मद्य मदिरा सुरा दारु, प्रसिध्द नामांनी असे |
तीन प्रहरी प्राशिता ती, गाढ निद्रा येतसे||
रिचविता ते पेग पेग, जडत्व कायेचे नुरे |
चालतानां भूमीवरुनी, स्थिर पाऊल ना ठरे ||
होऊनी आरक्त नेत्र, जीभ जड ती होतसे |
धरेवरती स्वर्ग उतरे, कि स्वतः स्वर्गी वसे ||
सुरवरांना सुरा प्रिय, अप्सरांचा सवे जथा |
दुग्ध शर्करा योग ऐसा, मदिराक्षी सवे सुरा ||
जन्म त्याचा वृथा झाला, आनंदासी मुकला |
एकच प्याला नाही, ज्याने कधी तो प्राशिला ||
वास्तवाची जाण येता, दु:खी जीव तो होतसे |
त्यापरि नशा बरी, दु:ख विस्मरण होतसे ||
जीन रम व्होडका, अन् गाळलेली गावठी |
जातकुळी एक त्यांची, लाविता तो पेग ओठी ||
चकणा नामे ज्ञात असती, खारे काजू शेंगदाणे |
एक मात्र जगन्मान्य, चकण्यासवे पिणे ||
इति नेत्रा विरचित मदिरा स्तोत्रम्
दारुबाज प्रित्यर्थं समर्पितम्
प्रतिक्रिया
12 Feb 2014 - 7:25 pm | आत्मशून्य
पेग भरलेला हवा याचा मित्रांना आग्रह करतो.
12 Feb 2014 - 7:29 pm | बॅटमॅन
कविता छान आहे. वृत्तात अजून ठोकून बसवायला वाव जरूर आहे पण जे आहे तेही उत्तमच.
12 Feb 2014 - 7:31 pm | मुक्त विहारि
छान
उत्तम
आवडले
12 Feb 2014 - 7:36 pm | तिमा
'दागु पीना हगाम है|
12 Feb 2014 - 7:45 pm | विवेकपटाईत
छान मस्त . कुजक-माजक खाईन, झिंगात येईन. गटरात लोळीन, स्वर्गसुख भोगीन.
12 Feb 2014 - 10:47 pm | विनोद१८
झकास विडंबन.
असेच लिहा.
13 Feb 2014 - 12:05 am | आयुर्हित
लाल रंगी, बहुगुणी, नाम तिचे वारुणी|
रोज एक पेग घेता, पळतील सारी दुखणी||
फक्त एक काळजी घ्यावी,खातांना तो चकणा|
मेद व वजन वृद्धी नियंत्रणा, मारू नका बकाणा||
कविता उत्तम झाली आहे, प्रत्यक्ष अनुभव कामी आलेले दिसतात!
13 Feb 2014 - 7:58 pm | नेत्रा वैद्य
प्रतिसादाकरिता धन्यवाद.
13 Feb 2014 - 8:46 pm | सोत्रि
मला कवितेतले काही कळत नाही पण मदिरा हे वाचून इथे आलो! छान लिहीले आहे.
- (मदिरा 'स्तोत्रि') सोकाजी
14 Feb 2014 - 5:48 pm | भटक्य आणि उनाड
चालु द्या..
5 Mar 2014 - 9:23 pm | आगाऊ म्हादया......
क्या बात है!! जमलंय.
बाकी अनुभव दांडगा आहे म्हणायचा.....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
काव्य लिहिण्याचा.