साहित्य-
2 वाटी ढोकळा पीठ,
(1किलो जाडा तांदुळ +1 किलो हरबरा डाळ गिरणीतून रवाळ दळून आणावे.)
दही- पावून वाटी,
कोमट पाणी- साधारण 1 वाटी,
8-10 पाकळ्या लसूण आणि 4 हिरवी मिरचीचा खरडा,
हळद- ½ टे. स्पुन,
मीठ आणि साखर- चवीनुसार,
इनो- 1 टे. स्पुन,
तेल- 2+2 फोडणीकरता,
जिरं आणि मोहरी फोडणीकरीता,
कोथिबीर- सजवटीकरता.
कृती-
2 वाटी ढोकळा पीठात पावून वाटी दही मिक्स करून घावे.
कोमट पाण्यानी वरील मिश्रण इडलीच्या पीठ भिजवितो त्याप्रमाणे भिजवून घ्यावे व 5-6 तास फेरमेंट करावे.
ढोकळा ज्या भांड्यात करणार आहात ते गॅसवर गरम करण्यास ठेवावे. मी इडलीपत्रात छोटी परात ठेवली. मिश्रण ज्या भांड्यात ओतणार आहोत ते भांडे चांगले गरम झाल्यावरच मिश्रण भांड्यात ओतावे.
पीठ फेरमेंट झाल्यावर त्यात हळद+मीठ+साखर+लसूण मिरचीचा खर्डा add करून त्यावर 2 टे. स्पुन तेल कडकडीत तापवून ओतावे.
आता वरील मिश्रण चांगले एकाच दिशेने फेटून घ्यावे व त्यात 1 टे. स्पुन इनो घालून भरभर फेटून लगेच गॅसवरील भांड्यात 8-10 मिनिटे वाफवायला ठेवावे.
10 मि. गॅस बंद करून ढोकळ्यावर जिरं + मोहरीची चुरचुरीत फोडणी करून ओतावी व ढोकळा थंड झाल्यावर कापावा.
प्रतिक्रिया
25 Oct 2013 - 9:53 am | नानबा
ती पण आवडत्या ढोकळ्याची फोटुंसह? इकडं हापिसात भुकेनं जळजळ वाढल्या गेली आहे..
25 Oct 2013 - 10:04 am | प्रभाकर पेठकर
लुसलुशीत आणि जाळीदार ढोकळ्यांची चविष्ट पाककृती टाकल्याबद्दल धन्यवाद.
फोडणी तडतडली की गॅसवरून उतरवून त्यात अर्धी वाटी पाणी ओतून ती पाणीमिश्रित फोडणी ढोकळ्यावर टाकल्यास ढोकळा कोरडा पडत नाही.
हिरव्या कोथिंबीरीसोबत खवलेले पांढरेशुभ्र खोबरे ढोकळ्याची रंगत आणि संगत वाढविते.
25 Oct 2013 - 10:07 am | त्रिवेणी
धन्यवाद प्रथम आणि पेठकर काका
हो काका माझी आई सुद्धा फोडणीत थोड पाणी टाकते.
25 Oct 2013 - 10:44 am | पियुशा
वॉव ! पण साला कधी ढॉकळा जमतच नाही नीट :(
मला बोआवग त्रिवेनी तै तुझ्या घरी ढॉकळा खायला ;)
25 Oct 2013 - 11:15 am | त्रिवेणी
ताई मत कहो ना.
कधीही ये मी वाट बघते.
या पद्धतीने करून बघ (आधी अगदी 1 वाटी डाळीचे पीठ हे हवे तर) आणि या पद्धतीने करून बघ नक्की जमेल.
ढोकळा कधीही 10 मि. पेक्षा जास्त वाफवू नये, कमीत कमी 8 मि. आणि जास्तीत जास्त 10मि. त्यापेक्षा जास्त वाफावला तर बसतो ढोकळा.
25 Oct 2013 - 3:24 pm | पियुशा
अगं त्रिवेणी मी ४-५ वेळा ढोकळा करुन बघितला
पहिल्यांदा केला तेव्हा तो फुगलाच नाही नुसत पिठल दिसत होत बेसनाच ;)
मग दुसर्यांदा केला तेव्हा त्यात ईनोची टेस्ट जास्त लागत होती :(
३ दा केला तो फुगलाही छान पण चव अशी काय लागेना अन खुप कोरडा लागत होता मग मी तो कुसकुरुन त्याला कांदा जिरे मोहरीची फोडणी देउन नविन पदार्थ केला फसलेल्या ढोकळ्याचा उपमा ;)
मला ढोकळा अतिशय आवडतो पण आता बणवन्याची हींमत नाही होत माझी परत फसला तर घरचे बोंबा मारतील माझ्या नावाने आता !
25 Oct 2013 - 9:48 pm | त्रिवेणी
असू दे ग.
माझेही बरेच पदार्थ फसतात. तु माझ्याकडेच येत जा ढोकळा खायला. कधी येते ते सांग.
25 Oct 2013 - 9:55 pm | प्यारे१
फक्त कांदेपोहेच जमतात वाटतं मुलीला....! ;)
संदर्भ :
25 Oct 2013 - 9:56 pm | प्यारे१
25 Oct 2013 - 10:00 pm | प्यारे१
http://www.misalpav.com/node/25910
25 Oct 2013 - 11:19 am | मुक्त विहारि
खतरनाक अनुभव आहेत ह्याचे.
तुम्ही दिलेले प्रमाण वापरून करण्यात येईल.
25 Oct 2013 - 11:25 am | त्रिवेणी
नक्की करून बघा.
वरती पियुषाला दिलेल्या प्रतिसादात रवा लिहायचे राहिले.
1 वाटी डाळीचे पीठ+1/2 वाटी बारीक रवा ताकत 1/2 भिजवून करून बघा ट्रायल अँड एरर बेसिस वर.नक्की जमेल.
आणि आम्हालाही सांगा कसा झाला ते.
25 Oct 2013 - 11:30 am | मुक्त विहारि
अनुभव नक्की सांगीन...
25 Oct 2013 - 11:22 am | मदनबाण
वा... आजच ढोकळा खाल्ला आहे. :)
(सुरळीची वडी आवडीने चापणारा) ;)
25 Oct 2013 - 11:25 am | मुक्त विहारि
नेहमी
पाटवड्याच चापणारा मुवि......
25 Oct 2013 - 12:12 pm | अत्रुप्त आत्मा
मस्त! :)
25 Oct 2013 - 12:29 pm | रुमानी
धन्यवाद ..या पद्धतीने करून बघेन. :)
25 Oct 2013 - 12:59 pm | सविता००१
मी पण असाच करते. नाहीतर जर वेळ नसेल तर फक्त डाळीच्या पिठाचा सायट्रिक अॅसिड, इनो घालून इंस्टंट ढोकळा करते. तो पण मस्त होतो.
25 Oct 2013 - 1:12 pm | अनन्न्या
खरच, ढोकळा नीट जमणे ही कला आहे. झक्कास झालाय. खायचा मोह होतोय.
25 Oct 2013 - 1:14 pm | त्रिवेणी
@अनन्या
कधी येतेस?
25 Oct 2013 - 3:02 pm | पैसा
फोटोअप्रतिम, पाकृ सोप्पी! मिपाचा ट्रेडमार्क इनो चक्क पाकृमधे वापरून सगळ्यांना कम्पल्सरी इनो खायला घालायची आयड्या लैच आवडली!
25 Oct 2013 - 4:17 pm | सूड
वीकांतास करुन बघावा म्हणतो. ते ईनो घालण्याआधीच्या फोडणीचं प्रयोजन कळलं नाही.
25 Oct 2013 - 9:54 pm | त्रिवेणी
आपण यात खर्डा कच्चाच वापरला आहे, आणि हळद ही घातली आहे. गरम तेलाच्या फोडणीमुळे ते दोन्ही पदार्थ थोडेसे फ्राय झाल्यासारखे होतात. आणि इनो हो ढोकळा मिश्रण गॅस वरील भांड्यात ओतण्याआधीच घालावा. इनो घालून मिश्रण जास्त वेळ बाहेर ठेवू नये, आणि ज्या भांड्यात मिश्रण घालणार आहोत ते सुध्या चांगले गरम झाले पाहिजे तरच ढोकळा चांगला फुगतो.
25 Oct 2013 - 4:59 pm | स्पंदना
इनो घेतला गेला आहे.
25 Oct 2013 - 6:23 pm | प्यारे१
साला ये धोकला लय भारी दिसते ने!
25 Oct 2013 - 6:32 pm | रेवती
मस्त दिसतोय ढोकळा.
शेवटचा कधी खाल्लाय आठवत नाही. आता करायला हवा.
25 Oct 2013 - 9:56 pm | त्रिवेणी
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे मन:पूर्वक आभार.
25 Oct 2013 - 9:58 pm | रेवती
अगं त्रि, आता मी कुठून ह. डाळ आणि तांदूळ दळून आणू? बेसन आणि पिठी एकत्र केलं तर ढोकळा होईल का? गेली अनेक दशकं मी ढोकळा करण्याचे अनेक प्रयोग केलेत, सग्ळे फसलेत.
25 Oct 2013 - 10:06 pm | त्रिवेणी
हो ताई,
1 वाटी बेसन+1/2 रवा मिक्स करून मग वरील प्रमाणे भिजवा. आणि 1/2 तासाने करायला घ्या.हे मिश्रण फेरमेंट नका करू.आणि पीठी नको रवा मस्ट. रवा स्किप नका करू नाहीतर नुसत्या बेसनाचे गिच्च पीठ लागेल.
करून झाल्यावर नक्की सांगा आणि फोटो सुद्धा टाका इथे.
25 Oct 2013 - 10:39 pm | कवितानागेश
सोप्पं वाटतंय. करुन बघायला हरकत नाही. :)
27 Oct 2013 - 1:01 pm | दिपक.कुवेत
खायचा मोह होतोय. मागे एकाकडे ढोकळ्याबरोबर खजुराची आंबट्/गोड चटणी दिलेली; मस्त लागली.
पण ढो़कळा क्वचीत(च) आवडतो अर्थात हलका झाला तरच!
15 Nov 2013 - 1:58 pm | सानिकास्वप्निल
कसला टम्म फुगलाय गं ढोकळा
भारीच आवडला +१