रानपाखरं.......!

psajid's picture
psajid in जे न देखे रवी...
28 Jan 2014 - 2:45 pm

बांधलं मचाण
वर गाण्यात गळा,
मधुरता मंधी
दुमला शेतमळा !!

येऊन चोर
जोंधळ्यात दडं,
शिवार टिपीत
चाललीत पुढं !!

भिरभिरली गोफण
सुटला दगड,
चोर जोंधळ्यात
त्येनं केलं उघड !!

का म्हून सतावता
सुखानं जगू द्यावं,
किती सोसलं पिकासाठी
तुम्हा ते नाय ठावं !!

घरी तान्हं ठिवून
आलिया राखणीला,
सोनं ठिवलं तरच
वरीसभर पीठ भाकरीला !!

- साजीद यासीन पठाण
दह्यारी
(पलूस, सांगली, महाराष्ट्र)

वाङ्मयशेतीजीवनमान

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

28 Jan 2014 - 3:46 pm | आयुर्हित

उत्कष्ट वर्णन केले आहे प्रथेचे! पण त्याच बरोबर आईच्या मनात दडलेली व्यथाही उत्तम रीतीने मांडली आहे.
छान आहे कविता! आवडली.
धन्यवाद

म्हैस's picture

28 Jan 2014 - 4:21 pm | म्हैस

चान . पण चोर शेतात कशाला शिरलेत ? लपायला का ?

आयुर्हित's picture

28 Jan 2014 - 6:46 pm | आयुर्हित

दाणे टिपायला आलेल्या पाखरांना चोर म्हटले आहे, ज्यांना उडवायला ती गोफण चालवत आहे.

बॅटमॅन's picture

28 Jan 2014 - 9:00 pm | बॅटमॅन

मस्त!

अन साजिदभौ तुम्ही पलूसचे हे ठौक नव्हतं. सहीच!

(मिरजकर) बॅटमॅन.

psajid's picture

29 Jan 2014 - 2:36 pm | psajid

दाणे टिपायला आलेल्या पाखरांना चोर म्हटले आहे, ज्यांना उडवायला ती गोफण चालवत आहे. - आयुर्हित
बरोबर !
साजिदभौ तुम्ही पलूसचे - (मिरजकर) बॅटमॅन.)
होय पलूस तालुक्यातील दह्यारी हे माझं गाव !
अभिप्रायासाठी धन्यवाद !

म्हैस's picture

29 Jan 2014 - 6:05 pm | म्हैस

ओह्ह. मस्त.

विवेकपटाईत's picture

29 Jan 2014 - 6:39 pm | विवेकपटाईत

पाखराची आई ही दाण्यांच्या शोधात शेतात आली. तिचे पिल्लू कधी न येणाऱ्या आई साठी वाट बघत असेल....
एकाच्या जगण्या साठी, दुसर्याला मरण. संसार म्हणत्यात ते हेच.....