भ्रमण जर्मनी.. ०४ - कलोन

यसवायजी's picture
यसवायजी in भटकंती
8 Jan 2014 - 1:28 am

--------------------------------------------------------------------------
भ्रमण जर्मनी.. ००
भ्रमण जर्मनी.. ०१ - म्युनिक
भ्रमण जर्मनी.. ०२ - साल्झबर्ग (ऑस्ट्रिया)
भ्रमण जर्मनी.. ०३ - नॉयश्वानस्टाईन कॅसल
--------------------------------------------------------------------------
जर्मनीत पोहोचल्यावर लगेच २ दिवसातच चपात्या करण्याचा कंटाळा आला होता. नंतर पंधरा दिवसानी तर साधा कुकर लावायचा म्हटलं तरी आमच्यात बाचाबाची व्हायची. बाहेरचं खाण परवडणेबल नव्हतं. आम्ही ज्या हॉटेलात होतो तिथं साधा नाश्ता करायचा म्हटलं तर चौदा युरो खर्चायला लागायचे. १४*८५ रु.???? माझं टिप्पीकल-मध्यमवर्गीय-कर्नाटकी-कुटुंबातलं-मराठी-मन हिशोब करु लागायचं. सकाळी नाश्त्याला मॅगी खायची वेळ आली. ऑफिसात जेवणाचे ८-१० काउंटर असायचे. पण एका ठिकाणी धड चव मिळेल तर शप्पथ. बिच्चार्‍या शाकाहारी दिल्लीकराला तर फक्त गवत, फळं, ज्युस आणी बटाटे यावर भागवावे लागे.
मी आणी एक मल्लू, जे मिळेल ते पोटात ढकलायचो. 'माणसं खातात ना, मग चालतं आपल्याला' म्हणत मत्स्य, वृषभ,वराहादी अवतार फस्त करायचो. पण उकडलेली कोंबडी नुसत्या मीठा आणी मिरीसोबर कशी आणी किती खाणार?
ऑफिसात ज्या दिवशी समोसे किंवा चिकन बिर्यानी होती त्या दिवशी Indian काउंटरवर झुंबड उडाली होती. 'आम्हाला पण थोडं शिल्लक ठेवा रेSS' म्हणावं लागलं. शेवटी संगम,ताज,राजा हिदुस्थानी यासारख्या खानावळी शोधुन काढल्या. कॉन्ट्री मारली की १५ ते २० युरोत रात्रीची पोटं भरायची. (तिथे भात अनलिमिटेड अन फुक्कट असतो. )

१. कभी खुशी, कभी गम.. आमचं मम्मं -

6 (4).DSC_1219
DSC_1221.DSC_0961.

कामानिमित्ताने कलोनला जायचा सुयोग आला. पश्चीम भागात असणारे Cologne (जर्मन-Köln) हे जर्मनीतील आकाराने चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. आपल्याला सर्वांना Eau de Cologne बद्दल माहिती असेलच.
माझे आजोबा हे अत्तर वापरायचे. आजोबांना सांगीतलं की, तुमच्या त्या अत्तरवाल्या कलोनला जाउन आलो. त्यांना कित्ती आनंद झाला.. आणी मलाही. त्यांची शाबासकी मिळाली की मला अजुन असाच आनंद होतो.. :)
आता हे अत्तर Procter & Gamble चे आहे. Eau de Cologne या फ्रेंच शब्दांचा अर्थ होतो- कलोनचे पाणी.

न्युरेंबर्गहून ट्रेनने सोमवारी सकाळीच कलोनला जाणार होतो. पहाटे हॉटेलातून बाहेर पडलो तोच चक्क मर्सीडीज नामक टॅक्सी आमची वाट पाहत होती. मनातल्या मनात त्या रथाला नमस्कार करत मी ती पायरी चढलो. सारथ्याने १८० च्या वेगाने घुमवत साडेतीन मिंटात स्टेशनावर पोहचवले. पहाटेचं सोडा.. स्साला दिवसा-ढवळ्या भर गावात १८० च्या स्पीडने गाड्या चालवतात ही माणसं..
क ह र !!
(मनातः- त्यात काय एवढं इशेष? एकतर हिरवा सिग्नल दिसला की वाटेत कुण्णी येणार नाही (अगदी कुत्रंसुद्धा) याची खात्री असते ना.., रस्त्यात गोमातांच्या मिटींगा चालत नाहीत, "वनवे'त हेडलाईट लावला की प्रवाहाच्या विरुद्द दिशेने जाता येतं" हे कुणाच्या गावी पण नाही, खड्यात मधे-मधे रस्ते न बांधता त्या उलट औषधाला पण खड्डे ठेवले नाहीत, आणी 'शिस्त ही पाळायची गोष्ट आहे' असं वाटतं त्यांना.. :D >>
या म्हणावं लक्शुमी रस्त्यावर!! फक्त सर्कीट नाहीत म्हणुन..नाहीतर सगळे शुमाकर व्हायच्या लायकीचे आहेत.)

२. एका जनतागाडीने (फोक्सवॅगनने) दिवसा, गर्दीच्या वेळेत, गावातल्या रस्त्यावर घेतलेला वेग - कॅचमीइफयुकॅन..

2 (3)

त्या वेगाची आता सवयच झाली होती. आमची ट्रेन ICE (InterCityExpress) होती. या ICE ट्रेन 370 kmph ने धावू शकतात. आमच्या ट्रेनने २४० चा वेग गाठला होता. बाहेरचं दृष्य पाहायचं सोडुन झोपायचे उद्योग याआधी केले नव्हते, पण कलोनला पोहोचल्यावर क्लासरुम ट्रेनींगमधे झोपल्यापेक्षा ट्रेनमधे झोपलेले बरे म्हटले. लॅपटोपच्या बॅगांना साखळ्यांची गरज नाही याची खात्री होती. बिंधास्स होतो.. पण.. कलोनला पोहोचलो आणी एकदम शॉक लगा लगा लगा.. शॉक लगा.. एका कलीगचे वॉलेट गायबले होते. कुणी मारले असेल? मर्सीत पडले का ट्रेनमधे? आपली रेल्वे असती तर पळत पळत जाउन शोधून आलो असतो. तो तर पार घाबरला होता.. पैशापेक्षा महत्वाची कर्डं आणी लायसन्स होते.
पण आभार त्या सिस्टीमचे, स्टेशनवर तक्रार नोंदवली आणी ४ दिवसात मुद्देमालासहीत पाकीट हॉटेलात परत.. ब्बास्स.. आहा आहा.. और क्या चाहिए??

३. जर्मनीच्या प्रेमात पडायला अजुन एक कारण.. InterCityExpress.

DSC06073

कलोनात बरेच वेगळे अनुभव आले. इथले रस्ते, इमारती सगळंच बवेरीयापेक्षा वेगळं वाटत होतं. मेट्रोत टॅटू-पियर्सींग केलेले, बिना शर्टाची फिरणारे सलमान पाहायला मिळत होते. साळकाया-माळकाया तिकडे लक्षपण देत नव्हत्या, "तुझा मुडदा बशीवला" वगैरे शिव्या देण्यात त्यांना काही रस दिसला नाही.

४. ग्राफिटी - गावातल्या, सबवेतल्या बर्‍याच भिंती स्प्रे-पेंट केल्या आहेत. कलाकार आहेत एकेक..
कला / सौंदर्य -

DSC05972

ह्हेSS..
हारली रं हारली.. हारली रे हारली..

IMG_4604

र्‍हाईन नदीच्या काठी वसलेले कलोन पुर्वीपासून एक महत्वाचे बंदर व वाहतुक केंद्र मानले जायचे. इथे २००० वर्षापासूनचा इतिहास सांगणारे पुरावे मिळाले आहेत. पुर्वी फ्रेंचांची सत्ता होती. दुसर्‍या महायुद्धात सर्वात जास्त बॉम्बीन्ग या शहराने झेललं. जवळपास ९५ टक्के लोकसंख्या यामुळे कमी झाली (स्थलांतर मोठ्या प्रमाणात झाले) आणी जवळजवळ सगळं शहर उध्वस्त झालं होतं. महायुद्धाच्या पुर्वी जवळपास ११००० च्या संखेने असणारे ज्यू, शेवटी एकतर मारले गेले होते किंवा त्यांची हकालपट्टी झाली होती.
तरी बर्‍याच जुन्या इमारती परत बांधण्यात आल्यात. हे बांधकाम १९५० पासून १९९० पर्यंत चाललं होतं. जुन्याची आठवण ठेवत, नव्याचा स्विकार करणारं शहर हौशा-गौशांनी भरलंय. पण आमच्या दुर्दैवाने फिरायला शनी-रवी मिळाला नाहीच. फक्त ऑफिस सुटल्यावर संध्याकाळी बाहेर पडायचो, गावभर हिंडुन रात्री-अपरात्री हॉटेलात परत. :(

खालचा फोटो न्युरेम्बर्गच्या एका संग्रहालयात काढलाय. महायुद्दातली हानी दाखवणार्‍या या फोटोत र्‍हाईन नदी, कलोन कॅथेड्रल आणी Hohenzollern Bridge, त्याची युद्धात लागलेली वाट.. दिसत आहेत.

५. हिटलर, नाझी,अन महायुद्धातली 'आग' म्हणजे जर्मनी..

DSC01663

६. आणी सध्य-परिस्थीती- नव्या जोमाने पुन्हा उभा राहिलेला जर्मनी..
राख...., पुन्हा पेटलेला 'चिराग' म्हणजे जर्मनी..

DSC06043

र्‍हाईन नदीचा उगम स्विस आल्प्समधे होतो. ती जर्मनीतून पुढे नेदरलॅन्डमधे जाते. कलोनचे शेजारील शहर ड्युसेलडॉर्फ हे सुद्धा याच नदीच्या काठावर आहे. आणी ते सुद्धा एक मोठे बंदर आहे. 'सख्खे शेजारी आणी पक्के वैरी' असणारी ही शहरे बियर, कर्नीव्हल्स आणी फुटबॉल यावर कायम भांडत असतात. कलोनच्या बियरला कोल्श, तर ड्युसेलडॉर्फच्या बियरला आल्ट म्हणतात. इकडे ती आणी तिकडे ही बियर ऑर्डर करणे म्हणजे चेष्टेचा विषय होऊ शकतो.
कोल्श भाषा सुद्धा असल्याने, अशी एकमेव आहे की जी आपण पिऊ शकतो असे म्हटले जाते.
या नदीतुन मोठ्या कार्गो शिप्स जाताना बघायला आवडले. काठावर कितीही बसुन राहिलो तरी वेळ सहज निघुन जातो.

७. र्‍हाईन आणी माल वाहतुक करणार्‍या बोटी-- एवढ्या मोठ्या पात्राच्या नद्या मी (पुराखेरीज) पाहिल्या नव्हत्या..

DSC06038

८. पूल टू धमाल.. पूल आणी कुलपे-
याच नदीवर असणार्‍या Hohenzollern Bridge वर रेल्वे धावतात. जवळपास अर्धा किलोमिटर लांबी असेल. इथे एक इंटरेस्टींग गोष्ट पहायला मिळते. या संपुर्ण पुलावर आतल्या बाजुने तारांची एक जाळी आहे. याला असंख्य रंगी-बेरंगी, आकर्षक कुलपं लावली आहेत. चौकशी केल्यावर समजले की, प्रेमात पडलेली आणी नुकतच लग्न झालेली जोडपी इथे येतात आणी या कुलपांवर आपले नाव, बदाम, तारीख वगैरे कोरुन ती इथे अडकवतात. हो.. इथे-तिथे माणसं सारखीच की.. आपले वासु-सपना किल्याच्या भिंतीवर विटांनी नावे कोरतात अगदी तस्सेच. फकस्त फर्क इतनाइच है के, कोल्श लोक्स थोडे इस्टाईलसे करतात. कुलुपात अडकल्यावर किल्ल्या र्‍हाईनला अर्पण केल्या जातात.
पण आजकाल मुळात कुलपांवर विश्वास कितपत ठेवायचा हाच मोठा प्रश्न आहे.. :(
हे प्रकार बर्‍याच ठिकाणी पहायाला मिळातात. या कुलपांना 'पॅडलॉक्स' म्हणतात.

DSC06018

थोड्याच जागा शिल्लक..
हरी अप..

DSC06042

DSC06035

९. इथे अजुन एक गम्मत बघायला मिळाली. दोन मुली कटर घेउन आल्या होत्या. लगेच तिथल्या पादचार्‍यांच्या मदतीने त्यांनी एक कुलुप कापायला सुरुवात केली. कुलुप नदीत फेकताच, एकीच्या डोळ्यात डेन्युब-र्‍हाईन उभ्या राहिल्या होत्या. बाजुला पाहिले तर.. तिथली र्‍हाईनमाई सुद्धा संथ वाहत होती.. 'पुलावरच्या सुख-दुखांची जाणीव' तीला पण नव्हती..

DSC06015

आम्ही याच भागात २-३ वेळा आलो. नदीच्या काठावर बसायचो. एकदा पुलावरची फुलं पाहण्यात गुंग झालो होतो, तेवढ्यात एक खरंखुरं गुलाबाचं फुलं नाकासमोर आलं. ते फुल ज्या मुलीच्या हातात होतं ती सुद्धा गुलाबासारखीच होती.. अगदी टवटवीत.. आता एवढी स्माईल देत समोर आलेल्या फुलाला नाकारायची हिंमत कोणाकडे? आणी टिव्हीत पाहिले होते की बाहेर अशीच Free Hugs वगैरे मिळतात. आमच्या नशीबात फुल नाही तर फुलाची पाकळी.. ;) ते घेताक्षणी ती म्हणाली "वन युरो प्लिझ.." मला एक काटा टोचलाच. च्यायला गुलाबाचं फुल ८५ रुपैला? अजुन १५ रुपये घातले तर कुंडीसकट मिळंल की.. (नोट- मराठीतली कुंडी)
मी निर्लज्जासारखे फुल परत केले. ती पण निर्लज्जासारखी "डान्के-चूस" (Danke Chus म्हणजेच थॅन्कयू-गूडबाय) म्हणाली. का कुणाला म्हाईत, पण.. बायदवे, tschüss हे चॉव (chow) चेच जर्मन रुपडे आहे.

१०. कलोन कॅथेड्रल - (Kölner Dom)
मेन स्टेशनामधुन बाहेर पडताच, आपल्याला हा भव्य-दिव्य Dom दिसतो. पुर्ण फोटो येण्यासाठी दूर उभे राहुनच फोटो काढावा लागतो. या रोमन कॅथोलीक चर्चचं बारच्या शतकात चालू झालेले बांधकाम पुढे ६०० वर्ष चालू होतं.
जर्मनीतली Most visited landmark म्हणून ही जागा प्रसिद्ध आहे. रोज साधाररण २० हजार पर्यटक येथे भेट देतात..
इथल्या जवळच्या रस्त्यांवर बरेच भटकलो. एका ठिकाणी Dunkin donuts परवडणेबल दरात मिळायचे. पोटभर खायचो. मॉलमध्ये वगैरे फिरलो. 'जर्मनीत खरेदी करु नका' असा सल्ला ऑफिस कलिग्जनी का दिला होता ते समजले.

खालच्या फोटोतली माणसे (भिंगाखाली धरुन) पाहिली की या वास्तूची भव्यता लक्षात येइल.

DSC05994

या चर्चला दोन उंच मनोरे आहेत. बाहेरच्या पायर्‍यांवर अनेकदा काही गृप आपली कला सादर करीत असतात. आम्हाला आत जाउन चर्च पाहता आले. पण संध्याकाळी वेळाने गेल्यामुळे या मनोर्‍यामधल्या पायर्‍या चढून वर जाता आले नाही. वरुन नदी आणी कलोन शहराचा नजारा मस्त दिसतो म्हणे.
आत काचांवर छान चित्रे काढली आहेत.
अंदरसे आणी बाहरसे -

DSC05979

DSC05959

DSC05958

DSC05982.DSC05976

१०. जगात भारी अशी "बियर अ‍ॅट इट्स बेस्ट" म्हणजे जर्मनी..
नदीकाठी बर्‍याच मधुशाला आहेत. आमचा कलीग आम्हाला एका गुहेसारख्या वाटणार्‍या Gilden Im Zims मधे घेउन गेला होता. आधुनिकता आणी परंपरा यांना जोडणारा हा पब अलिकडचाच असला तरी खूप प्रसिद्ध आहे. प्रवेश करताच फक्त 'आहा' अशी भावना.. संगीत, कलर्स, लाइट्स, चित्रे, आणी बघण्यासारखं बरच काही आहे. एखाद्या ऐतीहासिक,पौराणीक संग्रहालयात गेल्यासारखं वाटतं. एकावेळी हजार्-बाराशे पिणार्‍यांची व्यवस्था करतो हा पब.

या फोटोत दिसतोय अशा लहान, उभट ग्लासात बियर मिळते. काय ती 'साकी', काय तो 'माहोल', काय ती 'बियर'.. आणी विशेष म्हणजे या साकी आपले ग्लास संपले रे संपले की (तुम्हाला डिस्टर्ब न करता) लगेच दुसरे ग्लास ठेउन जातात. जाता जाता एका कागदावर फुली मारुन जातात. (चार उभ्या आणी एक तिरकी रेघ अश्या मोळ्या बांधतात.) काही वेळाने आपल्याला त्या साकीची जुळी बहिणसुद्धा दिसू लागली की मग आपण 'बास कर बाई आता' म्हणू शकतो किंवा ग्लासाखालखी कागदी चकती ग्लासावर ठेवली तरी तीला 'बिल आणायचंय' हे समजतं.
इथे माझी ऑर्डर गंडली होती. चुकुन एक अख्खी फक्त उकडलेली कोंबडी ताटात आली. करवतीने कापुन खाता-खाता नाकी नऊ आले होते.

Gilden Im Zims पब आणी कोल्श बियर -

DSC05969.DSC05968

११. नदीच्या काठावर अजुन एक चर्च आहे.

DSC06006

शनवारवाडा आणी बाजीराव - ;)

IMG_4721.DSC05966

(कर्मश्या..)

---------
|| SYG ||
---------

प्रतिक्रिया

मधुरा देशपांडे's picture

8 Jan 2014 - 3:34 am | मधुरा देशपांडे

मस्त. हाही भाग आवडला. जर्मनीच्या गंगा यमुना म्हणुन डेन्युब-र्‍हाईनची उपमा भारीच.
बाकी समोसा वगैरे ऑफिसमध्ये हे वाचून मात्र जळफळाट झाला. एवढेही मिळत नाही माझ्या हाफिसात. :(

अर्धवटराव's picture

8 Jan 2014 - 4:00 am | अर्धवटराव

तुम्ही फारच हसीन करुन सांगत आहात. मस्त.

खटपट्या's picture

8 Jan 2014 - 5:08 am | खटपट्या

कुलुपांची कल्पना खूपच छान

चौकटराजा's picture

8 Jan 2014 - 9:08 am | चौकटराजा

जगातील अत्यंत नामवंत कथेड्रल पैकी एक कलोनला आहे. बाकी मिलान, फ्लोरेन्स, रोम व लंडन येथे. याही भागातील फोटो
उत्तम. वर्णनही वास्तव व खुसखुशीत. गुगल अर्थ मधे कलोन फार हिरवेगार व सुंदर दिसते.
आणखी फटू टाका की राव !
बाकी मस्त !

इरसाल's picture

8 Jan 2014 - 9:48 am | इरसाल

मी मिलान च्या कॅथेड्रलला गेलोय.तसेच फोटो नं. ७ मधल्या मागे दिसणार्‍या डसेलडॉर्फच्या पुलावरुन प्रवासाचीही संधी मिळालीय.

यसवायजी's picture

8 Jan 2014 - 2:36 pm | यसवायजी

७ नं.चा तो पुल कलोनमधला आहे. (वरच्या पॅरा मधे वर्णन थोडं गोंधळलय वाटतं)

यसवायजी's picture

9 Jan 2014 - 10:44 am | यसवायजी

DSC05988

DSC05963.DSC05960

DSC05957

यसवायजी's picture

9 Jan 2014 - 10:49 am | यसवायजी

Objects in the mirror are smarter than they appear. ;)

DSC05984

आह्हां रं सय्ज्या ... म्या बघितलं तुला त्या आरश्यात ! ;)
पट्ट्या पट्ट्याचं पांढरं टीशर्ट घातलयस .... आन ती इव्लुशी मान वाकडी करुन रीकाम्या
पलंगाचे फोटु काढ्तुय्स ...

:D

यसवायजी's picture

9 Jan 2014 - 11:08 pm | यसवायजी

मला वाटलं की, 'दिसला ग बाई दिसला' गानं म्हंशील.. :D

पियुशा's picture

8 Jan 2014 - 10:43 am | पियुशा

सुपर्ब !!
पु.भा.प्र. ;)

जेपी's picture

8 Jan 2014 - 11:04 am | जेपी

*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:

मस्त खुसखुशीत लिहीता तुम्ही!

ऑफिसात ज्या दिवशी समोसे किंवा चिकन बिर्यानी होती त्या दिवशी Indian काउंटरवर झुंबड उडाली होती. 'आम्हाला पण थोडं शिल्लक ठेवा रेSS' म्हणावं लागलं.

ही झुंबड तुमचीच होती की जर्मनांची?

यसवायजी's picture

8 Jan 2014 - 5:24 pm | यसवायजी

'आम्हाला पण थोडं शिल्लक ठेवा रेSS'
असे मी जर्मन्सना म्हणालो. :)

परिंदा's picture

8 Jan 2014 - 5:56 pm | परिंदा

वाटलेच मला!

मी इंग्लंडमध्ये असताना दिवाळी निमित्त ऑफिसमधल्या भारतीयांनी इतर ब्रिटीश कलीगसाठी पार्टी ठेवली होती, तेव्हादेखील असाच समोश्यांचा फडशा पडला होता. :)

यालोकांना समोसे एवढे आवडतात तर मग हे लोक बर्गरच्या नादी का लागतात तेच कळत नाही. कदाचित आपल्या लोकांना समोश्यांचे नीट मार्केटिंग करता येत नसावे.

अतिशय खुसखुशीत बे यसवायजी!!!!!! ठीकठिकाणचे पञ्चेस वाचता वाचता अन तितकेच भारी भारी फटू पाहता पाहता मस्त वाटलं एकदम. :)

यसवायजी's picture

8 Jan 2014 - 5:41 pm | यसवायजी

धन्स ब्याट्या.. आणी चिअर्स.. *drinks*

स्वाती दिनेश's picture

8 Jan 2014 - 3:36 pm | स्वाती दिनेश

'कल्चरल सिटी ऑफ जर्मनी' असे म्हणतात क्योल्नला.. येथील क्रिसमस मार्केट फार प्रसिध्द आहे.
आणि तेथील चॉकलेट फॅक्टरीला व्हिजिट दिली की नाही?
स्वाती

छोटा डॉन's picture

8 Jan 2014 - 3:42 pm | छोटा डॉन

जर्मनी छानच आहे ह्यात वादच नाही पण ते दाखवण्याची आणि सांगण्याची तुमची शैलीही झकक्कास आहे.
लेखमाला वाचतो आहे, शुभेच्छा.

जाता जाता, तेवढं ते म्युनिकमधलं बायर्न म्युनिकचं 'अलायन्स अरेना' हे ग्राउंड पाहुन या हो, साला ते आमचं मिस्स झालंच. आणि तिकडे पेप गुर्डियालो भेटले तर त्यांना आमच्या चेल्सीकडुन प्रेमाचा एक गालगुच्चा घ्या ;)

- छोटा डॉन

बाप्पू's picture

8 Jan 2014 - 4:53 pm | बाप्पू

फोटो आणि वर्णन आवडले.
त्या मुलीने ते कुलूप काढले ? म्हणजे कुलूप लावण्याबरोबर कुलूप तोडण्यामागे पण काही कारण आहे का?

अवांतर: जर्मनी च्या लोकांचा हिटलर बाबत काय दृष्टीकोन आहे ? ते त्याला हिरो मानतात कि विलन ?

कपिलमुनी's picture

8 Jan 2014 - 5:51 pm | कपिलमुनी

सुंदर प्रवास वर्णन !

सूड's picture

8 Jan 2014 - 6:07 pm | सूड

मस्त !!

>>(नोट- मराठीतली कुंडी)
हे वाचल्यानंतर हसू किती आवरावं लागलं असेल हे लिहून सांगता येणार नाही. :))))

हितनं फुडं तुमचं धागं हापिसात वाचनार न्हाय. कुटंबी पंच टाकता राव.

विशाल चंदाले's picture

8 Jan 2014 - 6:14 pm | विशाल चंदाले

मस्तच हो, मज्जा आली.

यशोधरा's picture

8 Jan 2014 - 6:37 pm | यशोधरा

मस्त लिहिलंय! आवडलं :)
>> तर कुंडीसकट मिळंल की.. (नोट- मराठीतली कुंडी) >> अग्गागा!

दिपक.कुवेत's picture

8 Jan 2014 - 6:44 pm | दिपक.कुवेत

फोटो आणि वर्णन. दिल खुश हो गया!

ये सय्ज्या भारी लिवलय्स हं ! मागचे भाग आज दिवसभरात वाचुन काढणार
एकंदरीत लेखन रसरंगित ......

प्यारे१'s picture

8 Jan 2014 - 8:46 pm | प्यारे१

जर्मनीला जायला पायजे आता!

बाकी हिटलरचं नाव कुणी काढत नाहीत म्हणे.

यसवायजी's picture

8 Jan 2014 - 8:59 pm | यसवायजी

हो. मी अगावपना करत हिटलरचा इशय काडला हुता. पन त्यो इशय टाळत म्हनला "talk to you later".

तुमच्या जर्मनवारीला आमच्या मंडळातर्फे शुभेच्छा.

वर्णन आणि फोटो दोन्ही आवडलं.

यसवायजी's picture

10 Jan 2014 - 11:05 pm | यसवायजी

@ मधुरा देशपांडे - जवळच्या एका पंजाब्याच्या शॉपमधे समोसा ४ युरोला मिळायचा. इतरत्र सुद्धा इतके महाग असतात काय भारतीय पदार्थ?

@ स्वाती दिनेश - चॉकलेट फॅक्टरी बद्दल ऐकले होते. पण त्यावेळेस जमलं नाही. :(

@बाप्पू - वर सांगितल्याप्रमाणे, एकीच्या डोळ्यात गंगा-जमुना उभ्या राहिल्या होत्या. तर कारण तसेच काही असेल. (मी विचारलेही नाही ;) )
आणी हिटलरबद्दल एकदाच विचारल्यावर जी रिअ‍ॅक्शन होती ती पाहुन, पुन्हा कुणाला विचारायचं धाडस झालं नाही.

@ सुड, यशोधरा - :D कनडा बरुत्ते निमगे???

अर्धवटराव, खटपट्या, चौकटराजा, इरसाल, पूजा पवार, पियुशा, तथास्तु,
छोटा डॉन, कपिलमुनी, दिपक, विशाल, प्यारे१, अतिवास --
आणी सर्वांना..

धन्यवाद्स अ लॉट..

मधुरा देशपांडे's picture

11 Jan 2014 - 2:26 am | मधुरा देशपांडे

हो साधारण सगळीकडेच हीच किंमत असते. आणि तेही मोठ्या शहरातच इतके सहज मिळतात . आणि शिवाय बरेचदा चव आणि दर्जा अगदीच सुमार. प्रत्येक वेळी असे काही खाल्ले की वडा पाव किंवा तत्सम भारतीय चाट वगैरे ची गाडी टाकावी असे वाटते.

अवांतर: जर्मनी च्या लोकांचा हिटलर बाबत काय दृष्टीकोन आहे ? ते त्याला हिरो मानतात कि विलन ?

हिटलर विषयी आणि एकंदरीतच नाझी राजवट, युद्ध याविषयी हे लोक अजिबात बोलत नाहीत. प्रचंड राग, वैषम्य, खेद हे सगळेच आहे आणि निषेध व्यक्त करण्यासाठी मौन बाळगणे हीच पद्धत सगळीकडे दिसते. अगदी गाडीच्या नंबर प्लेट वरही 'एस एस' वगैरे आद्याक्षरे कुणीही वापरत नाही. स्वस्तिक सुद्धा सार्वजनिक ठिकाणी काढता येत नाही. सरकार आणि नागरिक सगळेच या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये याची हरप्रकारे काळजी घेतात.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Jan 2014 - 1:02 am | निनाद मुक्काम प...

लेख आवडला.
मला म्युनिक पेक्ष्या कलोन मध्ये राहणे आवडले असते.
तुझ्या लेखाने जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला.

चॉकलेट फॅक्टरीच्या माहितीसाठी पेश्शल धन्यवाद भावा.. :)