदार्थ मनासारखा लागला नाही चवीला तरी करणार्‍या माणसावर उखडायला कमी होते मग ती व्यक्ती घरची असो अथवा बाहेरची. करणारा परिश्रम घेऊन आपल्यासाठी करतो त्याची चाड ठेवायला शामच्या आईने शिकवले (म्हणजे पुस्तकात बाबांनी).

अंमळ जास्तच भावनाबंबाळ वैग्रे आहे. एकदा वाचलं अन नंतर तेवढा ओव्हरडोस कै झेपला नै. सानेगुर्जींबद्दल आदर असला म्हणून त्यांचं सगळंच्या सगळं पटलं पाहिजे असं वाटत नाही.

पैसा's picture

10 Mar 2014 - 1:58 pm | पैसा

पण त्याचं वातावरणात वाढून अनेकांनी अतिशय कष्टांनी आपले आयुष्य काही सकारात्मक करून लौकिक यश संपादले आहे/असेल.

हे सानेगुरुजींनी केलं नाही असं तुमचं म्हणणं आहे का? मग या पुस्तकाचा पुढचा भाग "श्याम" आणि सानेगुरुजींचं चरित्र अवश्य वाचून काढा.

या पुस्तकाकडे त्या काळच्या कोकणातील एका ब्राह्मण घराण्याचं चित्र असं म्हणून तुम्ही बघू शकत नाही का? दलित साहित्य तुम्हाला आवडतं ना? मग हेही तशाच एका माणसाचे अनुभव आहेत. त्या काळाचं वास्तववादी चित्रण आहे. या पुस्तकाकडे एका काळाचं चित्र म्हणून तटस्थपणे पाहता येतंच की! १९३३ सालचं हे पुस्तक आहे. या पुस्तकानंतर आतापर्यंत ३ पिढ्या उलटून गेल्या आहेत. आताचे निकष त्या काळच्या लोकांच्या वागण्याला लावणं बरोबर नाही. तेव्हाची एक पिढी अशा आदर्शवादी विचारांनी भारलेली होती. तसे तर भगतसिंग इ. क्रांतिकारकांचे मार्ग कोणाला चुकीचे वाटत असतील, पण म्हणून त्यांच्या हेतूबद्दल, देशभक्तीबद्दल संशय घेता येणार नाही.

त्यातूनही एखाद्या लिखाणाबद्दल प्रत्येकाला काय वाटेल हे सांगणं अवघड आहे. आवड ज्याची त्याची. व.पु.काळे आवडणारा एक वर्ग आहेच. तसा चेतन भगत आवडणारा पण आहे. आणि टिळक-आगरकर लेखक म्हणून आवडणारा पण आहे. दुसर्‍याच्या आवडीच्या विषयाला सरसकट लेबलं लावून कचर्‍यात टाकणं योग्य नव्हे. ज्याअर्थी आजही ते पुस्तक आवडणारे लोक इथे आहेत त्याअर्थी ते अगदी तद्दन टाकाऊ नक्कीच असणार नाही. "मला नाही आवडलं" एवढं म्हणून गप्प बसता येतंच की! त्यासाठी दुसर्‍याला दुखावलं पाहिजेच असं काही नाही. आपली रेघ मोठी दाखवण्यासाठी दुसरी रेघ लहान दाखवण्याची गरज नसते.

या पुस्तकाचा पुढचा भाग "श्याम"

हा भाग जास्त वास्तवपूर्ण (आणि कमी आदर्शवादी) आहे. यातला श्याम घरातून पळून जातो, पारव्यांवर दगड मारतो वगैरे प्रसंग आहेत. कापदापोलीच्या शाळेचं वगैरे तर वर्णन खासच.

योगी९००'s picture

10 Mar 2014 - 3:46 pm | योगी९००

ज्याअर्थी आजही ते पुस्तक आवडणारे लोक इथे आहेत त्याअर्थी ते अगदी तद्दन टाकाऊ नक्कीच असणार नाही. "मला नाही आवडलं" एवढं म्हणून गप्प बसता येतंच की! त्यासाठी दुसर्‍याला दुखावलं पाहिजेच असं काही नाही. आपली रेघ मोठी दाखवण्यासाठी दुसरी रेघ लहान दाखवण्याची गरज नसते.
+१ सहमत..
असेच म्हणतो.. मला ही हे पुस्तक तितके आवडले नाही पण मी यावर असे भडक कधीच लिहीणार नाही..

पुस्तकात कदाचित *** वातावरण, दर पानी २-४ शिव्या, मध्येच शरीरधर्माची वर्णने, थोडा रक्तरंजीत भाग असे असते तर हा लेख उगवलाच नसता....

पुस्तकात कदाचित *** वातावरण, दर पानी २-४ शिव्या, मध्येच शरीरधर्माची वर्णने, थोडा रक्तरंजीत भाग असे असते तर हा लेख उगवलाच नसता....

काय तो कडवा पाठिंबा, वाह! जप हो शाम =))

अत्रन्गि पाउस's picture

10 Mar 2014 - 4:06 pm | अत्रन्गि पाउस

ती हसून गडबडा लोळणारी स्मायली काशी टाकतात हो ? :D

बॅटमॅन's picture

10 Mar 2014 - 4:15 pm | बॅटमॅन

आधी = मग ) मग ) असे विथौट स्पेस टाकायचे.

योगी९००'s picture

10 Mar 2014 - 5:15 pm | योगी९००

जप हो शाम
हा हा ...हे मात्र आवडले....

जप हो याचा फार राग यायचा....

मनिम्याऊ's picture

10 Apr 2014 - 1:24 pm | मनिम्याऊ

.

यसवायजी's picture

10 Mar 2014 - 5:25 pm | यसवायजी

यावर असे भडक कधीच लिहीणार नाही..

+१

अवांतर-
हा लेख वाचताना कुणाला माननिय अनिता पाटील आठवल्या का हो?

प्लीज नोटः पैसा ताई, मला तुमच्याबद्दल एक अनुभवी, अभ्यासू आणि अतिशय संयत सभासद आणि संपादक म्हणून अतीव आदर आहे. कृपया हा प्रतिसाद पर्सनली घेऊ नये.
ज्याअर्थी आजही ते पुस्तक आवडणारे लोक इथे आहेत .........
त्यातील किती जणांना ते पुस्तक खरेच आवडते? किती जणांना त्यातील अती-बाळबोधपणा पटतो? किती जण स्वतः त्यातील साधी तत्वे (उदा. स्वयंपाकाबद्दल कौतुक करणे/टीका न करणे) अंगिकारतात?

खरोखर आवडते. पैसाताई, तुझा प्रतिसाद +१
त्यातला भाबडेपणा अनमोल आहे. आजच्या जगात असा भाबडेपणा जिच्यापाशी आहे, ती व्यक्ती भाग्यवान. :) अतिशय वेगळ्या, साध्या सुध्या जगात घेऊन जाणारे असे हे पुस्तक आहे.. माझ्या संग्रही आहे.

बॅटमॅन's picture

10 Mar 2014 - 5:57 pm | बॅटमॅन

आजच्या जगात असा भाबडेपणा जिच्यापाशी आहे, ती व्यक्ती भाग्यवान.

सहमत पण लार्जलि असहमत.

सखी's picture

10 Mar 2014 - 9:38 pm | सखी

छान प्रतिसाद पैसाताई. यानिमित्ताने हे क़ळले की मी 'श्याम' हे पुस्तक वाचलेले आठवत नाही आता शोधते कोणाकडे मिळतयं का.

यशो - त्यातला भाबडेपणा अनमोल आहे.+१११

पैसा's picture

10 Mar 2014 - 6:09 pm | पैसा

पर्सनली अजिबात घेत नाही. पण इथे वर आलेले सगळे प्रतिसाद वाचा भौ! किमान २ जणांनी तरी जेवताना जेवणावर टीका करत नाही असं लिहिलं आहेच. पुस्तक एक कलाकृती म्हणून मला निश्चितच आवडतं. त्यात त्या काळाचं चित्र अगदी स्पष्ट दिसतं.

आणि माझं मत विचाराल तर कोणत्याही कलाकृतीचा आयुष्यावर परिणाम वगैरे फार कमी वेळा आणि कमी प्रमाणात होतो. म्हणजे त्यातली एखादी गोष्ट आपल्यावर परिणाम करण्याची शक्यता आहे, पण संपूर्ण आयुष्य बदलणे वगैरे आजच्या काळात शक्य नाही.

भगवद्गीता आणि इतर तत्त्वज्ञानावरील पुस्तकं सोडून इतर सर्व पुस्तकं/कलाकृतीचा आस्वाद कलाकृती म्हणूनच घ्यावा. (ती पुस्तकंसुद्धा एखाद्याला मनोरंजक वाटू शकतील. पण मी सर्वसामान्य वाचकांबद्दल बोलत आहे.)

जयंत कुलकर्णी's picture

8 Apr 2014 - 9:14 pm | जयंत कुलकर्णी

+१११११

@ यसवाजी मला आटवल्या , मनुन आतापतुर गप होतो . तुमाला नाय ना आवडल तर तुमच्या पाशी ठेवा . कशाला बोंबलत फिरताव .

माझी आई काही विशेष होती तिने माझ्यावर अत्यंत उच्च संस्कार केले माझ्यासाठी त्याग केला...वगैरे वगैर....
परंतु अत्यंत सर्वसामान्य घरगुती घटनांना विलक्षण तीव्र भावनांची फोडणी देवून सतत वाचकाच्या (ते हि बाल वाचकांच्या)मनाशी अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक असे माझे पहिल्यापासूनच मत झाले होते.

हे फारसं खरं नाही असं वाटतं.
आणि गरीबीचं उदात्तीकरण वगैरे काही नाही... तर आहे त्या परिस्थितीत, माना-सन्मानाने जगावे आणि जास्तं काही मिळविण्यासाठी वाम मार्गाने जाऊ नये, हाच संदेश यात आहे.
ही कथा काल्पनिक असल्याने, त्यातील उच्च मूल्ये आणि आदर्शवाद आजच्या काळाच्या कसोटीवर खरे ठरणार नाहीत कदाचित, पण म्ह्णून ती टाकाऊ नाहीत. आणि "माझी आई विशेष होती" असं जर कुणी म्हणत असेल तर त्याला तुम्ही बेगडी ठरवू शकत नाही.
श्रीराम कथा आपण वाचतो ... त्यातील उच्च्कोटीचे गुण असणार्‍या व्यक्तींसारखी कुणी आपल्या आजूबाजूला कधीच नसते. पण तरीही ती कथा आपण आदर्श मानतो. आणि त्यातील काही गुण तरी आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो.
शामची आई हे पुस्तक याच दृष्टीकोनातून वाचावे.. मग तो इमोशनल अत्याचार वाटणार नाही.
परंतु शाळकरी वयातील मुलाला.. ,ज्याचा पुस्तक वाचण्याचा हेतु 'शुद्धं मनोरंजन' हाच आहे, हे पुस्तक रटाळ वाटण्याची शक्यता नक्कीच आहे.

अत्रन्गि पाउस's picture

10 Mar 2014 - 9:13 pm | अत्रन्गि पाउस

काय काल्पनिक ?

मंदार कात्रे's picture

10 Mar 2014 - 10:01 pm | मंदार कात्रे

बाळ जातो दूर देशा - गोपीनाथ
बाळ जातो दूर देशा, मन गेले वेडावून
आज सकाळपासून
हात लागेना कामाला, वृत्ती होय वेड्यावाणी
डोळ्याचे ना खळे पाणी
आज दूध जिनसा नव्या, आणा ताजा भाजीपाला
माझ्या लाडक्या लेकाला
याच्या आवडीचे चार, करू सुंदर पदार्थ
काही देऊ बरोबर
त्याचे बघा ठेवीले का, नीट बांधून सामान
काही राहिले मागून
नको जाऊ आता बाळ, कुणा बाहेर भॆटाया
किती शिणवीसी काया
वाऱ्यासारखी धावते, वेळ भराभर कशी!
गाडी थांबेल दाराशी
पत्र धाड वेळोवेळी, जप आपुल्या जीवास
नाही मायेचे माणूस
ऊंच भरारी घेऊन, घार हिंडते आकाशी
चित्त तिचे पिलापाशी
बाळा, तुझ्याकडे माझा जीव तसाच लागेल
स्वप्नी तुलाच पाहील
बाळ जातो दूर देशा; देवा, येऊन ऊमाळा
लावी पदर डोळ्याला

एकूणच संस्कारांसाठी चांगले पुस्तक. मात्र आधीच भावनाशील मुले जास्त हळवी होऊ शकतात. पण त्यात काळजी करण्यासारखे काही नाही. आपल्यापैकी बहुतेकांनी शामची आई वाचले आहे ,एका विशिष्ट काळापुरताच कोणत्याही पुस्तकाचा प्रभाव टिकतो.

"परंतु अत्यंत सर्वसामान्य घरगुती घटनांना विलक्षण तीव्र भावनांची फोडणी देवून सतत वाचकाच्या (ते हि बाल वाचकांच्या)मनाशी अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक असे माझे पहिल्यापासूनच मत झाले होते."
"भावनांची फोडणी" पर्यन्त ठीक पण त्यालाहि "विलक्षण तीव्र" हे विशेषण लावणे
ही तर फक्त शब्दान्ची फोडणी वाटते. आणि या वर बालमनाशी "अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक"----हे तर खुपच unfair व उगाचच भडक.

माझ्या लहानपणी हे पुस्तक मी वान्चलय पण या 'अक्षम्य आणि भडक खेळ करणार्या' पुस्तकाचा माझ्यावर काही दुष्परिणाम झालाय अस मला अजिबात वाटत नाही. मी एक वर्ष (१९५६) बोर्डीच्या (डहाणुजवळ) शारादाश्रमात होतो, तिथ साने गुरुन्जीचे धाकटे बन्धु--मला वाटत पुरुषोत्तम--होते. त्या "अत्यंत कारुण्यपूर्ण नैराश्युक्त वातावरण..सतत मानसिक दबाव /खच्चीकरण/ गरीबीचे विनाकारण अतिरेकी उदात्तीकरण" असलेल्या वातावरणात सम्पूर्ण वाढलेला हा माणुस असामान्य अजिबात नव्हता, चारचौघान्सारखा सर्वसाधारण होता पण त्याचे कुठल्याही प्रकारचे खच्चीकरणझाल्याचे दिसत नव्हत.
श्यामची आई हे पुस्तक 'कालबाह्य' आहे अस म्हणण्याला माझा काही आक्षेप नाही पण या वर दिलेल्या विशेषणाना आहे.

अप्पा जोगळेकर's picture

23 Mar 2014 - 2:07 pm | अप्पा जोगळेकर

तुमची विचार करण्याची पद्धत थर्ड ग्रेड आहे इतकेच नोंदवू इच्छितो. बाकी जिलब्या पाडून प्रसिद्धी मिळवायची असेल तर शुभेच्छा.

अत्रन्गि पाउस's picture

23 Mar 2014 - 8:58 pm | अत्रन्गि पाउस

माझी विचार करण्याची पद्धत ह्यावर तुमचे मत कुणाला हवंय ?
आणि जिलब्या पाडून प्रसिद्धी? ... जाऊदे तुमचे मुद्दे संपलेले दिसतात ...

अप्पा जोगळेकर's picture

23 Mar 2014 - 10:18 pm | अप्पा जोगळेकर

शामची आई याबद्दल तुमचे मत कोणी विचारले होते काय? आणि हो, सदर धागा चर्चेच्या पात्रतेचा नाही. कळावे. रजा घेतो.

अत्रन्गि पाउस's picture

23 Mar 2014 - 11:39 pm | अत्रन्गि पाउस

इथे विषय मांडायला कुणी विचारात नसतो...
आणि विषय मांडून जुना झाल्यावर चर्चेत आपण आला आहात..चर्चेत स्वागत सर्वांचेच असते...आणि धागा चर्चेच्या पात्रतेचा नही म्हणजे चर्चेत पूर्वी आलेल्यांवरहि आपण अप्रत्यक्ष रोख धरला आहे..

व्यक्तिगत टीका तुम्ही केलीत..

असो ..रजा घेताय ..जरूर..तुमचे मुद्दे संपलेत हे मी आधीच म्हटलंय...आपल्यापुरती चर्चा मी हि थांबवली आहे..

तुषार काळभोर's picture

24 Mar 2014 - 9:58 am | तुषार काळभोर

तुम्हाला आवडणारे, भावणारे, प्रभावित करणारे एखादे विशिष्ट पुस्तक न वाचणारे किंवा ते न आवडणारे लोक (त्यांचे विचार) थर्ड ग्रेड असतात?
मग फर्स्ट ग्रेड कोण असतात, तालिबानी वॄत्तीचे लोक? तुम्हाला हा धर्मग्रंथ आवडत नसेल तर तुम्ही धर्मद्रोही आहात, आणि तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही.

अत्रन्गि पाउस's picture

24 Mar 2014 - 12:04 pm | अत्रन्गि पाउस

मिपावर असेही असते मला कालच कळले ...

प्रसाद गोडबोले's picture

24 Mar 2014 - 2:33 pm | प्रसाद गोडबोले

बाकी सानेंनी आत्महत्या काहो केली ?

म्हणजे ह्या पुस्तकात ह्याबद्दल काही माहीती आहे का ? आपले काम असंपले की आत्महत्या करावी असे श्यामच्या आईने शिकवले असे काही आहे का हो ह्या पुस्तकात ?

आदूबाळ's picture

24 Mar 2014 - 7:07 pm | आदूबाळ

डिप्रेशनमुळे - असं माझ्या आजोबांकडून ऐकून आहे.

प्रसाद गोडबोले's picture

24 Mar 2014 - 7:19 pm | प्रसाद गोडबोले

डिप्रेशनमुळे

>>>

ह्म्म , माझ्याही माहीतीत असेच आहे , साने हे "गांधीवादी टेररिस्ट"* होते , सत्याग्रहाची बंदुक कानपटीवर ठेवुन पंढरपुर मंदिर प्रवेश आंदोलन करु पहात होते (जे की कायद्याने काही महिन्यात होणार होतेच) ह्याबद्दल दस्तुरखुद्द गांधींनीच त्यांना झाडले ...(पुढे मंदीर प्रवेश नक्की कशामुळे झाला हे माहीत नाहे , ह्यांच्या दहशतवादामुळे की कायद्यामुळे ?)

एकुणच ह्या प्रकाराने निराश होवुन त्यांनी आत्महत्या केली . तेव्हा त्यांना श्यामच्या आईची शिकवण आठवली नसावी बहुधा !!!

(* "माझं ऐका , नाहीतर सत्याग्रह करेन " ह्याला गांधीवादी टेररिझम असे म्हणतात )

अत्रन्गि पाउस's picture

24 Mar 2014 - 7:24 pm | अत्रन्गि पाउस

अहो ... साधा गांधी'गिरी' शब्द आला तर झोड उठली होती...
काय खरं नाय राव आता !!!

आत्मशून्य's picture

25 Mar 2014 - 10:23 pm | आत्मशून्य

बाकी सानेंनी आत्महत्या काहो केली ?

लोक सुधारत नाहीत हे लक्षात आल्यावर त्यांनी आता करण्यासारखे काहीही विशेष ध्येय उरलेले नाही या मानसिकतेतुन आत्महत्या केली असे ऐकले... अधि़कृत कारण माहित नाही.

अवांतरः- शामची आइ डोक्यात जाते पण त्यांच्या अनेक बालकथा सानेगुरुजिंच्या गोड गोश्टी या कथा मालिकेतुन विवीध पुस्तकातुन प्रकाशीत झाल्या आहेत त्या माझ्या अतिशय आवडत्या कथा आहेत, जसे सोहराब नी रुस्तुम, शेवटी नदी समुद्राला मिळेल, फुलाचा प्रयोग आणी इतरही अनेक. मला वाचनाची आवड लहानपणीच लागली या मधे सानेगुरुजिंच्या गोड गोष्टी या सिरीजचा फार मोठा हात आहे.

आम्ही आमच्या शाळेचा दिवसांत वर्गातल्या अतिलाजाळू मुलाला "श्यामळू" म्हणायचो... बाकी चालू द्या.

चिगो's picture

24 Mar 2014 - 8:06 pm | चिगो

म्हणजे 'शामळु' ह्या शब्दाचा उगम ह्या पुस्तकातून झाला की काय?

बॅटमॅन's picture

24 Mar 2014 - 8:10 pm | बॅटमॅन

अशीच शंका यायला लागलीय राव....असे असेल तर मग शाम म्ह. फेल्युअरच खंप्लीट =))

अत्रन्गि पाउस's picture

24 Mar 2014 - 8:56 pm | अत्रन्गि पाउस

+१ =))

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 Mar 2014 - 7:44 pm | निनाद मुक्काम प...

श्याम ची आई
आजच्या काळातील कालबाह्य पुस्तक
सुखवस्तू घरातील श्याम च्या वडिलांची व चुलत्यांची भाऊ बंदकी झाल्याने कोर्ट वार्या करून आयती गरिबी स्वतःवर ओढवून घेतली.
हे पुस्तक वाचून कितीजणांनी बोध घेतला , आजही भाऊ बंदकी संपली आहे का
हे पुस्तक टाकाऊ नाही आहे एखाद्या पिढीच्या जीवन शैलीचे वर्णन ,तत्कालीन काळ उभा करण्यात ते यशस्वी होते त्यातून प्रेरणा , आदर्श घेणे म्हणजे अती आहे ,
पूर्वी च्या काळी मुंजीत आहेर म्हणून काय द्यायचे हा प्रश्न ह्या पुस्तकाने जरी सोडवला असला तरी साडे तीन टक्क्या पलीकडे आपल्या समाजात हे पुस्तक ............
बालवयात माझी जन्मठेप ह्या पुस्तकाने सावरकर ह्या नावाशी अनेकांची निष्ठा जोडल्या गेली. ते खर्या अर्थाने चिरतरुण पुस्तक
अत्र्यांची नाटके आजही कालबाह्य झाले नाहीत, पण श्यामची आई व त्यात आईची भूमिका करणारी वनमाला आणि तिचा तो छापील डोक्यात तिडीक जाणारा स्वर डोक्यात जातो.

अत्रन्गि पाउस's picture

24 Mar 2014 - 9:02 pm | अत्रन्गि पाउस

मह्याला ३र्या यत्ते मंदी टाकले नं भौ धाग्या बद्दल...
आणि मग मंग तुमची ह्यो प्रतीर्कीया ..

आत्मशून्य's picture

25 Mar 2014 - 10:27 pm | आत्मशून्य

आजही भाऊ बंदकी संपली आहे का

भाऊ बंदकीचा शाप महाराश्ट्रा इतका कोणत्याही राज्याला ना याआधी झाला ना पुढे होइल. तिकडे नॉर्थला फिरलो तर मोठ्या भावाच्या आज्ञेत आख्खे कुटुंब जगते हे लगेच लक्षात येते.

प्रसाद गोडबोले's picture

25 Mar 2014 - 10:25 pm | प्रसाद गोडबोले

=))))

अनुप ढेरे's picture

26 Mar 2014 - 11:28 am | अनुप ढेरे

भारी !

प्रमोद देर्देकर's picture

26 Mar 2014 - 11:42 am | प्रमोद देर्देकर

३_१४ विक्षिप्त अदिती आणि खटपट्या यांची युती झालेली दिसतेय. ख.फ. वर खटपट्या ने हेच चित्र चढवले आहे.

अत्रन्गि पाउस's picture

25 Mar 2014 - 10:14 pm | अत्रन्गि पाउस

=))

आत्मशून्य's picture

25 Mar 2014 - 10:30 pm | आत्मशून्य

कम्युनिस्ट रशियात कमालिचे लोकप्रिय झाले असते. आजही होउ शकते. कम्युनिजम म्हणजे सर्वानाच शिळी भाकरी, व तिचेच उदात्तीकरण.... सर्वांना पनीर बटर मसाला न्हवे.

हुप्प्या's picture

26 Mar 2014 - 8:50 am | हुप्प्या

हे चित्र इथे योग्य आहे का इथे ?
image

हुप्प्या's picture

26 Mar 2014 - 9:56 am | हुप्प्या

चित्र दिसत नाही. माझा अपलोडिंगचा प्रयोग फसला की काय?
चित्र इथे आहे.
http://postimg.org/image/rlcjl9z3j/

विटेकर's picture

26 Mar 2014 - 5:13 pm | विटेकर

भारतीय संस्कृती नावाचे एक गुरुजींचे पुस्तक आहे .. तसे पुस्तक बरे आहे पण काही काही वाक्ये इअतकी बालीश आहेत की जाम हसायला येते.

अत्रन्गि पाउस's picture

26 Mar 2014 - 5:56 pm | अत्रन्गि पाउस

एखादे ?

आत्मशून्य's picture

26 Mar 2014 - 9:28 pm | आत्मशून्य

नावाचे सुधा त्यांचे एक पुस्तक असल्याचे स्मरते. जान्कारान्नी उजेड टाकावा

बॅटमॅन's picture

27 Mar 2014 - 12:41 pm | बॅटमॅन

हे कधी वाचनात आलेले नाही. त्यासारख्या नावाचे 'श्यामकांताची पत्रे' हे पुस्तक मात्र कधीकाळी थोडेसे वाचलेय. हा श्यामकांत म्ह. रियासतकार सरदेसायांचा मुलगा, शिकायला शांतिनिकेतनात होता.

साने गुरुजिनी फक्त आत्महत्या केली म्हणुन त्याना खाली लेखायच का? अर्नेस्ट हेमिन्ग्वे सारख्या कणखर पुरुषानेदेखिल आत्महत्या केली होती त्याच काय? त्याने तर लिहुन ठेवलय की (त्याच्या म्रुत्युपुर्वी) आत्महत्येसारखा दुसरा उदात्त म्रुत्त्यु नाही म्हणुन. आत्महत्या करणे म्हणजे भ्याडपणा, जगण्याच्या सन्घर्षापासुन दुर पळणे वगैरे वगैरे.आपण किती माणस पाहिली आहेत जी म्रुत्युला घाबरत नाहित? जवळजवळ प्रत्येक जण घाबरतो पण या सर्वाना आत्महत्या करण्याच धाडस होत नाही अस म्हणण चुक होइल का? मग जो माणुस आत्महत्या करतो त्याला भ्याड म्हणण चुकीच आहे अस नाही वाटत?

सने गुरुजिन्च लिखाण आत्ता कालबाह्य वाटु शकेल पण तस (माझ्या मते) मराठीतिल आत्तापर्यन्तच्या सगळ्यात श्रेष्ठ लेखकाला - भालचन्द्र नेमाडेना-अजिबात वाटत नाहीय.कारुण्य हा सप्तरसान्पैकि(?) एक रस आहे, आत्ता विनोदाची किवा श्रुन्गाराची सवय झालेल्या आपल्या सर्वाना तो आवडत नसेल म्हणुन तो अगदी कुचकामी झाला का?
मला वाटत कुठल्याही चीजेच रसग्रहण करताना त्या कालात शिरण आपल्याला अनिवार्य आहे नाहीतर आपण कालबाह्य ठरत नाही का?
मला वाटत माझ्यावर काही सन्स्कार साने गुरुजिने या त्यान्च्या पुस्तकाने केले आहेत व काही या पुस्तकावर आधारलेल्या चित्रपटाने केले आहेत. तुम्ही आमच्या पीढीला जरुर हसा कारण आम्ही कालबाह्य झाले असु पण क्रूपया या आमच्या आयुष्यातिल या आधाराना--मैलदगडाना- हन्सु नका.

चिन्मय खंडागळे's picture

28 Mar 2014 - 3:48 am | चिन्मय खंडागळे

मला वाटत कुठल्याही चीजेच रसग्रहण करताना त्या कालात शिरण आपल्याला अनिवार्य आहे नाहीतर आपण कालबाह्य ठरत नाही का?

हे वाक्य फार म्हणजे फारच आवडलं. कुठल्याही पुस्तकाचंच नाही तर ऐतिहासिक व्यक्तिंचंही मूल्यमापन त्यांच्या काळाच्या तुलनेतच व्हायला पाहिजे. साने गुरूजींना शामळू म्हणणारे लोक उद्या शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली म्हणून त्यांना क्रूरकर्मा म्हणायलाही कमी करणार नाहीत.
बाकी याच शामळू माणसाने आपली नोकरी सोडून देऊन इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात तुरुंगवास भोगला आणि दलितांच्या मंदिरप्रवेशासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता उपोषण केलं होतं. आज फेसबुकावर लाईक ठोकून क्रांत्या करणार्‍या या macho लोकांपैकी किती जण एखाद्या ध्येयासाठी तुरुंगात जायला तयार होतील?

kurlekaar's picture

28 Mar 2014 - 3:50 am | kurlekaar

खुप वाइट वाटल साने गुरुन्जिच्या आत्महत्येबद्दलच लिहीलेल वाचुन. खरच आत्महत्या करणे म्हणजे भ्याडपणा आहे का?अर्नेस्ट हेमिग्वे सारख्या दमदार लेखकाने सुद्धा केली होती की आत्महत्या. तो तर म्हणतो (त्याच्या आत्महत्येपुर्वी)की अत्महत्या हा एक उदात्त म्रुत्त्यु आहे. मला वाटत आपण सर्व जण म्रुत्युला घाबरतो मग जी माणस या मुलभुत भीतिवर अम्मल बजावुन आत्महत्या करतात त्याना भ्याड म्हणण्याचा नैतिक अधिकार कोण देतय आपल्याला?

साने गुरुन्जिच्या या पुस्तकाने व त्यावरच्या चित्रपटाने माझ्यावर कान्ही सन्स्कार केले आहेत्."मोहावर सन्य्यम ठेवणे म्हणजेच धर्म" हे श्यामच्या आईच वाक्य किन्वा घरचा खरवस घेउन श्यामचे वडिल त्याला शाळेत भेटायला जाणे हे सर्वच मला तेन्व्हा तरी खुप स्पर्शुन गेल होत.
माझ्या मते मराठीत आत्तापर्यन्तचा सर्वात चान्गला लेखक --भालचन्द्र नेमाडे-यान्च साने गुरुन्जिबद्दलच मत देखिल लक्षात घेण्याजोग आहे.
कुणितरी प्र के अ यान्च्या नाटकान्बद्दल लिहिलय ते अवास्तव नाही पण सावरकर हे टिकेच्या पलिकडे होते अस म्हणण
चुकीच होईल्.कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला शिवाजी महाराजानी "तसन्च" जाउ दिल हे सावरकराना पटल नाही कारण त्यान्च्या मते महाराजानी "जशास तसे" ही नीति पाळावयास हवी होती.पण मग मुघल आणि हा 'जाणता राजा' यान्त्त काय फरक? इथपर्यन्त ठीक आहे पण कान्ही वर्षापुर्वी एका पुस्तकात वाचल होत की सावरकरानी त्यान्ची रत्नागिरिच्या तुरुन्गात रवानगि होण्यापुर्वी ब्रिटिश सरकारची माफी मागितली होती--सावरकरान्च हे वागण त्यान्च्या त्यापुर्विच्या स्वाभिमानी व ताठर वागण्याच्या सन्दर्भात नीट बसत नाही.हे खरही नसेल आणि नसुदेत.
आमची पिढी कालबाह्य जरुर झाली असेल पण आमच्या आयुष्यतिल हे दगड असेच राहुद्या. हा आमचा मारुती नसेल पण हा आमच्या आयुष्यातिल 'मैलाचा दगड' नक्किच आहे.

kurlekaar's picture

28 Mar 2014 - 8:07 am | kurlekaar

या पोष्ट वर इतक्या प्रतिक्रिया आल्या की माझी पहिली प्रतिक्रिया दुसर्या पानावर गेली हे माझ्या लक्षातच आल नाही व काहीतरी गोन्धळ झालाय अस समजुन मी दूसर्यान्दा लिहिल. म्हणुन थोडासा overlap झालाय.

प्रसाद गोडबोले's picture

28 Mar 2014 - 9:30 am | प्रसाद गोडबोले

खरच आत्महत्या करणे म्हणजे भ्याडपणा आहे का?..... अत्महत्या हा एक उदात्त म्रुत्त्यु आहे.

बरं .... मग ज्यानं त्यानं स्वतःच्या मुलां समोर हा असला आदर्श ठेवावा ...
पण एकुणच समाजाच्या दृष्टीने आत्महत्या हे पापच आहे ... Life is an unalienable right of every human being , unalienable means no one can take it from him ...not even God... even he himself can not give it out !

कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला शिवाजी महाराजानी "तसन्च" जाउ दिल हे सावरकराना पटल नाही कारण त्यान्च्या मते महाराजानी "जशास तसे" ही नीति पाळावयास हवी होती.पण मग मुघल आणि हा 'जाणता राजा' यान्त्त काय फरक? इथपर्यन्त ठीक आहे पण कान्ही वर्षापुर्वी एका पुस्तकात वाचल होत की सावरकरानी त्यान्ची रत्नागिरिच्या तुरुन्गात रवानगि होण्यापुर्वी ब्रिटिश सरकारची माफी मागितली होती--सावरकरान्च हे वागण त्यान्च्या त्यापुर्विच्या स्वाभिमानी व ताठर वागण्याच्या सन्दर्भात नीट बसत नाही

कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची आख्खी गोष्ट खोटी आहे . घुसडलेली आहे , प्रक्षिप्त आहे ... त्या मुळे ते जाऊनदेच ... राहता राहिले सावरकर , सानेंची चर्चा चालु असताना सावरकरांवर गाडी ढकलणे काही योग्य नाही ....
(वाटल्यास त्यावर स्वतंत्र धागा काढा ... शिवाय सावरकरांनीही प्रायोपवेशन करुन देहत्याग केला होता हा मुद्दा ही त्यात घालता येईल तुम्हाला )
पण इन जनरल हे साने हे १९५०-६० च्या दशकात भारतात असलेल्या समाजवादासारखे आहेत .... त्यांचे असणं हे "ते का नकोत " हे समजुन घेण्याव्यतिरिक्त काही येक उपयोगाचे नाही .

"बालवयात माझी जन्मठेप ह्या पुस्तकाने सावरकर ह्या नावाशी अनेकांची निष्ठा जोडल्या गेली. ते खर्या अर्थाने चिरतरुण पुस्तक
अत्र्यांची नाटके आजही कालबाह्य झाले नाहीत"

सानेन्ची चर्चा चालु असतानाच सावरकर व अत्रे यान्चा उल्लेख वर आलेला आहे व त्याच अनुषन्गाने दोन्हि व्यक्तिन्चा उल्लेख केला गेलाय; सावरकरान्वर 'गाडी ढकलण्याचा' हा प्रकार अजिबात नव्हता. 'श्यामची आई' या पुस्तकाच साहित्यिक मुल्यान्कन राहिल बाजुलाच व त्याच धाग्याने साने गुरुजिना फान्सावर चढवल जात होत ते बघवल गेल नाही इतकच. तुम्ही ज्या समाजवादाची साने गुरुन्जिशी तुम्ही तुलना करता त्याच समाजवादाने लोहिया, नाथ पै, जयप्रकाश नारायण, मधु दन्डवते ही माणस देशाला दिली. दिसतात का अशी माणसे आत्ता? मला माहित नव्हत कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची आख्खी गोष्ट खोटी आहे, घुसडलेली आहे ते. कुठल्या इतिहासकाराने अस लिहिल्याच सान्गितलत तर बर होइल. आणि ही जरी आख्ययिका असली तरी हरकत नाही कारण तरीहि त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाला ती नक्किच शोभण्यासारखी आहे.

प्रसाद गोडबोले's picture

28 Mar 2014 - 3:34 pm | प्रसाद गोडबोले

दिसतात का अशी माणसे आत्ता?

>>> अजिबातच नाहीत दिसत ...ह्याचाच अर्थ ते एक्स्टिन्क्ट झालेत ...सरव्हायवल ऑफ द फिट्टेस्ट ....आजच्या काळात ते जगायला फिट्ट नाहीयेत ... आजच्या समाजात त्यांना जागाच नाहीये ...

साने वगैरे ह्या लोकांचे आणि त्यांच्च्या उगाच्च्याउगाचकाहीच्याबाही आदर्शवादाचे एकदा नव्याने अवलोकन करायची गरज आहे.

जग बदललय , बदलतय ...आपणही बदलायला हवं ....

साने गुरुजींचे व्यक्तिगत/सार्वजनिक आयुष्य सामाजिक कार्य हे चर्चेतील अवांतर मुद्दे आहेत..
नेमाडे हे सर्वश्रेष्ठ मराठी लेखक हे वाचून थक्क झालो...
विनोद आणि शृंगार ह्या दोनच रसांची आवड सध्या आहे हा निष्कर्ष हि तसाच अचंबित करणारा ..
अध्यात्म/भक्तीरस,वीररस,अद्भुत रस वगैरे ह्याचे मार्केट सध्या डाऊन आहे ???
(मी बीभत्स रसोल्लेख टाळलेला आहे )
जाता जाता : पुलंचे 'विनोदी साहित्य हे साहित्य का नाही' हा लेख आठवला ...रिअर अडमिरल बर्गंडी / पानिदात्तो टोचे ...अरिस्टोटल चा आकृतीबंधात्मक आशयानुसंचारीत्वाचा सिद्धांत वगैरे वगैरे..==))

सुनील's picture

28 Mar 2014 - 1:45 pm | सुनील

श्याने गुर्जींचं "श्यामची शाई" कुणी वाचलं आहे का?

दुसर्या व्यक्तिच्या विधानान्चा विपर्यास करुनच तुम्हाला तुमची प्रति-प्रतिक्रिया द्याविशी वाटत असेल तर मला काहिच म्हणायचे नाही.
(माझ्या मते) मराठीतिल आत्तापर्यन्तच्या सगळ्यात श्रेष्ठ लेखकाला - भालचन्द्र नेमाडेना- .कारुण्य हा सप्तरसान्पैकि(?) एक रस आहे, आत्ता विनोदाची किवा श्रुन्गाराची सवय झालेल्या आपल्या सर्वाना तो आवडत नसेल म्हणुन तो अगदी कुचकामी झाला का?
नेमाडेना 'माझ्या मते' सगळ्यात श्रेष्ठ लेखक मी म्हणणे याच्याशी तुम्ही फार तर असहमत असु शकता पण त्यात थक्क होण्यासारख काय आहे? आत्ता विनोदाची किवा श्रुन्गाराची सवय झालेल्या आपल्या सर्वाना यातुन विनोद आणि शृंगार ह्या दोनच रसांची आवड सध्या आहे हा निष्कर्ष हा कसा काय निघु शकतो? आणि समजा तो तसा निघालाच तर तुमच्यासारखे चोखन्दळ व उच्चभ्रु वाचक सोडले तर नाही तरी बहुतेक सर्वसामान्य वाचकाना दुसर काय हव असत?
...रिअर अडमिरल बर्गंडी / पानिदात्तो टोचे ...अरिस्टोटल चा आकृतीबंधात्मक आशयानुसंचारीत्वाचा सिद्धांत वगैरे डोक्यावरुन गेल. मला बर्गन्डि रन्ग व वाइन ठाउक आहे, अरिस्टोटल वाचलाय तो फक्त Will Durant च्या The Story of Philosophy तुन. तुम्ही माझ्या प्रतिक्रियेसाठी Touche हा शब्द नक्किच वापरलेला नाही.
मला वाटत आपण इथच थाम्बुया.माझ्याकडे या विषयावर दुसर लिहिण्यासारख काही उरल नाही.

पुतळाचैतन्याचा's picture

9 Apr 2014 - 10:41 am | पुतळाचैतन्याचा

या पुस्तकावर माझ्या शाळेतील मराठीच्या सरांचे मत आठवले: तुम्ही याच वयात (१०-१४) हे पुस्तक वाचा. एकदा २५-३० वर्षाचे झालात आणि तुमच्या भावना बोथट झाल्या तर तुम्हाला पुस्तकाचा भावर्थ कळणार नाही.....किती बरोबर...!!!

अत्रन्गि पाउस's picture

9 Apr 2014 - 9:01 pm | अत्रन्गि पाउस

संवेदनशील वयात हे वाचावे कि नही ह्यावर आपले मत काय ?

प्रसाद गोडबोले's picture

10 Apr 2014 - 1:38 am | प्रसाद गोडबोले

संवेदनशील वयात हे वाचावे कि नही

नकोच .... त्या पेक्षा पोरांना रिच डॅड पूअर डॅड , द फाउंटनहेड अशी पुस्तकं द्या वाचायला

अत्रन्गि पाउस's picture

10 Apr 2014 - 12:51 pm | अत्रन्गि पाउस

@प्रसाद : :) प्रश्न त्यान्न होता

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

10 Apr 2014 - 2:52 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

पावसा, शामची आई समजून् घ्यायचे असेल तर त्या काळात जावे लागेल.वूड हाउस सम्जून घ्यायचा तर त्या काळाची थोडीफार माहिती हवी.
पुलंच्या साहित्याबद्दल काय मत आहे?"ते बटाट्याची चाळ म्हणजे लोअर मिडल क्लास मराठींचे ग्लोरिफिकेशन" ह्यांच्या एका तरूण मित्राने तारे तोडले होते पूर्वी.'म्हैस' वाचून त्यालाच हसता येईल ज्याने एस.टी.ने प्रवास एकदा तरी केलाय.
जे 'एन्जॉय' करता येत नाही ते सगळे व्यर्थ ही तुझी मानसिकता तू बदलायला हवी.

असंका's picture

9 Apr 2014 - 2:31 pm | असंका

केवळ आपल्यामुळे मी काल हे पुस्तक वाचले. पहिल्यांदाच. त्यातल्या काही गोष्टी माहित होत्या. पण पुस्तक असे कधी वाचले नव्हते.
परत एकदा - मनापासून धन्यवाद.