नवि कोरी सिरियल...........सुन मी बावरी..

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
18 Feb 2014 - 1:26 pm

नवि कोरी सिरियल...........सुन मी बावरी..
------------------------------------------------------
श्री व जान्हवी ला तन्वी नावाची मुलगी झालेली असते.व ति कॉलेजला जात असते..
आईआजी देवाघरी गेलेली असते..श्री ची आई म्हातारी झालेली असते..
सोडुन दिलेल्या व टाकुन दिलेल्ल्या गोखल्यांच्या लेकि सुना नव~या बरोबर नांदत असतात..
आपटे म्हातारा झाला असला तरी त्याची लग्नाची इछ्या असतेच..
जान्हविचे आईबाब पण या जगात नसतात...
इकडे राधेला पण एक मुलगा असतो..बॉबी नावाचा...
सौरभ चे अजुन नोकरी शोधणे चालुच असते..दादा, घारु अण्णा यांचे फोटो भिंतिवर लटलेले असतात..केदार निराळा रहात असतो..
राधासुत बॉबी कॉलेजमधे जातो व मालिकेच्या व सिनेमाच्या नियमा प्रमाणे राधासुत बॉबी तन्वीच्या प्रेमात पडतो..
१०-१२ एपिसोड त्यांच्या प्रेमात खर्च होतात व दोधे आपापल्या घरी सांगण्याचा निर्णय घेतात..
बॉबी जेंव्हा राधा मा जवळ हा विषय काढतो त्या वेळी राधेच मात्रुहृदय काळजित पडते..तन्वि जान्हविची मुलगी कळाल्यावर ति बॉबी ला म्हणते..
"त्या गोखले घराण्याला कुणाचाच संसार ठिक न होण्याचा शाप आहे ..आई आजी मुळे कुणाचाच संसार मार्गी लागला नाहि.."
यावर बॉबी म्हणतो "पण आई आता आईआज्जी आता या जगात नाहि..तु का व्यर्थ काळजी करते?"
"अरे पण त्या गोखले आजीचा आत्मा अजुन त्या परिवारात हिंडत असतो अशी बातमी आहे..सोमण गुरुजीनी "नारायण नागबळी" केला आहे गोखल्याकडे" तु तिचा नाद सोड शिवाय ति वयाने पण लहान आहे,,आपल्या घराण्यात बायकोच वय नव~या पेक्षा किमान ५ वर्षानी तरी मोठे असावे असा शिरस्ता आहे.."
हे ऐकल्यावर बॉबी नाराज होतो...
इकडे तन्वी पण जानव्ही जवळ बॉबी चा विषय काढते..बॉबी राधा धर्माधिकारी चा मुलगा कळाल्यावर ति तन्वीला म्हणते.."तन्वी ते घराणे चांगले नाहि..त्या घराण्यातले पुरुष बाहेर ख्याली आहेत..दादा..मार्तंड..केदार सा~यांच लग्ना नंतर बाहेत लफड होते..उद्या तुला पण बॉबी न मार्तंड काका न जस बायकोला सोडल व अफ्रिकेला जावुन दुसर लग्न केले तर तुला उभा जन्म राधाच्या घरात नव~या शिवाय रांधा वाढा करत घालवावा लागेल"
हे ऐकल्यावर तन्वि पण नाराज होते...
काहि एपिसोड गेल्यावर एकदम नव्या पात्राची एन्ट्री होते त्याचे नाव "फाकडु"
फाकडु हे प्राजक्ता व दगडुच्या "टाईमपास" चे फलामृत असते..फाकडु कॉलेज मधे आल्यावर त्याचा मनांत तन्वि नावाची "साजुक तुपातली पोली" भरते..
बॉबी पासुन दुर झाल्याने तन्वि पण फाकडु कडे आकर्षित होत असते पण ति बॉबी ला पण विसरु शकत नसते..
फाकडु तन्वि बद्दल पिताश्री दगडु यांच्या सोबत बोलतो व दगडु खुष होतो व सांगतो कि " तु मी केली ति चुक करु नको आधी लग्न कर व नंतर टाईम पास कर"
फाकडु जानव्ही व श्री च्या घरी येतो व तन्वि चा हात मागतो..हि कुणकुण बॉबी ला असतेच व तो पण जानव्ही व श्री च्या घरी येतो व तन्विचा हात मागतो..
दोघानी पण तन्वीला मागणी घातल्याने श्री गोंधळतो..पण जानव्ही सांगते कि आपण तन्वीचे स्वयंवर ठेवु व एक स्पर्धा ठेवु जो जिंकेल त्याच्या गळ्यात तन्वि माळ घालेल..श्री ला हि आयडीया पटते..
व जो कुणी ५ किलो मसाला प्रथम कुटुन दाखवेल त्याच्या गळात तन्वी माळ घालेल असे ठरते..
गो.गृ.ऊ मधे स्पर्धा होते व म्हाव~या "फाकडु टाईम पास " स्पर्धा जिंकतो..
तन्वि व फाकडु चे लग्न लागते..त्या वेळी कुपोषित प्राजक्ता व दगडु " मला वेड लागले प्रेमाचे" गाणे म्हणतात व लग्नाची सांगता होते...
व मालिका संपते व प्रेक्षक सुटकेचा निश्वास सोडतात..

नाट्य

प्रतिक्रिया

या मालिकान्चा एकुण प्रवास बगता, हाच शेवट योग्य वाटतोय....

डायवर's picture

18 Feb 2014 - 2:52 pm | डायवर

फाकडु हे प्राजक्ता व
दगडुच्या "टाईमपास" चे फलामृत
असते..

जबरदस्त वाक्यरचना.खुप हसलो.

मृगनयनी's picture

18 Feb 2014 - 6:56 pm | मृगनयनी

मस्त!.. आवडेश..ही बावरी सून!!

त्या वेळी कुपोषित प्राजक्ता व दगडु " मला वेड लागले प्रेमाचे" गाणे म्हणतात व लग्नाची सांगता होते...

=)) =)) =)) .. कु पो षि त - ... शब्दशः सहमत!!!! +१

दिपक.कुवेत's picture

18 Feb 2014 - 3:03 pm | दिपक.कुवेत

आता भारतात गेलो कि नक्कि बघीन

इरसाल's picture

18 Feb 2014 - 4:25 pm | इरसाल

काय झालेय काय तुम्हाला.तुमची धाग्याची निवड सध्या जाम चुकतेय असं नाही वाटत तुम्हाला ?

साहेब, प्लॉट चांगला आहे...लवकरात लवकर एखाद्या मराठी वाहीनीला पुरवा नाहीतर दुसराच कोणीतरी स्वःताच्या नावावर खपवेल.... ;)

जादू's picture

18 Feb 2014 - 5:51 pm | जादू

मालिकेला लवकरच करा सुरुवात. नया है यह......

फाकडु हे प्राजक्ता व
दगडुच्या "टाईमपास" चे फलामृत
असते.. वा क्या बात

पाषाणभेद's picture

19 Feb 2014 - 2:13 pm | पाषाणभेद

हा हा हा जबराच.
कुपोषित प्राजक्ता हे पण खरे आहे.
जबरा काका जबरा.

फक्त तुम्ही, दुसरं नाय कोणी.

चंबा मुतनाळ's picture

18 Feb 2014 - 6:52 pm | चंबा मुतनाळ

शाट मारी कायपण कळल नाय! असली काही TV सिरीयल आहे काय?

अकुकाका जेव्हा दीर्घाच्या जागी र्‍हस्व लिहितात (उदा. नवि, दगडु, वगैरे) तेव्हा आखूड (आखुड?) प्यांट घातल्यासारखं वाटतं.

(दिर्घशंकि) आदुबाळ

आनन्दिता's picture

19 Feb 2014 - 12:30 am | आनन्दिता

असले धागे तिकडे मायबोली वर टाका पब्लिक खुष होईल तिथलं...

आदूबाळ's picture

19 Feb 2014 - 12:36 am | आदूबाळ

प्रतिक्रिया उडणार तुमची. :)

बॅटमॅन's picture

19 Feb 2014 - 12:47 am | बॅटमॅन

की अनाहिता ;)

(पळा पळा मेलो)

अत्रुप्त आत्मा's picture

19 Feb 2014 - 10:05 am | अत्रुप्त आत्मा

@(पळा पळा मेलो) >>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif

आनन्दिता's picture

19 Feb 2014 - 9:32 pm | आनन्दिता

प्रतिसाद योग्य त्या ठिकाणी मारण्यात आला आहे... धन्यवाद!!! :)

आनन्दा's picture

19 Feb 2014 - 2:37 pm | आनन्दा

हे घ्या.. अजून बराच पल्ला गाठयचा आहे.
Jilebi