छोटे मोठे कवी

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
16 Jul 2008 - 10:03 pm

विडंबनकाराचे दुखः या जालावर कुणाला कळलच नाही.. त्यांना नेहमी गावकुसाबाहेरचे अशीच वागणूक मिळाली.स्वातीताईंचे छोटे,मोठे तारे
बघून आमच्यातला जखमी उपेक्षीत विडंबनकार बंड करून उठला

कविवर्या किती रे गर्व करशील....
खरं आहे, प्रतिभावान आहेस तू!!
मी तुझ्याच कवितांवर जगतो.
तरी..
उठून जरा सभोवार पाहा,
तू ही छोटासा कवी दिसतोस!
:
:
तू काय किंवा मी काय
आपण फक्त भुणभुणतो.... रे

तू जरा मोठा
म्हणून जरा जास्त प्रतिसाद मिळवतोस.
इतकंच!!

शब्द संपले की
लेखणी अटत अटत मी विझणार.
तसाच तू ही..................

मी जरा लवकर संपेन!!
तू थोडं जास्त लिहिशील.
एवढंच!!

===========================
केशवसुमार .............................१६-०७-२००८

विडंबन

प्रतिक्रिया

सहज's picture

16 Jul 2008 - 10:05 pm | सहज

स्वातीताईंना देखील ह्या विडंबनाला दाद द्यावीच लागेल :-)

सही आहे!!

मुक्तसुनीत's picture

16 Jul 2008 - 10:12 pm | मुक्तसुनीत

केसु ,
तुम्हाला खरे तर वेगळे सांगायला नको , विडंबनकार हा सर्कशीतल्या विदूषकाप्रमाणे असतो. लोकाना रिझवतो, इतर कुशल क्रीडापटूंच्या झोपाळ्याच्या खेळांमधे खेळतो , पडण्याचे नाटक करतो. याचा अर्थ असा की, तो खुद्द एक निष्णात क्रीडापटू असावा लागतो ! त्याला झोपाळ्यावरच्या कसरती करता यायला हव्यातच , परत त्यात सुरक्षितपणे "पडण्याचे" नाटक लोकाना रिझवण्याकरता करावे लागते. आणि इतके करून त्याला मुखवटे घालून रहावे लागते ! वेगळे तात्पर्य तुम्हाला सांगायची गरज नाही असे वाटते.

मजा आहे ती खेळात. कोणी किती टाळ्या दिल्या- नाही दिल्या , हा भाग आहेच , पण तो भाग मुख्य नव्हे !

पिवळा डांबिस's picture

17 Jul 2008 - 12:23 am | पिवळा डांबिस

विडंबनकार हा सर्कशीतल्या विदूषकाप्रमाणे असतो. लोकाना रिझवतो, इतर कुशल क्रीडापटूंच्या झोपाळ्याच्या खेळांमधे खेळतो , पडण्याचे नाटक करतो. याचा अर्थ असा की, तो खुद्द एक निष्णात क्रीडापटू असावा लागतो ! त्याला झोपाळ्यावरच्या कसरती करता यायला हव्यातच , परत त्यात सुरक्षितपणे "पडण्याचे" नाटक लोकाना रिझवण्याकरता करावे लागते. आणि इतके करून त्याला मुखवटे घालून रहावे लागते !
अगदी अचूक वर्णन!!
मुसुराव, अगदी खरं आहे, मजा आहे ती खेळात!

चतुरंग's picture

16 Jul 2008 - 10:14 pm | चतुरंग

केशवा तुझे 'ई-पाय' धरतो! खल्लास!!

(स्वगत - हा केसु 'घेत' नाही म्हणे तरिही इतकी झटपट निर्मिती? का र्‍हाईन नदीचं पाणीच चढतं? काय गौड्बंगाल आहे कोण जाणे?;) )

चतुरंग

प्रमोद देव's picture

16 Jul 2008 - 10:40 pm | प्रमोद देव

केशवा तुझे 'ई-पाय' धरतो! खल्लास!!

हो. नाहीतर लगेच खेचाल! पाय हो! ;)

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

(स्वगत - रंगा, तुला असे सिलेक्टिव प्रतिसाद द्यायला कधी बरं जमेल? :? )
चतुरंग

वरदा's picture

16 Jul 2008 - 10:16 pm | वरदा

खूप आवडलं विडंबन...
केशवा तुझे 'ई-पाय' धरतो!
असंच म्हणते....
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

ऋषिकेश's picture

16 Jul 2008 - 10:40 pm | ऋषिकेश

खरंच.. अफलातून
तुझ्या पायांचा फोटू स्कॅन करून खरडवहीवर लाव.. जरा रोज नमस्कार करिन म्हणतो ;)

खूप खूप आवडलं हे विडंबन

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

सर्किट's picture

17 Jul 2008 - 2:26 am | सर्किट (not verified)

मुक्तकाचे विडंबन असल्याने पूर्ण सात गुण !

तू जरा मोठा
म्हणून जरा जास्त प्रतिसाद मिळवतोस.
इतकंच!!

असं नाही बरं का ?

आत्ताच पहा ना: इकडे आठ तर "तिकडे" ३ आहेत.

- (मोजणी कारकून) सर्किट

केशवसुमार's picture

17 Jul 2008 - 9:03 pm | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)केशवसुमार

प्राजु's picture

17 Jul 2008 - 9:58 pm | प्राजु

मुक्तकाचे विडंबन... सह्ही बॉस
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

18 Jul 2008 - 12:40 am | विसोबा खेचर

विडंबनातले विचारमंथन आवडले!

तात्या.

स्वगत : साला हा आपला आडनावबंधू आहे म्हणून उगीच जरा 'विचारमंथन' वगैरे मोठे शब्द वापरून प्रतिसाद द्यायचा झालं! :)

केशवसुमार's picture

18 Jul 2008 - 3:31 am | केशवसुमार

तात्याशेठ,
तुमच्या तोंडात शीव्याच ब-या दिसतात.. हे विचार मंथन वगैरे तुम्हाला नाही शोभत.. ते संपादकाचे काम डायर चे नाही
(सपष्ट)केशवसुमार
स्वगत: लेका केश्या प्रतिसादाची वेळ बघ :B .. ह्या वेळेस अस्च बोलतात.. L)