बाई गावापुढं गेली,
बांबू-काठीची कमान.
खाल्ला नाही धड घास,
चूल रांधताना जिनं,
तिच्या तोंडामधे सोनं.
बाई अहेवपणीची,
लाल माखलेली टाळू.
अंगी नेसलं जुनेरं,
जिणं जगताना जिनं,
तिला मरताना शालू.
बाई लाकडावरती,
तूप-तेल ओघळलं.
एका गजऱ्याची नाही,
आस माळलेली जिनं,
तिच्या अंगभर फुलं.
बाई चंदनाची हवा,
जाळ भणाणून फार.
माप ओलांडलं नाही,
दारावेशीतलं जिनं,
पापापुण्याच्या ती पार.
-- अमेय
प्रतिक्रिया
25 Oct 2013 - 11:10 am | मदनबाण
:(
25 Oct 2013 - 11:17 am | गवि
सुंदर कल्पना. खिन्न झालो पण.
आवडले.
25 Oct 2013 - 11:22 am | मुक्त विहारि
"बाई लाकडावरती,
तूप-तेल ओघळलं.
एका गजऱ्याची नाही,
आस माळलेली जिनं,
तिच्या अंगभर फुलं."
खिन्न...
27 Oct 2013 - 3:19 pm | सुज्ञ
वा
25 Oct 2013 - 11:32 am | जेपी
no comments
25 Oct 2013 - 11:39 am | नानबा
सुंदर रचना.. :(
25 Oct 2013 - 11:55 am | अत्रुप्त आत्मा
उत्तम!
25 Oct 2013 - 12:10 pm | psajid
ही वस्तुस्थिती आहे. एखाद्याला जीवंतपनी आयुष्यभर उपेक्षित राहावं लागतं आणि मृत्युनंतर त्यांच्या मरणाचाही सोहळा होतो. खूप अस्वस्थ करणारी कविता
25 Oct 2013 - 12:38 pm | मेघवेडा
कविता अतिशय आवडली. :)
25 Oct 2013 - 12:43 pm | डॉ सुहास म्हात्रे
:(
25 Oct 2013 - 5:31 pm | सूड
बर्याच दिवसांनी एक उत्तम कविता वाचली.
हे विशेष आवडलं आणि पटलंही;
बाई अहेवपणीची,
लाल माखलेली टाळू.
अंगी नेसलं जुनेरं,
जिणं जगताना जिनं,
तिला मरताना शालू.
25 Oct 2013 - 5:53 pm | प्रसाद गोडबोले
+१
25 Oct 2013 - 5:56 pm | प्यारे१
सर्रकन काटा आला अंगावर.
कविता म्हणून लयबद्ध, सुंदर नि आशय थेट काळजात पोचवणारी.
27 Oct 2013 - 3:25 pm | चाणक्य
अंगावर आली
25 Oct 2013 - 6:41 pm | रेवती
वस्तूस्थिती कवितेतून दिसतीये.
25 Oct 2013 - 7:14 pm | वेताळ
एकदम जहाल वस्तुस्थिती मांडली आहे तुम्ही.
25 Oct 2013 - 7:14 pm | बहुगुणी
तुमच्या आणखी कविता वाचायला आवडतील.
25 Oct 2013 - 7:28 pm | कवितानागेश
आशय भिडतोय.
शब्दरचना अतिशय सुंदर आहे. अजून येउ द्यात.
25 Oct 2013 - 8:29 pm | पैसा
मोजक्या शब्दात मांडलेलं भयाण वास्तव. हल्लीच याबद्दल एक शतशब्दकथा वाचली होती तिची आठवण झाली.
25 Oct 2013 - 8:58 pm | चित्रगुप्त
याच्या अगदी उलट देखील झालेले बघितले आहे.
ज्यांचे शिष्य आंतरराष्ट्रीय ख्याति मिळवते झाले, असे जुन्या काळचे अतिशय श्रेष्ठ, उच्चशिक्षित, प्रसिद्ध, राजवैभव भोगलेले चित्रकार, त्यांच्या अंत्ययात्रेला चित्रकारांपैकी फक्त मी एकटा (ते माझ्या गुरुंच्या गुरुंचे गुरु), आणि चार-पाच त्यांचे शेजारी. आम्ही कुणी वीस, कुणी दहा कुणी पन्नास रुपये जमवून कसाबसा त्यांचा अंत्यविधी केला. (ही घटना साधारणतः १९७८ सालची)
...कविता आवडली.
....कुदरत की गत न्यारी न्यारी....
27 Oct 2013 - 8:57 am | इन्दुसुता
कविता अतिशय आवडली.
27 Oct 2013 - 11:24 am | आदूबाळ
अमेय, कविता आवडली. लिहीत रहा...
27 Oct 2013 - 12:04 pm | शैलेन्द्र
खुपच छान, आशयघन, आणि लयबद्ध कविता..
लिहित रहा..
27 Oct 2013 - 3:06 pm | पिलीयन रायडर
काळजाला भिडली....
27 Oct 2013 - 3:20 pm | सुज्ञ
वा
28 Oct 2013 - 6:06 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
सुंदर रचना...
__/\__!!
28 Oct 2013 - 6:26 pm | आतिवास
सुंदर रचना. वास्तव थेट समोर आणणारी!
5 Nov 2013 - 3:26 pm | नगरीनिरंजन
अ प्र ति म!!
5 Nov 2013 - 3:30 pm | कोमल
भयानक.. पण जबरा..
__/\__
27 Nov 2013 - 12:19 am | राघव
ए बाबा.. काय लिहितोस रे?
अक्षरश: अंगावर येतं तुझं लेखन. __/\__
27 Nov 2013 - 1:43 am | जेनी...
बापरे !
तुमची गुज हि पहिलीच कविता जी मी वाचली
खुपच सुंदर रीत्या मांडता भावना
हॅट्स ऑफ
27 Nov 2013 - 9:58 am | सुमीत भातखंडे
पण वाचून त्रास झाला
27 Nov 2013 - 10:22 am | सुहास..
_/\_
29 Nov 2013 - 9:29 am | तिमा
दाहक वास्तवदर्शी अन काळजाला भिडणारी !
शीर्षक वाचून गैरसमज झाला होता. आणीबाणीनंतरच्या निवड्णुकीच्या निकालाच्या दिवशी,पुण्यात होतो. भल्या पहाटे पन्नासएक माणसे 'बाई गेली,बाई पडली' असे ओरडत धावत गेल्याचे स्मरते.
7 Oct 2015 - 6:56 pm | जेपी
सूड ची 'नवमी' कविता वाचल्यावर ही आठवली.
वर काढतोय.
7 Oct 2015 - 6:59 pm | रेवती
अगदी हेच म्हणते.
7 Oct 2015 - 7:05 pm | प्रसाद गोडबोले
अप्रतिम कविता !
अशा कविता वाचल्या की मिपावर आल्याचे अन काही तरी क्लासिक वाचायला मिळाल्याचे समाधान मिळते :)
अवांतर : जेपी , एक अप्रतिम कविता वर काढल्या बद्दल मना पासुन आभार ! आपल्याला आवडलेल्या अशाच अजुन कविता वर काढाव्यात अशी विनंती करीत आहे :)
8 Oct 2015 - 10:41 pm | अनुप ढेरे
धन्यवाद.
7 Oct 2015 - 7:18 pm | मालोजीराव
वाह !
7 Oct 2015 - 8:30 pm | दमामि
सुन्न!
7 Oct 2015 - 8:33 pm | मधुरा देशपांडे
:(
7 Oct 2015 - 11:03 pm | मित्रहो
सुन्न करनार वास्तव
असाच एकदा घाटावरचा संवाद आठवला.
"ते बुढी जिती व्हती तर कोणी तिले पाणी बी पाजत नव्हते. आता आले तिच्या नावाने भादरायला
7 Oct 2015 - 11:06 pm | रातराणी
निशब्द. :(
7 Oct 2015 - 11:09 pm | सतिश गावडे
सुन्न करणारी कविता...
8 Oct 2015 - 9:34 am | नाखु
........ बाकी फक्त सुन्न
8 Oct 2015 - 10:23 am | नीलमोहर
.......
8 Oct 2015 - 12:01 am | दिवाकर कुलकर्णी
सुंदर कविता शिर्षक विसंगत
विसंगत अनुभवही तेव्हडेच
आमच्या परिसरतल्या एक बाई अचानक गेल्या
एकदम स्मार्ट ,तडफदार, चैतन्यशील बाई,
दपारपरयंत कसंतरी मुलं सुना इकड पोचले
सुना जीन मद्धयेच ड्रेसात
नो अंन्त्य संस्कार नथिंग ऑफ़ द सॉर्ट
डेड बॉडी उचलली देह दान करुन टाकली
बाईंची तशी ईच्छा असेलहि तशी कदाचित
पण सगलं जे झालं त रुढी परंपरा सोडून मुलं सुना संद्धयाकाली पुण्याला परत
सुगंधाचा शिडकावा करणारी बाई अनाथ असल्यासारखी गेल्या सारखा लोक बोलत होते
8 Oct 2015 - 9:31 am | अभिजीत अवलिया
अतिशय भेदक कविता.
8 Oct 2015 - 9:47 am | तर्राट जोकर
परमसत्य.....
8 Oct 2015 - 10:23 am | नाव आडनाव
हे सगळं एकदम असंच समोर होतांना बघितलेलं आहे गावाकडं. आणि त्या आज्जिंचं घरचं नाव बाईंच होतं. कविता त्यांना समोर ठेवून लिहिली आहे असं वाटलं. अर्थात अश्या किती तरी "बाई" असणार. अवघड परिस्थितीत ४ लेकरांना मोठं केलं, आयुष्यभर कष्ट केले (शब्द्शः मरेपर्यंत) पण त्याच तिच्या लेकांना तिच्याकडे बघायला सुध्धा वेळ नसायचा. प्यायला मागितलेलं पाणी तिच्या चिरंजिवाने (जे पंढरीच्या वारीला जातात) तांब्या ऊलटा करून ओतून दिलं आणि त्या रात्रीच त्या माऊलीनं जीव सोडला. त्याच तिच्या पराक्रमी चिरंजिवांनी दहाव्याला कथा सांगायला मोठा गुरुजी बोलावला, उपास असणार्यांसाठी वेगळं, नसणार्यांसाठी वेगळं असं गावातल्यांसाठी जेवण बनवलं. आईला मात्र एव्हढं प्रेमानं शिळ्या भाकरी साठी विचारलं नसेल कधी .....
8 Oct 2015 - 3:47 pm | तुडतुडी
उत्तम कविता