आरोग्यवर्धक पाकक्रुती... भाग १ ... खजूराच्या वड्या....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in पाककृती
10 Feb 2014 - 6:29 pm

आधीच सांगून ठेवत आहे.

१. हा पदार्थ आपापल्या कुवतीनुसार खावा.
२. तसा हा साखरयुक्त पदार्थ असल्याने, ज्यांना मधूमेह आहे, त्यांनी वैद्यकीय सल्ल्याने घ्यावा.
३. माझी फोटोग्राफी कशी आहे, हे आता वेगळे सांगायला नकोच.
४. मी अद्याप इथे फोटो चढवण्यात कुशल झालेलो नाही.जसे जमले तसे चढवले.कुणाला टोचल्यास मंडळ जबाबदार नाही. कुणालाच न टोचल्यास आम्ही आभारी आहोत.
५. भरपूर व्यायाम केल्याशिवाय ह्या पदार्थाच्या वाट्याला जावू नये.पण खूप थकवा जाणवत असेल तर नक्की खा.
६. संपादकांना नम्र विनंती, की माझ्या कडून काही लेखनाच्या चुका झाल्या असल्यास सुधारून देणे.तसदीबद्दल क्षमस्व.

आधीच सूचना देवून टाकल्या आहेत.तरीही पुढे वाचत असाल तर खरे मिपाकर..आणि ते पण नाखट..

===========================================================================

मध्यंतरी एका ताईला आरोग्यवर्धक (मिंग्लीश मध्ये "डायेट रेसीपी") पाकक्रुती हव्या होत्या.तसे मुळातच मी वजन राखून आहे.वजन आणि उंची समप्रमाणात आहेत का? हे तर दर ३ महिन्यांनी बघतोच पण शिवाय पोटाचा घेर पण जास्त वाढत नाही आहे ना? इकडे पण लक्ष देत असतो.जरा जास्त झाला की, गिरीभ्रमाणास जातो.भरपूर खातो आणि मनसोक्त भटकतो.पण कसे कुणास ठावूक, गिरीभ्रमण केले की जरा पोटाचा घेर कमी होतो.

आता अशा ठिकाणी जातांना कमीत कमी वजनांत जास्तीत जास्त उर्जा देणारे पदार्थ नेलेले उत्तम.मग कधी पाकातले चिरोटे,तर कधी डिंकाचे लाडू किंवा मग मेथीचे लाडू नेले की , भूक पण भागते आणि एक चार लोक जरा कौतूक पण करतात.आपल्या पदार्थांना कुणीतरी नावाजावे अशी इच्छा प्रत्येक बल्लवाची आणि सुग्रणीची असतेच असते.

असो. तर ह्या ताईंना नक्की कुठल्या कारणामुळे ही आरोग्यवर्धक पाकक्रुती हवी होती ते त्यांनी स्पष्ट न सांगीतल्यामुळे मी गिरीभ्रमण करणार्‍या लोकांसाठी किंवा जे व्यायाम करतात, त्या लोकांसाठी पा.क्रु. देत आहे.

मिपाच्या (अलिखित) धोरणाप्रमाणे पा.क्रु.ला लगेच सुरुवात केलेली नाही.जाणकारांच्या हे लक्षांत आले असेलच आणि नविन सभासदांनी योग्य ती दखल घेतली असेलच.

तर आता साहित्य.....

,

१. २ वाट्या खजूर (अर्थात बिया काढून.बायको मालिका बघत बसली की, मी बसल्या बसल्या तिच्याकडून वाल, लसूण सोलून घेतो.खजूराच्या बिया पण तिनेच काढून दिल्या.मालिकांचा असा पण उपयोग होतो.)

२. दोन वाट्या ओल्या नारळाचा कीस (दर शनिवारी हा कीस मी करून ठेवतो.हे आमचे आवडते काम आहे.एकदा हा कीस काढला की, आमची बायको आमच्या डोक्याला जास्त त्रास देत नाही.)

३. अंदाजे अर्धा कप दूध (दुधात किती पाणी आहे, त्या प्रमाणात कमी जास्त करणे.)

४. भरपूर बदाम (बदाम नसतील तर शेंगदाणे वापरलेत तरी चालेल.चवीत खूप मोठा फरक पडत नाही आणि प्रथिनांमध्ये पण खूप फरक पडत नाही.)

५. साखर (मला हिचे प्रमाण देता येत नाही.कारण मी नेहमीच अंदाजे साखर टाकतो आणि कसे कुणास ठावूक पण ती नेहमीच प्रमाणात असते.तरी पण साधारण पावणे २ वाट्या असाव्यात.खजूरात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने, खोबर्‍याच्या वडी करतांना मी जे साखरेचे प्रमाण घेतो, त्यापेक्षा थोडी कमी साखर घेतली होती.)

६. पिठीसाखर (जास्त करून ठेवा, कारण क्रुतीच्या वेळीस समजेलच)

७. साय (आता बायकोच्या तावडीतून हा पदार्थ कसा काढायचा, ते तुमचे तुम्ही ठरवा.हा पदार्थ देतांना जाम किटकिट करते आमची बायको.)

८. तूप (ताटाला लावायला.हा बायकोच्या समोर १ चमचा आणि तिच्या नकळत १ चमचा घेतला.आता बिंधास्त लिहीत आहे.कारण समजेलच.)

आता क्रुती.

सर्वप्रथम,बायको आसपास आहे का? हे बघून घेणे.ती घरात असावी पण स्वैपाकघरात नसावी.(खूलासा योग्य वेळ येताच करण्यात येईल.)

१. बदामाचे तुकडे करून घेणे.ते साहित्याच्या फोटोत आधीच दिले आहेत.

२. मिक्सरच्या भांड्यात थोडे दूध घालून मग त्यात खजुर आणि बदामाचे तुकडे घालून मिक्सर मधून फिरवणे.साधार्ण पेस्ट तयार होते.खालील फोटो बघा.

,

३. मंद आचेवर कढई तापायला ठेवणे.

४. एकीकडे ताटाला तूप लावून ठेवणे.

५, कढई थोडी तापली की नारळाचा कीस आणि साखर घालून गॅस थोडा मोठा करणे आणि एक ३/४ मिनिटे त्यांना ढवळत बसणे.साखर थोडी विरघळायला लागली की,

६. खजूर आणि बदामाचे आपण जे काही पेस्ट रुपी बनवले असेल ते घालणे.साय पण आत्ताच घालून घ्या.खालील फोटो बघा.

,

७. आता गॅस नध्यम आंचेवर ठेवा आणि मनसोक्त ढवळत बसा.कुठपर्यंत तर आपला चमचा त्या सारणात उभा राही पर्यंत.इकडे मस्त वास सुटायला लागला असेलच आणि बायको जवळ येवून उभी राहिली असेलच.

खाली फोटो देत आहे.

,

,

,

(प्रत्येक वड्यांच्या पा.क्रु.ची वेगवेगळी खासीयत असते, अगदी शास्त्रच म्हणाना.आल्याच्या वड्या होत आल्या, हे कसे ओळखायचे? तर कढईच्या आतील भागा भोवती साखर जमा व्हायला लागली की.तसेच ह्या वड्यांसाठी सारण तयार होत आले, हे ओळखायचे कसे? तर.... तर....)

८. आता गॅस मंद करा आणि जेमतेम १/२ मिनीटे अज्जुन परता आणि गॅस बंद करा.

९. परतलेला गोळा ताटावर घ्या.

१०. त्यावर पिठीसाखर ओता. जास्त ओतलीत तरी चालेल पण कमी नको.खाली फोटो देत आहे.

,

११. आता हा गोळा थापटण्या इतपत तापमानाला आला की, पिठीसाखरेसकट थापून घ्या.(इथे मी माझ्या बायकोची मदत घेतो.आम्ही शीतपेय पिणारे असल्याने चटके सहन होत नाहीत.)

१२. थोडा गरम असतांनाच वड्या पाडून घ्या.खाली फोटो देत आहे.

,

ह्या वड्या केल्या आणि बायकोला दिल्या.

"माझ्या सायीचे आणि तुपाचे सार्थक झाले", असे ती म्हणाली.ह्यापेक्षा अधिक उत्तम प्रतिसाद बायकोकडून मी अजिबात अपेक्षित करत नाही....

प्रतिक्रिया

अनिरुद्ध प's picture

10 Feb 2014 - 6:51 pm | अनिरुद्ध प

मु वि,एक्दम दमदार पा क्रु आणि वर्णन तर अप्रतिमच पु ले शु

पाकृ चांगली वाटली. वड्या अजून बर्‍यापैकी चौकोनी करायला वाव आहे.

मुलांनी आणि बायकोने, फोटो काढे पर्यंत धीर धरला हेच आपले नशीब.

तुम्ही ही, अशी काही तरी खुसपटे काढता म्हणून मग कुणी बिना फोटूची पा.क्रु. टाकली तर, फोटू का नाही टाकले म्हणून रडत बसता.

हे मिपाकर ना कुणाला सुखाने जगू पण देणार नाहीत.

ह.घ्या. (आम्ही पण हलकेच घेतले आहे.न घेवून सांगतो कुणाला?)

अत्रुप्त आत्मा's picture

10 Feb 2014 - 6:57 pm | अत्रुप्त आत्मा

साखरेच्या मखरातली पाकक्रुती! :)

आयुर्हित's picture

10 Feb 2014 - 7:04 pm | आयुर्हित

गिरीभ्रमण केले की जरा पोटाचा घेर कमी होतो.

ही तर अतिशय मोलाची माहिती दिली आहे आपण!
एक प्रयोग म्हणून, बिना साखरेची खजुराची वडी मी नक्कीच करून पाहीन.
धन्यवाद.

दिव्यश्री's picture

10 Feb 2014 - 8:00 pm | दिव्यश्री

"माझ्या सायीचे आणि तुपाचे सार्थक झाले", असे ती म्हणाली.ह्यापेक्षा अधिक उत्तम प्रतिसाद बायकोकडून मी अजिबात अपेक्षित करत नाही....>>> :)

करुण पहिल्या तर सांगेनच चवीला कशा होत्या.

मदनबाण's picture

10 Feb 2014 - 11:19 pm | मदनबाण

वा... पाकॄ अगदी झकास लिहली आहे ! ;)

वाटाड्या...'s picture

11 Feb 2014 - 12:05 am | वाटाड्या...

मुविशेठ,

लय भारी. तोपासु. आता जरा ते बायको किचेनमधे नाही असं का बघायचं ते पण सांग की.... :)

- वाट्या...

मुक्त विहारि's picture

11 Feb 2014 - 1:27 pm | मुक्त विहारि

आपल्या नवर्‍याला काही येत नाही, ह्या त्यांच्या मताशी ठाम असतात.

आणि मग स्वैपाक घरात येवून हे जास्त झाले, ते कमी करा अशा सुचना येत असतात.त्या टाळायच्या असतील तर बायकोला अशा वेळी स्वैपाकघरांत न आणणेच इष्ट.

असो,

तुर्तास इतकेच ठीक......

स्पंदना's picture

11 Feb 2014 - 7:35 am | स्पंदना

मुवि मिक्सरच्या भांड्याची अवस्था पाहून ही पाकृ १००% तुम्ही बनवल्याची खात्री पटली.
मी नक्किच करुन पाहेन. साय आहे म्हणजे टेस्टी असणारच नाही का?

मुक्त विहारि's picture

11 Feb 2014 - 12:42 pm | मुक्त विहारि

ज्याच्या ताटी साय आणि तूप

त्याला आयुष्य खूप

असे म्हणत आमच्या आज्ज्यांनी नव्वदी गाठली होती.पहिल्या वाफेचा वरण,भात,लिंबू आणि घरच्या सायीची धार हे तर खात होत्याच पण शिवाय जेवण झाल्यावर शेवटी सायीचे दही + भात हे पण कधी सोडले नाही.

त्यांची दिनचर्याच वेगळी होती.

जेपी's picture

11 Feb 2014 - 3:29 pm | जेपी

दहिभात वरुन आठवल जो जेवणात शेवटी दहिभात खातो त्याला सासुरवाडी श्रीमंत मिळते असा आमच्याकडे प्रवाद आहे .

(वरील कारणासाठी दहिभात खाणारा )जेपी =))

दिव्यश्री's picture

12 Feb 2014 - 2:34 am | दिव्यश्री

आमच्या कडे सासुरवाडीला आल्यावर जेवताना जावयाला अगदी आग्रहाने खाऊ घालतात.नवीन लग्न झाले त्यावेळी माझे बाबा असा आग्रह आमच्या प्यांटवाल्यांना करायचे तेंव्हा त्यांना समजायचे नाही.मग एक दिवस सांगितलं कि अस खाल्ल्याने सासुरवाडी शिर्मन्त होते.मग बाबाणी आग्रह करण्याआधी हेच दही,दूध भात आणा अस सांगायला लागले. ;) *lol* :D

आनन्दिता's picture

14 Feb 2014 - 9:01 am | आनन्दिता

प्यांटवाले हा शब्दप्र्योग आवडल्या गेला आहे..:)

दिव्यश्री's picture

14 Feb 2014 - 3:13 pm | दिव्यश्री

धन्यवाद दिले गेल्या आहे..... :P :D

दिपक.कुवेत's picture

11 Feb 2014 - 11:28 am | दिपक.कुवेत

पण येत्या घारापुरी कट्ट्याला घेउन आलात तर "चविचा/मुवि ट्च वड्यांचा" अंदाज येईल. हवा असेल तर खजुर मी येताना आणु का? बाय द वे तुम्हि प्रत्यक्षात "किस" काढता हे बघुन डोळे प्वाणावलेत!

"किस" काढतो,

ते पण फक्त नारळाचे.

खोबरे आणि चव, मिळत असेल तर आणि तरच "किस" काढण्यात अर्थ आहे.

दगडांचा आणि धोंड्यांचा कसला "किस" काढणार?

सुक्या खोबर्‍याचा तो 'कीस' आणि ओल्या नारळाचा तो 'चव' असे कुठेसे वाचलेले आठवले. ;) खुस्पट नाही बर्का, आता आठवलं ते सांगितलं.

मला समुद्र फारसा आवडत नाही म्हणून तो कट्टयाचा लेखसुध्दा उघडला नव्हता .
परंतु खजुरीच्या वड्यांची जहाजे येणार असतील तर
येण्याचा विचार करावा लागेल .
बाकी मुवि फारच कलाकार
आहेत .

स्वाती दिनेश's picture

11 Feb 2014 - 12:42 pm | स्वाती दिनेश

गोडाची पाकृ खुसखुशीत लिहिली आहे,
स्वाती

पैसा's picture

11 Feb 2014 - 12:57 pm | पैसा

ते डाएट फिएट न्हेऊन घाला १२ गडगड्यांच्या हिरीत! मस्त पाकृ. तुम्ही सगळ्या गोष्टींची कारणे नंतर देतो म्हटलं तरी समझनेवाले को इशारा काफी होता हय. सौ.मुविंची या धाग्यावर वेण्ट्री कधी होते याची वाट बघत आहे! ;)

पाकृ एकदम हलकी फुलकी (लिहिली) आहे. ;)
बाकी तुमचा साखरेचा 'अंदाज' पाहुनच एखादा मधुमेही कोमात जायचा बिचारा. =))

हो ना...

मला पण हीच शंका होती....

म्हणून तर मी आधीच सांगून ठेवले आहे....

२. तसा हा साखरयुक्त पदार्थ असल्याने, ज्यांना मधूमेह आहे, त्यांनी वैद्यकीय सल्ल्याने घ्यावा.

साखर आणि मसाले पचवायचे असतील तर नियमीत व्यायामाला पर्याय नाही.

ज्यांना व्यायामाची गोळी घ्यायला लागते, ते गोळ्या घेवूनच वानप्रस्थ काढतात.

मस्त पाकृ... आम्हाला हे काही जमणार नाही तेव्हा बायकोला सांगुन (मनवून ;) ) बनवावे म्हणतो...

सानिकास्वप्निल's picture

11 Feb 2014 - 3:14 pm | सानिकास्वप्निल

लेक खुसखुशीत लिहिलाय ...आवडला :)
आणी पाकृ तर मस्तचं.

Prajakta२१'s picture

11 Feb 2014 - 8:54 pm | Prajakta२१

छान पाककृती अशीच खजुराच्या लोणच्याची पाककृती मिळेल का?

अनन्न्या's picture

13 Feb 2014 - 5:36 pm | अनन्न्या

कट्टा वृत्तांत वाचून होणारी जळजळ या वड्यांनी कमी होईल का हो?

अजिबात नाही,

उलट वाढेल.

ह्यावेळी काळाघोडा महोत्सवाला "आल्याच्या वड्या" करून आणल्या होत्या.

त्या कशा होत्या, हे रामदास काकांना व्य. नि. करून विचारा.

सानिकास्वप्निल, गणपा इत्यादी कसबी लोकांच्या पाककृत्यांमधे फोटो किती सुंदर असतात. फोटो बघताचक्षणी पदार्थ खावासा वाटतोच.

हा मुविंच्या फोटोग्राफीवर टोला आहे का? :))

- बादवे मुवि: आल्याच्या वड्यांची पाकृ पण टाका ना.

जरूर...

पण त्याला एक फोटोग्राफर जवळ पाहिजे.

शेवटच्या पायरीला जेमतेम ५/१० सेकंदच मिळतात. फोटो काढत बसतो तर वड्यांचे चिक्कीत रुपांतर होईल.

शेवटच्या पायरीचं राहूद्या, आम्ही समजून घेऊ. बाकीच तर टाका...

मुक्त विहारि's picture

14 Feb 2014 - 4:57 pm | मुक्त विहारि

आपल्याला काय?

आल्याच्या वड्या करायला वेळ लागत नाही.

तसे ही उद्या एक कट्टा आहेच.तिथे "कुछ मीठा हो जाय" असे म्हणत ह्या आल्याच्या वड्या घेवून जातो.

मुक्त विहारि's picture

14 Feb 2014 - 12:47 pm | मुक्त विहारि

दुर्दैवाने, मुलाचा दहावीचा अभ्यास सुरु असल्य्यने, तो पण फोटो काढून द्यायला तयार न्हवता.

त्यामुळे समोर जे काही आहे, त्याला "फोटो" म्हणणे, हाच एकमेव मार्ग उरतो,

समोर आलेले "फोटो" रुपी संकट हसून साजरे करा, ही विनंती.

पिठीसाखर वरुन का घातलि? जास्त गोड नाहि होनार का?

मुक्त विहारि's picture

14 Feb 2014 - 1:05 pm | मुक्त विहारि

त्याला थोडा घट्ट पणा आणण्यासाठी पिठीसाखर मिसळायला लागली.

मला तरी वड्या जास्त गोड नाही लागल्या.तसेही चालणे जास्त असल्याने (रोजचे १०/१२ कि.मी.) इतकी साखर माझ्या शरीरात पचून पण जाते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Feb 2014 - 8:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

रोजचे १०/१२ कि.मी. मग मुवि हे तुमच्या "आयडिचे नाव" लैच सार्थ आहे हे म्हणावंच लागेल :)

यशोधरा's picture

14 Feb 2014 - 12:26 pm | यशोधरा

वड्या करताना ओट्यावर किती पसारा करुन ठेवलाय! नंतर वैनींनाच डबल काम पडले असणार! :P

मुक्त विहारि's picture

14 Feb 2014 - 1:08 pm | मुक्त विहारि

अजिबात नाही.

नंतर मलाच पसारा आवरायला लागतो.

जावू दे....

एक तर वड्या करून खायला द्या आणि मग पसारे आवरा.

पुरुषांच्या जातीचे भोग आहेत हो!!!! (ह.घ्या.)

दिव्यश्री's picture

14 Feb 2014 - 3:46 pm | दिव्यश्री

हायला माझा परतिसाद गायब ????

मुवींना फोटोवरुन टोला !!!!!!!
कोण असाव बर ???? विचारात पडलोय

मुक्त विहारि's picture

14 Feb 2014 - 1:10 pm | मुक्त विहारि

हरकत नाही....

आमची बायको-मुले कॅमेरा घ्यायला पैसे माझ्याच हातातून घेतात पण हातात कॅमेरा देत नाहीत.

हवे असल्यास "फोर्ट महोत्सवातल्या" सगळ्या मिपाकरांची साक्ष काढा.

प्यारे१'s picture

14 Feb 2014 - 1:20 pm | प्यारे१

बरोबर करतात! ;)

मुक्त विहारि's picture

14 Feb 2014 - 3:42 pm | मुक्त विहारि

शिपडो...और मीठ शिंपडो हमारे जखमे के उपर...

फिर भी दिल नही भर्‍या तो लाल लाल तिखट पण शिंपडो....

मेला हुवा कोंबडा किसको भी भिता नै.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Feb 2014 - 9:53 pm | अत्रुप्त आत्मा

@शिपडो...और मीठ शिंपडो हमारे जखमे के उपर... >>> =))

@फिर भी दिल नही भर्‍या तो लाल लाल तिखट पण शिंपडो....>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/deep-hearty-laughter-smiley-emoticon.gif

@मेला हुवा कोंबडा किसको भी भिता नै. >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/big-grin-smiley-emoticon.gif

प्यारे१'s picture

14 Feb 2014 - 1:19 pm | प्यारे१

>>>>>आम्ही शीतपेय पिणारे असल्याने चटके सहन होत नाहीत.

बिअर, व्होडका, व्हिस्की ह्यांना शीतपेय म्हणतात काय तुमच्याकडं?

बाकी खजुराच्या वड्या उत्तम. आणि बायकांकडं 'कट्ट्याच्या स्वच्छतेबाबत वगैरे' जास्त लक्ष देऊ नये.
इतर वेळी आपापला वकुब, वय, अनुभव, आकारमान, प्रकृती इ.इ.इ. चा सर्वांगीण विचार करुन द्यावं.

- धाग्याच्या टीआरपी साठी प्रयत्नशील

मुक्त विहारि's picture

14 Feb 2014 - 2:26 pm | मुक्त विहारि

"बिअर, व्होडका, व्हिस्की ह्यांना शीतपेय म्हणतात काय तुमच्याकडं?"

हो, येस मिलॉर्ड

=============

"- धाग्याच्या टीआरपी साठी प्रयत्नशील"

कळीचा मुद्दा ध्यानांत आलेला आहे.

प्रमोद देर्देकर's picture

14 Feb 2014 - 2:42 pm | प्रमोद देर्देकर

खुप छान मु.वि.
अजुन अवगत असलेल्या पाककलांचा लेख येवु दे मी.पा वर

सौंदाळा's picture

14 Feb 2014 - 3:48 pm | सौंदाळा

येऊ दे काय येणारच, भाग १ आहे हा :)
किती भागांची मालिका आहे हो मुविकाका?

ते आता मिपाकरांच्या सहनशीलतेवर अवलंबून तर आहेच आणि पचनशक्तीवर जास्त अवलंबून आहे...

मिपाची सहनशक्ती चांगली आणी तुमची पचनशक्तीपण .
तेंव्ह येऊ दे पुढचा धागा , पकडुन बसतो जागा .

मोक्षदा's picture

17 Feb 2014 - 7:24 pm | मोक्षदा

, सुंदर वड्या झाल्या आहेत
में मधील सुटीत नक्की करून बघू

निवेदिता-ताई's picture

17 Feb 2014 - 9:22 pm | निवेदिता-ताई

मस्तच...... आवडल्या वड्या

शिव कन्या's picture

3 Nov 2015 - 5:36 pm | शिव कन्या

हे कायतर स्थानिक झालंं.
करणार.