पवारांची विचार"पूस"

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
23 Mar 2014 - 8:49 pm
गाभा: 

जाणता राजा ह्या पदवीवर शिवरायांच्या नंतर आपला हक्क सांगणारे, भारतीय लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते श्री शरच्चंद्ररावजीदादासाहेब पवार असे म्हणाले की १७ तारखेला सातार्‍यात राष्ट्रवादीला मतदान करा आणि ती शाई पुसून २४ तारखेला मुंबईत येऊन पुन्हा एकदा मतदान करा! एक व्यक्ती एक मत अशी लोकशाहीची मांडणी होती ती राष्ट्रवादीच्या मतदारांकरता बदलली असावी. जाणत्या साहेबांना काहीही करणे शक्य आहे!
अशा प्रकारे एका तथाकथित जबाबदार व अनुभवी नेत्याने असे बिनडोक आणि बेजबाबदार विधान करणे योग्य आहे का? अगदी विनोद म्हटला तरी हा जरा अतीच वाटतो आहे. निवडणूक आयोगाने पवारांची कानउघडणी करणे आवश्यक आहे. पवार ह्या विधानाचे काय स्पष्टीकरण देतात ते बघणे ज्ञानवर्धक ठरेल! शाईचा डाग पुसण्याबद्दलचा हा कलंक पवारांच्या कारकीर्दीवरून पुसला जाणार नाही अशी आशा. (अगदी अजितदादांच्या आवडीचे द्रव्य वापरले तरीही!).

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/Sharad-Pa...

http://www.loksatta.com/mumbai-news/clear-ink-on-hand-to-vote-twice-shar...

प्रतिक्रिया

दुसरे काय ???? पाहुया खेचरीभक्त ( डु आय डी वाले ) यावर काय प्रकाश टाकताहेत ते.

शशिकांत ओक's picture

23 Mar 2014 - 11:33 pm | शशिकांत ओक

पुढच्या काळात या बुजुर्ग पुढारी लोकांना पुन्हा एकदा पदावर बसायची सुरसरी येणार व भारतीय लोकतंत्र मजबूत होणार यात शंका नाही.

काळा पहाड's picture

23 Mar 2014 - 11:37 pm | काळा पहाड

कुठलं स्पष्टीकरण देतंय ते!! युतीला जातीयवादी वगेरे शिव्या देऊन विषय बदलायचा प्रयत्न करेल मग. बाकी सकाळ स्वतःला निष्पक्ष वगैरे म्हणवतो तर मथळे बघा..
"मोदी पंतप्रधान म्हणजे ऐक्‍याला सुरुंग"
"फॅसिस्ट प्रवृत्तींना पराभूत करा - पवार"
"लतादीदींनी मोदींचे ब्रॅंड ऍम्बेसिडर होणे अयोग्य"
"मुंडेंना मानसोपचारतज्ज्ञांची गरज"
थोडक्यात काय, तर पवार म्हणजे "दाल में काला".. मग ते जाणत्या राजाचा बुरखा पांघरलेले असोत की पत्रकाराचा बुरखा पांघरलेले.

लेखाचे नाव पवारांची विचार"फुस" असे हवे (होते का?).

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Mar 2014 - 9:14 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

यावरून एक मुद्दा समोर येतो .
ओळखपत्र म्हणून पैन कार्ड ,ड्रायविंग लायसन दोन वेगळी (एकच नाव पण दोन वेगळे पत्ते ) बनवता येते .

आता नवीन आधार कार्डचा डाटाबेस जो एकशेवीस कोटिंचा होईल त्यातून फोटो आणि ठसे यावरून ही एकच व्यक्ती आहे हे शोधण्याइतका त्यांचा संगणक सक्षम आहे का ?

माहितगार's picture

24 Mar 2014 - 8:06 am | माहितगार

छायाचित्रावरून छायाचित्र ओळखण्याच तंत्रज्ञान पुढे जात आहे पण ते परफेक्शनला येण्यास अजून अवधी असावा असे वाटते पण बोटांच्या ठशांच्या बाबतीत शक्य असावे असे वाटते.

मुंबई ते सातारा अंतर खुप आहे, दोन-चार उत्साही लोकांपलीकडे एवढ्या दूर केवळ मतदाना करता लोक प्रवास करणार नाहीत. लोकसभा मतदारसंघ मोठे असतात दोन-चार लोकांच्या अशा मतदानाने एकुण परिणाम होण्याची शक्यता कमी. पण जवळच्या दोन गावात जाऊन मतदान करण्याच प्रमाण बर्‍या पैकी असावं. असे करणारे मतदार उपकृततेच्या ओझ्याखाली इतपत दबलेले असतात की अशा गोष्टींची सहसा वाच्यता होत नाही. हितसंबंधांच्या राजकारणातून सुधारणांना विरोध केला जातो पण हे विरोध मोडून अशा तांत्रिक सुविधा वापरून सुधारणा करण्याची गरज आहे हे खरे.

आता नवीन आधार कार्डचा डाटाबेस जो एकशेवीस कोटिंचा होईल त्यातून फोटो आणि ठसे यावरून ही एकच व्यक्ती आहे हे शोधण्याइतका त्यांचा संगणक सक्षम आहे का ?

अर्थातच… माझ्या एका नातेवायीकाचे आधार कार्ड लग्नापूर्वीचे होते, आधार कार्ड केंद्रात कळाले कि नाव बदलण्याची सोय अजून उपलब्ध नाही.
तिथल्याच अधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसार नवीन फॉर्म भरला. पण तो रीजेक्त झाला कारण हाताचे ठसे पूर्वीच्या रेकॉर्ड मध्ये म्याच होत आहेत.

नावातकायआहे's picture

24 Mar 2014 - 8:11 am | नावातकायआहे
माहितगार's picture

24 Mar 2014 - 8:44 am | माहितगार

आजकाल केंद्रातील मराठी मंत्री मिश्कील वक्तव्ये करण्यात अग्रेसर आहेत तर ! :)

प्रसाद गोडबोले's picture

24 Mar 2014 - 2:18 pm | प्रसाद गोडबोले

मा. शरदचंद्ररावजी पवार साहेब ह्यांच्या वरील वक्तव्यात काही एक चुक नाहीये . विरोधी पक्ष उगाचच पराचा कावळा करताहेत .
त्यांचा निषेध !

जातीयवादी पक्षांना हरवण्यासाठी दोनदा मतदान केले तर ते पाप ठरत नाही ....
दोनदा काय जमलं तर दहादा मतदान करा आणि जातीयवादी धर्मांध शक्तींना हाणुन पाडा !!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Mar 2014 - 5:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सारकॅसम?

काकांनी बाकी कोलांटी उडी जरा उशिराच मारली.

आधारचा संगणक इतकं करत असेल तर चांगली गोष्ट आहे .ठशांशिवाय डोळ्यांचाही नकाशा घेतला आहे .

निवडणुक आयोग काय म्हणतो बघुया !
बाकी जिंतेंद्र आव्हाड "मुंब्रा" प्रकरणा सुद्धा वाचनीय आहे बरं का ! त्याची काही माहिती देता आली तर द्या हो.
बाकी साहेबांचा म्हणणच आहे ना... :- मुंब्र्याला सुधारण्याची संधी द्या

शिवाय हे सुद्धा नक्की वाचा :-
आव्हाडांचा मुंब्राविकास वादात कोटय़वधी रुपयांची कामे संशयाच्या फेऱ्यात
शिवसेनेचे सुपारीबाज.. हप्तेखोर

आशु जोग's picture

16 Jul 2014 - 8:17 am | आशु जोग
मराठी कथालेखक's picture

16 Jul 2014 - 12:34 pm | मराठी कथालेखक

धरणात आपला कार्‍याक्रम करणार्‍या पुतण्यास लोकांनी यंदाच्या विधानसभेत घरी बसवायला हवे. काका-पुतण्याच्या बेताल वर्तनाला तेच योग्य उत्तर होईल.

मदनबाण's picture

22 Jul 2014 - 10:14 am | मदनबाण

पवार साहेब काय करताय हे बारामतीत?

अवांतर :---
बाकी सध्या श्री.नारायण राणे फारच चर्चेत आहेत. अनेक वॄत्तपत्र / वेबसाईट यांच्या बातम्यांनी भरुन गेलेले आहे.
नारायण राणे कॉग्रेस नाराज,वेंगुर्ल्यात नारायण राणेंचं पोस्टर फाडलं, 'उद्धव ठाकरेंची सरपंचही होण्याची लायकी नाही'-राणे इं आणि अनेक बातम्या या श्री.नारायण राणेंनी व्याप्त करुन टाकल्या आहेत.
काल जरा उसंत मिळाली होती तेव्हा तू-नळीवर श्री.नारायण राणे यांच्यावर अजुन काही मिळतयं का ते पाहत होतो...
आणि काय सांगावे... कै.बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणेंवर "ठाकरी" भाषेत जी काही तोफ डागली होती त्या भाषणाचा व्हिडीयो मिळाला !
बाब्बो... मी या आधी कै. बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे ऐकली आणि पाहिली होती,पण हे तर अगदी "ठाकरी" शैली म्हणजे काय हे खर्‍या अर्थाने मला समजावणारे ठरले !

विशेष सुचना :- तुम्हाला जर "ठाकरी" भाषा झेपत असेल आणि ऐकण्याची इच्छा असेल तरच हा व्हिडीयो पहा.

मदनबाण......
आजची स्वाक्षरी:- बडबडोबा !