एक अबोल प्रेम फुललेच नाही !!
दोघांच्याही मनात होतं,
दोघांनाही ते ठाऊक होतं
कुनी कधी काही बोललेच नाही…..
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!
जाण्या-येण्याच्या वेळाही एक,
ठरुनच गेल्या होत्या बहुतेक
वाटा दोहोंच्या जुळल्याच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!
नजर भिरभिरते,एकमेंका शोधते;
दृष्टा-दृष्ट झाल्यास मनी सुखावते
नजरेपलिकडे काही घडलेच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!
नसेना का घडले मिलन परि…
आजन्म फुलतिल प्रेमांकुर ऊरी
नियतीचे कोडे कधी उलगडलेच नाही!
-अज्ञात
प्रतिक्रिया
17 Jul 2008 - 2:49 pm | सखाराम_गटणे™
आवडली कविता.
नियतीचे कोडे कधी उलगडलेच नाही!
-अज्ञात
हे, मिपाच्या नियमात बघा जरा.
सखाराम गटणे
12 Nov 2009 - 12:24 pm | बकुळफुले
.सुंदर कविता
17 Jul 2008 - 3:49 pm | शेखर
परी ,
कविता चांगली पण तुमची आहे का?
नसल्यास खालील दुवा पहा.
http://www.misalpav.com/node/1196
शेखर
17 Jul 2008 - 10:11 pm | प्राजु
खूपच छान.. कोणाची आहे कविता?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
17 Jul 2008 - 10:30 pm | टारझन
नजर भिरभिरते,एकमेंका शोधते;
दृष्टा-दृष्ट झाल्यास मनी सुखावते
नजरेपलिकडे काही घडलेच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!
सुंदर आहे... कविता कळत नसल्याने त्या क्वचितच भावतात ....
तुझी कविता आवडली...
कुबड्या खवीस
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
13 Aug 2008 - 4:02 pm | योगेश ९८८१
ही कविता क्दाचित माझ्यावर तर बनवलि नहि ना.........
23 Dec 2009 - 11:33 am | विजुभाऊ
अरे वा ....
ही कविता वाचनातच आली नाही कधी.
तू अज्ञात नावाने लिहितेस हे यंदाचे दिवाळी अंक वाचल्यावर कळाले.
अशीच लिहीत रहा.
23 Dec 2009 - 11:43 am | फ्रॅक्चर बंड्या
छान कविता,,,
binarybandya™
23 Dec 2009 - 11:55 am | टारझन
काय इजुभाउ.. आज आपल्या परीने लॉगिन केलेत ?
=))
बाकी आमची मिसळपाव वरची पहिली सही आठवल्याने अंमळ सुखावलो !
- टारझन
तु भारी ... तर मी लै भारी
23 Dec 2009 - 4:48 pm | jaypal
सगळ नुसत मनातल्या मनात. परिराणी आठवणींच्या पावसात चिंब भिजवलस. धन्यवाद

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
26 Dec 2009 - 4:06 pm | सागरलहरी
अतिशय तरल आहे. आवड्ली कविता.
26 Dec 2009 - 4:41 pm | मदनबाण
कविता आवडली...धागा वर आणणार्याचा मी आभारी हाय... ;)
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
7 Jan 2011 - 1:51 pm | विजुभाऊ
प्र का टा आ