टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
उघडी पाठ
स्वाती ताईंची हिरवी जिद्द बघून आमच्या वस्तिगृहातील काही आठवणी हिरव्या झाल्या
रद्दीच्या साठलेल्या थरात....
मासिकाचा बोटभर तुकडा शोधून,
टंच टंच दिसणार्या जाहिराती मधल्या
वितभराच्या कपड्यात....
किती ग सुंदर दिसतेस!
तुझ्या एका उघड्या पाठीनं
''जीव शिंपडलाय या देखाव्यात''
शरीराला घट्ट धरून ठेवणारी तुझी वसनं...
आणि पांढर्या शुभ्र 'पार्श्व'भूमीवरच..
तो टोकाचा हसरा काळा तीळ,
म्हणजे सौंर्दयाचा कळस!
आहा...!
डोळे अगदी तृप्त झाले तुला पाहून.
बर आहे..., तू चित्रात आहेस!,
अशीच राहशील कायम...
अशीच राहील तुझी कमनीय काया,
तुझ कोवळे पण..
तुझी उघडी पाठ!
न जराठता, कोमेजता!
=====================
केशवसुमार............ १९-०७-२००८
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

ठीक आहे
विडंबन ठीक आहे पण तेवढी मजा नाही. मुळ कविताच जास्त चांगली वाटतीय.
बेलाचा प्रयत्न देखील समजला नाही
दुर्दैव :(
बेलाचा प्रयत्न देखील समजला नाही
)
दुर्दैव माझे. कवितेचा अर्थ कवीला स्वतःलाच समजवावा लागणे हे कवीचे दुर्दैवच नव्हे काय?
सगळ्या कवितेचा थोडक्यात अर्थ - मेक्-अप् करणार्या पत्नीकडे/प्रेयसीकडे पाहून पतीच्या/प्रियकराच्या मनात आलेले विचार;बाकी काही खास नाही.बाकी ओठांशी मस्ती करणे,निर्या सांभाळणारी बोटे,बटा,फूल वगैरे सगळी सौंदर्यदृष्टी (जे न देखे रवी ते देखे कवी; आता एका कवीच्या बायकोसाठीची सौंदर्यदृष्टी वाचकांकडेही आली,तर कवीची पंचाईत की हो
(दुर्दैवी)बेसनलाडू
ते लौकिकार्थानं विडंबन नाही. फडणीस बाईंच्या कवितेचा सैल फॉर्म आणि काही शब्द व/वा ओळी जसेच्या तसे/जशाच्या तशा उचलल्या म्हणून फक्त विडंबन म्हटले/म्हणायचे. नाहीतर त्याच्या डोलार्यावर उभी असलेली स्वतंत्र कविताच
(कवी)बेसनलाडू
फडणीस
फडणीस बाईंच्या कवितेचा सैल फॉर्म आणि काही शब्द व/वा ओळी जसेच्या तसे/जशाच्या तशा उचलल्या म्हणून फक्त विडंबन म्हटले/म्हणायचे. नाहीतर त्याच्या डोलार्यावर उभी असलेली स्वतंत्र कविताच
ती रचावी असे वाटणे हे माझ्या कवितेचे श्रेय
हाहाहा..
अहो.. वाचकांना ओरिजनल वाचायला तरी वेळ द्या ना...
आवडले विडंबन..
स्वगत : केश्याचं काही खरं नाही आता..जपून बरं..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
काही बदल्[बघा कसे वाटतात]
रद्दीच्या साठलेल्या थरात....
गुळगुळीत कव्हरच मासिक शोधून,
चकचकीत दिसणार्या मुखपृष्टा वरल्या
वितभराच्या तुकड्यावर....
किती ग टच्च दिसतेस!
तुझ्या एका उघड्या पाठीनं
''जीव ओतलाय या मासिकात''
शरीराला घट्ट बिलगलेली तुझी वसनं...
आणि काळ्य-पांढर्या 'पार्श्व'भूमीवरच..
तुझ रंगीत चित्र,
म्हणजे सौंर्दयाचा कळस!
आहा...!
डोळे अगदी तृप्त झाले तुला पाहून.
बर आहे..., तू चित्रात आहेस!,
अशीच रहशिल कायम...
अशीच राहील तुझी कमनीय काया,
तुझ कोवळे पण..
तुझी उघडी पाठ!
न जराठता, ओघळता!
=====================
केशवसुमार............ १९-०७-२००८
ह्म्म्म्म
एम्.एफ. हुसेनने हम आप के हैं कौन मधल्या उघड्या पाठीच्या माधुरीचे चित्र काढण्यापूर्वीचे हे त्यांचे मनोगत वाटते
;पण त्यांत तीळ शोभायचा नाही.सौंदर्यपूर्ण आणि शारीर - दोघांपैकी कुठेही एकाकडे अति न झुकता - यांच्यातला वरणभात-बिर्याणी चवीचा फरक सांभाळता आला म्हणजे झाले.
केसुशेठ,
उघडी पाठ आणि तीळ आवडला.स्वातीताईंची गुळगुळीत कव्हरची मासिकं सुद्धा (सगळ्यांना) आवडण्यासारखी(च) आहेत
(चवदार)बेसनलाडू
वा!
बेसनशेठ,
जरा सांभाळुन रहायला हवे उगाच उघडे पडायचो
माझ्या अगदी मनातल ओळखलतं तुम्ही.. क्या बात है!
हे विडंबन लिहीतान एम.एफ. हुसेनने काढलेल्या हम आप के हैं कौन मधल्या उघड्या पाठीच्या माधुरीचेच चित्र होते
(सहमत)केशवसुमार
स्वगतः तो तात्या सहीवरून स्वभाव सांगतो तसे ह्या लाडवाला विडंबनावरून विडंबनकाराच्या मनात काय चालय कळते की काय ?
धन्यवाद!!
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार..
(आभारी)केशवसुमार
आणि
आणि पांढर्या शुभ्र 'पार्श्व'भूमीवरच..
तो टोकाचा हसरा काळा तीळ,
म्हणजे सौंर्दयाचा कळस!
वा! सुंदर...
आपला,
(रसिक) तात्या.
हं
तीळ आवडला..
. अशी पाठ आवडेलच
;)
बाकी विडंबन ओके ओके
-('मिसळ'लेला) ऋषिकेश