गणराया

kalpana joshi's picture
kalpana joshi in जे न देखे रवी...
10 Sep 2013 - 11:39 am

गणराया

प्रथम नमन तुला गणराया,
दाखवतो तू वाट भक्तांना
आद्य पूजेचा मान तुझा
आवडतो तू आम्हाला ,
संकट काळी धावून येशी,
तुझ्या नामातच गोडवा किती
ॐकाराचे स्वरूप तू,
सर्व जगाचे रक्षण करशी तू
चौशष्ट कलांचा,चौदा भाषांचा तूस्वामी दाता,
बुद्धी ची देवता तू,सुबुद्धी दे आम्हांस,
दुष्टांचा संहार कर,पापांचा नाश कर,
तू सुखकर्ता,तू दु;ख हरता,
विघ्नांचा तू विनाश करतो
प्रसन्नतेचा तू एक आनंद उत्सव,
सर्वाना तू आनंद देतो
मंगलमय वातावरण निर्माण करतोस.
तुझ गूण वर्णन कराया स्फूर्ती येते,
सर्व संकटे घेऊन जाते
तुझ्या दर्शनाने आम्ही पावन होतो.

संस्कृती