दप्तराचे ओझे कमी करा
कालच एका सामाजिक संस्थेने दप्तराचे ओझे या वर एक सर्वेक्षण करून त्याचे आलेले निष्कर्ष प्रसिध्द केला आणि सर्वांना विचार करायला भाग पाडले. मी ही एक साधा माध्यमिक शिक्षक गेली २२ वर्षे अध्यापनाचे काम प्रामाणिक पणे शिरगाव ( ता. देवगड ) च्या शिरगाव हायस्कूल शिरगाव मध्ये करत आहे. विद्यार्थ्यानी शिकायचे व शिक्षकानी शिकवायचे ही दोन्ही बाजूने चालणारी अखंड क्रिया. आज काल विद्यार्थ्याच्या पाटीवर असणार्या दप्तराचे ओझे इतके जास्त आहे की त्याच्या आरोग्यावर आणि पर्यायाने अध्ययनावर परिणाम होत आहे. या वर काही उपाय मी येथे देऊ इच्छितो. मी सुचव्त असलेले काही उपाय मी माझ्या शाळेत कमी जास्त प्रमाणात अमलात आणत आहे तर काही उपक्रम मी राबवीणार आहे.
१. आजचा जमाना हा माहिती तंत्रज्ञानाचा जमाना आहे. सामान्य व्यक्तीपर्यंत इंटरनेट ची सुविधा वापरली जात आहे. प्रत्येक शिक्षकाने या माहीती तंत्रज्ञानाच्या जमान्यात आपले अध्यापन प्रभावी होण्यासाठी इंटरनेट चा वापर केल्यास होऊ शकते. विद्यार्थ्याला ६ ते १० विषय शिकावे लागतात. ( इयत्ता नुसार संख्या कमी जास्त आहे ) प्रत्येक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यास गृहपाठ सोडवायला देतात. पर्यायाने विद्यार्थ्याच्या दप्तरात गृहपाठाच्या वह्या वर्गपाठाच्या वह्या व पुस्तके असा बोजा असतो. ह्या बोजा पैकी आपण त्याच्या गृझपाठाच्या वह्यांचे ओझे कमी करू शकतो . तसा मी प्रयनही केला आहे व त्याय मला यशही मिळाले आहे. ह्या गृहपाठाच्या वह्या कश्या कमी करायच्या म्हणजेच मी काय केले हे आपणास सांगतो.
मी अध्यापनात संगणकाचा जास्तित जास्त वापर करतो. यातुनच मी इंटरनेट वर मोफत उपलब्द असलेली एक सुविधा म्हणजे ”गुगल ग्रुप” याचा वापर केला. मी गणित व संगणक हे विषय इयत्ता ९ वी व १० वी साठी शिकवतो. प्रथम मी वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याना मेल आयडी काढावयास शिकवले. ( सर्वांचे जी मेल) आणि प्रत्येक वर्गाचा एक गुगल ग्रुप तयार केला उदा. इयत्ता ९ वी अ चा ग्रुप जा shs9amt201112@gmail.com या नावाचा केला. यातील shs म्हणजे शिरगाव हायस्कूल शिरगाव 9a म्हणजे ९ वी अ mt म्हणजे गणित 201112 म्हणजे २०११-१२ या वर्षासाठी अशाच प्रकारचे ग्रुप आपण प्रत्येक इयत्तांचे व विषयांचे करू शकतो. मी माझ्या या ९ वी अ च्या विद्यार्थ्याना गणित गृहपाठाची वही घालायला लावली नाही. मात्र त्याना geogebra हे गणित विषयाचे इंतरनेट वर मोफत उपलब्द असलेले स्वाप्टवेअर वापरावयास शिकवले. ते शिकवीण्यास मला त्रास झाला नाही कारण गणित विषय शिकवताना प्रत्यक्ष मी ते वापरत होतो त्या मुळे त्याना ते ओळकीचे होते. जेव्हा जेव्हा मला त्याना गृहपाठ द्यावयाचा असेल तेव्हा मी तो गृहपाठ सर्व विद्यार्थ्याना गुगल ग्रुप च्या साह्याने मेल ने पाठवत असे. विद्यार्थी आमच्या शालेत असलेल्या सोल प्रकल्पातील संगणक प्रयोगशाळेत जाऊन (शाळा भरण्याचा आगोदर किंवा सुटल्यावर अथवा मधल्या सुट्टीत ) डाऊनलोड करून घेत . आणि त्याच संगणकावर geogebra चा वापर करून सोडवत व परत त्या प्रश्नाची उत्तरे ग्रुप ला मेल ने पाठवत. या मूळे प्रत्येक विद्यार्थ्याचा गृहपाठ पुरण झाल्यावर प्रत्येक विद्यार्थ्याना मेल ने मिळत होता. म्हणजेच विद्यार्थी वर्गात असलेल्या ३७ च्या ३७ विद्यार्थ्याचे गृहपाठ मेल च्या माध्यमाने वाचत असत. वारंवार वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे गृअहपाथ पाहील्या मुळे स्वत;च्या चूका त्यांच्या लक्षात येत असत. व तो घटक त्याचा पक्का होतो. ही गोष्ट वहीत गृहपाठ सोडविल्यामुळे होत नाही. कारण प्रत्येकाचा ग्रुहपाठ फक्त शिक्षक वाचतात आणि तेच तपासतात त्या मुळे सराव होत नाही.
हीच पद्दत जर भाषा विषयाना वापरली तर? खुपच फायदा होईल उदा द्यावयाचे झाले तर मराठी विषयाचा एक निबंध गृहपाठासाठी दिला तर? एका विषयाचे ३० ते ४० निबंध तयार होतिल आणि तो विद्यार्थी ते सर्व ३० ते ४० निबंध गुगल गृप च्या साह्याने मिळणार्याब मेल ने वाचेल आणि त्याला भविष्यात त्या विषयाचा निबंध कधिही लिहायचा झाला तर नक्की चांगला लिऊ शकेल. तसे या सर्व निबंधांचे शिक्षकाने वाचन करून स्वत: एक निबंध लिहिला व तो गृहपाठ पुर्ण झाल्यावर विद्यार्थ्याना पाठविला तर तो त्यांच्या संग्रही राहील. अशा प्रकारचा उपक्रम मी माझ्या शाळेत करत आहे.
२. हे एकत्र गोळा झालेले लेखन साहीत्य उदा. निबंध किंवा पत्र लेखन, उदाहरणे याची जर विकी बनवलीतर? हो हाही प्रयोग मी केला असून मी या विकीच्या साह्याने विद्यार्थ्याना जास्तित जास्त अध्ययनास उपयुक्त पुरक माहीती पुरवत आहे. वीकी ही कोणासही बनवता येते त्या साठी खर्च येत नाही. मी http://www.snattar.pbwiki.com/ या नावाने शाळेतील विद्यार्थ्यासाठी विकी वनवली आहे. या विकीवर मुलानी लिहीलेले निबंध . सुविचार, म्हणी, इंग्रजी व्याकरण, विज्ञान माहीती या प्रकारची माहीती उअप्लोड केली आहे. विद्यार्थ्याना जेव्हा जेव्हा त्या माहीतीची गरज लागते तेव्हा तेव्हा त्या विकी च्या लिंक वर जातात आणि त्या माहीती च्या वापर करतात. या विकी मुळे काही प्रमाणात विद्यार्थ्यांच्या दप्तरात असणार्या् पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त पुस्तकाना सुट्टी देता येते ( निबंधाची पुस्तके, व्याकरणाची पुस्तके, आलेख वही चित्रकला वही ) व ओझे कमी होण्यास मदत होईल.
अशा प्रकारचे अनेक उपाय अवलंबून आपण विद्यार्थ्याची पुस्तके कमी करू शकतो हे माझ्या अनुभवावरून सांगत आहे. गुगल ट्रान्स्लेटर, गुगल बुक, गुगल मॅप, गुगल अर्थ, या सारख्या गुगल्या सुविधांचा ही वापर मी दैनंदीन अध्यापन प्रक्रियेत करत आहे. स्काईप चा वापर करून माझ्या शालेतील विद्यार्थी हे परदेशातील शिक्षकांशी संवाद साधून आपल्या अध्ययनातील अडीअडचणिवर मात करत आहेत. अध्ययनास पुरक वातावरण तयार केल्यास विद्यार्थी स्वत: अध्ययन करू शकतात हे मी माझ्या शाळेत सुरू असलेल्या सोल ( सेल्फ ऑर्गनाइझ लर्निंग इनव्हारमेंट ) या प्रकल्पातून पाहीले आहे. टेड Ted. Com या वेब साईट वरील व्हीडीओ चा वापर करून विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व विकास करण्य़ावर ही ई एक प्रकल्प इयत्ता ५ वी ते ९ च्या विद्यार्थ्यांनवर करत आहे. त्याचे सकारात्मक परींणाम पहायला मिळाले. युट्यब वरील व्हीडीओ चा वापर करून इतिहास किंवा भूगोलातील काही घटक विद्यार्थ्याना सहज शिकवता येतात व ते मी शिकवले आहेत तसेच स्टेलेरियम हे स्वाप्टवेअर वापरून खगोलाची ओळख ही मुलाना मी करून दिली आहे. ग्रहणे, ग्रह, उपग्रह त्यांच्या कक्षा, व इतर अनेक गोष्टी विद्यार्थी या स्वाप्टवेअर चा वापर करून शिकत आहे. अरविंद गुप्ता यांच्या वेब साईट वरील वैज्ञानिक उपकरणे पाहून विद्यार्थ्यानी वैज्ञानिक साहित्याम्ची निर्मिती केली आणि त्याचे प्रदर्शन ही शाळेत भरवले गेल. ७० ते ७५ विद्यार्थ्यानी या प्रदर्शनात भाग घेतला. थोडक्यात या साईट मुळे विद्यार्थ्याना विज्ञानाची आवड निर्माण झाली. याचाच परीणाम म्हणून की काय आमच्या मुलानी टि आय एफ आर ला भेट दिली.
आमच्या शाळेत मी अध्ययन अध्यापन प्रक्रियेत जास्तीत जास्त प्रमाणात संगणकाचा व इंतरनेट चा वापर कसा करता येईल याचा प्रयत्न करत असतो आणि हे सर्व शक्य झाले आहे ते आमच्या संस्थेत उच्चपदांवर काम करणार्या संस्था चालकांमुळे. या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष श्री राजन चव्हाण यानी आपल्या घरातला नवा कोरा संगणक २००० सालात उचलून शाळेला दिला. त्यांच्या कडे व संस्थेतील अन्यपदाधिकार्याचकडे असलेल्या दुरदृष्टी मुळेच आज आमची संगणक प्रयोग शाळा अध्यावत तयार झाली आहे.
शमशुद्दीन नसिरूद्दीन आत्तार
शिरगाव हायस्कूल शिरगाव
मेल पत्ता: snattar1968@gamail.com
प्रतिक्रिया
4 Sep 2013 - 7:43 pm | अनिरुद्ध प
स्तुत्य उपक्रम्,एक शन्का आहे मग प्रत्येक विद्यार्थ्याकडे सन्गणक आहे का?(Laptop).
4 Sep 2013 - 7:55 pm | शनआत्तार
नाही संगणक प्रयोगशाळा सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत उघडी असते मुले आपल्या सवडीने येतात व आपला अभ्यास पुर्ण कत्रतात
4 Sep 2013 - 8:26 pm | डॉ सुहास म्हात्रे
अतिशय कल्पक आणि नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. तो उत्तरोत्तर अधिक विकसित व सबळ व्हावा यासाठी शुभेच्छा !
5 Sep 2013 - 5:57 am | स्पंदना
अतिशय स्त्युत्त उपक्रम, पण संगणक वापरायला तेव्हढा वेळ विज उपल्ब्ध असते का?
आणि दुसर...आळशी मुले नुसत कॉपी पेस्ट करणार नाहीत का?
5 Sep 2013 - 8:10 am | ब़जरबट्टू
आणि दुसर...आळशी मुले नुसत कॉपी पेस्ट करणार नाहीत का?
हा स्वानुभव का काय ताई ? :) :)
5 Sep 2013 - 8:04 am | निवेदिता-ताई
अतिशय छान उपक्रम................ :)
5 Sep 2013 - 9:27 am | चित्रगुप्त
अभिनंदनीय काम करत आहात, आत्तार साहेब.
तुमच्या सिंधुदुर्ग वाल्या लेखात मी दिलेला प्रतिसाद इथे पुन्हा देतो आहे:
अगदी खरे आहे. आपल्या इकडल्या शिक्षणात एक फार मोठी उणीव आहे, ती म्हणजे कला, साहित्य, संगीत इ. विषयी उत्तम संस्कारांची उणीव. मी माझ्या मुलांचे मित्र (आता मोठे झालेले) बघतो, त्यांना उत्तम चित्रकार, संगीतकार, लेखक, कवी इ.ची नावेही ठाऊक नाहीत, त्यांच्या रचना माहित तर असणे दूरच. याउलट युरोप अमेरिकेतील विद्यार्थ्यांना अगदी लहान पणापासून संग्रहालयात नेऊन अनेक प्रकारची माहिती दिली जाते.
चित्रकलेच्या बाबतीत मी मदत करू शकतो, ती म्हणजे उत्तमोत्तम चित्रे निवडून त्याबद्दल थोडी माहिती असलेला एकादा ब्लॉग बनवून तो विद्यार्थांना दाखवता येइल. याच प्रकारे शाळेत भारतीय व पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत थोडावेळ वाजवले, तर तेही त्यांच्या कानी पडेल.
5 Sep 2013 - 12:28 pm | पिलीयन रायडर
तुमची आयडीआ पण मस्त आहे. खरचं असा ब्लॉग तयार करा, सगळ्यांनाच वापरता येईल.
आत्तार सर..
मस्त उपक्रम. शिक्षकदिनाच्या शुभेच्छा!!
5 Sep 2013 - 9:41 am | प्रभाकर पेठकर
चांगला उपक्रम. येत्या आधुनिक काळात संगणक साक्षरता सर्व खेडोपाडीही पोहोचली पाहीजे. शाळेत सकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत संगणक वर्ग सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे ही सुद्धा शाळा चालकांची फार कौतुकास्पद बाब आहे असे म्हंटले पाहीजे.
तुमच्या ह्या उपक्रमास अनेकानेक शुभेच्छा..!
5 Sep 2013 - 10:02 am | संजय क्षीरसागर
अत्यंत कल्पक उपक्रम आहे. तुमच्या या नाविन्यपूर्ण कल्पनेला मनःपूर्वक दाद देतो.
5 Sep 2013 - 12:24 pm | बॅटमॅन
हा अतिशय जबर्या उपक्रम!! आवडल्या गेला आहे. आत्तार सर, लगे रहो. लै शुभेच्छा तुम्हाला!!!!
5 Sep 2013 - 12:54 pm | पैसा
अतिशय उत्तम उपक्रम! एका खेडेगावात हे सगळं करता आहात याबद्दल विशेष अभिनंदन! यामुळे मुलांना संगणकाचीही सवय होत आहे आणि अभ्यासही होतो आहे. वीज नसणे वगैरे अडचणींवर मात करावी लागत असेलच पण हे सगळं वाचून छान वाटलं. असेही प्रयोग मरगळलेल्या शिक्षणक्षेत्रात होत आहेत!
इथे कोणी कोणी मुलांनी वेळ काढण्याबद्दल लिहिले आहे. पण मुले कसाही वेळ काढतात. माझ्या मुलाला संध्याकाळी घरी आल्यावर मैदानी खेळासाठी वेळ हवा असायचा. म्हणून पठ्ठ्याने या गृहपाठावर उपाय शोधून काढला होता, तो म्हणजे एक पीरियड झाला की दुसरे शिक्षक येईपर्यंतचा वेळ, मधली सुटी असा सगळा शाळेतला रिकामा वेळ तो गृहपाठासाठी वापरायचा. :D घरी कोणालाच कटकट नाही! आणि गृहपाठही पूर्ण!
5 Sep 2013 - 1:08 pm | जे.पी.मॉर्गन
आत्तारसाहेब !
_/\_ तुम्हाला! अत्यंत स्तुत्य आणि प्रेरक उमक्रम. हार्दिक अभिनंदन आणि उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा !
जे.पी.
5 Sep 2013 - 2:20 pm | मोदक
अतिशय उत्तम उपक्रम!
5 Sep 2013 - 2:44 pm | क्रेझी
हार्दिक अभिनंदन आत्तार साहेब, अतिशय चांगल्या रितीने तुम्ही तुमचं ज्ञान मुलांच्या शि़क्षणासाठी वापरत आहात *clapping*
5 Sep 2013 - 3:08 pm | एच्टूओ
आत्तार साहेब्...हार्दिक अभिनंदन !! या सम्पूर्ण प्रयोगाची सुरूवात, येणार्या अडचणी आणि त्यावर तुम्ही योजलेले उपाय यावर एखादा लेख लिहाल काय? धन्यवाद!!
5 Sep 2013 - 3:27 pm | Dipankar
खुपच छान,
5 Sep 2013 - 5:55 pm | मुक्त विहारि
लगे रहो...
5 Sep 2013 - 7:14 pm | यशोधरा
तुम्हांला ह्या मुलांसाठी संगणकाची गरज असली तर मी देऊ शकते. माझ्याकडचा जरा जुना आहे, पण मुलांना चालू शकेल. मला व्य नि तून संपर्क करु शकता. चांगल्या अवस्थेतला संगणक, मॉनिटर वगैरे सगळे आहे.
5 Sep 2013 - 7:36 pm | उपास
अभिनंदन अत्तार सर. शिक्षण क्षेत्रात टॅबलेट्सचा वापर सुरु झाला आहेच पण भारत सरकारची स्वस्तात टॅबलेट उपलब्ध करुन देण्याची योजना होती, त्याचं काय झालं माहित नाही पुढे.
पुस्तकांच/ पर्यायाने दप्तरांच ओझं कमी करण हे जरी शिर्षक असलं तरी सदरहू उपक्रमातून बर्याच बर्याच गोष्टी मुलांना करायाला/ अनुभवायाला मिळत असणारच. आता हे सगळं तुम्ही इतर शिक्षकांना समजावून त्यांच्या पचनी पाडून दिलत की मग साखळी अभियान सुरुच :) शुभेछा तुम्हाला शिक्षक दिनानिमित्त आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठीही.
7 Sep 2013 - 8:42 pm | अग्निकोल्हा
.
7 Sep 2013 - 11:15 pm | अत्रुप्त आत्मा
आगे आगे बढते रहो।
शुभेच्छा. :)