हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वतःचाच पंजा खूप भिववतो
वर्षानुवर्ष विश्वासलो ज्यावर
तोच हल्ली घाबरवतो
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वत:चाच पंजा खिसा कापतो
दोन भा़ज्या जास्त खातोस रे हावरटा
असे म्हणून धमकावतो
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वतःचाच पंजा चिडवतो
गाडी घेतलीस काय रे साल्या म्हणून
हळुच इंधनाचे दर वाढवतो
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वतःचाच पंजा हिणवतो
९५ टक्के मिळाले का रे तुझ्या पोरांना म्हणत
५०% वाल्याला डोक्यावर बसवतो
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वतःचाच पंजा गंध पुसू पाहतो
नारळ फोडतोस का रे भाड्या म्हणत
लगेच अंधश्रद्धेचे लेबल लावतो
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वत:चाच पंजा गळफास लावतो
कधी शेतावर तर कधी शहरात
आत्महत्या करायला लावतो
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वत:चाच पंजा वस्त्र फेडतो
दिवस-रात्र-जात-धर्म निरपेक्ष
अब्रूहीन जगायला लावतो
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वत:चाच पंजा फितुर होतो
कधी स्वकीयांवर अत्याचार
तर कधी परक्यांना 'आधार' देतो
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वत:चाच पंजा माझा इतिहास पुसतो
माझी तलवार म्यान करुन
इतरांची दाढी कुरवाळतो
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वतःचाच पंजा धमकावतो
ताई माई अक्का म्हणत म्हणत
दर पाच वर्षांनी फसवतो
---------------------------------------------------
पण आता नाही घाबरणार
पंजाला नाही जुमानणार
निरुपयोगी अन् त्रासदायक अपेंडिक्ससारखे
त्याला कापून काढणार
---------------------------------------------------
- मंदार
०५.०१.२०१४
पौष शु. ५, गुरु गोविंद सिंग जयंती
प्रतिक्रिया
5 Jan 2014 - 4:17 pm | पैसा
:) पण खराटा धरायला पंजाच लागतो ना भौ? ;)
5 Jan 2014 - 4:20 pm | मंदार दिलीप जोशी
:D
6 Jan 2014 - 7:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मग कमळाकडे पाहा. बाकी, मंदारशेठ अजून येऊ द्या सुंदर कविता.
इतनी मिलती है मेरी गजलो से सूरत तेरी
लोग तुझ को मेरी महबूब समझते होंगे.- बशीर बद्र.
8 Jan 2014 - 11:09 pm | विजुभाऊ
कमळा दिसायला कशी आहे हो?
8 Jan 2014 - 12:19 pm | बर्फाळलांडगा
.
8 Jan 2014 - 12:50 pm | दर्यावर्दी
तुमचा पंजा तूमी कापल्यानंतर तूम्ही किती गोष्टींना मूकणार आहात याचा फक्त विचार करुनच मी सुन्न झालो आहे...
असो, गरज लागली तर माझा पंजा उधारीवर द्यायला मी तयार आहे.
8 Jan 2014 - 12:54 pm | बर्फाळलांडगा
अग्गागा! वार्ल्या गेलो आहे coz I don't think it's legal anymore
8 Jan 2014 - 12:57 pm | दर्यावर्दी
काय रे बॅट्या तू लांडगा कधी झालास?
8 Jan 2014 - 1:06 pm | बर्फाळलांडगा
.
8 Jan 2014 - 12:51 pm | तिमा
आपल्या हाताचाच काय,वाघाचा पंजाही आताशा घाबरवतो! इंजिन अंगावरुन जाईल अशी भीति वाटते, हत्तीच्या पायी देतील अशी भीति वाटते, कमळातला भुंगा कानांत शिरेल अशी भीति वाटते आणि या सर्वांपासून दूर पळावे म्हणून झाडू हाती घ्यावा तर त्याचे 'हीर' नाकांत घुसतील अशी भीति वाटते.
8 Jan 2014 - 12:56 pm | दर्यावर्दी
मुळव्याधीवर एक कमलतैलमोदम नावाचे जालीम औषध आहे ,रोज लावत चला.
8 Jan 2014 - 3:06 pm | सचीन
*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:
10 Jan 2014 - 11:12 am | हतोळकरांचा प्रसाद
एक स्मायली राहिली वाटतं!! न्हाय मंजी धा तोंडाच्या धा बऱ्या असतात, कसं? ह्याह्याह्या….
10 Jan 2014 - 5:03 pm | प्यारे१
एक तोंड 'आलं' असेल. ;)
तोंड आल्यावर हसताना त्रास होतो.
तोंड येण्याचं एक कारण ... असतंय काहीतरी!
शाला शब हम बतायेगा तो टुम क्या करेगा? ;)
10 Jan 2014 - 8:43 pm | सचीन
*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:*lol*
8 Jan 2014 - 3:14 pm | मदनबाण
कविता आवडली...
8 Jan 2014 - 4:34 pm | सचीन
नवल आहे
10 Jan 2014 - 8:44 pm | सचीन
कोण हे फडणवीस?
8 Jan 2014 - 10:11 pm | मुक्त विहारि
छान आहे...
आवडले.
10 Jan 2014 - 3:39 pm | उद्दाम
मायबोलीच्या पंजाने अर्धचंद्र दिलेले ते तुम्हीच का?
:)