(अनुवादीत. कवी--हसरत जयपुरी)
पाहूनी तुला मजसमोरी
केस तुझे भूरभूरती वाऱ्यावरी
पदर तुझा तू न सांवरी
गं! राहू मी कसा भानावरी
नयन तुझे बिलोरी जांबापरी
ओठ तुझे थरथरत्या मैखान्यापरी
गं! राहू मी कसा भानावरी
पाहूनी तुला मजसमोरी
हंसणे तुझे जणू वीज चमकणे
श्वास तुझे जणू गुलाबी गंध दरवळणे
इतर बहकती पाहुनी तुझे ते चालणे
पाहूनी तुला मजसमोरी
गं! राहू मी कसा भानावरी
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
18 Jul 2008 - 10:27 am | सर्किट (not verified)
सामंत काका,
तुमचे एका "गोळे काका" नावाच्या व्यक्तीचाच तर दुसरा अवतार नाही ?
एकदा खरंच चेक करून बघा.
हे काका, अशेच हिंदी गाण्यांचं कैच्या कैच भाषांतर करून, मग ओळखा पाहू, म्हणायचे.
प्रशासकांना सदर लेखनावरचे सगळे प्रतिसाद "छन्न" करावे लागायचे. अजूनही लागतात.
येथे , म्हणजे मिसळपावावर , तशी काही सोय नाही.
पण तरीही आम्हाला अशी रुपांतरे वाचताना कुठेतरी छ्न्न व्हावेसे वाटते.
एवढेच सांगतो.
- (मी पण स्यान होझेतच) सर्किट
18 Jul 2008 - 10:15 pm | श्रीकृष्ण सामंत
सर्किटजी,
कोकणीत एक म्हण आहे,
"जवळची होकाल कुरडी"
म्हणजे
"घरातली नवरी मग ती कुरूप"
स्यान होझेत र्व्हतात म्हटल्यात म्हणून म्हणतंय.
अहो,गोळेकाका,भोळेकाका,किंवा सुळेकाका हे जन्माला यायचेच.आपण काही कुठे चुरस करायला निघालो नाही.
"व्वा!क्या बात है! बहुत अच्छे!"
असे उद्गार शेरो शायरीत सतत येत असतात.ते कुणालाही उत्तेजन देण्यासाठी असतात.सर्वच गालिब कसे होतील.
नाहीतरी आमच्या बंडुतात्याना नाही काय
"झंय तंय शेरे मारुची संवय"
एकदा बंडुतात्यानी जादुगारावर शेरा मारला.
"ही कसली जादू कोणही करील"
जादूगाराने एक दिवशी सगळ्यांसमोर बोलावून टेबलावर अंड उभं करून दाखवायला सांगितलं.
"हो कसलो जादुगार मी प्रसिद्ध जादूगार सरकार,आणि जादूगार पिल्ले ह्यांका ओळखतंय"
पण बंडूतात्याना हर प्रयत्न करून अंड उभं करता आलं नाही.
"एकाच वेळी पोट आणि पाठ लाव तर मी हरलो" म्हणून किंगकॉंगला सांगणारे ते ऐकतात काय?
"इतक्या सांगतस तर तू उभ्या करून दाखव अंडा" म्हणून शेवटी जादूगाराला म्हणाले
जादूगाराने एक सेकंदात अंड जरासं एका टोकावरून फोडलं आणि उभं करून दाखवलं.
"तेतूर काय असां असतां तर मी पण उभ्या करून दाखंवला असतां"
हे बंडूतात्यांचे उद्गार ऐकून जादूगाराने कपाळावर हात मारून घेतला.ही गोष्ट कदाचित तुम्हाला माहित असेल पण संदर्भ म्हणून दिली एव्हडंच.
तात्पर्य काय सर्कीटजी,
माझ्या ह्या अनुवादीत कवितेला १०२ व्हिझीट्स आजतक दिल्या गेल्या आहेत.आता एखाद-दुसरा बंडूतात्या आपलं प्रामाणिक मत देणारच.
"टिकेचं घर असावे कविच्या शेजारी"
आणि आता जाता जाता,
अशीच एक परत कविता
नको म्हणू रे मनूजा!
प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे
सुगंध देवून सर्वा उल्हासित करावे
गुलाब जाई जुई आणि मोगरा
घाणेरी लाजेरी कण्हेरी आणि धत्तूरा
नाविन्य असते प्रत्येक कृतिचे
निर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे
नको म्हणू रे मनुजा!
हेच बरे वा तेच बरे
जा तुही करीत निर्मिती
मात्र
करू नको दुसऱ्याची कॉपी
क.लो.अ.ही विनंती
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com