मौत का सौदागर कुणाला म्हणावे मग?

मंदार दिलीप जोशी's picture
मंदार दिलीप जोशी in काथ्याकूट
24 Jan 2014 - 12:57 pm
गाभा: 

गुजरातचे मुख्यमंत्री नरेन्द्र मोदींना काही वर्षांपूर्वी मौत का सौदागर म्हटल्याने सोनिया गांधींवर चौफेर टीका झाली. मग रीतसर सारवासारव करण्यात आली. नुकतेच एका काँग्रेसी मंत्र्याने पंतप्रधान नरभक्षक नको असे खळबळजनक विधान केले.

तर गुजरातच्या दंगलींच्या वेळेला नरेन्न्द्र मोदी मुख्यमंत्री होते म्हणून त्यांच्यावर मौत का सौदागर असल्याचा आरोप केला जातो. पण जेव्हा ३०००+ शी़खांची हत्या झाली तेव्हा सरदहु दंगलींना प्रोत्साहन दिल्याचा आरोप हरकिशनलाल भगत, ललित माकन, जगदीश टायटलर व सज्जनकुमार (नावात चूक असेल तर कृपया सांगा) यांच्यावर होता. दंगलींनंतर पंतप्रधान राजीव गांधींनी "एक मोठे झाड पडते तेव्हा जमीन हादरतेच" असे बेजबाबदार विधान करुन शी़खांच्या जखमेवर मीठ चोळले होते. मग त्यांना हे मौ.का.सौ. हे विशेषण लावायला काँग्रेसवाले का विसरले?

आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या दंगलींत बहुसंख्य वेळेला भाजपेतर सरकारे......आणि बहुतेक ठिकाणी काँग्रेसचीच सरकारे व मुख्यमंत्री होते हे या यादीवरुन स्पष्ट आहे. अशांना का नाही मौ.का.सौ. असे विशेषण लागले? की देशपातळीवरच्या राजकारणात नरेन्द्र मोदी आपल्याला भविष्यात भारी पडू शकतात हे आधीच ओळखल्याने काँग्रेसची तंतरली? आता या सगळ्या दंगलींच्या वेळी मुख्यमंत्री असलेल्या सगळ्यांना मौत का सौदागर म्हणायला काँग्रेस तयार आहे का?

Riots List

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

24 Jan 2014 - 1:14 pm | श्रीगुरुजी

१०१ टक्के सहमत

>>> पण जेव्हा ३०००+ शी़खांची हत्या झाली तेव्हा सरदहु दंगलींना प्रोत्साहन दिल्याचा आरोप हरकिशनलाल भगत, ललित माकन, जगदीश टायटलर व सज्जनकुमार (नावात चूक असेल तर कृपया सांगा) यांच्यावर होता.

यांच्याव्यतिरिक्त धरमदास शास्त्री (काँग्रेस), अर्जुनदास (काँग्रेस) व कमलनाथ (काँग्रेस) यांच्यावरही आरोप होते. १९९९ च्या निवडणुकीत वाचाळ मनमोहन सिंगांनी, 'या दंगलीत रा.स्व.संघाचा हात होता' असा धडधडीत खोटा आरोप केला होता.

मंदार दिलीप जोशी's picture

24 Jan 2014 - 1:24 pm | मंदार दिलीप जोशी

विकीपिडियाचे पान वाचायला सांगायला हवे मनमोहन सिंगांना. :(

तिमा's picture

24 Jan 2014 - 1:20 pm | तिमा

वाचाळ मनमोहन सिंगांनी, 'या दंगलीत रा.स्व.संघाचा हात होता' असा धडधडीत खोटा आरोप केला होता.

बाटगा, हा नेहमीच जास्त कडवा असतो अशी म्हण आहे.

अवांतरः बाकी म.मों. ना 'वाचाळ' म्हटलेले बघून अंमळ मौज वाटली.

मंदार दिलीप जोशी's picture

24 Jan 2014 - 1:22 pm | मंदार दिलीप जोशी

मला महमोहन सिंह यांची सगळ्यात जास्त चीड येते. उपरोल्लेखित चार जणांपैकी दोन जण मनमोहन सिंहांच्या मंत्रिमंडळात होते. स्वतः एक शीख असून ममोंना याची चीड कशी नाही?

चन्द सिक्को के लिये एक सिक्ख बदल गया... :(

देव मासा's picture

26 Jan 2014 - 3:51 am | देव मासा

क्रमांक. ६ नेल्ली आसाम आकडा भायानक आहे .

आयुर्हित's picture

26 Jan 2014 - 11:49 pm | आयुर्हित

अरे देवा, हे काय चिल्लर हिशेब करताय!

सबसे जादा मौते तो २०००० है!
इतना हि नही और १२०००० लोग त्रासदी से झुंजते रहे|

और जिनका सौदा भी हुआ है!

सबसे बडा मौत का सौदागर तो श्रीमान अर्जुन सिंग (मुख्य मंत्री, मध्य प्रदेश) है, जीन्होने भोपाल वायू दुर्घटना के जिम्मेदार Warren Anderson को सही सलामत भारत से बाहर जाने दिया, जिस वक्त केंद्र मे भी कॉंग्रेस कि सरकार थी|

4^ "How Anderson came and left", The Bhopal Post, 9 June 2010.

इसीलिये कॉंग्रेस वाले ही "मौत का सौदागर" शब्द प्रयोग मे लाते है!

आता बोला!

देव मासा's picture

27 Jan 2014 - 1:43 am | देव मासा

आणि मी अफगाणिस्तानात जन्म झाला नाही यात सुख मानत होतो *sorry2* *SORRY* :sorry:

मुक्त विहारि's picture

27 Jan 2014 - 9:50 am | मुक्त विहारि

मुझ्झफर नगरच्या दंगलीचा पण समावेश हवा होता.

वेल्लाभट's picture

27 Jan 2014 - 2:28 pm | वेल्लाभट

एकदम बरोबर आहे.....

विकास's picture

27 Jan 2014 - 8:37 pm | विकास

सोनीया गांधींनी आणि त्यांच्या चमच्यांनी मौद का सौदागर म्हणणे हे अत्यंत निषेधार्ह होते आणि पोरकट होते. असले काही तरी बोलून मते मिळतील असे त्यांना आणि त्यांच्या सल्लागारांना वाटले होते खरे पण काय झाले माहीतच आहे...

तरी देखील, मला वाटते तुम्ही दिलेल्या यादीतील कोणालाच मौत का सौदागर म्हणू नये. यांच्यातील जे कोणी दंगलीस जबाबदार असतील ते गावगुंड म्हणण्याच्या लायकीचे तरी होते, अत्यंत खालच्या पातळीवरचा स्वार्थ बाळगणारे तरी होते अथवा दिशाहीन नेतृत्वाचे मुर्तीमंत पुतळे होते. असे दिशाहीन नेतृत्व असलेले असल्यानेच भोपाळ दुर्घटना होऊ शकली आणि झाल्यावर अँडरसन पळू शकले. अशाच दिशाहीन नेतृत्वांमुळे सातत्याने दंगली घडलेल्या आहेत.

मात्र, मौत का सौदागर हे हिटलर सारख्या घृणास्पद व्यक्तींना अथवा स्वतःच्या लोकांचे भले करता येत नाही तर त्याकडे लक्ष देयचे सोडून बाजूच्या देशात दहशतवादाला सातत्याने खतपाणी घालणारे पाकीस्तानी सत्ताधारी आणि त्याला पाठींबा देणारे द्वेषाने आंधळे झालेले जे कोणी पाकीस्तानी असतील त्यांना म्हणावे असे वाटते.

चिरोटा's picture

28 Jan 2014 - 9:24 am | चिरोटा

मला वाटते तुम्ही दिलेल्या यादीतील कोणालाच मौत का सौदागर म्हणू नये

वर दिलेल्या दंगलीत पाहिलेत तर शेकड्यावारी नागरिक बळी गेले आहेत्.शीख दंगल असो वा गोध्रा वा मुंबई ,तत्कालीन सत्ताधारी नेत्यांच्या,प्रशासनाच्या छुप्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नसते.कुठ्ल्या भागात दंगल्खोरांना मोकळीक देवून काणाडोळा करायचा हे ही ठरलेले असते.

विकास's picture

28 Jan 2014 - 10:01 am | विकास

"सत्ताधारी नेत्यांच्या,प्रशासनाच्या छुप्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नसते." असे नेहमी नाही तरी असू शकते हे मान्य. मी कुठल्याच सरकारला अथवा राजकारणी नेत्याला संत समजत नाही. पण तरी देखील एखादी संपूर्ण जमात उखडून टाकण्याचे प्लॅनिंग करून ते पूर्णत्वास नेण्या इतके आपले कुठलेच सरकार अथवा नेतृत्वाने केले असे वाटत तरी नाही. माझ्या दृष्टीने हिटलर अथवा पाकीस्तानी यंत्रणा (सामान्य जनता नसेलही त्यात), किंवा अल कायदा/ओसामा हे मौत का सौदागर आहेत असे मी माझ्यापुरते समजतो.

विटेकर's picture

28 Jan 2014 - 10:23 am | विटेकर

आज पुन्हा युवराजांनी तोच राग आळवला आहे !
तेच ते तेच ते आणि पुन्हा तेच ते !!!!

अर्धवटराव's picture

28 Jan 2014 - 10:41 am | अर्धवटराव

खरच "मौत का सौदागर" या एका विशेषणाने तत्कालीन निवडणुकांवर निर्णायक प्रभाव टाकला होता का? कि हे हि इंडीया शायनींग सारखं चुकीचं विष्लेषण आहे?

शिखांच्या हत्येचे पातक आणि राहुल गांधीचे वडील

Jan 31st, 2014 | By प्रतिनिधी | Category: संपादकीय लेख
***** किरण शेलार*****

‘‘इंदिरा गांधी आपली आई होती. या सापाच्या पिलांनी तिची हत्या केली. रोशन सिंग आणि बाग सिंग यांची हत्या जो करेल, त्यांनी माझ्याकडून प्रत्येकी ५००० रुपये येऊन घेऊन जावे. आपल्याला ही जमातच नष्ट करायची असल्याने प्रत्येकी १००० रु. याप्रमाणे आपण शीख मारावे. जयचंद जामदार हा माझा सचिव आहे. ३ नोव्हेंबरपर्यंत तुम्ही त्याच्याकडून पैसे घेऊ शकता.’’

सज्जनकुमार यांचे हे भाषण राहुल गांधी यांना माहीत नाही काय? शीखविरोधी दंगलीची चौकशी करणार्या आयोगाच्या अहवालात हे भाषण नोंदविले गेले आहे. १९८४ सालच्या शिखांच्या दंगलीत शिखांच्या निर्घृण हत्या करणार्या दंगलीतील गुन्हेगारांना वाचविण्याचे काम राजीव गांधी व त्यांच्या कॉंग्रेस सरकारने केले. देशाचा पंतप्रधान यापेक्षा आपल्या आईच्या खुनाचा बदला घेणार्यांचे रक्षण करणारा मुलगा, अशीच राजीव गांधींची भूमिका होती.

कॉंग्रेस बुडवायला निघालेल्या राहुल गांधींनी ’टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये गुजरातचा उल्लेख केला. गोध्रा येथे रामभक्तांची बोगी पेटवून दिल्यानंतर जी दंगल उसळली, त्यानंतर झालेल्या दंगलीसाठी नरेंद्र मोदींना जबाबदार धरले पाहिजे, असे राहुलबाबांचे म्हणणे होेते. सहाजिकच, समोरून दिल्लीतील शिखांच्या दंगलीसाठी कॉंग्रेसला जबाबदार का मानू नये? असा प्रश्न विचारला गेला. राहुल गांधींना हा प्रश्न अनपेक्षित होता. किंबहुना, ज्यांनी सराव करून घेतला होता, त्यांनी या प्रश्नाचे उत्तर त्यांना नीट सांगितले नव्हते. २००२च्या दंगलीचे बुमरँग राहुल गांधींच्या मुर्खपणामुळे कॉंग्र्रेेसवरच उलटले आहे. राहुल गांधींनी या प्रश्नाचे उत्तर ज्याप्रकारे दिले, त्यावरून शीख समुदायामध्ये संतापाची लाट आली आहे. इंदिरा गांधींचे मारेकरी शीख होते, म्हणून त्यांच्या हत्येनंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी शिखांच्या हत्या करण्याचे सत्र आरंभले होते. अत्यंत निर्घृणपणे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी शीख पुरुष, महिला, लहान मुले यांच्या हत्या केल्या. यातील काही लोकांना शिक्षा झाली, असे राहुल गांधी सांगतात. मात्र, वस्तुस्थिती काही निराळीच आहे. ज्या कॉंग्रेसच्या तत्कालीन कार्यकर्त्यांनी या शिरकाणात महत्त्वाची भूमिका निभावली, ती सगळी मंडळी राजीव गांधींच्या कारकिर्दीत कॉंग्रेसच्या पक्ष व सत्तेत महत्त्वाच्या पदावर विराजमान झाली. आपल्या आईच्या हत्येचा बदला घेण्याच्या मोबदल्यात राजीव गांधी यांनी त्यांना अनेक महत्त्वाची पदे दिली, असे म्हणता येणार नाही काय? खासदारकीपासून ते केंद्रीयमंत्रीपदापर्यंत अनेक पुरस्कार त्यांना या अमानुष वीरत्वासाठी बक्षीस म्हणून दिले गेले. लोकांचा दबाव पाहून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गेले; परंतु गांभीर्याने कधीही कारवाई केली गेली नाही. उत्तम वकील पुरविले गेले. न्यायालयीन खटले प्रलंबित राहतील, अशी व्यवस्थादेखील राहुल गांधींच्या वडिलांनी केली.
ऑक्टोबर-नोव्हेंबर १९८४. या दोन महिन्यांत ज्याप्रकारे हत्या दिल्ली आणि परिसरात करण्यात आल्या, तशा प्रकारच्या नियोजित हत्या आणि चिथावणी भारतीय राजकारणात कुठल्याही अन्य राजकीय पक्षाने केलेली नाही. केंद्रीयमंत्री सज्जनकुमार यांनी हत्या करणार्या प्रत्येकाला दारूची बाटली आणि १०० रुपयांची नोट वाटली होती. दिल्लीच्या सुलतानपुरी भागात सज्जनकुमारनी उभे राहून भाषण दिले.

‘‘इंदिरा गांधी आपली आई होती. या सापाच्या पिलांनी तिची हत्या केली. रोशन सिंग आणि बाग सिंग यांची हत्या जो करेल, त्यांनी माझ्याकडून प्रत्येकी ५००० रुपये येऊन घेऊन जावे. आपल्याला ही जमातच नष्ट करायची असल्याने प्रत्येकी १००० रु. याप्रमाणे आपण शीख मारावे. जयचंद जामदार हा माझा सचिव आहे. ३ नोव्हेंबरपर्यंत तुम्ही त्याच्याकडून पैसे घेऊ शकता.’’

सुमारे ८००० निष्पाप शिखांना या कॉंग्रेसप्रणीत दंगलीमध्ये आपले प्राण गमवावे लागले. यातील सर्वाधिक हत्या दिल्लीत झाल्या होत्या. सुमारे ३००० लोक दिल्लीतच मारले गेले होते. २०,००० लोकांना आपले घरदार सोडावे लागले. दिल्लीतला लहान- मोठा प्रत्येक कार्यकर्ता शिखांच्या हत्या करून राजीव गांधींच्या आईच्या हत्येचा बदला कसा घेतला जाईल, याच राक्षसी हिंसेने प्रेरित होऊन कामाला लागला होता. जगदीश टायटलर आणि एच.के.एल. भगत यांच्यासारखेे नेते राजीव गांधींच्या कृपेने शिक्षेपासून दूर राहिले. या दोघांनीही दिल्लीतील कारागृहात कैद असलेल्या खुन्यांना तीन दिवसांसाठी मोकळे सोडले होते. अधिकाधिक शिखांच्या हत्या करण्यासाठी त्यांना ही मुभा देण्यात आली होती. शिखांना धडा शिकविण्यासाठीच या खुन्यांना या घाऊक सुपार्या देण्यात आल्या.

जगदीश टायटलर यांना आजही राहुल गांधी ‘टायटलर अंकल’ संबोधतात. २००७ साली टायटलर यांच्या विरोधातील गुन्हे सीबीआयने मागे घेतले. राजीव गांधींचा हा सहकारी वाचावा म्हणून कॉंग्रेस कसा आटापिटा करीत आहे, त्याचे हे उदाहरण आहे. केंद्रीय क्रीडामंत्री अजय माकन यांचे काका आणि तत्कालीन कॉंग्रेसचे नेते ललित माकन यांच्याबाबतीतही असाच बचावाचा न्याय करण्यात आला. राजीव गांधी असतानादेखील त्यांनी दंगलीसाठी दोषी असलेल्यांना कसे वाचविता येईल, यासाठी आटापिटा केला. दंगलीनंतर राजीव गांधी यांनी जे विधान केले, ते तर शिखांच्या जखमांवर डागण्या देणारे होते. ’’मोठे वृक्ष कोसळले की, धरणीकंप होणारच’’, असे म्हणत राजीव गांधींनी शिखांच्या शिरकाणाचे समर्थन केले होते. दंगली झाल्यानंतर सीबीआय, मारवा आयोग, मिश्रा आयोग, कपूर मित्तल आयोग, जैन बॅनर्जी आयोग हे आणि असे १० आयोग चौकशीसाठी बसविण्यात आले. खरेतर सीबीआयच्या पहिल्याच अहवालात दिल्लीतील कॉंग्रेस नेत्यांनी अत्यंत नियोजितपणे ही दंगल कशी घडवून आणली, हे स्पष्टपणे नमूद केले होते. अनेक नेते व कार्यकर्ते यांची नावे पुराव्यानिशी त्यात दिली गेली होती. प्रत्येक आयोगासमोर पीडित शिखांनी आपल्या करुण कहाण्या जिवाच्या आकांताने सांगितल्या. विविध आयोगांसमोर नोंदविले गेलेले जबाब जरी आपण वाचले, तरी अंगावर शहारे येतात. गळ्यात पेटता टायर टाकून जिवंत जाळल्या जाणार्या शिखाचे छायाचित्र आजही गुगलवर पाहायला मिळते. शिखांच्या हत्यांच्यासंदर्भात डिसेंबर, १९८४ सालच्या ’माणूस’ या साप्ताहिकात प्रकाशित झालेले दत्तप्रसाद दाभोळकर यांचे ११ लेख आपल्याला आजही वाचवत नाहीत, इतकी हिंसा त्या वेळी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. तरीसुद्धा दहा समित्या आणि आयोगांचा खेळ का मांडला गेला? याचे कारण स्पष्ट आहे. राजीव गांधींच्या आईच्या खुनाचा बदला ज्यांनी घेतला, त्यांना वाचविण्यासाठी.

आणीबाणीचे दु:शासनपर्व जसे कॉंग्रेसच्या तुकड्यावर पोसलेल्या विचारवंतांनी आणि पत्रकारांनी दडपून टाकले, तसाच शिखांच्या हत्येचा हा कालखंड भारतीय राजकारणाच्या पटलावर कुठेही तटस्थपणे नोंदला गेला नाही. ८००० निरपराध लोक अत्यंत नियोजितपणे निर्घृण पद्धतीने मारले गेले. २०,००० लोक घरादारापासून परागंदा झाले. मारेकर्यांना शिक्षा करण्यापेक्षा त्यांना वाचविण्याचे काम गांधी परिवाराने आणि कॉंग्रेसने केले. भारतात विकास आणि नव्या कल्पनांचा चेहरा म्हणून राजीव गांधींचा निरागस चेहरा केंद्र सरकारच्या जाहिरातींमध्ये झळकत असतो. हा चेहरा निरागस नसून, त्यावर निष्पाप शिखांच्या हत्येचे डाग आहेत. गुजरातच्या दंगलीसाठी नरेंद्र मोदींना ’नरराक्षस’ म्हणून हिणविणार्या मुखंडांना शिखांच्या दंगलीसाठी किमान आरोपीच्या पिंजर्यात उभे करावे, असेही वाटले नाही. गोध्य्राच्या प्रतिक्रियेत मारले गेलेले अल्पसंख्याक जगभर ‘व्हिक्टीम’ म्हणून फिरविले जतात. त्याच्यामागून तिस्ता सेटलवाडसारख्यांचे वाडगे फिरतात आणि परदेशी निधींनी यांची बँक खाती फुटेपर्यंत तुडूंब भरतात. शिखांच्या शिरकाणाला मात्र बगल दिली जाते. कारण कुमार केतकरांसारखे विचारवंत ज्या गांधी घरण्याची पालखी वाहतात, त्या गांधी घराण्याचा आधीचा राजपुत्र यात स्पष्टपणे दोषी असतो. कदाचित, तो दंगलीसाठी जबाबदार नसेल; पण दंगलींत माणसामधून पशूत परिवर्तीत झालेल्या जनावरांना पोसण्याचा आरोपी तर नक्कीच आहे, हे विसरून चालणार नाही. राहुल गांधींकडून हे मुद्दे समजून घेण्याची अपेक्षा फोल आहे; पण त्यांच्या झांजा वाजवत फिरणार्या पत्रकार आणि ढोंगी विचारवंतांनी तरी याचा विचार करावा. कारण येणारा काळ फार निराळा आहे.

According to a report published on the Cobrapost website, the police force had succumbed to anti-Sikh sentiments, thus abetting rioting and arson, even encouraging rioters.

Some of the confessions made by the police officers who were interviewed during the sting operation: The Cobrapost interviewed police officers - Shoorveer Singh Tyagi, then Station House Officer (SHO) Kalyanpuri; Rohtas Singh, SHO Delhi Cantonment; SN Bhaskar, SHO Krishna Nagar; OP Yadav, SHO Srinivaspuri; and Jaipal Singh, SHO Mehrauli.

Delhi Police, Congress govt colluded during 1984 riots: Cobrapost

दुश्यन्त's picture

22 Apr 2014 - 1:31 pm | दुश्यन्त

@मंदार दिलीप जोशी,माहिती बद्दल धन्यवाद. शीख दंगल, आणीबाणीतील अत्याचार याबद्दल दुतोंडी पत्रकार नेहमीच गप्प बसतात.

विवेकपटाईत's picture

23 Apr 2014 - 7:22 pm | विवेकपटाईत

गुजरात आणि इतर राज्यात झालेल्या दंगलीत मूलभूत फरक :
१ गुजरात मध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदीने राजधर्माचे पालन केले जवळपास ११५ हून अधिक दंगे खोराना गोळीने उडविले.
दुसरी कडे
2.दिल्लीत ३५०० शीख मारल्या गेले एक ही दंगेखोर पोलिसांच्या गोळीने मेला नाही.
३. आत्ताच झालेल्या मुझफ्फरनगर येथे ७४ लोक मेले, पोलिसांनी एका ही दंगेखोराला उडविले नाही.
कोण अल्पसंख्याकांचा हितचिंतक आहे हे, कोणी राजधर्माचे पालन केले आपण स्वत: ठरवू शकतो.
४. शीखविरोधी दंग्यात दिल्लीतले लोक शिखांच्या विरोधात नव्हते. भाड्याचे 'त्या वेळी यमुनाकाठी हजारो झुग्ग्या होत्या', तिथून ट्रक मध्ये लोक भरून शिखांच्या वस्तीत लूट-पाट आणि हत्या करण्यासाठी पाठविले होते. या मागचे लोक कोण होते हे सांगायला नको. म्हणून कोणता ही दंगेखोर पोलिसांनी मारला नाही.

मजलिसे ओलमा-ए-हिंद के महासचिव मौलाना कल्बे जव्वाद ने कहा कि तमाम राजनैतिक दलों के नेताओं से उनकी मुलाकात होती है, जिसमें उनसे मुसलमानों की समस्याओं पर ही विचार विमर्श हुआ। उन्होंने यह बात धर्मगुरुओं की एक बैठक में कहा।

इस बैठक में मजलिसे ओलमा ने इस एलान का समर्थन किया कि काग्रेस पार्टी द्वारा मुसलमानों की दोषी होने के कारण कांग्रेस का ‌बहिष्कार जारी रहेगा।

बैठक में कहा गया कि देश की आजादी के बाद से कांग्रेस के शासनकाल में 60 हजार से भी ज्यादा फसाद हुए, लेकिन न किसी फसादी को सजा मिली और न ‌ही किसी पुलिस वाले को।

बैठक में धर्मगुरुओं ने मेरठ के हाशिमपुरा के फसाद पर बात करते हुए भी कांग्रेस को कोसा। कहा गया कि मुसलमानों का पीएसी के हाथों कत्लेआम को भला कैसे भूला जा सकता है।

धर्मगुरुओं ने आरोप लगाया कि इस कत्लेआम में कांग्रेस के तत्कालीन मुख्यमंत्री वीरबहाद़ुर सिंह का पूरा हाथ था। उन्होंने कहा, 'क्या हम यह भूल सकते हैं कि जमशेदनगर के फसाद के दौरान पुलिस अभिरक्षा में औरतों और बच्चों से भरी बस में आग लगा दी गई।'

'कांग्रेस के शासन में हुए 60 हजार फसाद'