डोळ्यांतुनि तयांच्या त्यांचेच भाव होते
हातात गोंदलेले त्यांचे न नाव होते
लटकेच हासणे अन् खोटे मुरडणे ते
अंगात भिनलेले सगळे बनाव होते
शुक् शुक माझ्या कानी चारीकडून आली
मी एकटाच होतो त्यांचेच गाव होते
हातात हात कोणी घेऊन जात होते
जणु आपसांत त्यांचे जमले ठराव होते
शरिरातल्या भुकेचा बाजार पाहताना
का वेदना निघाली, माझ्या न घाव होते
प्रतिक्रिया
17 Feb 2014 - 4:27 pm | मदनबाण
छान...