बरं झालं मी नोकरी करतो

चाणक्य's picture
चाणक्य in जे न देखे रवी...
17 Nov 2013 - 5:43 pm

बरं झालं मी नोकरी करतो
नाहीतर,
लोक म्हणाले असतेच
की कविता करून काय पोट भरतं का
किंवा हसले असते काहीजण कुचेष्टेने
मला...
मग मी ही दाढी वगैरे वाढवून
कवितेने पोट भरायच्या मागे लागलो असतो
धडपडत राहीलो असतो
नसलेलं काहीतरी
सिद्ध करून दाखवायला
आणि भेटत राहीलो असतो जगाला
एक तकलादू स्वाभिमान खिशात घेवून
माझ्या शबनम मधून काढून काढून
आल्या गेल्याला दाखवला असता मी
माझ्यातला एक 'उपेक्षित कलाकार'....
अगदी मला टाळेपर्यंत
ऐकवल्या असत्या लोकांना मी
माझ्या कविता आणि गझला
आयताकृती घडी केलेला
कुठलातरी साप्ताहिक किंवा दिवाळी अंक
बनला असता मग
माझ्या कवी असण्याचा पुरावा....
पण आज?
आज कसंय ना,
की माझी नोकरी हाच पुरावा आहे
जणू
मला लिहिता वगैरे येतं याचा
मी लिहिलेलं
कुठे काही छापून यायलाच हवं
असं काही नाही
शिवाय,
काहीतरी कमवत असल्यामुळे
एक चांगली सोय झालीये;
'कामाच्या रगाड्यात लिहायला वेळ मिळत नाही'
असं मी म्हणू शकतो सतत दांभिकपणे
.........'ताठ' मानेने
आणि ऐकणारेही म्हणू शकतात
'खरंय रे, तुझी लाईन चुकलीच'

बरं झालं मी नोकरी करतो....

- चाणक्य
१७/११/२०१३

कविता

प्रतिक्रिया

जेपी's picture

17 Nov 2013 - 5:49 pm | जेपी

आवडल

चित्रगुप्त's picture

17 Nov 2013 - 5:51 pm | चित्रगुप्त

अरेरे, एका महाकवीला जग मुकले.
तेरी दो टकियाकी नोकरी...

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

17 Nov 2013 - 5:52 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

__/\__!!

प्यारे१'s picture

17 Nov 2013 - 6:09 pm | प्यारे१

छानच!

प्रभाकर पेठकर's picture

17 Nov 2013 - 6:21 pm | प्रभाकर पेठकर

एकदा एकजण, प्रातःर्विधीची तक्रार घेऊ, डॉक्टरांकडे जातो.
'डॉक्टर, सक्काळी सक्काळी अर्धा अर्धा तास बसतो पण कांही होत नाही.'
त्याला कांही गोळ्या देत डॉक्टर म्हणतो,' काळजी करू नका. ह्या गोळ्या घ्या उद्या होईल.'
दुसर्‍या दिवशी तो परत येतो. डॉक्टरांच्या प्रश्नाला नकारार्थी उत्तर देत म्हणतो, 'नाही, आजही नाही झाली.'
डॉक्टर डोस वाढवून देतो. 'ह्या गोळ्या घ्या ह्या जास्त स्ट्राँग आहेत. ह्याने नक्की होईल.'
पुन्हा दूसर्‍या दिवशी तेच. 'नाही, डॉक्टर नाही झाली.'
तिसर्‍या दिवशी डॉक्टर औषध बदलून देतो. म्हणतो, 'ह्या सगळ्यात स्ट्राँग गोळ्या आहेत ह्याने व्हायलाच पाहिजे.'
पण पुन्हा तो पेशंट जेंव्हा निराश मनाने येतो आणि म्हणतो, 'नाही. डॉक्टर ह्या गोळ्यांचाही कांही उपयोग झाला नाही.'
तेंव्हा मात्र डॉक्टरही चक्राऊन जातो. सहज बोलता बोलता डॉक्टर विचारतो. 'तुमचा व्यवसाय काय आहे?'
तो म्हणतो, 'मी कवी आहे. कविता करतो.'
डॉक्टर शांतपणे खिशातून आपले पाकिट काढून त्याला २०० रुपये काढून देतो आणि सांगतो, 'समोर एक चांगली खाणावळ आहे. तिथे जाऊन पोटभर जेऊन घ्या. जा काळजी करू नका, होईल उद्या.'

जेनी...'s picture

21 Nov 2013 - 1:45 am | जेनी...

=))

मारवा's picture

17 Nov 2013 - 7:09 pm | मारवा

मनाला भिडली !

कवितानागेश's picture

17 Nov 2013 - 10:46 pm | कवितानागेश

अगदी मनातून उतरलेत शब्द.....

अत्रुप्त आत्मा's picture

17 Nov 2013 - 11:09 pm | अत्रुप्त आत्मा

बहोत खूब! http://www.sherv.net/cm/emoticons/yes/ok-sign-smiley-emoticon.gif

स्पंदना's picture

18 Nov 2013 - 5:42 am | स्पंदना

हं!

झंम्प्या's picture

18 Nov 2013 - 6:16 am | झंम्प्या

मस्त लिहीलीय...

पाषाणभेद's picture

18 Nov 2013 - 7:09 am | पाषाणभेद

फारच छान

हरवलेला's picture

18 Nov 2013 - 6:40 pm | हरवलेला

:)

धन्या's picture

18 Nov 2013 - 6:57 pm | धन्या

भारी !!!

भडकमकर मास्तर's picture

21 Nov 2013 - 1:36 am | भडकमकर मास्तर

कवितेतल्या भावनांशी सहमत ..
आवड्ली कविता :)

ऋषिकेश's picture

21 Nov 2013 - 12:09 pm | ऋषिकेश

वा! छानच!
टोकदार भाष्य.. अगदी आवडले