मूक आक्रोश

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in जे न देखे रवी...
7 Sep 2013 - 4:20 pm

दिल्लीतील बलात्काराची शिकार झालेल्या "निर्भया"च्या शेवटच्या शब्दांवर आधारित एक कविता सध्या सगळीकडे ऐकू येते आहे. ती इंदू वर्मा यांनी लिहिली आहे. तिचा हा भावानुवाद.

http://www.youtube.com/watch?v=fyrj5tMwjic

आई, त्रास खुप सहन करून
मनाला तुझ्या खुप त्रास देवून
सांगून तुला काही, मी जात्ये आहे....

आज माझ्या पाठवणीला
सख्या भेटायला येतील तेव्हा
सफेद कपड्यात गुंडाळलेली पाहून मला
हमसून हमसून रडतील जेव्हा....
आपल्या स्त्रीपणाचीच त्यांना जेव्हा लाज वाटेल
आई, पाशवी लोकांच्या या दुनियेत
सांभाळून त्यांनी राहावं हेच सांगणं
तुझ्याकडे माझं फक्त एवढंच एक मागणं....

राखीला भाऊ त्याच्या मोकळ्या हाताकडे पाहील
माझ्या आठवणीने त्याच्या डोळ्यात पाणी येईल
भाळी टिळा लावायला आत्मा माझा तळमळेल
आई, भाऊला रडून नको देवूस
अश्रुंनी त्याच्या मी इथे हळहळेल....

आई, बाबाही मुक्याने खुप अश्रु ढाळतील
काहीच करता न आल्याचा स्वतःलाच दोष देतील
आई, वेदना त्यांना तू होऊन देवू नको
आरोप स्वतःवर घेऊन देवू नको
तेच माझा अभिमान
तेच माझा सन्मान
एवढं त्यांना तू सांगशील

आई, तुझ्यासाठी शब्द नाहीत
तुझ्या वेदनेला शब्दात कसं सांगू
पुन्हा एकवार जगण्याचं दान कसं मागू
आई, लोकं तुलाच दोषी ठरवतील
मला स्वातंत्र्य देण्याचा तुलाच ठपका लावतील
आई, सगळं सहन कर पण हे म्हणू नको
"पुढच्या जन्मात मला मुलगीच पोटी नको”

करुणकविता

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

7 Sep 2013 - 4:27 pm | मुक्त विहारि

अक्षरे धुरकट झाली.

पैसा's picture

7 Sep 2013 - 4:42 pm | पैसा

मूळ कविता अतिशय उत्कट आहे. भावानुवाद अत्यंत सुरेख. लोकप्रिय कलाकार अमिताभ बच्चन यांचीही या विषयावरील कविता ऐकली आहे.

यशोधरा's picture

7 Sep 2013 - 5:04 pm | यशोधरा

काय बोलू..?

प्रचेतस's picture

7 Sep 2013 - 5:08 pm | प्रचेतस

सुंदर भावानुवाद.
पण किसनद्येव सध्या लैच सेन्टी मूड मध्ये दिसायलेत.

स्पा's picture

7 Sep 2013 - 5:10 pm | स्पा

किसनद्येव सध्या लैच सेन्टी मूड मध्ये दिसायलेत.

ह्म्म्म

अत्रुप्त आत्मा's picture

7 Sep 2013 - 5:16 pm | अत्रुप्त आत्मा

लैच सेन्टी मूड मध्ये दिसायलेत. >>>>> +२

बाकी अनुवाद छान!

तिमा's picture

8 Sep 2013 - 12:39 pm | तिमा

उत्तम भावानुवाद. आपण सगळेच असहाय्य असल्याची जाणीव तीव्रतेने होते, असं काही वाचल्यावर.

अग्निकोल्हा's picture

8 Sep 2013 - 12:44 pm | अग्निकोल्हा

.

psajid's picture

10 Sep 2013 - 12:06 pm | psajid

खुप सुन्दर भावानुवाद आणि अस्वस्थ करणारे शब्द आणि हुरहूर लावणारा संवाद !