कालपर्यंत कितीतरी
खुषीत तू ठेवलेस -
बघता बघता देवा,
आज मात्र भुईत लोळवलेस . .
हिरवेगार शेत सारे
सोन्यासारखे पिकवलेस -
बघता बघता देवा,
सगळे का रे धुळीत मिळवलेस . .
का रे देवा आम्हाला
इतके तू छळलेस -
बघता बघता देवा,
पाणी आमच्या तोंडचे पळवलेस . .
घ्यायचे होते सगळे परत
आधी इतके का दिलेस -
बघता बघता देवा,
आम्हाला कफल्लक का केलेस . .
इतके दिवस तुझे
कौतुक करायला लावलेस -
बघता बघता देवा,
आता बोट मोडायला लावलेस . .
खेळ कसला जीवघेणा
पावसाला रे धाडलेस -
बघता बघता देवा,
आम्हाला मातीमधे गाडलेस . . !
.
प्रतिक्रिया
5 Mar 2014 - 4:11 pm | जेपी
:-(
5 Mar 2014 - 4:18 pm | अत्रुप्त आत्मा
.....
5 Mar 2014 - 4:20 pm | शिद
:(
5 Mar 2014 - 4:31 pm | कवितानागेश
हम्म...
5 Mar 2014 - 8:57 pm | निलरंजन
छान
5 Mar 2014 - 10:40 pm | पाषाणभेद
खरं आहे एकदम. राजानं मारलं काय अन पावसानं झोडलं काय सारखंच.
6 Mar 2014 - 5:32 pm | अजय जोशी
खेळ कसला जीवघेणा
पावसाला रे धाडलेस -
बघता बघता देवा,
आम्हाला मातीमधे गाडलेस . . !
छान....
7 Mar 2014 - 8:45 am | विदेश
जेपी, अ.आ., शिद, लीमाउजेट, निल्_वर्षाराणी, पाषाण्भेद, अजय जोशी ..
सर्वांचे आभार .