तू उत्तर नाही दिलंस मला

वडापाव's picture
वडापाव in जे न देखे रवी...
3 Nov 2013 - 12:07 am

तू उत्तर नाही दिलंस मला
मी एक प्रश्न विचारला
का तुझ्यातल्या नव-याने
आज माझ्यावर हात उगारला?

तू उत्तर नाही दिलंस मला
हवं तर पुन्हा विचारते
तुझ्या चुकांचं खापर मी
का डोक्यावर माझ्या मारते?

तू उत्तर नाही दिलंस मला
मी केव्हाची वाट पाहत्येय
संसार अधोगतीच्या प्रवाहात जातोय
आणि मीही त्यात वाहत्येय

तू उत्तर नाही दिलंस मला
उलटून बोलतोयस तू फक्त
तुझ्यासारखाच मीही जाब विचारला
तर का खवळतंय तुझं रक्त?

तू उत्तर नाही दिलंस मला
आता वाट पाहून मी थकले
तुझा विश्वास मिळालाच नाही
आज तुझ्या प्रेमालाही मी मुकले

कविता

प्रतिक्रिया

पैसा's picture

3 Nov 2013 - 10:45 pm | पैसा

कविता आवडली. नवर्‍याचं टिपिकल पुरुषी (समजलं गेलेले) व्यक्तिमत्व जर लपवून ठेवलेलं असेल तर बायकोने असा चुकून कधी एखादा प्रश्न विचारल्यावर सत्य बाह्र पडतं आणि मग ती न दिलेली उत्तरं पचवणं त्या बायकोला कठीण जातं.

स्पंदना's picture

6 Nov 2013 - 7:13 am | स्पंदना

__/\__!!

मुक्त विहारि's picture

6 Nov 2013 - 8:14 am | मुक्त विहारि

उत्तम

psajid's picture

7 Nov 2013 - 12:43 pm | psajid

कविता आवडली.