बेधुंद मनीचे बोल
निसटून चालले होते
चंचलशा त्या लहरींना
मी हळूच टिपले होते
ते बोल खुळेसे काही
अविचल त्या अस्फुट तारा
वळणाशी भिरभिरणारा
तो सोसाट्याचा वारा
बांधून कधीचे ज्यांना
मी उरात जपले होते
मी बोल बोलता सारे
अस्तित्वच बहिरे झाले
अविभाव आर्त स्वत्वाचे
ते अजून गहिरे झाले
जिद्दीच्या तेज कणांनी
आयुष्य रापले होते
त्या उधाणलेल्या लहरी
संकोच गोठवुन गेल्या,
विझलेल्या सामर्थ्याला
अवचीत पेटवुन गेल्या...!
मी ध्येय गाठले तेव्हा
हे भान हरपले होते...
© अदिती शरद जोशी
प्रतिक्रिया
28 Nov 2013 - 4:45 pm | अत्रुप्त आत्मा
अता हे गीत गुणगुणत मी कोणत्या गल्लीत गेलो पहा....
"ती गेली तेंव्हा रिमझीम,पाऊस निनादत होता..." :)
परफेक्ट व्रुत्त ,घट्ट मात्रा..
ये इसका कम्माल है|
भावना आणी आशयही सुंदर आहे.
28 Nov 2013 - 4:45 pm | अत्रुप्त आत्मा
अता हे गीत गुणगुणत मी कोणत्या गल्लीत गेलो पहा....
"ती गेली तेंव्हा रिमझीम,पाऊस निनादत होता..." :)
परफेक्ट व्रुत्त ,घट्ट मात्रा..
ये इसका कम्माल है|
भावना आणी आशयही सुंदर आहे.
2 Dec 2013 - 10:35 am | पैसा
सुरेख रचना!
अवांतरः तुमच्या नावामुळे एका गद्य मैत्रिणीची लै आठवण झाली हो!
2 Dec 2013 - 11:33 am | अनिल तापकीर
अप्रतिम रचना
2 Dec 2013 - 3:36 pm | ज्ञानोबाचे पैजार
कवितेला लय असली तरी अर्थ लावताना माझा गोंधळ उडतो आहे.
नीट अर्थ लागत नाहीये या कवितेचा.
त्यामुळे छान छान असे कसे म्हणावे असा मला प्रश्र्ण पडला आहे.